The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगात कितीही राडे झाले तरी स्वित्झर्लंड त्यात का पडत नाही..?

by द पोस्टमन टीम
3 May 2025
in भटकंती, इतिहास, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जगभरातील पर्यटकांच्या आवडीचा देश म्हणजे स्वित्झर्लंड. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या देशातील जास्तीतजास्त स्थळांचा समावेश होतो. लोकशाही शासनव्यवस्था असलेला स्वित्झर्लंड हा एक शांतीप्रिय देश आहे. या देशाच्या सीमा आजही सर्वांसाठी खुल्या असतात. कोणत्याही एकाच संस्कृतीला, भाषेला, चिकटून न राहण्याच्या धोरणामुळे एकाच देशात आजही विविध संस्कृती गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे पाहायला मिळते.

या देशात जर्मन, फ्रेंच, इटालियन आणि रोमन अशा चार भाषा बोलल्या जातात. शिवाय या मुख्य भाषांच्या अनेक बोली भाषाही आहेत. हा देश तटस्थ राष्ट्र म्हणून ओळखला जातो. या देशाचे सौंदर्य अबाधित राहण्यास हे तटस्थतेचे धोरणच कारणीभूत आहे.

स्वित्झर्लंडच्या या तटस्थतेने या देशाला नेमके काय दिले, जाणून घेऊया या लेखातून.

हा देश यु*द्धविरोधी आहे म्हणून इथल्या इतिहासाची अगदी खरीखुरी साक्ष पटते. स्वित्झर्लंडने कुठल्याच यु*द्धात कोणत्याही देशाच्या वतीने भाग घेतला नाही. त्यामुळे या देशात तुम्हाला कुठेही बॉ*म्बह*ल्ल्याच्या खुणा, परकीय आक्र*मणाच्या खुणा दिसणार नाहीत. त्यामुळे इथले ऐतिहासिक संपत्ती आजही जशीच्या तशी जतन केलेली आहे. इथल्या ऐतिहासिक वस्तूंची मोडतोड झाल्याचे दिसत नाही. इथल्या ऐतिहासिक इमारती इतिहासाची अचूक साक्ष देतात.



तटस्थ राहण्याचे फायदे काय असतात हे सांगणाऱ्या अनेक खाणाखुणा इथे आढळतात.

स्वित्झर्लंडच्या कुठल्याही गावात गेलात तर तिथल्या ऐतिहासिक वस्तू तुम्हाला जशाच्या तशा उभ्या असलेल्या आढळतील. त्यामुळे इथला इतिहास तुम्हाला सहज दिसतो.

या देशातील शहरे पाहिल्यावर आपण पऱ्यांच्या शहरात तर आलो नाहीत ना असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

बर्न हे स्वित्झर्लंडमधील सर्वांत जुने शहर. या शहारात जागतिक वारसा स्थळात नोंद केलेल्या अनेक ऐतिहासिक आणि पुरातन वस्तू, इमारती पाहायला मिळतात. १५३० साली बांधलेला क्लॉक टॉवरही इथे पाहायला मिळतो.

स्वित्झर्लंडच्या तटस्थ भुमिकेबद्दल माहिती असणारे खूप कमी लोक आहेत. इथे आल्यावर जेव्हा त्यांना स्वित्झर्लंडच्या या तटस्थ धोरणाबद्दल माहिती मिळते तेव्हा खरोखरच त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. कारण, स्वित्झर्लंड पूर्वी यु*द्धात भाडोत्री सैन्य पाठवत असे. पण सतत दुसऱ्या देशांवर यु*द्ध लादणाऱ्या भांडखोर देशाला कधीच त्यांनी सैनिक दिले नाहीत. स्वित्झर्लंडकडे भाडोत्री सैन्य देण्याची व्यवस्था असली तरी हे सैन्य कुठल्या देशाला आणि केव्हा द्यायचे याबद्दल त्यांचे काही नियम आहेत. स्विस गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर तुम्हाला हे नियम पाहायला मिळतील.

पर्यटकांना भुरळ घालणारा हा देश एकीकडे प्रगत देशांत गणला जात असला तरी इथे काही अशीही खेडी आहेत ज्यांनी स्वतःहून वीज जोडणी नाकारली आहेत. कारण त्यांना साधे जीवन जगायचे आहे. दक्षिण स्वित्झर्लंडमधील या ग्रोट्टो गावात चारी बाजूला हिरवेगार डोंगर पाहायला मिळतात. आजही इथे दगडी इमारती आहेत. स्वित्झर्लंडमधील हे सर्वांत जुने शहर असावे, बहुतेक.

स्वित्झर्लंडच्या सीमेतून आत प्रवेश करणे फारसे कटकटीचे काम नाही. या सीमा तुम्हाला मैत्रीपूर्ण निमंत्रण देत असतात. हा देश म्हणजे शांततापूर्ण सहवासाचा एक आदर्श प्रतिक आहे असे वाटते. देशातील वेगवेगळ्या भागात जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा तुम्हाला असे वाटेल की आपण चार वेगवेगळे देश फिरतोय.

तुम्ही टीसीनोला गेलात तर तुम्हाला वाटेल तुम्ही इटलीमध्ये आहात, झ्युरीकला गेलात तर वाटेल जर्मनीत आहात आणि जिनिव्हाला गेला तर वाटेल फ्रांसमधे आहात आणि ग्रीसंसमध्ये असताना तुम्हाला प्राचीन रोमन साम्राज्यात गेल्याचा भास होईल.

स्वित्झर्लंड हा एक तटस्थ देश आहे हे आधीच नमूद केले. तो कोणत्याच देशाच्या बाजूने किंवा विरोधात उभा राहत नाही. असे असले तरी कधीकाळी हाच स्वित्झर्लंड एक मार्सिनरीज म्हणजे भाड्याने सैन्य पुरवणारा देश होता.

या देशात अनेक आदिवासी टोळ्यांनी, बाहेरच्या देशांनी इथून आल्प्स पर्वताकडे जाणारा मार्ग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. स्विसला देखील संघर्षाचा आणि यु*द्धाचा इतिहास आहे आणि हा इतिहास तटस्थ नाही हे मात्र खरे.

स्वित्झर्लंडचा मध्ययुगीन इतिहास पाहिल्यास स्वित्झर्लंडने तेव्हाही अनेक यु*द्धात भाग घेतला होता. त्याकाळी स्वित्झर्लंडने अनेक यु*द्धांत विजय मिळवला होता. त्यांची यु*द्धपद्धती इतकी पुढारलेली होती की पुढे त्यांनी याला व्यवसायाचे स्वरूप दिले. त्यावेळी असा व्यवसाय करण्यामागे काही आर्थिक कारणेही होती. मध्ययुगीन काळात स्वित्झर्लंड खूप गरीब देश होता. त्यांच्याकडे ना मोठ्या प्रमाणावर शेती करण्याची सोय होती ना समुद्र किनारा लाभला, त्यामुळे व्यापार करण्याचीही सोय नव्हती. तेव्हा त्याकाळी त्यांना एकच व्यवसाय फायदेशीर वाटला आणि तो म्हणजे सैन्य भाड्याने देणे.

कुठल्याही यु*द्धात स्विस सैनिकांना विजय मिळतच असे, त्यामुळे त्यांच्या सैन्याला मागणीही होती. त्यांच्या सैनिकांचा पराभव होईपर्यंत स्वित्झर्लंडच्या आर्थिक उत्पन्नाचे हेच एकमेव साधन होते. १५१५ साली फ्रांस आणि वेनेटीयन्स यांच्याशी यु*द्ध करताना स्वित्झर्लंडला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर स्वित्झर्लंडने भाड्याने सैन्य देण्याचा हा व्यवसाय बंद केला. या पराभवानंतर स्वित्झर्लंडने युरोपच्या राजकारणापासून स्वतःला अलिप्तच ठेवले.

अनेक देशांना स्वित्झर्लंड जर त्यांच्या बाजूने झाला तर ते हवेच होते. पण अनेकदा कुठल्या देशाची बाजू घ्यायची याबद्दल ठाम मत न घेता आल्याने स्वित्झर्लंड तटस्थच राहिला. हळूहळू तटस्थता हेच स्वित्झर्लंडचे धोरण बनत गेले. खरे तर यामुळे होणारे फायदेही एव्हाना त्यांच्या लक्षात आले होते.

युरोपमध्ये १८१४-१५ या काळात झालेली फ्रेंच क्रांतीच्या वेळी स्विसने फ्रांसच्या सरदार उमरावांना संरक्षण देण्याचे काम स्वीकारले होते. यावेळी फ्रांसने स्विसवर हल्ला केला होता. या हल्ल्यातून सावरल्यावर स्वित्झर्लंडने तटस्थ राहण्याचे धोरण स्वीकारले. स्विसचे चार्ल्स पिक्टेट याने व्हिएन्ना कॉंग्रेसमध्ये स्विस हा एक तटस्थ देश राहील असे घोषित केले. जिनिव्हामधे चार्ल्स पिक्टेट यांचा पुतळा पाहायला मिळतो.

स्विसचे व्यापारी हेन्री ड्युएंट इटलीला व्यापाराच्या निमित्ताने जात होते तेव्हा त्यांना यु*द्धामुळे अर्धमेली झालेली आणि अपंग झालेली माणसे पाहून प्रचंड दु:ख झाले. यानंतर त्यांनी अशा आपत्तीच्या वेळी देश, सीमा, लिंग, वंश, वर्ग असा कुठलाच भेदभाव न मानता माणसाच्या मदतीला धावून जाणारी रेड क्रॉस संघटनेची स्थापना केली.

या संघटनेने आजपर्यंत अनेक ठिकाणी निर्हेतुक मदत पोचवली आहे. कुठल्याही नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीतही ही संस्था काम करत असते. या संस्थेमुळेही स्वित्झर्लंडच्या तटस्थतेच्या धोरणाला आणखी बळकटी मिळाली.

स्वित्झर्लंडमध्ये गेल्यानंतर तुम्हालाही त्यांच्या या तटस्थ धोरणाचे परिणाम दिसून येतील. इथली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, चविष्ट मेजवानी, खाद्यपदार्थ आणि आजूबाजूला दिसणारे विहंगम नयनरम्य ठिकाणे या सगळ्यातून तुम्हाला स्वित्झर्लंडची तटस्थता भिडत राहील.

शांतीपूर्ण साहचर्य अनुभवण्यासाठी अशा प्रकारची तटस्थ जीवनदृष्टी किती महत्वाची आहे, याची जाणीव तुम्हाला स्वित्झर्लंडला गेल्यावर नक्कीच होईल!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ज्या देशासाठी अंतराळात गेला, परत आला तेव्हा तो देशच अस्तित्वात नव्हता

Next Post

गिटार हे ग्रीकांनी आपल्याला दिलेलं अजून एक अनमोल गिफ्ट आहे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
Next Post

गिटार हे ग्रीकांनी आपल्याला दिलेलं अजून एक अनमोल गिफ्ट आहे

नादिया मुराद : ही महिला आयसिस विरोधात खंबीरपणे उभी राहिलीये

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.