The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वयाच्या दुसऱ्या वर्षी चीनच्या राजगादीवर बसलेला शापित सम्राट!

by द पोस्टमन टीम
29 May 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


नशिबाचे फासे उलटे पडले की कुणावर काय वेळ येईल हे सांगता येत नाही. तसेही स्वकर्तृत्व गाजवण्याची आकांक्षा नसणाऱ्या लोकांना नेहमीच इतरांच्या ताटाखालचे मांजर राहण्यात धन्यता वाटते. चीनचा शेवटचा सम्राट फुयीच्या जीवनावरून एक नजर फिरवल्यास लक्षात येईल की स्वतः एका बलाढ्य राष्ट्राचा सम्राट आणि एका पराक्रमी घराण्याचा वंशज असूनही त्याने नेहमीच कुणाच्या तरी ताटाखालचे मांजर होऊन जगणे स्वीकारले. म्हणूनच कधीकाळी सम्राट म्हणवून घेणाऱ्या या राजावर शेवटच्या क्षणी माळीकाम करण्याची वेळ आली.

७ फेब्रुवारी १९०६ रोजी फुयीचा जन्म झाला. त्यावेळी एम्प्रेस सिक्सी हा चीनचा कारभारी होता. त्याने फुयीला सम्राटपदी बसवून त्याचा राज्याभिषेक करवण्याचे ठरवले. फुयीचे वय लहान असल्याने त्याच्यावर दबाव टाकून किंवा त्याला अंधारात ठेवून आपल्याला हवा तसा राज्यशकट हाकता येईल असे त्याचे धोरण होते. परंतु, फुयीचा राज्याभिषेक होण्याआधीच सिक्सीचे निधन झाले. फुयी फक्त दोन वर्षांचा असतानाच त्याचा राज्याभिषेक करून त्याला गादीवर बसवण्यात आले.

फुयीचा राज्याभिषेक होत असताना दोन वर्षांचा फुयी राज्याभिषेकासाठी जमलेली भव्य गर्दी पाहून तो भांबावून गेला होता, घाबरून रडू लागला. राज्याभिशषेकावेळीच फुयीचे असे रडणे म्हणजे अपशकून असल्याची चर्चा केली जाऊ लागली.

शिंग वंश त्यावेळी खूपच खडतर परिस्थितीतून जात होता. फुयीचा राज्याभिषेक झाल्यावर सरदार युआन शिकायी याने राज्याच्या ताबा आपल्या हातात घेतला. पण, गाडीवर मात्र फुयीच होता. कारण, फुयीला जर गादीवरून पदच्युत केले तर जनतेत रोष निर्माण होईल अशी भीती युआनला होती. १९१२ साली चीनमध्ये क्रांती झाली त्यात शिंग वंशाचा पाडाव झाला. यावेळी फुयीच्या आईने फुयीचे राज्यपद त्यागाल्याचा करार केला.

आता फुयी सम्राट राहिला नाही तरी त्याला चीनमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली. युआन शिकाईला स्वतः गादीवर बसण्याची इच्छा होती. १९१५ साली त्याने स्वतःला चीनचा सम्राट घोषित केले. परंतु संपूर्ण चीनमध्ये सरदारांनी उठाव केल्यामुळे त्याच्या सम्राटपदाला कुणाचीही संमती मिळाली नाही. १९१६ साली युआनचा मृत्यू झाला. अनेक सरदारांनी बीजिंगवर आक्र*मण केले. सरदारांच्या आपसात लढाया सुरूच राहिल्या.



१९२४ पर्यंत फुयीला त्याच शहरात राहण्याची अनुमती देण्यात आली पण, १९२४ साली फेंग युशिआंगने इथे ह*ल्ला करून फुयीला बीजिंगमधून हाकलवून लावले. यावेळी फुयी आपल्या वडिलांच्या घरात राहायला गेला पण त्याला तिथे अजिबात करमत नव्हते. मग त्याने जपानकडे राजाश्रय देण्याची विनंती केली. १९२५ साली तो जपानच्या तियानजीनमधील दुतावासात गेला.

जपानने मंचुरीयावर ह*ल्ला केल्यावर चीनच्या नॅशनॅलिस्ट पक्षाचे नेते शियांग काई-शेक यांनी फुयीला विनंती केली की त्याने चीनला परत यावे, नाहीतर जपान त्याचा वापर करून स्वतःचा अजेंडा रेटत राहील.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पण, फुयीचा शियांगवर आणि त्याच्या पक्षावर विश्वास नव्हता. उलट त्याने जपानच्या हातचे बाहुले बनून राहणे पसंत केले.

१९३२ साली त्याला मंचुरिया राज्याचा राजा बनवण्यात आले. अर्थात तो फक्त नामधारी राजा होता. चीनमधील जपानच्या वसाहतवादी धोरणांना न्याय मिळवण्यासाठी हे नाटक रचण्यात आले होते. मंचुरियाच्या आडून जपानला उर्वरित चीनवर आपले वर्चस्व राखणे शक्य होते. फुयी हा बुद्धिस्ट असला तरी राज्याचा राजधर्म शिंतोइजम होता. आपल्या नंतर या राज्याचा उत्तराधिकारी कोण असेल हे निवडण्याचा अधिकार देखील त्याने जपानलाच दिला आणि फुयीनंतर जपानचा सम्राटच मंचुरियाचा उत्तराधिकारी बनेल हे त्याने मान्य केले. त्याला फक्त मंचुरियामधील ऐषोआरामी जीवनात रस होता. शिवाय, आपल्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त त्याचा इतर कुणावरही विश्वास नव्हता.

परंतु दुसऱ्या महायु*द्धात जपानची पीछेहाट होऊ लागल्याने फुयीच्या नशीबाचे पारडे पुन्हा एकदा फिरले. सोव्हिएत युनियनने जपानविरुद्ध यु*द्ध पुकारले आणि त्यांनी मंचुरियावर ह*ल्ला केला. मंचुरियाला वाचवण्यासाठी जपानने काहीच केले नाही कारण, जपानने पूर्ण शरणागती पत्करण्याची तयारी केली होती.

१५ ऑगस्ट १९४५ रोजी मंचुरिया सोव्हिएत संघात सामील झाल्याचे घोषित केले गेले. फुयीने जपानला पळून जाण्याचा प्रयत्न केला पण, सोव्हिएतच्या सैनिकांनी त्याला पकडले आणि त्याला कैद केले.

फुयी आपल्या जीवाला काही बरे वाईट होईल या कल्पनेने घाबरला होता. परंतु सोव्हिएतच्या सैनिकांनी त्याला सन्मानजनक वागणूक दिली. छळछावणीत ठेवूनही त्याच्या गरजा पुरवल्या जात होत्या. इतर कैद्यांपेक्षा आपल्याला चांगली वागणूक मिळते हे पाहून फुयी तर स्टालिनचा चाहताच झाला.

१९४७ साली चीनमध्ये नॅशनॅलिस्ट आणि कम्युनिस्ट यांच्यात यु*द्ध सुरु झाले. फुयीला वाटले की कदाचित आता आपल्याला चीनमध्ये परत पाठवले जाईल. या भीतीने त्याने स्टालिनला आपल्याला आश्रय देण्याची विनंती करणारे पत्र लिहिले.

माओ झेडॉंग विजयी झाल्यावर मात्र स्टालिनने फुयीला चीनला पाठवले.

फुयीला वाटत होते माओ आपल्याला मारून टाकेल. पण, माओने देखील आपल्या प्रचारासाठी फुयीचा वापर करून घेण्याचा विचार केला. माओने त्याला सुधारगृहात पाठवले आणि तिथे दहा वर्षे त्याला कम्युनिजम शिकवण्यात आला. इथे त्याच्याकडून कष्टाची कामे देखील करवून घेतली जाऊ लागली. कधीकाळी चीनचा सम्राट असलेला फुयी त्याच चीनमध्ये कामगार म्हणून राहू लागला.

१९६० साली फुयीची या छावणीतून सुटका करण्यात आली आणि त्याला चीनचे नागरिकत्व देण्यात आले. चीनच्या सम्राटालाच चीनचे नागरिकत्व देण्याची वेळ यावी, किती ती शोकांतिका!

१९६२ साली चीन सरकारने सुचवलेल्या मुलीशी त्याने विवाह केला. याचे देखील स्वातंत्र्य त्याला राहिले नव्हते. त्याची बायको खूपच कजाग होती. शेवटी उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने एका राष्ट्रीय उद्यानात माळ्याचे काम करायला सुरुवात केली. बीजिंगच्या राष्ट्रीय जैविक उद्यानाची देखभाल करण्याचे काम त्याच्यावर सोपवण्यात आले. १९६४ मध्ये तो नॅशनल पिपल कॉंग्रेसच्या ग्रंथालयाचा ग्रंथपाल झाला.

१९६६ मध्ये त्याला किडनीचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि त्याची तब्येत वेगाने ढासळू लागली. नेमके याचवेळी चीनमध्ये सांकृतिक परिवर्तन सुरु झाले. रेड गार्ड्सना चीनचा जुना इतिहास पुसून नवा साम्यवादी क्रांती घडवून आणायची होती. त्यांच्या भीतीने फुयीला एकही रुग्णालयाने उपचार दिले नाहीत. सर्वांनी नकार दिला आणि यातच फुयीचे निधन झाले. १९६७ साली वयाच्या ६१ व्या वर्षी चीनच्या शेवटच्या सम्राटाने शेवटचा श्वास घेतला.

आपल्या सामर्थ्याची आणि योग्यतेची जाणीव नसलेला फुयी आयुष्यभर फक्त एका पटावरील सामान्य प्यादे बनून जगला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved

ShareTweet
Previous Post

एका हाताने पाळण्याची दोरी हलवणारी ही बाई दुसऱ्या हाताने संपूर्ण जग हलवीत होती

Next Post

तीन दिवस, अकरा कॉम्पिटिशन्स आणि पाच गोल्ड, पी.टी. उषांनी इंडोनेशियात डंका पिटला होता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

तीन दिवस, अकरा कॉम्पिटिशन्स आणि पाच गोल्ड, पी.टी. उषांनी इंडोनेशियात डंका पिटला होता

एक तरंगते वेश्यालय : सर्वाधिक कलंकित समुद्रप्रवासाची गोष्ट

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.