The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जग बदलून टाकणारे हे शोध लावून संशोधकांनाच पश्चाताप झाला होता

by द पोस्टमन टीम
20 April 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


विज्ञानाने आपले जगणे कितीतरी सुसह्य केले आहे. आज पावलोपावली आपल्याला या विज्ञानाच्या साधनांची मदत लागते. त्याशिवाय दिवसातील एका मिनिटाचीही कल्पना करणे अशक्य. पण, ज्या संशोधनाचा आज आपल्याला इतका फायदा होत आहे, त्याचा शोध लावल्याबद्दल त्याच संशोधकांना पश्चाताप होत होता. हो! कदाचित हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, बऱ्याच संशोधकांना असे वाटत होते की हा शोध लावून आपण चूक केली किंवा हा शोध आपण लावलाच नसता तर बरे झाले असते.

कोण होते हे संशोधन ज्यांना स्वत:च्याच संशोधनाबद्दल पश्चाताप होत होता आणि का? जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा.

टीम बर्नर्स ली (इंटरनेट)

प्राध्यापक टीम बर्नर्स ली यांनी HTML आणि WWW चा शोध लावला. आज या संशोधनाचा फायदा अब्जावधी लोकांना होत आहे. या संशोधनाच्या वापराने अनेक नवनवे शोध लावले जात आहेत. १९८९ मध्ये त्यांनी हा शोध लावला तेंव्हापासून कित्येक लोकांच्या आयुष्यात कितीतरी मोठा फरक पडला.

संपूर्ण जगात एक नवी क्रांती घडली आणि जग जवळ आहे. परंतु त्यांना मात्र आपल्या या शोधाबद्दल अभिमान वाटत नव्हता.



त्यांना पहिला पश्चाताप वाटत होता तो ‘//’ या डबल स्लॅश चिन्हाचा. हे चिन्ह न वापरता जर इंटरनेटचा वापर करणे शक्य असते तर मला अधिक आनंद वाटला असता असे ते म्हणत.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यापद्धतीने इंटरनेटचा वापर करून फेक न्यूज पसरवल्या जातात आणि चुकीच्या गोष्टींचा प्रसार करण्यासाठी याचा वापर केला जातो आहे, त्याबद्दल. २०१८ मधे ते म्हणाले होते, “वेबचा मानवसेवेचा उद्देश पूर्णतः फसला आहे.”

ते आता इनरप्ट नावाचा नवा शोध लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे आज ज्यापद्धतीने इंटरनेटचा वापर होत आहे तो रोखला जाईल.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

टॉम करेन (रेलीज चॉपर)

१९७० च्या दशकात त्यांनी रेलीज चॉपरचा शोध लावला. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे याला पाठीमागे रेलून बसता येण्यासाठी आधार होता. त्याकाळात ही बाईक खूपच म्हणजे खूपच लोकप्रिय ठरली होती. परंतु २०१४ मधे जेंव्हा या बाईकचे पुनरागमन होण्याची बातमी आली तेंव्हा पहिल्यांदा नाराज होणारी व्यक्ती होती, टॉम करेन.

“एक तर या बाईकचे वजन खूप आहे. दूरच्या अंतरावर जायचे झाल्यास या बाईकचा अजिबात उपयोग होत नाही. एकदा एका व्यक्तीने या बाईकवरून जास्त अंतराचा प्रवास केला तेंव्हा त्याने अशी जड बाईक बनवल्याबद्दल खूपच तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली होती,” असे टॉम करेन यांचे म्हणणे होते. आपल्याच संशोधनाबाबत ते असमाधानी होते.

मिखाईल कलाश्निकोव्ह (एके-४७)

मिखाईल कलाश्निकोव्ह याने अशा हत्याराचा शोध लावला ज्याबद्दल रशियन लोकांना खूपच अभिमान वाटत होता. १९४७ मधे या त्याने ज्या रायफलचा शोध लावला त्याला एके-४७ हेच नाव देण्यात आले. याचे संशोधन करण्यामागे हाच उद्देश होता की एकदम मोठ्या प्रमाणावर याची निर्मिती करता येईल आणि अत्यंत सोप्या पद्धतीने हाताळता येईल.

२०१४ मधे कलाश्निकोव्ह यांचे निधन झाले. त्यांच्या या संशोधनाला खूप प्रसिद्धी मिळाली पण यामुळेच जगभरात खूप मोठ्या प्रमाणात हत्या देखील घडून आल्या. कलाश्निकोव्ह यांना याचा खूप पश्चाताप होता,

“माझ्या आत्म्याला होणाऱ्या वेदना खूपच असह्य आहेत. माझ्या संशोधनामुळे कुठलेच प्रश्न सुटले नाहीत. मी संशोधित केलेल्या हत्यारामुळे जगभरात असंख्य मृत्यू होत असतील तर खरेच हा माझा दोष आहे का? हा एकच प्रश्न मला दिवसेंदिवस पोखरत आहे. मी जितका अधिकाधिक यावर विचार करतो तितके मला एकाच गोष्टीबाबत सखेद आश्चर्य वाटते, शेवटी देवाने माणसाला इतका द्वेष, लोभ आणि आक्रमकता का दिली असेल.”

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मिखाईल कलाश्निक्लोव्ह रशियाच्या टँक विभागात काम करत होते. जर्मन सैन्याविरोधात टिकून राहायचे असेल तर टँकपेक्षाही हलके आणि हाताळायला सोपे जाणारे शास्त्र हवे म्हणून त्यांनी रायफलचा शोध लावला. अर्थात, हा शोध लष्करापुरताच मर्यादित राहील अशी त्यांना अपेक्षा होती. पण, त्यांचा दारूण अपेक्षा भंग झाला.

यापेक्षा मी शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरणारे एखादे मशीन वापरले असते तर मला समाधान मिळाले असते असेही ते म्हणाले होते.

ग्रुएन (शॉपिंग मॉल्स)

अमेरिकेतील शॉपिंग मॉल्सचा जनक. १९५६मधे त्याने याचा पाया घातला. एकाच ठिकाणी खरेदी आणि संस्कृती एकत्र आल्या तर असा विचार करून त्याने एकाच जागेत सर्व वस्तूंच्या खरेदीचा आनंद घेण्याची कल्पना योजली.

त्याचा पहिला शॉपिंग कॉम्प्लेक्स ८००००० स्क्वेअर फुटाचा होता. परंतु अशा प्रकारच्या वस्तू अमेरिकेत उभारल्याचा त्याला खूप पश्चाताप झाला. त्याच्या मृत्यूआधी दोन वर्षे त्याने क्वार्टझ मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, “मला या शॉपिंग मॉल्सचा जनक म्हटले जाते. पण, जर खरेच शक्य असेल तर मला हे पालकत्व अजिबात नको आहे. या शॉपिंग मॉल्सनी आमच्या शहराचे सौंदर्य बिघडवून टाकले आहे.” १९५६ पासून आजतागायत संपूर्ण अमेरिकेत १३०० मॉल्स उभारले आहेत.

जे. रॉबर्ट ऑपेनहायमर (अ*णुबॉ*म्ब)

जे. रॉबर्ट ऑपेनहायमर याला अ*णुबॉ*म्बचा जनक म्हटले जाते. दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात तो लॉस अलमोस प्रयोगशाळेचा प्रमुख म्हणून काम पाहत होता. १९४५ मध्ये त्याने अ*णुबॉ*म्बचा शोध लावला. अ*णुबॉ*म्बचा प्रयोग करण्याआधी आमच्या सरकारने जपान आणि संपूर्ण जगालाच अणुबॉम्ब म्हणजे काय आणि त्याचे परिणाम काय होतील हे सांगायला हवे होते.

हिरोशिमा आणि नागासाकीमधे झालेल्या अ*णुबॉ*म्बच्या हल्ल्यात अनुक्रमे १,६६,००० आणि ८०,००० लोकांचा मृत्यू झाला. त्याचे वर्षानुवर्षे झालेले परिणाम वेगळेच. हे सगळे पाहून ऑपेनहायमरने आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि याबाबतचे संशोधन पुढे नेण्यासही त्याने नकार दिला.

एथन झुकरमन (इंटरनेट जाहिरात)

कुठलीही वेबसाईट उघडली की त्यावर झळकणारी जाहिरात पाहून आपल्याला वैताग आलेला आहे. पण, या वैताग देणाऱ्या गोष्टीचाच शोध याने लावला. मॅसॅच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधे एथन झुकरमन सिव्हिक मिडिया सेंटरचा प्रमुख होता.

त्याच्या कंपनीला अधिकाधिक नफा कसा कमावता येईल आणि कंपनीच्या प्राप्तीत वाढ कशी होईल, यावर संशोधन करता करता, त्याला या पॉप-अप जाहिरातींचा शोध लागला.

पण, ही जाहिरात म्हणजे इंटरनेटचा सर्वात मोठा गुन्हा आहे. वेबपेज हाताळणाऱ्या लोकांचा डाटा गोळा करून त्यानुसार त्यांना जाहिरात दाखवली जाईल अशी यामागील कल्पना होती. परंतु आज याच गोष्टीचा प्रत्येकाला तिरस्कार आणि वैताग आहे.

अल्फ्रेड नोबेल (डायनामाइट)

अल्फ्रेड नोबेलने १८६७ मध्ये डायनामाइटचा शोध लावला. परंतु यामुळे अशांतता पसरू शकते हे लक्षात आल्यावर त्याने आपल्या नावाने शांततेचा पुरस्कार देण्यासाठी संस्था स्थापन केली आणि त्यासाठी निधीची तरतूदही केली. आपल्या संशोधनाचा वापर करून कित्येक हानिकारक कृत्ये केली जात आहेत हे पाहून त्याला उबग आला होता. म्हणूनच त्याने शांततेसाठी काम करणाऱ्यांसाठी जागतिक पुरस्काराची घोषणा केली. नंतर त्याच्या लक्षात आले की आपले हे संशोधन जर युद्धात वापरले गेले तर त्यामुळे किती मोठी हानी घडून येईल.

“दोन राष्ट्रांचे सैनिक क्षणात एकमेकांचा नाश करू शकतात हे ज्या दिवशी त्या दोन राष्ट्रांना जाणवेल त्या दिवशी जगभरातील सैन्य दले बरखास्त होतील,” असे तो म्हणत असे.

संशोधन करूनही आपल्या संशोधनाचा जग सुंदर करण्यासाठी वापर न होता उलट ते आणखी कुरूप करण्यासाठीच वापरले गेले हे पाहून या संशोधकांना पश्चाताप होणे साहजिकच होते. संशोधक संवेदनशील असतात, त्यामुळे ज्या उद्देशाने त्यांनी संशोधन केले तो उद्देश बहुसंख्य लोकांनी स्वीकारला नाही, यात खरे पाहता त्यांचा दोष काहीच नाही तरीही त्यांनी याबद्दल आत्मक्लेश करून घेतला. त्यांच्या या संशोधनाकडे आपण ज्यादिवशी सकारात्मकतेने पाहू आणि वापर करू, त्याच दिवशी त्यांना खरे समाधान मिळेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या लोकांमुळे रेल्वेतल्या टॉयलेटमधला मग साखळीने बांधून ठेवलेला असतो

Next Post

नेहरूंनी तीन मूर्ती भवनाचा बगीचा उखडून तिथे शेती केली होती

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

नेहरूंनी तीन मूर्ती भवनाचा बगीचा उखडून तिथे शेती केली होती

करोडो रुपये खर्चून प्लेअर्स विकत घेणाऱ्या आयपीएल टीम कमाई कशी करतात..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.