The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शोएब अख्तर ते आंद्रे रसेल, ही आहे क्रिकेटमध्ये बंदी घातल्या गेलेल्या क्रिकेटर्सची यादी

by द पोस्टमन टीम
4 July 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


क्रिकेट हा ‘जेंटलमेन्स गेम’ म्हणून ओळखला जातो. पण आज या खेळाचे रूप पालटले आहे. मॅच फिक्सिंग, क्रिकेटसाठी लागणारा सट्टा, नशेबाजी यांसारख्या कारणांमुळे क्रिकेटप्रेमीच नाही तर अनेकदा क्रिकेटपटूही आरोपाच्या जाळ्यात फसले आहेत. काही जणांवर तर आयसीसीने खेळण्यावरच बंदी घातली.

हा लेख अशाच काही क्रिकेटपटूंवर आहे, ज्यांच्यावर घातलेल्या बंदीमुळे त्यांचे क्रिकेट करिअरच संपुष्टात आले.

मोहम्मद आसिफ

पाकिस्तानचा मोहम्मद आसिफ त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जात होता. पण त्याच्या खेळापेक्षाही तो त्याच्या विवादास्पद कृत्यामुळेच जास्त चर्चेत राहिला.

आसिफची स्टीरॉइड चाचणी पॉझिटिव्ह आली तेव्हा क्रिकेट मंडळाने त्याला शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आणखी काही वर्षांनीही तो स्टीरॉइड चाचणीत दोषी आढळला होता.



पुन्हा त्याच्यावर काही वर्षांसाठी बॅन लावण्यात आला. दुबईत असताना तर आसिफकडे ड्र*ग सापडले होते. इथे त्याला तुरूंगवारीही करावी लागली.

पुढे तर असिफ मॅच-फिक्सिंगमध्येही दोषी आढळून आला. २०१० साली लॉर्डस मैदानावर झालेल्या सामन्यात त्याने मुद्दामहून नो-बॉल टाकला होता. त्याचा हा गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याच्यावर पुन्हा पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली.

एस. श्रीसंत

आयपीएलने क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंचे करिअर बनवले. त्याच आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग केल्याच्या कारणावरून श्रीसंतचे पूर्ण करिअर धुळीस मिळाले. २०१३ साली झालेल्या आयपीएलमध्ये श्रीसंतने स्पॉट फिक्सिंग केल्याचे उघड झाले. श्रीसंतवर जे काही आरोप लावण्यात आले ते न्यायालयातही सिद्ध झाले. श्रीसंतने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी खूप धडपड केली पण त्याचे प्रयत्न वाया गेले. यानंतर क्रिकेट मंडळाने श्रीसंतच्या खेळण्यावर बंदी घातली. क्रिकेट मंडळाने आपला हा निर्णय बदलावा म्हणूनही श्रीसंतने खूप रदबदली केली पण त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

आंद्रे रसेल

२०१७ च्या डोपिंग चाचणीत आंद्रे रसेल दोषी आढळला. तसा तर आंद्रे ऑल राउंडर खेळाडू म्हणून ओळखला जातो. म्हणूनच वेस्टइंडीज संघासातील तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे.

पण, या एका डोपिंग टेस्टमुळे आंद्रेची प्रतिमाच बदलून गेली. यामुळे आंद्रेवर देशांतर्गत क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट अशी दोन्ही सामन्यांत खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती.

२०१७ ते २०१८ या एका वर्षाच्या कालावधीसाठी त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. आता मात्र रसेल पुन्हा मैदानावर परतला आहे. त्याला तुम्ही आयपीएल खेळताना पाहिलं असेलच.

मोहम्मद अझरूद्दीन

अझरूद्दीनचे हे प्रकरण तर खूपच गाजले होते. अझरूद्दीनवर लावण्यात आलेल्या या आरोपांमुळे त्याला कायमचेच क्रिकेटपासून दूर व्हावे लागले. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अझरने ११ वर्षे न्यायालयाची पायऱ्या झिजवल्या. २००० साली अझर आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर होता. पण, त्याचवेळी तो मॅच फिक्सिंग केल्याच्या आरोपात अडकला गेला. कराची येथील सामन्यात त्याने मॅच फिक्सिंग केल्याचा त्याच्यावर आरोप होता. २०१२ मध्ये हैद्राबाद न्यायालयाने अझरवरील ही बंदी हटवली. आज अझर हैद्राबाद क्रिकेट संघाचा अध्यक्ष आहे.

लोनवाबो सोत्सोबे

लोनवाबो सोत्सोबे दक्षिण आफ्रिकेचा एक महत्त्वाचा गोलंदाज. त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप लावण्यात आला. २०१७ साली सोत्सोबेने स्वतः आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. वरून तो असेही म्हणाला की मी प्रत्यक्षात फिक्सिंग केली नव्हती पण मी त्या विचारात होतो. त्याच्या या कबुली जबाबानंतर तर त्याला दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळाने त्याच्यावर आठ वर्षांसाठी क्रिकेट बंदी घालण्यात आली आहे.

शोएब अख्तर

पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर आणि विवाद यांचे तर नाते खूप जुने आहे. शोएब नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने विवादात अडकला आहे. १९९९ मध्ये पहिल्यांदा त्याच्यावर बंदी घालण्यात आली. त्याची बॉलिंग ॲक्शन क्रिकेट नियमात बसणारी नव्हती. क्रिकेटच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याला या बंदीचा सामना करावा लागला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा शोएब नियम उल्लंघनाच्या कारणावरूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला यावेळीही त्याला कसोटी क्रिकेट खेळण्याची बंदी घालण्यात आली. शिवाय त्याच्यावर ५०,०००चा दंडही ठोठावण्यात आला.

२००१ मध्ये पुन्हा एकदा चुकीच्या बॉलिंग ॲक्शनसाठी बंदी घातली गेली. २००२ मध्ये स्टेडियममधील प्रेक्षकांच्या दिशेने पाण्याची बाटली फेकल्याने त्याला एकदिवसीय क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली गेली.

त्यानंतरही बॉल कुरतडलल्याच्या आरोपावरून एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली. २००७ साली त्याने शिस्तभंग केली म्हणून दोन वर्षाची बंदी घालण्यात आली. २००८ मध्ये त्याने पाकिस्तान क्रिकेट संघाबद्दल काही अपमानजनक वक्तव्ये केली मानून त्याच्यावर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. एकूणच शोएबची क्रिकेट कारकीर्द एकदम वादग्रस्त राहिली आहे.

२०१८ साली क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉल टेम्परिंगच्या केसमध्ये ऑस्ट्रेलियाचा कप्तान स्टीव्ह स्मिथ आणि उपकप्तान डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची आणि कॅमेरून बेन्क्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातली होती.

क्रिकेटमध्ये आता या गोष्टी काही फार नव्या रहिल्या नाहीत. काही खेळाडूंच्या अशा वागण्यामुळे क्रिकेटक्षेत्र काहीसे बदनाम झाले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सुट्या पैशांऐवजी दिल्या जाणाऱ्या पल्स कॅण्डीचा टर्नओव्हर ऐकून तोंडात बोट घालाल..!

Next Post

अवघ्या ८ अमेरिकन सैनिकांनी १३ तास किल्ला लढवून आपल्या नागरिकांचं रक्षण केलं होतं

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

अवघ्या ८ अमेरिकन सैनिकांनी १३ तास किल्ला लढवून आपल्या नागरिकांचं रक्षण केलं होतं

अघोरी साधूंबद्दल आपल्याला माहित असलेल्या निम्म्या गोष्टी अफवा आहेत..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.