The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेच्या विरोधात गाणे लिहूनदेखील बॉब डिलनला नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता

by द पोस्टमन टीम
23 May 2025
in मनोरंजन, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


नोबेल पुरस्काराला  प्रतिष्ठित पुरस्कार मानले जाते. नोबेल पुरस्कारासंबंधित एक आख्यायिका अशी आहे की, जो कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून अमेरिकन कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या विरोधात आवाज उठवतो, त्याला कधीच हा पुरस्कार प्रदान करण्यात येत नाही.

भारतात प्रेमचंद आणि मुक्तिबोध यांनी कालजयी साहित्याची निर्मिती केली, तरी देखील त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही. काही लोक मानतात की अमेरिकन कॉर्पोरेट्सच्या असलेल्या प्रभावामुळे हे घडू शकले नाही. पण या आख्यायिकेला तोडण्याचे काम एका कलाकाराने केले होते.

त्या कलाकाराने अमेरिका व तेथील कॉर्पोरेटच्या विरोधात आवाज उठवून देखील त्याला नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. या कलाकाराचे नाव होते बॉब डिलन !

बॉब डिलन यांचा जन्म २४ मे १९४१ साली अमेरिकेच्या मिनसोटा शहरात झाला. शाळकरी वयातच त्यांना संगीताची गोडी निर्माण झाली होती. हायस्कुलमध्ये असतानाच त्यांनी अनेक ब्रँड बनवले होते. त्या वयात त्यांच्यावर एल्व्हिस प्रिस्ले, जॉनी रे, हँक विल्यम्स आणि लिटील रिचर्ड यांच्यासारख्या विख्यात संगीतकारांचा मोठा प्रभाव होता.

याकाळात त्यांचे शिक्षण देखील सुरु होते. १९५९ साली त्यांनी कॉलेजात प्रवेश घेतला पण काही काळातच त्यांना कॉलेजमधून हाकलून टाकण्यात आले. याच काळात त्यांच्या एका मित्राने त्यांना अमेरिकन संगीतकार वूडी ग्रुथी याचा अल्बम भेट दिला. तो अल्बम ऐकून बॉब इतके प्रभावित झाले की त्यांनी गिटार वादनाचे प्रशिक्षण घेतले. इतकेच नाही, त्यांनी ग्रथी यांच्यासारखी वेशभूषा करायला देखील सुरुवात केली. १९६० पर्यंत त्यांनी संगीतात नैपुण्य मिळवले होते.



१९६० चे दशक हे वैश्विक राजकारण संक्रमणावस्थेतून जात होते. शीतयु*द्ध पेटले होते. फ्रान्सच्या पराभवानंतर अमेरिकेने व्हिएतनामवर ह*ल्ला चढवला होता. आ*ण्विक शस्त्रांसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरु होती. अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांची त्यांच्या हक्कांसाठी सिव्हिल राईट मुव्हमेंट सुरु होती. याच काळात १९६१ मध्ये बॉब यांचे पाऊल न्यूयॉर्क शहरात पडले. त्याकाळी हे शहर लोकसंगीताचे एक प्रमुख केंद्र होते. बॉब यांनी तेथील स्थानिक क्लबमध्ये गाणे गाण्यास सुरुवात केली, त्यानंतर ते लोकप्रिय होत गेले.

जुलै १९६१ मध्ये बॉब यांच्या आयुष्यात सुजी रोटोलो नावाच्या सतरा वर्षीय युवतीने प्रवेश केला. दोघे एकत्र राहू लागले. सुजी राजकारणात खूप सक्रिय होत्या. त्या काँग्रेस फॉर रेशियल इक्वलिटीच्या अध्यक्ष होत्या. सुजी-बॉब यांची भेट ब्रेख्त आणि आर्थर रिमबाड यांच्यासारख्या कवींशी झाली. या दोघांची भेट झाल्यावर बॉब यांच्या गाण्यात भावनात्मकवृद्धी होत गेली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

सुजी यांनी बॉब यांना जगभरात घडणाऱ्या विविध घटनांची जाणीव करून दिली. यानंतर बॉब यांनी ज्या गाण्यांची निर्मिती केली, त्या गाण्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य केले. एक विद्रोही गायक म्हणून बॉब यांचे नाव सर्वत्र प्रसिद्ध होऊ लागले.

एप्रिल १९६२ मध्ये बॉब यांनी ‘टॉल्किंग जॉन बर्ग सोसायटीज ब्लु’ आणि ‘लेट मी डाय इन माय फुटस्टेप्स’ या गीतांची रचना केली. या गीतांमधून त्यांनी अमेरिका-रशिया दरम्यानच्या शीतयुद्धावर आणि अमेरिकन सरकारच्या आ*ण्विक शक्ती विकासावर कडकडीत ह*ल्ला चढवला होता. हे गाणे लिहिल्यानंतर बॉब अमेरिकन सरकारच्या नजरेत आले.

बॉब यांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन होत होते, आपल्या गाण्यांमधून समाजात बदल घडवण्यासाठी बॉब प्रयत्न करत होते. जेम्स मेरेथीड या कृष्णवर्णीय मुलाला मिसिसिपी युनिव्हर्सिटीत प्रवेश दिल्यामुळे अमेरिकेत दं*गली उसळल्या होत्या, बॉब यांनी या दंगलींच्या निषेधार्थ ‘ऑक्सफोर्ड टाऊन’ नावाच्या गाण्याची रचना केली. या गाण्याने त्यांना अजूनच प्रसिद्धी मिळवून दिली.

बॉब यांनी लिहिलेल्या ‘ब्लोईंग इन द वाइंड’ या गीताने अमेरिकेतील मानवी हक्क चळवळीला प्रेरणा दिली, इतकेच नाही या गीताच्या माध्यमातून बॉब यांनी अमेरिकन सरकारच्या व्हिएतनामवर युद्ध लादण्याचा निर्णयाचा धिक्कार केला होता. या गीतातून त्यांनी प्रश्न विचारले होते की, “अजून किती दिवस लागतील गोळ्या चालवणे बंद करायला? अजून किती दिवस लागतील गुलामांना मुक्त करायला? अजून किती लोक मेल्यावर सत्तेत बसलेल्या सत्ताधीशांना पाझर फुटेल?” याच गीतात या प्रश्नांचे उत्तर देताना ते म्हणतात, ‘उत्तर हवेत उडते आहे.’

बॉब डिलन यांच्या या गीताने त्यांना ‘न भूतो न भविष्यती’ प्रसिद्धी मिळवून दिली. या गाण्यामुळे त्यांना कृष्णवर्णीयांच्या अधिकारांसाठी लढा देणाऱ्या मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांच्या सभेत गाणं म्हणायला आमंत्रित केले होते.

बॉब डिलन यांनी आपले गाणे सादर केले, त्यानंतर मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांनी आपले विश्वप्रसिद्ध ‘आय हॅव अ ड्रीम’ हे भाषण दिले.

याच वर्षी बॉब डिलन यांनी त्यांचे मास्टर ऑफ वॉर आणि टॉल्किंग वर्ल्ड वॉर थर्ड ब्लूज हे दोन गीत लिहिले होते. या गीतांमधून त्यांनी अमेरिकन सरकारच्या ह*त्यारांच्या व्यापारावर आणि अमेरिकन कॉर्पोरेटच्या व्यवहारावर टीकास्त्र सोडले. ह*त्यार बनवणाऱ्या कंपन्या राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली सरकारला शस्त्र विकतात आणि जबरदस्ती यु*द्ध घडवून आणतात. या यु*द्धात कंपन्यांच्या मालकांचे आणि संसदेत बसलेल्या नेत्यांचे काही नुकसान होत नाही पण गरीब शेतकरी, मजूर आणि निष्पाप सैनिकांचा ब*ळी देण्यात येतो.

द टाइम्स दे आर चेंजिंग नावाचे गाणे देखील त्यांनी लिहिले या गीतातून त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांच्या समस्यांना वाचा फोडली. त्यांचे हे गीत जगभरात प्रसिद्ध झालं, इतकंच नाहीतर जगभरातील शोषित गटांच्या लढ्यासाठीचे प्रेरणास्थान बनून हे गीत अजरामर ठरले होते. या गाण्यात त्यांनी एक आशावाद मांडला होता. आज जे रडताय ते उद्या हसणार आहेत, असा भाव त्यांनी व्यक्त केला होता.

१९६३ नंतर त्यांचे विद्रोही गाणे लिहून मन विटले होते, पण तरीदेखील त्यांनी ते गाणे लिहिणे थांबवले नाही. त्यांना राजकीय नेत्यांच्या नकलीपणाचा प्रचंड राग यायचा, त्यांनी राजकीय नेत्यांवर कठोर शब्दात टीका केली होती. जॉन एफ केनेडी यांच्या हत्येनंतर ‘अमेरिकन सिव्हिल राईट्स कमिटी’ने त्यांना पुरस्कार प्रदान केला. ही कमिटी राजकीय नेत्यांनी तयार केली होती, ज्यांच्यावर बॉब डिलन यांनी आजवर टीका केली होती.

बॉब डिलन यांनी ह्या समारंभात आयोजकांवर आणि त्यांच्या नकली अश्रुंवर गंभीर टीका केली. यावर त्यांना बरीच टीका सहन करावी लागली होती. यानंतर त्यांनी विद्रोही गाणे लिहिणे सोडून दिले.

अधूनमधून ते विद्रोही गाणे लिहित पण हे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. बॉब डिलन यांनी या काळात आत्मकेंद्री गाण्यांची निर्मिती केली. १९६५ च्या व्हिएतनाम यु*द्धाच्या वेळी त्यांनी ‘हायवे ६१ रिव्हिजिटेड’ आणि टॉम्बस्टोन ब्लूज हे दोन गाणे लिहिले. या गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी अमेरिकन सरकारच्या क्रू*रतेवर टीकास्त्र सोडले. टोम्बस्टोन ब्लूजमध्ये तर त्यांनी अमेरिकन कमांडर लिंडल जॉन्सन यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की हा कमांडर आपल्या सैनिकांना सामान्य लोकांवर गोळ्या झाडायला सांगतो.

त्यांनी यानंतर १९६७ मध्ये आय शाल ब्लीड, आय पिटी द पुअर इमिग्रेन्ट, १९७५ मध्ये हरिकेन, १९८३ मध्ये लायसन्स टू किल आणि १९८४ मध्ये किल्न कट कीड या गीतांची रचना केली. १९९० मध्ये अमेरिकेने इराकवर ह*ल्ला केल्यानंतर बॉब यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या निषेधार्थ गीत लिहिले.

२००८ मध्ये ओबामा विजयी झाल्यावर त्यांनी विश्वशांतीचा संदेश देणारे गीत लिहिले. २०१६ मध्ये त्यांना नॉर्वेने साहित्याचा नोबेल घोषित केला. अनेकांना वाटले होते की अमेरिकन कॉर्पोरेटचा हस्तक्षेप असलेला नोबेल पुरस्कार ते स्वीकारणार नाहीत. पण त्यांनी तो पुरस्कार त्याचा मान राखण्यासाठी स्वीकारला होता.

सरतेशेवटी जरी बॉब डिलन यांनी राजकीय विरोधापासून स्वतःला बाजूला केले होते, तरीदेखील त्यांचे गाणे नेहमीच शोषित आणि वंचितांची बाजू घेत राहिले. आजही बॉब डिलन त्या लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत, जे विश्वशांतीसाठी प्रयत्न करत आहेत. बॉब डिलन हे खऱ्या अर्थाने पीपल्स रॉकस्टार आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अरबस्तानातील हा चिमुकला देश जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे

Next Post

दाऊदने बॉ*म्बस्फो*ट घडवून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

20 January 2024
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
Next Post

दाऊदने बॉ*म्बस्फो*ट घडवून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती

वयाच्या ११ व्या वर्षी पहिली गुंतवणूक करणाऱ्या वॉरेन बफे कसे बनले सर्वात श्रीमंत व्यक्ती..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.