The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टीव्हीवर लागणाऱ्या ‘सास-बहू’छाप मालिकांना डेली सोप का म्हणतात..?

by द पोस्टमन टीम
17 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दिवसभर टिव्हीवर सुरु असलेल्या घरगुती मुद्द्यांवर आधारित असणाऱ्या मालिकांना इंग्रजीत ‘सोप ऑपेरा’ असे का म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? हे नाव रशियन ऑपेराशी संबंधित असू शकते असा अंदाज येईल, पण हे कितपत खरे आहे याचाच आढावा आपण आज घेणार आहोत.

या ‘सोप ऑपेरा’ची सुरुवात झाली ती १९३० च्या दशकात. रेडिओ चॅनेल चालवणाऱ्या काही व्यक्ती जाहिरातींमधून मिळणारा पैसा कसा वाढवता येईल यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत होते. त्यात त्यांनी घरगुती वस्तू विकणाऱ्या उद्योगांना जाहिरातदार म्हणून लक्ष्य केले. या उद्योजकांना जाहिरात द्या म्हणून मनवणे त्यांच्यासाठी सोपे होते, कारण बहुतेक लोक हे दुपारभर रेडिओ ऐकत असत. त्यात बहुतेक श्रोते स्त्रिया असल्याने ही उत्पादने थेट त्यांच्यापर्यंत जाहिरातीमार्फत पोहोचू शकतील असे ते या उद्योजकांना सांगत.

यात अग्रेसर होते ते प्रॉक्टर आणि गँबल हे दोन रेडिओ स्टुडिओ. रोज रेडीओवर लागणाऱ्या मालिकांमध्ये त्यांनी एका मोठ्या ऑक्झिडॉल साबणाच्या पावडरची जाहिरात केली. ज्याचे प्रतिसाद बघून बाकीच्या रेडिओनेही आपल्याकडच्या कार्यक्रमांत या जाहिराती सुरु केल्या.

कालांतराने रेडिओचे कार्यक्रमच या जाहिरातींसाठी ओळखले जाऊ लागले आणि साबणाच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात लागत असल्याने या कार्यक्रमांना नाव पडले-सोप ऑपेरा.

पहिली सोप ऑपेरा बनवण्याचे श्रेय दिले जाते ते अर्ना फिलीप्स या नायिकेला. “पेंटेड ड्रीम्स” नावाची मालिका तिने १९३० साली सीजीएन या शिकागोमधील रेडिओ स्टेशनसाठी बनवली होती. एक विधवा आणि तिच्या अविवाहित मुलीबद्दल असलेली ही एक १५ मिनीटांची मालिका होती. फिलिप्सनेच टिव्हीवरची पहिली सोप ऑपेराही बनवली होती. १९४९ साली तिने “दिज आर माय चिल्ड्रन” नावाची सोप ऑपेरा बनवली होती. फिलिप्सनेच पुढे जाऊन प्रसिद्ध अशा “गायडीँग लाईटस”, “द वर्ल्ड टर्न्स” आणि “अनादर वर्ल्ड” या दैनंदिन मालिका बनवल्या.



सोप ऑपेरा हे नाव पहिल्यांदा वापरले गेले ते १९३९ साली. ‘लॉस एंजेलीस टाइम्स’ आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वर्तमानपत्रांत पहिल्यांदा या मालिकांचा उल्लेख ‘सोप ऑपेरा’ म्हणून केला गेला. साबण कंपन्यांनी या मालिकांमध्ये आपल्या जाहिराती दाखवणे सुरुच ठेवले.

बोल्ड अँड ब्यूटीफुल, डेज ऑफ अवर लाईव्ज, जनरल हॉस्पिटल, यंग अँड रेस्टलेस या जागतिक वाहिन्यांवर दाखवण्यात येणाऱ्या काही सोप ऑपेरा आजही तग धरून आहेत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

भारतातही बऱ्याच सोप ऑपेरा आता बघायला मिळतात. भारतीय सोप ऑपेरा मुख्यत: घरगुती आयुष्य आणि त्यातील नात्यांत असणारी गुंतागुंत दाखवण्याचा प्रयत्न करतात. प्रेम, धोका, काही रंजक गुपिते आणि घरातल्या घरातच एकमेकांवर केल्या जाणाऱ्या कुरघोड्या हे भारतीय सोप ऑपेराजच्या मुख्य कथानकाचे भाग असतात.

दैनंदिन सुरु असलेल्या मालिका आजही मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या उत्पादन कंपन्यांसाठी जाहिरातीचे मुख्य साधन आहेत. भारतातल्या गृहिणी तर या मालिका न चुकता बघतात, त्यात असणारी रंजक कथानकं महिलांच्या मनावर अगदी घट्ट असा ताबा मिळवण्यात यशस्वी होत आहेत.

कमाल आहे ना! एखाद्या जाहिरातीवरून एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीला नाव मिळालं! आता जेव्हा संध्याकाळी घरच्या बायकांसोबत “सोप ऑपेरा” बघाल तेव्हा त्यांना हा इतिहास नक्की सांगा, तेवढाच त्या ‘सोप ऑपेरा’ बघण्याचा वेळ जाईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ऑक्सिजनचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाला त्याच्या शोधाचं श्रेय कधी मिळालंच नाही

Next Post

पाकिस्तानच्या निर्मितीमागे जिन्नांपेक्षा मोठं योगदान या माणसाचं आहे..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

पाकिस्तानच्या निर्मितीमागे जिन्नांपेक्षा मोठं योगदान या माणसाचं आहे..!

ग्रेट वाॅल ऑफ चायनानंतर भारतातल्या या किल्ल्याचा नंबर लागतो

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.