The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

करोडो रुपये खर्चून प्लेअर्स विकत घेणाऱ्या आयपीएल टीम कमाई कशी करतात..?

by द पोस्टमन टीम
22 April 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


गेल्या काही दिवसांपासून भारतात सार्वत्रिक निवडणुका आणि आयपीएलचं वारं वाहतंय. IPL. भारतातील क्रिकेटप्रेमींसाठी आपले आवडते खेळाडू एकत्र खेळताना बघण्याची पर्वणीच!

यंदा चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या मॅचने आयपीएलची सुरुवात झाली. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या दाही टीमच्या मालकांनी फक्त खेळाडूंना विकतच नाही घेतलं तर त्यांचं ट्रेनिंग, त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था, इतर सुविधा या सगळ्यातच पाण्यासारखा पैसा ओतलाय.

पण, या सगळ्यांवर एवढा पैसा खर्च करणाऱ्या या आयपीएलच्या टीमची कमाई कशी होत असेल? हा प्रश्न तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना पडत असेल. आजच त्याचंच उत्तर जाणून घेऊया.

२००८ साली आयपीएलची सुरुवात झाली. त्यावेळी आठ शहरातील मोठमोठ्या हस्तींनी या टीम आपल्या नावे केल्या. या टीमची फ्रॅन्चाईझी घेण्यासाठी त्यांनी बीसीसीआयने मोठी रक्कमदेखील चुकावली होती.

यानंतर बीसीसीआयने खेळाडूंवर बोली लावायला सुरुवात केली. प्रत्येक टीम जास्तीत जास्त २५ खेळाडूंना विकत घेऊ शकते, ज्यात भारताबरोबरच विदेशातील खेळाडूंचा देखील समावेश असतो.



तर, आयपीएलच्या संग्रामात उतरणाऱ्या या टीमकडे कमाईचे वेगवेगळे मार्ग असतात. जसं की, जाहिराती, वेगवेगळे पुरस्कार जाहीर होतात त्याची आणि टीमच्या सामानांचा लिलाव.

जाहिराती किंवा स्पॉन्सर

आयपीएलमधे खेळणाऱ्या या टीम्सना वेगवेगळ्या कंपन्या स्पॉन्सर करत असतात. त्या कंपनीची जाहिरात या टीम आपल्या टी-शर्ट्सवर वगैरे करून त्या बदल्यात कंपनीकडून पैसे घेतात. एका टी-शर्टवर अनेक कंपन्यांच्या जाहिराती असतात. आता कंपनीचा लोगो कुठे प्रिंट करण्यात आला असेल यावरून त्याची किंमत ठरत असते. याशिवाय इतरही वस्तूंवर देखील लोगो छापण्यात येतो.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

या टीम्सच्या कमाईचा हाच मुख्य स्त्रोत असतो. जेवढी मोठी टीम तेवढे स्पॉन्सर जास्त आणि साहजिकच त्या टीमची कमाई पण.

तिकिटांतून होणारी कमाई-

आयपीएलमध्ये होणाऱ्या साखळी सामन्यात सात मॅच एखाद्या टीमच्या होमग्राउंडवर खेळल्या जातात तर सात बाहेर. आता ज्या टीमच्या होमग्राउंडवर हे सामने होतील त्या टीमला ते पैसे मिळतात.

मिडीया राईट्स

या टीम्सच्या मुख्य कमाईचा अजून एक स्त्रोत म्हणजे मिडीया राईट्स अर्थात ब्रॉडकास्टिंगचे अधिकार. म्हणजेच कुठल्या चॅनेलवर आयपीएल दाखवली जाईल. सध्या तरी हे व्हायकॉम 18 कडे आहे. आपल्या चॅनेलवर मॅच दाखवू देण्याच्या बदल्यात व्हायकॉम 18 कडून बीसीसीआयला काही ठराविक रकम दिली जाते.

२०१८ साली स्टारने तब्बल १६ हजार करोडहून अधिक रकम देऊन हे राईट्स आपल्याकडे घेतले. याच रकमेतील काही हिस्सा टीम्सला देखील दिला जातो.

आता जी टीम जास्त टिकून राहते तिचा तेवढाच फायदा जास्त होतो. आजकाल सगळेच ऑनलाईनकडे जास्त वळले आहेत त्यामुळे बीसीसीआयकडून ब्रॉडकास्टिंगचे ऑनलाईन अधिकार पण विकले जातात. सध्या तरी हे अधिकार देखील व्हायकॉम 18 कडेच आहेत. यामुळेच जिओ सिनेमावर आपल्याला आयपीएल बघता येते.

पुरस्कार राशी

प्रत्येक टीमला आपल्या एकूण आयपीएलच्या सामन्यांत केलेल्या परफॉर्मन्सनुसार रँकिंग दिलं जातं आणि त्याच अनुषंगाने काही रकम दिली जाते. साहजिकच विजेत्या टीमला जास्त धनराशी दिली जाते आणि शेवटचा नंबर आलेल्या टीमला कमी.

आयपीएल जिंकणाऱ्या टीमला यंदा तब्बल १० करोडची धनराशी मिळेल. २०१९ साली ही रकम २० करोड होती पण गेल्या वर्षभरात कोरोनाने घातलेल्या धुमाकुळामुळे ही रकम कमी करण्यात आली आहे.

टीमच्या सामानाची विक्री (टीम मर्चंडाइज)

हे सगळं काय कमी होतं की आयपीएलच्या या टीम्सचे मालक वेगवेगळे मर्चांडाइज विकतात आणि त्यातूनही आपापले खिसे भरण्याचं काम करतात. जी टीम जेवढी लोकप्रिय तेवढे त्याचे मर्चंडाइज जास्त विकले जातात.

तर, अशाप्रकारे आपली आवडती टीम त्यांचा गुजारा करत असते. हा लेख कसा वाटला ते आणि आयपीएलमधे तुमची आवडती टीम कोणती हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

नेहरूंनी तीन मूर्ती भवनाचा बगीचा उखडून तिथे शेती केली होती

Next Post

एक पुस्तक वाचून फक्त ७२ दिवसांमध्ये या महिलेने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली होती

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

एक पुस्तक वाचून फक्त ७२ दिवसांमध्ये या महिलेने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली होती

ज्या राजाला मुघल व सुलतानी सैन्य हरवू शकले नाही त्याचा पोटच्या मुलानेच घात केला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.