The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरबस्तानातील हा चिमुकला देश जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे

by द पोस्टमन टीम
25 August 2025
in भटकंती, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


कोणताही देश हा मुळात विकसित नसतो. त्याच्या विकासासाठी त्या देशात क्रांतिकारी बदल घडत राहणे आवश्यक असते.

१९७१ साली स्वतंत्र मिळालेल्या या देशाने काही काळातच प्रगतीचे शिखर गाठले होते. आज या देशाचा आर्थिक विकास दर जगातील इतर कुठल्याही देशापेक्षा जास्त आहे. हा देश २०२२मध्ये होणाऱ्या फुटबॉल वर्ल्ड कपंचे आयोजन करत असून अत्यंत कमी कालावधीत विकास करणारा हा देश युरोपातील नाही तर आशिया खंडातील आहे. सौदी अरेबियाला अगदी खेटून असलेल्या कतर या देशाबद्दल आपण बोलतोय.

हा तोच देश आहे जो एकेकाळी युद्धामुळे पूर्णपणे उध्वस्त झाला होता. ८० च्या दशकात कतरमध्ये मोत्यांच्या व्यापारा व्यतिरिक्त दुसरे काही नव्हते. मग ४७ वर्षात या देशाने असे काय केले ज्यामुळे हा देश इतकी प्रगती करू शकला ?

कतर एकेकाळी ब्रिटिश साम्राज्याचा गुलाम देश होता. १८६८मध्ये ब्रिटिश याचा ताबा अशा व्यक्तींना देऊ इच्छित होते, जे याचा उत्तम प्रकारे सांभाळ करू शकतील. याच काळात मोहम्मद अली थानी नावाचा एक मनुष्य पुढे आला. त्याने ब्रिटिशांकडून कतरचा कारभार स्वतःच्या हाती घेतला. आजही कतरवर अल थानी कुटुंबाचेच शासन सुरु आहे. या देशाचा संपूर्ण इतिहास हा या लोकांभोवती फिरणारा आहे. बऱ्याचदा या देशाला उपासमारीचा सामना करावा लागला पण प्रत्येक वेळी हा देश बचावला.

२०१७ मध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पण त्यानंतर या देशाने विकासाचा असा वेग पकडला की नवनवीन उंची हा देश नेहमी गाठतो आहे.



१९५० साली या देशात तेलाचे मोठे साठे आढळले, यानंतर त्या देशाची परिस्थिती पालटली. १९७१ मध्ये ब्रिटनने ५५ वर्षांनी या देशाला स्वतंत्र केले, त्यावेळी कतारने संयुक्त अरब अमिरातीमध्ये समाविष्ट होण्यास नकार दिला. अब्दुल्लाह बिन जासिम बिन मोहम्मद अल थानी यांनी कतरची स्थापना केली. याने आपल्या प्राकृतिक संसाधनांची विक्री करून बेसुमार दौलत जमवली.

१९९०पर्यंत कतरच्या प्रत्येक निर्णयात सौदी अरेबिया हस्तक्षेप करायचा. या देशातील प्रत्येक लहान मोठा निर्णय हा सौदी अरेबियाच्या मर्जीने घेतला जात होता. स्वातंत्र्यानंतर शेख खलिफा बिन हमाद अल थानी येणे त्याचा भाऊ शेख अहमद बिन अली याचे सरकार पाडले. १९९५ साली त्याचा मुलगा हमादने बापाच्या ताब्यातून देशाची सत्ता काबीज केली. सौदी अरेबियाचा हस्तक्षेप हमादला अजिबात मंजूर नव्हता. त्याला वाटायचे की सौदी अरेबियामुळे त्यांचा देश कायम मागासलेला राहणार आहे.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

कतरची परिस्थिती सुधारण्यासाठी हमादने फ्रान्स सोबत करार केले. कतरमध्ये गुंतवणूक आणली. कतरमध्ये व्यापारासाठी अनुकूल वातावरण तयार केले, यामुळे या देशातील लोकांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली.

कमी लोकसंख्या असल्याने या देशात मोठ्या प्रमाणात भारतीय उपखंडातून मजूरवर्ग रवाना झाला. २०१० मध्ये कतारचा जगातील काही श्रीमंत देशांपैकी एक बनला. तब्बल १० टक्के विकासदराने कतार प्रगती करत होता.

आज कतरने जगातील काही सर्वात प्रसिद्ध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. लंडनच्या हर्ड्स नावाच्या डिपार्टमेंटल स्टोअर, फ्रान्सच्या एलव्हीएचएम नावाच्या लक्झरी सामानाच्या कंपनीत कतरने गुंतवणूक केली आहे. जर्मनीच्या एका फुटबॉल क्लबमध्ये कतरची गुंतवणूक आहे. इतकेच नाही तर लंडनच्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये देखील कतरने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. द सेवोय आणि द कॅनॉट या हॉटेलमध्ये देखील कतारने गुंतवणूक केली आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील प्लाझा हॉटेल देखील कतरच्या मालकीचे आहे. हे हॉटेल डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीची होती. या हॉटेलमध्ये भारतीय सहारा परिवाराने देखील गुंतवणूक केली आहे.

मेहनत आणि कुठल्याही परिस्थितीत खचून न जाण्याच्या कतरच्या वृत्तीने आज या देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आजही अनेक देश यु*द्धनीती तयार करण्यासाठी या हजार वर्ष जुन्या पुस्तकाचा आधार घेतात

Next Post

अमेरिकेच्या विरोधात गाणे लिहूनदेखील बॉब डिलनला नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
Next Post

अमेरिकेच्या विरोधात गाणे लिहूनदेखील बॉब डिलनला नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता

दाऊदने बॉ*म्बस्फो*ट घडवून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.