The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ही आहे भारताला लुटून खाणाऱ्या ११ आक्र*मकांची संपूर्ण यादी

by द पोस्टमन टीम
22 March 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


लहानपणापासून आपण ऐकतोय की भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. असं म्हणतात की आपल्याकडे अफाट संपत्ती होती पण, काही विदेशी आक्र*मकांची वाईट नजर या संपत्तीवर पडली आणि हळूहळू आपला देश कंगाल होऊ लागला. या विदेशी लुटेऱ्यांनी या देशाच्या संपत्तीचाच नाही तर या देशातील संस्कृतीचा देखील सर्वनाश केला होता. हे विदेशी लुटेरे कोण होते, ज्यांनी आपली संस्कृती पायदळी तुडवली होती, चला जाणून घेऊ..

१) चंगेज खान

चंगेज खान हा एका मंगोल शासक होता. त्याने मंगोल साम्राज्याच्या विस्तारात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. चंगेज खानाने इराण, गजनीसहित पश्चिम भारताचा भाग असलेल्या काबूल, कंदहार, पेशावरसहित काश्मीरवर विजय मिळवत, त्यांना त्याच्या साम्राज्याला जोडले होते. त्याने सिंधू नदी ओलांडून उत्तर भारतातून आसामच्या मार्गाने पुन्हा मंगोलियाला परतण्याची तयारी केली होती. पण यात त्याला यश मिळाले नाही, अर्थात त्याने भारतातील अनेक बहुमूल्य वस्तुंना लुटण्यात यश मिळवले होते.

२) हलाकू खान

हलाकू खान हा देखील चंगेज खानप्रमाणे एक मंगोल शासक होता. त्याने आपल्या क्रौर्याच्या बळावर साम्राज्याचा विस्तार केला होता.

भारतासह रशिया, एशिया आणि अरबी राष्ट्रांना हलाकू खानने आपल्या साम्राज्याला जोडले होते. पश्चिम भारतातील बहुतांश भागावर आपले शासन प्रस्थापित करण्यास त्याला यश आले होते.

त्याने आपल्या कारकिर्दीत प्रचंड रक्तपात केला. मुसलमानांसाठी तर हालाकू खान भीतीचा समानार्थी शब्द बनला होता.



३) तैमूर लंग

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि त्याची बायको करीना कपूर खानने त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यामुळे मोठा वाद झाला होता. यानंतर सैफ अली खानला स्वतःला समोर येऊन सफाई द्यावी लागली होती. हा तैमूर लंग तोच होता ज्याच्या मनात दुसरा चंगेज खान होण्याची इच्छा होती. तो लंगडा होता म्हणून त्याला तैमूर लंग म्हटले जाई.

तुघलक वंशाच्या शासनकाळात तैमूरने भारतावर आक्र*मण केले होते. तो मंगोलांची फौज घेऊन आला होता. दिल्लीत तो १५ दिवस मुक्कामी होता. त्याने संपूर्ण शहर बरबाद केले होते. तो परत गेला त्यावेळी दिल्ली प्रेतांचे शहर बनले होते. त्याने दिल्लीत प्रचंड लूट केली होती. त्याच्यामुळे तुघलकांचे शासन नष्ट झाले होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

४) नादिर शहा

नादिर शहा हा इराणचा शासक होता. त्याने भारतावर आक्र*मण करून लूटमार केली होती. १७३९ मध्ये दिल्लीच्या मोहम्मद शहाचा पराभव केल्यानंतर त्याने अमाप संपत्ती लुटली होती, एवढेच नाही तर भारताची शान असलेला कोहिनूरसुद्धा पळवला. नादिर शहाने मुघलांचा सर्व खजिना खाली केला होता. या खजिन्यात कोट्यवधींचे सोने नाणे, हिरे, माणिक इत्यादींचा समावेश होता. तो याबरोरबच १ हजार हत्ती, ७ हजार घोडे, १० हजार उंट देखील सोबत घेऊन गेला होता.

५) अहमद शहा अब्दाली

अहमद शहा अब्दाली हा नादिरशहाचा मुलगा होता. त्याने पित्याप्रमाणे भारतावर आक्र*मण केले. १७५७ मध्ये त्याने पहिल्यांदा दिल्लीवर आक्र*मण केले. पुढे १७६१ मध्ये त्याचे आणि मराठ्यांचे यु*द्ध झाले, ज्याला पानिपतचे तिसरे यु*द्ध म्हणून ओळखले जाते. यात तो विजयी झाला. पण युद्धात त्याचे एवढे नुकसान झाले की पुन्हा त्याने भारतावर आक्रमण करायची हिम्मत केली नाही. शिवाय नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहून सदाशिवरावभाऊ आणि विश्वासरावांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली आणि ‘आपल्यात वैर असण्याचे काही कारण नाही’ हे देखील नमूद केले.

६) मोहम्मद गजनवी

मोहम्मद गजनवीने भारतावर १७ वेळा आक्र*मण केले होते. त्याने आपल्या ९ व्या आक्र*मणावेळी मथुरेजवळच्या महावान येथून मोठ्या प्रमाणात सोने चांदीची लूट केली, इतकेच नाहीतर ८० हत्ती देखील चोरले होते. त्याच्या आक्र*मणाने त्याने गुजरातला पुरते कंगाल केले होते.

हे काय कमी होते म्हणून १६व्या आक्र*मणावेळी त्याने सोमनाथाचे देऊळ फोडले.

यात त्याने मोठ्या प्रमाणात सोन्याची लूट केली. १७ व्या आक्र*मणावेळी त्याने सिंध आणि मुलतानच्या प्रदेशातील तटवर्ती क्षेत्रातील जाटांचा पराभव केला आणि काठियावाडच्या सोमनाथ मंदिरातून अपार धन लुटले.

७) मोहम्मद घोरी

गजनवीनंतर मोहम्मद घोरीने भारतावर आक्र*मण करून लुटपाट केली. घोरी गजनी आणि हैरात या भागातील डोंगराळ प्रदेशातील घोर शासक होता. त्याने पंजाबवर आक्र*मण करून लूट केली. पुढे तो दिल्लीच्या दिशेने निघाला, परंतु पृथ्वीराज चौहानांनी त्याचा पानिपतच्या पहिल्या यु*द्धात पराभव केला. पण शेवटी त्याने जयचंदाचा मदतीने पृथ्वीराज चौहानांना पराभूत केले व त्यांची ह*त्या केली.

८) मोहम्मद बिन कासिम

मोहम्मद बिन कासिमने ८व्य शतकाच्या सुरुवातील भारतावर आक्र*मण केले होते. वयाच्या १७ व्या वर्षी त्याने सिंध आणि मुलतानवर आक्र*मण केले होते. तो फार क्रू*र आक्र*मक होता. त्याने भारतात फक्त रक्तपात केला नाहीतर मोठ्याप्रमाणात संपत्तीची लूट देखील केली. पण वयाच्या २२ व्या वर्षी त्याचे निधन झाले. कासीमला मुलतानमधून इतके सोने मिळाले होते की त्याने त्याचे थेट स्वर्णनगर नामकरण केले. त्याने देबल येथील मंदिरांना देखील लुटले.

९) सिकंदर

सिकंदर जगावर अधिपत्य करण्याच्या उद्देशाने भारतावर स्वारी करून आला होता. पंजाबजवळ येऊन पोहचल्यावर भारतीय लोकांची सधनता बघून त्याचे डोळे दिपले. भारताची संपत्ती लुटण्यासाठी त्याने वारंवार आक्रमण केले.

हळूहळू तो भारताच्या काही भागावर वर्चस्व मिळवण्यात यशस्वी ठरला. तो जिथे जिथे गेला तिथे त्याने धनसंपत्तीची लूट केली. परंतु आर्य चाणक्यांनी भारतीयांमध्ये एक नवीन चेतना जागृत केली आणि त्याच्याविरोधात चंद्रगुप्ताला तयार केले. यानंतर सिकंदर परतला. कायमचाच.

१०) बाबर

मुघलवंशाचा संस्थापक, बाबर एक लुटेरा होता. त्याने उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात लूट केली होती. बाबरने क्रू*रतेने हिंदूंचा नर*संहा*र केला होता. हिंदू मंदिरांचा सर्वनाश केला होता. अयोध्येतील राम मंदिराला पाडून बाबरी मशीद त्यानेच उभारली होती. आज तिथे पुन्हा राम मंदिर उभारले गेले आहे. त्याने ग्वाल्हेरजवळच्या अनेक जैन मंदिरांचा सर्वनाश केला होता. चंदेरीच्या प्रसिद्ध लेण्या व मंदिराचा देखील त्याने सर्वनाश केला होता. आज तिथे फक्त भग्नावशेष शिल्लक आहेत.

११) औरंगजेब

औरंगजेबाने देखील भारतात मोठ्याप्रमाणात लूटमार केली होती. त्याने काश्मिरी पंडितांचे जबरदस्ती धर्मांतर केले होते. ज्यावेळी काश्मिरी पंडितांनी शिखांचे नववे गुरु तेगबहाद्दूर यांची मदत मागितली त्यावेळी तेगबहाद्दूर यांनी औरंगजेबाचा विरोध सुरू केला, परिणामस्वरूप औरंगजेबाने त्यांचा शिर*च्छेद केला.

हे काही विदेशी आक्र*मक होते, ज्यांच्यामुळे एकेकाळी ज्या देशात सोन्याचा धूर निघत होता, तो देश गरिबीच्या वाटेवर गेला. जर त्यावेळी भारतीय लोकांनी या आक्र*मकांना तोंड दिले असते तर आज भारत गर्भश्रीमंत देश राहिला असता. पण एकतेच्या अभावाने आपल्या देशावर हे दुर्दैव ओढवले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

रक्ताचा एक थेंबही न सांडता हे युद्ध ३३५ वर्षे चाललं होतं

Next Post

आज स्टाईल स्टेटमेंट बनलेल्या सनग्लासेसचा इतिहास माहित आहे का..?

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

आज स्टाईल स्टेटमेंट बनलेल्या सनग्लासेसचा इतिहास माहित आहे का..?

सिगारेट सुटत नाही, तर हे पाच सोपे घरगुती उपाय कराच

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.