The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सैतानाच्या या मंदिरात गेल्यावर कोणीच परत येत नाही, शास्त्रज्ञांनी शोधलं कारण

by द पोस्टमन टीम
16 February 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


काही दिवसांपूर्वी टर्कीचा हुकूमशहा एर्दोगन याने हागिया सोफिया या वस्तू संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर केले होते. टर्की हा देश तसा अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. ऐतिहासिकदृष्टया देखील या देशाला फार महत्व आहे. या देशात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत.

इथे एक असे मंदिर आहे जिथे कोणी गेले तर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. प्राचीन शहर हेरापोलिस येथे हे मंदिर आहे. या मंदिराला नरकाचे द्वार देखील म्हटले जाते. दोन वर्षांपूर्वीच या मंदिराचे रहस्य जगासमोर आले आहे.

काही वर्षांपूर्वी टर्कीचे हेरापोलिस शहर ऍडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये रस असलेल्या लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र होते. देश विदेशातून पर्यटक या ठिकाणी येऊन इथे असलेल्या एका खास मंदिरात जाण्याची हिंमत करायचे. या मंदिराजवळ जो जातो, मग तो एखादा पशुपक्षी का असेना त्याचा मृत्यू अटळ आहे. काळाबरोबर या मंदिराचे रहस्य गडद होत गेले.

या मंदिराला प्लुटोचे मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मृत्यूच्या देवतेचे मंदिर आहे असे मानले जायचे. बरीच वर्षे लोकांची श्रद्धा होती की इथे असलेल्या देवाच्या श्वासामुळे त्याच्या जवळ जाणाऱ्या लोकांचा आणि प्राण्यांचा मृत्यू होतो. सतत होणाऱ्या मृत्युंमुळे लोकांनी त्या मंदिराच्या आसपास भटकणे बंद केले. जे पर्यटक तिथे जाण्याचा प्रयत्न करायचे त्यांना स्थानिक लोक अडवायचे.

ज्यावेळी पर्यटक ऐकायचे नाही त्यावेळी स्थानिक लोक त्यांच्या हातात एखाद्या जिवंत पक्ष्याला द्यायचे आणि त्याला त्या मंदिराच्या जवळ सोडायला सांगायचे. जेणेकरून त्या परिसरात गेल्यावर त्या पक्ष्याला मरताना त्या पर्यटकांनी बघावे आणि तिथे जाण्याचा हट्ट सोडून द्यावा.



पर्यटक पक्षी घेऊन जायचे, मंदिराच्या परिसरात पक्षी क्षणार्धात मरून जायचा, हे बघून पर्यटक देखील घाबरायचे आणि या जागेला भेट देण्याची त्यांची इच्छा देखील मरून जायची. यामुळे रहस्य दिवसेंदिवस गडद होत चालले होते.

हेरापोलिस हे एक प्राचीन रोमन शहर आहे. या शहराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विविधता आढळून येते. इथे कॅल्शियमयुक्त गरम पाण्याचे झरे असून ते आहेत. या भागातून सतत पाण्याचे बुडबुडे निघत असतात.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

हिवाळ्यात हे शहर थर्मल स्पा म्हणून काम करते. हे पाणी आरोग्यदायी असून अनेक लोक लांबून याठिकाणी उपचारासाठी येत असतात. याठिकाणी त्वचा आणि इतर विकारांवर गुणकारी परिणाम होतात.

रोमन काळात इथे १५ हजार लोकांसाठी थिएटर बनवण्यात आले होते. त्याच काळात या शहरातील दुसरी गोष्ट म्हणजे प्लूटो मंदिर तयार करण्यात आले होते. रोमन सांस्कृतिक पुराणानुसार प्लूटो हा जमिनीखालच्या भागाचा राजा आहे.

इसवी सन पूर्व काळात स्ट्रॅबो नावाच्या एका स्कॉलरने मंदिराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण तो मागे फिरला. मंदिरातून निघणारा धूर बघून तो भयचकित झाला होता.

फेब्रुवारी २०१८ मध्ये या मंदिरात धूर कसा निर्माण होतो आणि लोक का मरतात, यावर संशोधन करण्यात आले. यात समोर आले की या मंदिराच्या खालच्या भागात कार्बन डायॉक्साईडचा मोठा साठा आहे. याबरोबरच गरम पाण्याच्या स्रोतातून देखील काही विषारी वायूंचे उत्सर्जन होऊन त्यामुळे हा संपूर्ण परिसर धोकादायक बनला आहे.

कार्बन डायॉक्साईड हा वायू तसा इतका धोकादायक नाही. जोपर्यंत या वायूचे वातावरणातील प्रमाण संतुलित असते तोपर्यंत कुठलीच अडचण नसते. जेव्हा या वायूचे प्रमाण १० टक्के होते, तेव्हाच माणूस गुदमरायला सुरुवात होते. वातावरणात हा वायु 0.039 टक्के इतका असतो. मंदिर परिसरात मात्र याचे प्रमाण तब्बल ९३ टक्के नोंदवले गेले होते, यामुळेच इथे लोक मरत होते.

कार्बन डायॉक्साईड हा वायू ऑक्सिजनच्या तुलनेत दीडपट जास्त वजनदार असतो. यामुळे हा गॅस जिथे असतो तिथे धुराचे प्रमाण खूप असते. मंदिराच्या परिसरात हाच धूर असतो म्हणून तिथे जाणारा सजीव प्राणी तिथे दीर्घकाळ जगू शकत नाही.

हे मंदिर कोणी व का निर्माण केले, याबद्दल कुठलीच माहिती उपलब्ध नाही, फक्त हे मंदिर जीवघेणे आहे, ही एकमेव गोष्ट या मंदिराबाबत प्रसिद्ध आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

सरदार पटेलांनी दम भरला आणि भोपाळ भारतात विलीन झालं

Next Post

क्युबामध्ये आहे एक ‘फाईव्ह स्टार जेल’, एका कैद्यावर खर्च करण्यात येतात ९८ कोटी रुपये !

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

क्युबामध्ये आहे एक 'फाईव्ह स्टार जेल', एका कैद्यावर खर्च करण्यात येतात ९८ कोटी रुपये !

एक बुटका म्हणून हिणवला गेलेला हा माणूस मृत्यूच्या वेळी जगातील सर्वात उंच माणूस होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.