The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सिंहालाच कुस्तीत हरवणारा पैलवान म्हणजे युजेन सॅंडो ..!

by द पोस्टमन टीम
21 October 2023
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कुस्ती हा खास भारतीय खेळ. भारतात अनेक चांगले चांगले पैलवान होऊन गेले ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली कीर्ती स्थापित केली. पैलवान म्हटल्यानंतर गामा पैलवान, दारा सिंग आणि कुस्तीतील पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे कोल्हापूरचे खाशाबा जाधव यांची नावे चटकन आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा तर कुस्तीची पंढरी म्हणून ओळखला जातो, इतकी इथे कुस्ती लोकप्रिय आहे.

आजही भारताच्या विविध भागातील पैलवान कोल्हापूरच्या तालमीत कुस्ती शिकण्यासाठी येतात. आता तर भारतातील मुलीसुद्धा कुस्तीमध्ये नाव कमावत आहेत. फोगट भगिनींपासून साक्षी मलिकपर्यंत किती तरी नावं घेता येतील.

कुस्तीमध्ये जसा भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे तसाच काही परदेशी खेळाडूंनीसुद्धा यामध्ये अतुलनीय कामगिरी केली आहे. यामध्ये पहिलेच नाव सांगायचे तर युजेन सँडो!

युजेन सँडोचा जन्म १८६७ साली जर्मनीतील कोनिसबर्ग येथे झाला. काही काळाने त्याचे कुटुंब जर्मनीतून इंग्लंडला स्थलांतरीत झाले. लहानपणी युजेन अगदी किरकोळ अंगकाठीचा होता आणि वारंवार आजारी पडायचा. किरकोळ सर्दी, खोकला तर कायमचाच. त्याची अंगकाठी पाहून त्याचे कुटुंबीय कायमच काळजीत असायचे तर मित्रमैत्रिणी चिडवायचे. पण आता अंगकाठीच होती तशी त्याला कोण काय करणार? युजेनलाही या चिडवण्याचा खेद वाटायचा. अशा तब्येतीमुळे त्याला बराच त्रास व्हायचा पण तो दुर्लक्ष करायचा.

एकदा तो आपल्या वडिलांबरोबर इटलीतील रोम आणि फ्लॉरेन्स शहरातील संग्रहालय पाहायला गेला. त्या संग्रहालयात जुन्या यो*द्ध्यांच्या मुर्त्या ठेवल्या होत्या. त्या मुर्त्या पाहून ११-१२ वर्षाच्या युजेनला मोठं आश्चर्य वाटलं. कारण, एवढ्या धिप्पाड शरीरयष्टीचे लोक असू शकतात, हे तो पहिल्यांदा पाहत होता. त्याने आपल्या वडिलांना विचारलं, ‘हे लोक इतके मोठे आणि धिप्पाड कसे काय?’ त्याचे वडील म्हणाले, ‘त्याकाळी शरीर संपत्तीला खूप महत्त्व होते. लोकांजवळ ह*त्यारे आणि शस्त्रास्त्रे नव्हती तेव्हा एखाद्या कठीण प्रसंगी ते आपल्या शरीराचा ह*त्याराप्रमाणे वापर करायचे.’



हे ऐकल्यापासून युजेनलाही वाटू लागले की आपणही अशीच मजबूत, सुडौल शरीरयष्टी कमवावी. त्याने व्यायामाला सुरुवात केली. त्याचा हा संकल्प पाहून अनेकांनी त्याची थट्टा केली पण, त्याने आपला संकल्प सोडला नाही. तो जिद्दीने व्यायाम करत राहिला. चांगली शरीरयष्टी कमावण्यासाठी जे काही करता येईल ते ते तो करू लागला. त्यासाठी भरपूर मेहनत घेऊ लागला.

युजेनच्या काळात तरी जिम वगैरे नव्हते. मग त्याने स्वतःच व्यायामाचे तंत्र विकसित केले.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

अठरा वर्षांचा होईपर्यंत तरी त्याच्या शरीरावर या व्यायामाचा काहीच परिणाम दिसत नव्हता. पण, एकविसाव्या वर्षानंतर त्याचे शरीर धष्टपुष्ट दिसू लागले, तो सुडौल आणि दमदार दिसू लागला.

शरीरयष्टी सुधारण्यासाठी तो कुस्ती खेळू लागला. तालीम घेऊ लागला. त्या काळात बॉडीबिल्डींगच्या स्पर्धा वगैरे आयोजित केल्या जात नसत. पण, कुस्ती खेळली जाई. यातूनच त्याला कुस्तीची आवड निर्माण झाली. कुस्ती खेळून पैसे कमवणे अवघड होते. तरीही त्याने कुस्तीचा छंद सोडला नाही. पैलवान त्याकाळी आपल्या ताकदीचे प्रदर्शन करून पैसे कमवत असत.

१८८९ साली लंडनमध्ये सॅमसन नावाचा एक मोठा पैलवान होता. त्याने आपल्याला शक्तीप्रदर्शनात हरवणाऱ्याला १००० पौंडचे बक्षीस देऊ अशी दिवंडी दिली. त्याचा शिष्य सायक्लोपस याला जो कोणी हरवेल त्याला १०० पौंडाचे बक्षीस जाहीर केले. या आव्हानाविषयी ऐकताच युजेन त्यात भाग घेण्यास तयार झाले. त्याने हे आव्हान स्वीकारले. शिवाय ही स्पर्धा लंडनमध्येच होणार होती त्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचणे त्याला सहज शक्य होते.

सायक्लोपसने २४० पौंड वजन आपल्या दोन्ही हाताने उचलून दाखवले. युजेनने आपल्या एका हाताने त्याच्यापेक्षाही जास्तीचे वजन सहज उचलले. सगळ्यांना वाटत होते, युजेनला हे जमणार नाही. पण स्टेजवर गेल्यानंतर काही क्षणातच युजेनने अगदी सहज ते वजन उचलले. युजेनने १०० पौंडाचे आपले बक्षीस जिंकले होते.

आता वेळ होती सॅमसनची. सॅमसनने २८० पौंडाचे वजन उचलून दाखवले. आता युजेनला त्यापेक्षाही जास्त वजन उचलून दाखवायचे होते. युजेनने त्या वजनाच्या दोन लोखंडी सळ्या दोन्ही हातांनी सहज उचलल्या आणि डोक्यावर नेऊन त्या काडकन मोडून दाखवल्या. त्याने पैज जिंकली होती. पण सॅमसनने नंतर आपला शब्द फिरवला आणि बक्षीस देण्यास नकार दिला.

पण या स्पर्धेने युजेनला चांगले नाव कमवून दिले.

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरात एकदा सिंह आणि अस्वलाची लढाई ठेवली होती. त्या लढाईची मोठी जाहिरात करण्यात आली होती. मोठ्या स्टेडियममध्ये ही लढाई भरवली जाणार होती. पण, अचानक पोलिसांनी या लढाईला परवानगी देता येणार नसल्याचे म्हटले आणि ही लढाई रद्द करण्याचे ठरवण्यात आली. युजेन त्यावेळी अमेरिकेतच होता. त्याने अस्वलाऐवजी सिंहाशी मी लढेन असे जाहीर केले. मग पुन्हा सिंहाच्या आणि युजेनच्या लढाईची जाहिरात करण्यात आली.

प्रत्यक्ष लढाईचा दिवस उगवला. सुमारे २०,००० प्रेक्षक बसतील एवढ्या क्षमतेचे ते स्टेडियम खचाखच भरले होते. ५३० पौंड वजनाचा तो सिंह युजेनला पाहिल्या बरोबर त्याच्या अंगावर धावून आला. पण, यूजेनने त्याच्या मानेखाली हात घालत त्याला वर उचलले आणि खाली आपटून दिले. सिंह चांगलाच चवताळला आणि यावेळी तो दुप्पट वेगाने युजेनच्या अंगावर आला. याही वेळेस युजेनने सिंहाला तसेच आपटले. सिंहाने युजेन पुढे हार मानली आणि सिंहाविरुद्धची ही लढाई युजेनने सहज जिंकली. या पराक्रमाने तर त्याला जगभरात प्रसिद्धी मिळाली.

शरीराने बलदंड माणसे बुद्धीने कमकुवत असतात असे मानले जाते. पण, युजेनने हे खोटे ठरवले. त्याने शरीरयष्टी आणि कुस्ती या विषयावर सुमारे वीस पुस्तके लिहिली. स्वत:ची स्वतंत्र व्यायाम पद्धती विकसित केली, जिला सँडो प्रणाली म्हणून ओळखले जाते. या पुस्तकांच्या वाचनाने अनेकांना लाभ झाला.

अभिनेता सलमान खानचे काका नसीम खान याच्यावरही सँडो पद्धतीचा खूप प्रभाव होता. त्यांच्या युरोपमधील कुठलाशा नातेवाईकाने त्यांना सँडोचे एक पुस्तक भेट म्हणून दिले होते. सलमानलाही बॉडी बिल्डींगचा छंद आपल्या या काकामुळेच निर्माण झाला असावा.

एक किरकोळ मुलगा ज्याला सगळे त्याच्या किरकोळ शरीरयष्टीसाठी चिडवत होते, तो एका सिंहालासुद्धा हरवू शकला. आपल्या अनुभवातून स्वतःची व्यायाम पद्धती विकसित केली आणि सगळ्या जगासोबत ही आपल्या ज्ञानाची शिदोरी वाटली. खरोखरच ज्यांना आयुष्यात काही तरी करून दाखवायचे आहे अशा लोकांसाठी युजेन सँडोचे जीवन खूपच प्रेरणादायी आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या माणसाने पेप्सी-कोलापेक्षा दूध पिणं ‘कुल’ आहे हे लहान मुलांच्या मनावर ठसवलं

Next Post

उजवी आणि डावी विचारसरणी म्हणजे काय..? त्यांना ही नावं कशी पडली? जाणून घ्या!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

उजवी आणि डावी विचारसरणी म्हणजे काय..? त्यांना ही नावं कशी पडली? जाणून घ्या!

इंग्लंडचा प्रिन्स शून्यावर बाद झाला आणि क्रिकेटमध्ये 'डक' आला..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.