The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हि*टल*रला शांततेचा नोबेल पुरस्कार द्यायला निघाले होते स्वीडिश सरकार !

by द पोस्टमन टीम
7 March 2024
in इतिहास, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


नोबेल पुरस्काराची माहिती नसेल अशी सुशिक्षित व्यक्ती कोणी नसेल. आल्फ्रेड नोबेल या संशोधकाने ३५५ शोधांचे पेटंट मिळवले आहेत, पण लोक त्याला दोनच गोष्टींसाठी ओळखतात एक म्हणजे डायनामाईट आणि दुसरी नोबेल पारितोषिक.

जर आल्फ्रेड नोबेलने त्यावेळी डायनामाईटचा शोध लावला नसता तर आज नोबेल पुरस्काराचे वितरण करण्यात आले नसते. नोबेल पुरस्काराविषयी असे अनेक पैलू आहेत, जे लोकांना माहिती नाहीत, त्यापैकी काही आपण जाणून घेऊ….

डायनामाईटचा शोध लावल्यानंतर आल्फ्रेड नोबेल यांनी आपला मोर्चा गलगाईनेटच्या संशोधनाकडे वळवला. यानंतर त्यांनी बेलिस्टची निर्मिती केली जिचा वापर गोळी व बंदुकांमध्ये केला जात होता. खरंतर डायनामाईटच्या संशोधनानंतर नोबेल यांना यु*द्धाच्या ह*त्यारांची निर्मिती करणे थांबवायचे होते. पण त्यांना यात यश आले नाही. या संशोधनामुळे आल्फ्रेड नोबेल गर्भश्रीमंत झाले होते. पण त्यांचा बहुतांश वेळ एकाच गोष्टीचे चिंतन करण्यात जायचा की ते इतके परिश्रम घेऊन शोध लावतात त्याचा वापर सामान्य माणसाला कमी पण गर्भश्रीमंत लोक व भ्रष्ट राजकारणी वर्गाला जास्त होतो आहे. सामान्य माणसे आपल्या संशोधामुळे मृत्युमुखी पडतात या विचाराने नोबेल दुःखी व्हायचे. एक दिवस एक अशी घटना घडली, ज्यामुळे नोबेल पार हादरून गेले होते.

एके दिवशी एका वृत्तपत्रात नोबेल यांच्या मृत्यूची बातमी छापून आली. बातमीच्या मथळ्यात नोबेल यांचा उल्लेख व्यापारी म्हणून करण्यात आला होता. वृत्तपत्रातील त्यांची बातमी वाचल्यावर नोबेल यांना लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतात हे बघून फार दुःख झाले.

लोकांच्या मनात आपली प्रतिमा एका संशोधकाची नाहीतर, एका स्वार्थी व्यापाऱ्याची आहे हे बघून त्यांना वेदना झाल्या, त्यांनी तेव्हाच ठरवले की काहीतरी करायचे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपली ९० टक्के संपत्ती समाजकार्यासाठी अर्पण केली. यानंतर त्यांनी नोबेल पारितोषिकाची सुरुवात केली. या पुरस्काराची त्याने चार क्षेत्रात विभागणी केली, यात साहित्य, शांती, केमिस्ट्री आणि औषधनिर्माण या क्षेत्रांचा समावेश होता. त्यांनी पुरस्काराची सुरुवात केल्यावर म्हटले होते, ज्यांच्या संशोधनामुळे मानव जातीचे कल्याण झाले आहे अथवा ज्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी कार्य केले आहे, अशाच व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात यावा.



१८९६ साली नोबेल यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून आतापर्यंत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. आल्फ्रेड नोबेल यांना लोक डायनामाईटच्या संशोधनापेक्षा त्यांच्या नोबेल पुरस्कारामुळे जास्त ओळखतात. या पुरस्काराने त्यांची प्रतिमा सुधारली होती.

शांततेचा नोबेल पुरस्कार हा सामाजिक बांधिलकीला चालना देणाऱ्या लोकांना प्रदान करण्यात येतो. एका अशा व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो ज्याने यु*द्ध थांबवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. १९३५ साली जर्मन शांतीवादी कार्यकर्ते कार्ल वॅन ओसिएतकी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

जर्मनीने पहिल्या महायु*द्धात पराभूत झाल्यावर वर्सायचा करार केला होता. ज्याच्या अटींमुळे जर्मन नागरिकांचे शोषण करण्यात आले होते, हि*टल*र त्या कराराचा कडवा विरोधक होता. या करारानुसार जर्मनीला सैन्य ठेवण्याची मर्यादा घालून देण्यात आली होती. पण हि*टल*रने हा करार धुडकावून लावत यु*द्ध पुकारले होते, यामुळे हा करार फक्त कागदोपत्री उरला होता.

असं म्हणतात की हि*टल*रच्या यु*द्धाच्या तयारीची बातमी ओसीएतकी यांनी जगासमोर आणली होती. यामुळे तो हि*टल*रचा शत्रू बनला होता. यासाठी त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. जेलमध्ये त्याची कसून चौकशी करण्यात आली होती. तिथेच त्याचा टीबीमुळे मृत्यू झाला होता. त्याला नोबेल पुरस्कार मिळाला आहे, ही बातमी प्रत्येक जर्मन नागरिकापर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न केले जात होते. पण ज्या व्यक्तीची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे, त्याला पुरस्कार कसा मिळाला याबद्दल लोक आश्चर्य व्यक्त करत होते. जर्मनीने त्यावेळी भूमिका घेतली होती की कुठल्याही प्रकारे ओसीएतकीला नोबेलने गौरविण्यात आले आहे, ही बातमी लोकांपर्यंत पोहोचू द्यायची नाही, असं असलं तरी काही लोकांपर्यंत ही बातमी पोहचली होती. अखेरीस एकदिवस हि*टल*रने स्वतः जर्मनीत कोणीच नोबेल पुरस्कार स्वीकरणार नाही, अशी घोषणा केली.

१ सप्टेंबर १९३९ च्या दिवशी जर्मनीने दुसऱ्या महायु*द्धाला तोंड फोडले. त्याच वेळी नोबेल कमिटीकडे एक पत्र आले, ज्यात हि*टल*रच्या नावाचा देखील उल्लेख होता. त्या पत्राद्वारे कोणीतरी हि*टल*रला नोबेल पारितोषिक प्रदान करावे अशी मागणी केली होती. असे म्हणतात ही शिफारस स्वीडिश पार्लमेंटकडून करण्यात आली होती. या पत्रात असे लिहिण्यात आले होते की, “१९३८ साली युरोपात यु*द्ध भडकण्याची स्थिती होती, असे असून देखील हि*टल*रने शांततेचा संदेश दिला होता. त्यांच्या माईन काम्फ या ग्रंथात त्यांनी शांततेचा संदेश दिला आहे. युरोपच्या शांततेत आणि विकासात हि*टल*र यांनी मोठी भर घातली असून ते जणू देवाने पाठविलेले दूत आहेत.”

नोबेल पारितोषिकासाठी हि*टल*रच्या नावाची शिफारस केल्याची बाब जशी लोकांच्या समोर आली, तसा असंतोष पसरण्यास सुरुवात झाली. पुढे ब्रँड या व्यक्तीने ते पत्र लिहिल्याचे समोर आले, ज्यावेळी त्या व्यक्तीला पत्र का लिहिले अशी विचारणा करण्यात आली त्यावेळी तो म्हणाला की हे पत्र मी लिहिले आहे पण यात मी हि*टल*रची शिफारस केली नाही, मी तर एक व्यंग म्हणून अशी अनेक पत्रे अनेकांना पाठविली आहेत, मला कधीच वाटलं नव्हतं की स्वीडिश सरकारला विनोद कळत नाहीत.

ब्रँड यांच्या स्पष्टीकरणानंतर स्वीडिश सरकारवर हि*टल*रची दावेदारी रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. जर त्यावेळी चुकून हि*टल*रला नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले असते तर आल्फ्रेड नोबेलने डायनामाईटनंतर अजून एका मानवताविरोधी कृत्याला पैसा पुरवल्याचे पाप केले असते, ते देखील तो हयात नसताना..!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

त्या रात्री दारूने सरबजीतचा घात केला होता

Next Post

लग्नाच्या आधी वाईट स्वप्न पडले तर ‘नागा’ जमातीच्या मुली लग्न मोडतात!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

लग्नाच्या आधी वाईट स्वप्न पडले तर 'नागा' जमातीच्या मुली लग्न मोडतात!

दुर्बिणीचा शोध गॅलिलिओने नाहीतर एका चष्मा बनवणाऱ्या डच माणसाने लावला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.