The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

समुद्राखाली आहे हे पोस्ट ऑफिस, पत्र टाकायला नऊ फूट पाण्याखाली पोहत जावे लागते..!

by द पोस्टमन टीम
19 February 2025
in विश्लेषण, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


१८७४ साली ९ ऑक्टोबरच्या दिवशी २२ देशांनी युनिव्हर्सल पोस्टल युनियन बनवण्याचे सुनिश्चित केले. ९ ऑक्टोबर १९६९ ला जपानच्या टोकियो शहरात त्या तारखेला जागतिक टपाल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त लोकांना टपाल सेवेशी जोडणे या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो.

जगात १४२ देशात पोस्टल कोड आहेत. हे युनिव्हर्सल पोस्ट सेवेअंतर्गत येतात. भारतात पिनकोड व्यवस्था असून त्याच्या आधारावर पत्रांचे वाटप करण्यात येते.

पिनकोडची सुरुवात १५ ऑगस्ट १९७२ ला करण्यात आली. पिनची पहिली संख्या क्षेत्र, दुसरी सबडिव्हिजन, तिसरी संख्या जिल्ह्याचा कोड आणि शेवटची संख्या ही तुमच्या भागातील पोस्ट ऑफिसची असते.

आज देशाच्या कानाकोपऱ्यात दीड लाखाहून अधिक पोस्ट ऑफिस आहेत. भारतीय पोस्टाच्या एका कार्यालयात ७००० लोकांना सेवा पुरवण्यात येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादे टपाल पाच दिवसात गंतव्य स्थानी पोहचण्याचे ८३% चान्सेस आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी डाक सेवा वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असते. सणाच्या वेळी पोस्टाचा विशेष सेवा सुरु असतात. स्पीड पोस्टाने जलद गतीने टपाल पाठवण्यात येते.

पोस्ट ऑफिस काही फक्त जुन्या इमारतीत आणि लाल रंगात रंगवलेले नसतात. काही पोस्ट ऑफिस इतके सुंदर सजवलेले असतात की त्यामुळे आज ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहेत.



काश्मिरात एक तरंगते पोस्ट ऑफिस आहे, जे एका हाऊसबोटीवर आहे. हे पोस्ट ऑफिस दाल सरोवरात आहे. या पोस्ट ऑफिसचे आधीचे नाव नेहरू पोस्ट ऑफिस होते जे नंतर फ्लोटिंग पोस्ट ऑफिस असे करण्यात आले. २०१४ साली आलेल्या पुरात हे पोस्ट ऑफिस वाहून जाणार होते पण जवानांच्या प्रयत्नांमुळे या पोस्ट ऑफिसला वाचवण्यात यश आले. जनजीवन सुरळीत झाल्यावर हे पोस्ट ऑफिस पुन्हा काम करू लागले.

व्हिएतनाममध्ये जगातील सर्वात सुंदर पोस्ट ऑफिस आहे. तेथील हो चि मिन्ह शहरात हे पोस्ट ऑफिस १८८६ साली फ्रेंच वास्तुविशारद गुस्तवो आयफेल यांनी बनवले आहे. आयफेल यांनीच अमेरिकेच्या प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची निर्मिती केली आहे. हे पोस्ट ऑफिस तयार करायला तीन वर्षांचा कालावधी लागला होता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

एका युरोपियन स्टेशनप्रमाणे याची वास्तू असून याठिकाणी एक मोठा नकाशा लावण्यात आला आहे. शिवाय याठिकाणी  मोठ्या प्रमाणात टपालपेट्या आणि फोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे जेणेकरून लोक आपल्या आप्तस्वकीयांना फोन करून तासंतास गप्पा मारू शकतात.

रिपब्लिक ऑफ वानूउतू येथे एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पोस्ट ऑफिस आहे. याठिकाणी पाण्यात जमिनीपासून ९ फूट खोल पाण्यामध्ये पोस्ट ऑफिस तयार करण्यात आले असून इथे एक टपाल पेटी आहे ज्यात पत्र कधीच ओली होणार नाहीत अशी व्यवस्था केली आहे. या देशात पाण्यात पोहणाऱ्या लोकांची संख्या इतकी जास्त आहे की काही दिवसातच इथली टपाल पेटी भरून जाते. या देशातील सरकार देखील अशाप्रकारे पाण्यात जाऊन पत्र टपाल पेटित टाकण्याला ऍडव्हेंचर ऍक्टव्हिटी म्हणून बघते. स्कुबा डायव्हिंगची आवड असणारे लोक येथे मोठ्या संख्येने येतात.

जगातील सर्वात थंड आणि उजाड जागा असलेल्या अंटार्क्टिका येथे देखील पोस्ट ऑफिस आहे. याला पोर्ट लोकरे म्हणून ओळखले जाते. या पोस्ट ऑफिसचा एक भाग वास्तू संग्रहालयासाठी वापरण्यात येतो. या पोस्ट ऑफिसातून पत्र पाठवण्यासाठी एक डॉलर शुल्क आकारले जाते. दोन आठवड्यापासून एक वर्षापर्यंतचा कालावधी या पत्राला त्यांच्या गंतव्य स्थानी पोहचण्यासाठी लागत असतो. बाहेरील वातावरणावर पत्राचा प्रवास बेतलेला असतो.

अशाप्रकारे आज मोबाईलच्या युगात टपालाने पत्र पाठवण्याची परंपरा लुप्त होत चालली असली तरी अशी काही ठिकाणं अजून आहेत जे मामाचे पत्र कधीच हरवू देत नाहीत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या चार प्रजतीच्या कुत्र्यांमुळे भारतीय सैन्य मजबूत झाले

Next Post

मार्को पोलो : युरोपियन लोकांना आशिया खंडात माणसंच राहतात, राक्षस नाही, हे सांगणारा प्रवासी

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

मार्को पोलो : युरोपियन लोकांना आशिया खंडात माणसंच राहतात, राक्षस नाही, हे सांगणारा प्रवासी

भंवरी देवी : महिलांच्या शारीरिक शोषणाविरोधात उठलेला क्रांतिकारी आवाज

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.