The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भटकंती – भारताच्या संपन्न इतिहासाचा भग्न साक्षीदार हम्पी

by द पोस्टमन टीम
17 May 2025
in भटकंती, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दक्षिण भारतातील विजयनगर या प्राचीन राज्यतलं एक छोटसं गाव, हम्पी. हे गाव जगाच्या नकाशावर ठळकपणे झळकतं ते भारताच्या इतिहासाचा संपन्न साक्षीदार म्हणून. वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळवलेलं हे सुंदर गाव एखाद्या चित्रकारानं तल्लीनतेनं चित्र रेखाटावं असं आहे.

मध्यकालीन हिंदू राजवटीतील विजयनगरची राजधानी असणारं तुंगभद्रा नदीकाठचं हम्पी आजही आपले अवशेष सांभाळून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. हे अवशेष बघूनच या गावाची त्या काळातली संपन्नता लक्षात येते. आज वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळालेलं हम्पी समृध्द परंपरेची साक्ष देणारं आहे.

या प्राचीन शहराचा उल्लेख रामायणातही आढळतो. इतिहासाकारांच्या मते पूर्वी हम्पीला ’किष्किंधा’ या नावानं ओळखलं जायचं.

तेराव्या ते सोळाव्या शतका दरम्यान हम्पी विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखलं जायचं. आजही भग्नावस्थेतील हम्पीमध्ये अनेक मंदिरं आणि महाल आढळतात, याच कारणामुळेच हम्पी जगभरातल्या भटक्यांचं आवडतं शहर आहे. २०१४ च्या गुगलच्या आकडेवारीनुसार हम्पी हे गुगलवर सर्वांत जास्त सर्च केलं गेलेलं कर्नाटकातील पर्यटनस्थळ आहे.

हम्पीच्या इतिहासात डोकावायचं तर अगदी पहिल्या शतकापर्यंत मागे जावं लागेल. याठिकाणी आढळलेल्या शिलालेखानुंसार सम्राट अशोक याच्या साम्राज्याचाही हम्पी हिस्सा होतं. कालांतराने हिंदूंचं सर्वांत विशाल साम्राज्य म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या विजयनगर साम्राज्याची राजधानी बनण्याचा मान या सुंदर शहराला मिळाला.



आज हम्पीत जी काही स्मारकं शिल्लक आहेत, त्यातील बहुतेकांचं बांधकाम राजा कृष्णदेवराय यानं केलं आहे. सन १५०९ ते १५२९ या कालखंडात हम्पीवर कृष्णदेवराय यांची राजवट होती. याच कृष्ण्देवरायांच्या दरबारात तेनालीराम होता. या दोघांच्या चातुर्यकथा आजही आवडीनं वाचल्या, सांगितल्या जातात.

विजयनगरच्या वैभवशाली कालखंडात इटली, इराण, पोर्तुगाल या ठिकाणाहून आलेल्या मुसाफ़िरांनी भेट देऊन या शहराचं भरभरून कौतुक केलं. हे एक ऐश्वर्यप्रधान शहर असल्याचं त्यांनी नोंदवून ठेवलं.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

हम्पीतल्या विरूपाक्ष मंदिराबाहेर चक्क उघड्यावरच हिर्‍यांची बाजारपेठ भरत असे आणि या बाजारात जगभरातून लोक हिरे खरेदीसाठी येत असत, असे सांगितले जाते.

प्राचीन विजयनगर साम्राज्यात आजची कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश ही तीन राज्यं येत असत. त्या काळातली विजयनगरची लोकसंख्या होती ५ लाख. कृष्णदेवरायांनंतर १५६५ साली झालेल्या तालीकोटा यु*द्धात या वैभवशाली नगरचा वि*ध्वंस झाला. एका बाजूला विजयनगरी राज्य तर दुसर्‍या बाजूला मुस्लिम राज्यांचा संघ (बीदर, विजापूर, गोवळकोंडा, अहमदनगर) असं हे यु*ध्द झालं. या यु*द्धात मुस्लिम सेनेनं विजयनगरची प्रचंड नासधूस केली. मुस्लिम आक्र*मणात हिंदुस्थानातील अनेक मंदिरं, महालं जमीनदोस्त करून प्राचीन स्थापत्यशास्त्र नामशेष केलं गेलं त्याला विजयनगरही अपवाद नाही. या यु*द्धात विजयनगर साम्राज्याचा नाश झाला. या आक्र*मकांनी अक्षरश: या शहराला आग लावून त्याची राख करून टाकली.

असं सांगतात की, यु*द्धानंतर सहा महिने या शहराची लूट चालूच राहिली. इथल्या भव्यदिव्य राजमहालाला जमीनदोस्त करण्यात आलं. त्याच्या सर्व खुणा मिटवल्या गेल्या.

आजही या महालाच्या अवशेषांच्या शोधात अनेक आर्किओलॉजिस्ट याठिकाणी येत असतात.

असं मानलं जातं की हा संपूर्ण महाल जमिनीत गाडला आहे आणि योग्य ते खोदकाम झालं तर आजही हा महाल जमिनीखालून वर काढता येईल. अबदुर्र्ज्जाक हा फ़ारसी पर्यटक १४४२-१४३ दरम्यान या ठिकाणी भ्रमंती करत आला होता. तो लिहितो की या साम्राज्यात इतकं सोनं आहे की राजमहालाचे खांबही सोन्यानं भरलेल्या खड्ड्यात रोवले आहेत. या राज्यात राहणारा सामान्य माणूसही अंगाखांद्यावर सोन्याची आभुषणं मिरवतो.

डोमिंगोज पीजू हा एक पोर्तुगाली पर्यटक होता आणि त्यानं विजयनगरवर विस्तारानं लेख लिहिला आहे. तो लिहितो की, हम्पी हे जगातील सर्वात संपन्न असं राज्य आहे. या राज्यात अनेक जातीधर्माचे लोक रहातात कारण याठिकाणी विविध गोष्टींचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. या राज्याकडे ऐश्वर्य तर आहेच पण बलशाली सेनाही आहे. सैन्यात मोठ्या प्रमाणात हत्ती आहेत कारण ते मुबलक प्रमाणात याठिकाणी मिळतात.

हम्पीला रामायण कालखंडात पम्पा किंवा किश्किंधा या नावांनी ओळखलं जात असे. अकराव्या शतकात बांधल्या गेलेल्या हम्पी देवीच्या मंदिरामुळे शहराला हम्पी या नावानं ओळखलं जाऊ लागलं.

प्राचीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेलं हे शहर आजही अनेकांना चकीत करतं. तुंगभद्रेचं विशाल पात्र लाभलेल्या हम्पीमध्ये अनेक तलावही आहेत. काही निसर्गनिर्मित तर काही विजयनगरच्या राज्यकर्त्यांनी बांधलेले. यातून या राजांचं नगरनियोजनाचं कौशल्य दिसून येतं. या शहरातील पंधराव्या शतकात बांधले गेलेले जलसेतू, कॅनॉल हे त्या कालखंडातील जलप्रबंधन प्रणालीची झलक देतात.

आजचं हम्पी हे दोन विभागात उभं आहे. इथली मंदिरं तीर्थयात्रेकरूंचा जिव्हाळ्याचा भाग आहे तर, विजयनगर साम्राज्याचे पुरावे देणारा महालांचे भग्नावशेष असणारा पर्यटकांचा आवडता भाग यांचा समावेश आहे.

तुम्हाला जर सगळं हम्पी बघायचं तर किमान तीन दिवस तरी द्यायलाच हवेत. डोंगर कपारी आणि हिरवळीत पसरलेल्या हम्पीत सोळाशेहून अधिक मंदिरं, महाल आणि प्राचीन इमारती आहेत. याठिकाणी असलेलं विरूपाक्ष मंदिर हे सातव्या शतकातलं बांधलेलं असून आजच्या घडीपर्यंत त्याठिकाणी एकही दिवसाचा खंड न पडता पूजा होते. यातीलच एका भिंतीवर संसदेत स्थानापन्न झालेलं ‘सेंगोल’ महादेवाच्या हाती असल्याचं दाखवलंय.

हम्पीच्या आजूबाजूला असणार्‍या ग्रॅनाईटच्या डोंगरांचा जगात अस्तित्वात असणार्‍या सर्वांत जुन्या दगडांत समावेश होतो. अक्षरश: करोडो वर्षांपासून ही डोंगरं इथे उभी आहेत मात्र इतकी वर्ष हवापाणी, वादळ वारा झेलत उभी राहिल्यानं कोणे एकेकाळी महाकाय पर्वत असणारे आता ते तुलनेनं आकारानं लहान डोंगर बनले आहेत. यापैकी अनेक डोंगर म्हणजे एकावर एक रचले असलेले दगड आहेत.

हिंदू पुराणकथांनुसार याठिकाणी आधी वानर साम्राज्य होतं. आजही या पौराणिक जनतेचे वंशज मंदिरांवरून, डोंगर, झाडांवरून धुमाकुळ घालत फ़िरत असतात. या परिसरात साधारण पाचशेहून अधिक मंदिरं आहेत. यापैकी विठ्ठल मंदिराची रचना फ़ार सुरेख आहे.

भल्या मोठ्या दगडावर केलेलं नाजूक नक्षीकाम बघून त्या काळातल्या कारागीरांच्या कौशल्याचा अंदाज येतो. प्रचंड मोठ्या रथाचं रूप असणारं गरूड मंदिरही असाच एक पुरातन स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे.

असं म्हणतात की हम्पीतल्या प्रत्येक दगडात कथा लपली आहे. एका मंदिरात संगीतमय खांब बघून ब्रिटिशांनाही आश्चर्य वाटलं होतं. खांबांच्या आत काही वाद्यं लपवलेली असावीत असा त्यांना संशय होता. हा संशय दूर करायचा म्हणून त्यांनी काही खांब तोडून खातरजमाही करून घेतली. आजही हे तोडलेले खांब तसेच उभे आहेत. मंदिर परिसरात कोणे एकेकाळी घोडे बाजार भरत असल्याचा पुरावा देणारे आडवे रॉड आजही आहेत. या ठिकाणच्या दगडांमध्येही तसं कोरीव काम केलेलं आहे.

असं म्हणतात की हम्पी हे रोमपेक्षाही समृध्द शहर होतं. याठिकाणी जे भग्नावशेष आहेत त्यावरून हे अगदी सिध्द होतं की भरभराटीच्या काळात याठिकाणी कलाकारांकडून वास्तुकला, चित्रकला, मूर्तीकला यांची एक शैली विकसीत करण्यात आली होती. अनेक सुंदर मंदिरांनी हे शहर व्यापलेलं आहे म्हणूनच याला मंदिरांचं शहर या नावानंही ओळखलं जातं.

भारताचा वैभवशाली इतिहास सांगणाऱ्या या शहराला एकदा तरी भेट द्यावीच!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या माणसाने आपण जिवंत आहोत हे सिद्ध करायला थेट पंतप्रधानांविरोधात निवडणूक लढवली होती

Next Post

आजही VVS लक्ष्मण भारतासाठी ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’च आहे आणि पुढेही राहील

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
Next Post

आजही VVS लक्ष्मण भारतासाठी ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’च आहे आणि पुढेही राहील

जॅक डॅनिएल्स विस्की 'जॅक'ने नाही तर त्याच्या गुलामाने बनवली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.