The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेन वॉर्नच्या करिअरची सुरुवातच गुरु रवी शास्त्रींची विकेट घेऊन झाली होती

by द पोस्टमन टीम
13 September 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
1
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


क्रिकेट विश्वात असे कितीतरी खेळाडू आहेत ज्यांचे यश पाहून थक्क व्हायला होते. काही खेळाडूंना तर सातासामुद्रापार चाहते भेटतात, आज प्रत्येक देशात हा खेळ पोचला आहे. आपल्या देशातील अनेक खेळाडूंनी या खेळाद्वारे स्वतःचे आणि देशाचे नाव उंचावले आहे.

सचिनला क्रिकेटमधे बॅटींगसाठी ओळखले जाते, तर वसीम अक्रमला बॉलिंगसाठी. आणि शेन वॉर्नला स्पिन बॉलिंगसाठी.

ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडू नजरेसमोर आणताच तुम्हाला त्याची वेगवान गोलंदाजी आणि त्यातही स्पिन बॉलिंग आठवलीच असेल. शेन वॉर्नने खूप लहानपणीच ठरवले होते की त्याला क्रिकेटर बनायचे आहे. त्यासाठी अर्थातच खूप मेहनतही घ्यावी लागली होती. १३ सप्टेंबर १९६९ साली जन्मलेल्या शेन वॉर्नचे पूर्ण नाव आहे शेन कीथ वॉर्न.

शेन वॉर्न शालेय जीवनापासूनच क्रिकेट खेळत आला आहे. लहान वयातच त्याने स्पिन बॉलिंगचे कौशल्य आत्मसात केले होते. शेन वॉर्नच्या याच कौशल्याने त्याला प्रचंड यश मिळवून दिले. त्याकाळात क्रिकेटमधे ते तंत्र वापरले जात नव्हते. पण याचाच वॉर्नला फायदा झाला.



क्रिकेटमधील करिअर सुरु करण्यासाठी वॉर्नने शालेय जीवनापासूनच प्रचंड मेहनत घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षाखालील गटात जेंव्हा त्याची निवड झाली, तेव्हा त्याने आपल्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. त्याने निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. हळूहळू त्याचा खेळ चांगला होत गेला.

लेग स्पिन बॉलिंगमधील शेन वॉर्नचे कौशल्य वादातीत होते. लेन स्पिन बॉलिंग हा बॉलिंगचाच प्रकार आहे, यामध्ये मनगटाच्या सहाय्याने बॉल फिरवून त्याला विशिष्ट गती दिली जाते. ऑफ स्पिन बॉलिंगच्या तुलनेत लेन स्पिन बॉलिंग कठीण असल्याचे मानले जाते. कारण यात मनगट पूर्ण फिरवावे लागते. स्नायू लवचिक नसतील तर या पद्धतीची बॉलिंग जमणारच नाही. पण, शेन वॉर्नला मात्र ही कला अगदी सहज जमायची.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

यामध्ये बॉलर आपल्या मनगटाला वळवून चेंडू अशा वेगाने फेकतो की चेंडू लेन विकेटवर जाऊन पडतो. पीचवर चेंडू पडताच तो ऑफ स्टम्पकडे वळतो. यालाच म्हणतात लेन स्पिन बॉलिंग.

चेंडूने टप्पा खाल्यानंतर जर फलंदाजाला बॉलची दिशा समजली तर ठीक नाही तर तो आउटच!

फलंदाजांचा अंदाज अर्थातच चुकतो आणि ते या लेन स्पिनच्या टेक्नीकला हमखास बळी पडतात. तसेही बॉलिंगचा हा प्रकार खूप कमी खेळाडूंना जमतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे या प्रकारे बॉलिंग करणारे खेळाडू खूपच कमी आहेत. भारतातील अनिल कुंबळेचे नावही उत्तम लेग स्पिनरच्या यादीत घेतले जाते.

शेन वॉर्न जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला तेव्हा कुणीही त्याला फारसे गांभीर्याने घेत नसे. सुरुवातीला तरी त्याचा एवढा प्रभावही जाणवत नव्हता. १९९२ साली त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरची सुरुवात केली. त्याचा पहिलाच सामना भारताविरोधात होता.

त्याने भारताच्या रवी शास्त्रीची पहिली विकेट घेतली होती.

या सामन्यात तो फक्त एकच विकेट घेऊ शकला होता. त्याचा खेळ पाहून ऑस्ट्रेलिया संघाचे निवडकर्ते देखील नाराज झाले. शेवटी मालिकेतील पाचवा सामना त्याला वगळूनच खेळण्यात आला.

पण, पुढच्याच वर्षी शेन वॉर्नचे नशीब पालटले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या अटीतटीच्या समजल्या जाणाऱ्या ऍशेष सिरीजसाठी त्याची निवड करण्यात आली. या संपूर्ण सिरीजमधे शेन वॉर्नने एकूण ३४ विकेट्स घेतल्या. त्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत वॉर्नने आपले कौशल्य निर्विवादपणे सिद्ध केले. या सिरीजमधील शेन वॉर्नचा खेळ सर्वांवर आपली छाप सोडून गेला.

पुढेही विकेट्स घेण्याचा हा वेग शेन वॉर्नने कायम ठेवला. १९९३ पर्यंत त्याने ७१ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर शेन वॉर्न नावाचा एक दबदबाच निर्माण झाला. १९९२ साली एका विकेटपासून सुरुवात करून १९९९ पर्यंत शेन वॉर्नने ३०० विकेट्स घेतल्या होत्या.

क्रिकेट आणि आरोप यांचे एक अतूट नाते असावे असे वाटते. फार कमी क्रिकेटर असतील ज्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप लावण्यात आले नाहीत. शेन वॉर्नवरही २००३ मध्ये डोपिंगचा आरोप लावण्यात आला.

२००३ साली झालेल्या वर्ल्ड कप सामन्यात जेव्हा डोपिंग टेस्ट करण्यात आली तेव्हा शेन वॉर्न त्यात दोषी आढळला.

त्याने उत्साह वाढवण्यासाठी कुठले तरी औषध घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्या या गुन्ह्यामुळे एक वर्षासाठी त्याच्या खेळावर बंदी घालण्यात आली. वर्ल्डकपमधूनही त्याला ऑस्ट्रेलियाला परत पाठवण्यात आले.

शेन वॉर्नवर जरी डोपिंग केल्याचा आरोप लावला गेला होता तरी शेवटपर्यंत शेन वॉर्नचे म्हणणे हेच होते की त्याने अशा प्रकारचे कुठलेच औषध घेतले नव्हते. बंदी घातलेल्या वर्षात तो फक्त चॅरिटी सामने खेळत होता. या एका वर्षात त्याला कुठल्याही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सामन्यात सहभागी होता आले नाही.

एक वर्षाच्या कालावधीनंतर जेव्हा तो मैदानात पुन्हा उतरला तेव्हा त्याने वर्षभरातील सगळी कसर भरून काढली. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने ५०० विकेट्सचे विक्रम तोडले. वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनीच्या नावावर हा विक्रम होता. कोर्टनी वॉल्शला मागे टाकल्यानंतर आता त्याला श्रीलंकेचा ऑफ स्पिनर मुथैया मुरलीधरनला मागे टाकायचे होते.

आपल्या बॉलिंगच्या जोरावर त्याने श्रीलंकेला पुरते चीत करून टाकले. या सिरीजमधे त्याने ‘मॅन ऑफ दि सिरीज’चा किताब पटकावला.

त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २००४ साली त्याने मुरलीधरनचा विक्रम देखील मोडीत काढला. यावर्षीचा कसोटी सामना होता भारताविरुद्ध. त्याने इरफान पठाणची विकेट घेतली आणि मैदानात एकच जल्लोष सुरु झाला, कारण या विकेटवर त्याने ५३२ विकेट्सचा विक्रम मोडला होता.

२००६ साली तर त्याने ७०० विकेट्सचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने जेव्हा ७००वी विकेट घेतली तेव्हा स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभे राहून त्याला सलामी दिली होती. पुढच्याच वर्षी म्हणजे २००७ साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. शेन वॉर्नच्या या निवृत्तीचीही भरपूर चर्चा झाली.

आयपीएलमधे त्याने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली या संघाने आयपीएलचा किताबही पटकावला होता.

शेन वॉर्न आज आपल्यात नसला तरी बॉलिंगमधील जादूगार ही त्याची प्रतिमा मात्र क्रीडा रसिकांच्या मनात कायम राहील. प्रत्येकाच्या जीवनात चांगले-वाईट टप्पे येतातच. पण, वाईट काळातूनही सावरल्यानंतर शेन वॉर्नने आपल्या कौशल्याचे जे प्रदर्शन केले त्यामुळे क्रिकेट जगतात त्याच्या नावाचा दबदबा निर्माण केला. त्याच्यावरील कलंक त्याने खऱ्या अर्थाने त्याच्या मनगटातील कर्तुत्वाने पुसून टाकला. शेन वॉर्नसारखे खेळाडू म्हणजे निसर्गाची एक अद्भुत किमयाच म्हटली पाहिजे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हातपाय नसलेला ‘निक’ जगभरातील लोकांना मोटिवेट करतोय..!

Next Post

ही संस्था ‘मासिक पाळी’विषयी प्रबोधन अभियान राबवत आहे, त्यात तुम्हीही सहभागी होऊ शकता..!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

ही संस्था 'मासिक पाळी'विषयी प्रबोधन अभियान राबवत आहे, त्यात तुम्हीही सहभागी होऊ शकता..!

पेट्रोल-डिझेलला फाट्यावर मारून फोर्डने अणुऊर्जेवर चालणारी कार बनवली होती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.