The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

परिसा तब्रीज – ‘गुगल’ला हॅकिंगपासून वाचवणारी प्रिन्सेस

by द पोस्टमन टीम
21 June 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


कुणालाही हल्ली छोटासा जरी प्रश्न विचारला तरी उत्तर मिळतं गुगल करून बघ.

गुगलच्याच आकडेवारीनुसार दर सेकंदाला २.३ मिलियन वेळा गुगल सर्च केले जाते. मग दिवसभर गुगलचे सर्वर किती व्यस्त असेल याची कल्पना करा. या प्रत्येक सर्चवेळी गुगल आपल्या युजरचा डाटा सेव्ह करून ठेवत असते. मग गुगलकडे असणारा डाटा किती अफाट असेल याची कल्पना तरी करता येईल का? अशक्यच! इतका मोठा डाटा जर हॅकर्सच्या हाती लागला तर काय होईल. संपूर्ण जग इकडचे तिकडे करण्याची शक्ती या डाटामध्ये आहे. मग इतक्या मोठ्या डाटाचे संरक्षण गुगल कसे करत असेल? प्रश्न तर पडतोच ना, कारण आपली सुरक्षा गुगलच्या सुरक्षेवर अवलंबून आहे.

गुगलने यासाठी सॉफ्टवेअर इंजिनियर्सची एक टीम नियुक्त केली आहे आणि या टीमचे नेतृत्व करते परिसा तब्रीज. 

परिसा तब्रीज हे नाव ऐकून काही जण दचकतील. एवढ्या मोठ्या जोखमीच्या कामासाठी एका महिलेची नियुक्ती? खरे तर जेव्हा परिसाची यासाठी नियुक्ती झाली होती तेव्हा तिलाही या प्रकारच्या अविश्वासाला सामोरे जावे लागले होते. पण, प्रत्येक टप्प्यावर तिने स्वतःला सिद्ध करून दाखवले म्हणून तर आज ती गुगलची सिक्युरिटी प्रिन्सेस आहे. परिसा जे काम करते आहे त्यात धोका आणि जोखीम तर खूप आहे पण, या सगळ्याला यशस्वीपणे पेलण्यास ती सक्षम आहे हे मात्र नक्की!

 गुगलच्या या सिक्युरिटी प्रिन्सेसबद्दल जाणून घ्यायचे आहे का? तर मग हा लेख तुमच्यासाठीच आहे.



हॅकर्सना रोखायचे असेल तर हॅकिंगमधील सगळे बारकावे माहिती असणे गरजेचे आहे. हॅकर्ससारखाच वेगळा विचार करणारा मेंदूही हवाच. हॅकिंग रोखण्यासाठी परिसाच्या नेतृत्वाखालील तीस इंजिनियर्सची टीम अहोरात्र झटत असते. काट्याने काटा काढण्याची म्हण तर तुम्हाला माहिती असेलच. परिसा आणि तिची टीम नेमके हेच काम करत असते. ही टीमच सतत गुगलला हॅक करत असते. हॅकर्स कसा विचार करतील काय शक्कल लढवतील याचा विचार करून हे स्वत:च त्याची अंमलबजावणी करतात. यामुळे गुगलमधले बग तत्काळ काढून टाकण्यात येतात. म्हणून परिसाला “बग किलर” म्हणूनही ओळखले जाते.

तिच्या आणि तिच्या टीमच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच तुमच्या-आमच्यासारख्या अब्जावधी गुगल वापरकर्त्यांचा डाटा सुरक्षित राहतो आहे. एखाद्या असुरक्षित साईटवर जेव्हा आपण सर्फिंग करत असतो तेव्हा तिथे ‘धिस इज अ पोटेन्शिअली हार्मफुल साईट,’ अशी एक सूचना आपल्याला दिसते. ही सूचना देण्याचे कामही परिसाची ही टीमच करत असते.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

गुगलला आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांना हॅकर्सपासून सुरक्षित ठेवणाऱ्या या सिक्युरिटी प्रिन्सेसचे वय फक्त तिशीच्या आसपास आहे. २००७ साली ती इलिनॉय युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएट झाली.

२०१२ साली तिने एक हॅकींग इंटर्न म्हणून गुगलमध्ये काम सुरू केले. पण, अल्पावधीतच तिने आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले. 

परिसाने वेबसाईट डिझायनिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिने आपली स्वतःची साईट बनवली. कित्येक दिवस ही साईट सुरळीत सुरू होती पण अचानकच एक दिवस ती साईट स्लो झाली. साईट स्लो होण्याची कारणे शोधू लागली तेव्हा तिला कळले की आपली साईट हॅक झाली आहे. यासाठी तिला स्वतःला हॅकिंग शिकावे लागले. हळूहळू तिने यातील इतके बारकावे शिकून घेतले की ती हॅकिंग मास्टर झाली. कंप्युटर आणि तंत्रज्ञान विषयात तिला लहानपणापासूनच गती असल्याने परिसासाठी हॅकिंगचे बारकावे शिकणे काही फार अशक्य गोष्ट नव्हती.

गुगलशी जोडल्यानंतर तर तिचे जीवन आरपार बदलून गेले. गुगलने तिला गुगलच्या सिक्युरिटी हेडची पोस्ट दिली. सिक्युरिटी हेडसारखा अरसिक शब्द तिला आवडत नाही म्हणून तिनेच स्वतःला सिक्युरिटी प्रिन्सेस हा शब्द वापरायला सुरुवात केली. आता तर गुगलने तिला आणखी वरच्या पदावर बढती दिली आहे, आता ती स्वतःला ब्राउजर बॉस म्हणवून घेते.

सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या परिसाच्या कुटुंबात मात्र सगळे डॉक्टर आहेत. एकट्या परिसानेच आपल्यासाठी इंजिनियरिंगचे क्षेत्र निवडले. इतक्या मोठ्या आणि जबाबदारीच्या पदावर काम करत असूनही परिसा आपली सामाजिक बांधिलकी विसरलेली नाही. पौंगडावस्थेतील मुलांसाठी समुपदेशन करणे, स्त्रियांना आणि अशाच समाजातील दुबळ्या वर्गासाठी ती काम करते. विशेष पुरुषी समजल्या गेलेल्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठीही ती समुपदेशन केंद्र चालवते.

परिसाने आज अत्युच्च टोकाचे यश मिळवले आहे. मात्र तिचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. प्रत्येक टप्प्यावर तिला स्वतःला सिद्ध करावे लागले.

वेबसाईट सिक्युरिटी हेही आजपर्यंत पुरुषांची मक्तेदारी असलेले क्षेत्र होते पण परिसाने दाखवून दिले की या क्षेत्रात महिलाही चांगले काम करू शकतात.

तिच्या महिला असण्याविषयीही तिला बरेचदा बरेच काही ऐकून घ्यावे लागले आहे. इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या पदावर महिला असणे हे आजही अनेकांच्या पचनी पडत नाही.

२००७ साली पहिल्यांदा जेव्हा ती गुगलला जॉईन झाली तेव्हा तिच्या काही मित्रांनीच “तू मुलगी आहेस म्हणून तुला ही संधी मिळाली” अशी टिप्पणी केली होती. एका मुलाखतीत बोलताना तिने स्वतःच ही माहिती दिली होती. अर्थात, अशा लिंगभेद करणाऱ्या कुचकत टोमण्यांना तिने भिक घातली नाही म्हणून तर ती इतके मोठे यश मिळवू शकली. प्रत्येक टीकेला ती आपल्या कामातूनच उत्तर देते, हीच तिची खास शैली आहे.

या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी ती लेक्चर्सही घेते. तिची शिकवण्याची पद्धतही तिच्या कामाच्या पद्धतीप्रमाणे अगदी हटके आहे.

गुगलच्या सुरक्षिततेची जोखीम लीलया पेलणाऱ्या या सिक्युरिटी प्रिन्सेसबद्दल आणि तिच्या कामाबद्दल वाचल्यानंतर तिच्याबद्दलचा आदर द्विगुणीत होतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सतरा वर्षाचा ‘विली’ दोनवेळा मृत्युदंडाला सामोरा गेला होता..!

Next Post

ज्या बेटावरून श्रीराम लंकेवर चाल करून गेले होते ते बेट कॉंग्रेसने श्रीलंकेला देऊन टाकलं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

ज्या बेटावरून श्रीराम लंकेवर चाल करून गेले होते ते बेट कॉंग्रेसने श्रीलंकेला देऊन टाकलं

स्कॉटलंडने विनंती केली आणि राहुल द्रविड स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय मॅच खेळला..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.