The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोकरी गेली, बायकोने सोडले, २० वर्षं पडेल ते काम केले, वयाच्या ८८ व्या वर्षी उभा केला स्वतःचा ब्रँड!

by द पोस्टमन टीम
23 September 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


केंटुकी फ्राईड चिकन अर्थात केएफसी हे नाव आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कर्नल हारलँड डेव्हिड सँडर्स या माणसाने केएफसीची स्थापना केली होती. केएफसी हे जगातील प्रमुख फास्ट फूड चेन्सपैकी एक आहे. केएफसीचे मालक असलेले सँडर्स हेच त्याचे ब्रँड अम्बॅसेडर देखील होते.

आजही केएफसीच्या प्रमुख मार्केटिंगसाठी देखील सँडर्स यांचाच फोटो वापरला जातो.

१९५० साली केएफसीची सुरुवात झाली तेव्हापासून चार वेळा केएफसीचा लोगो बदलण्यात आला आहे. परंतु त्यावरील व्यक्ती मात्र तीच आहे.

१९५२ ते १९७८ या काळात या कंपनीचा लोगो ब्लॅक अँड व्हाईट होता. या केएफसीच्या लोगोवर असलेला सँडर्स यांचा फोटो हा गंभीर मुद्रेचा होता. असा फोटो घेण्यामागे ब्रँड उभा करण्यासाठी सँडर्स गंभीर होते, हे संचालकांना दाखवायचे होते.

केंटुकी फ्राईड चिकनचा KFC हा शॉर्टफॉर्म वापरून ब्रॅण्डिंग करण्यात आले. KFC हे नाव उच्चारायला सोपे असल्याने त्यांनी या नावाने ब्रॅण्डिंग करायला सुरुवात केली.



२००७ साली सॅन फ्रान्सिस्कोच्या टेस्सर नावाच्या कंपनीने केएफसीचा नवा लोगो तयार केला. टेस्सर कंपनीने या लोगोमध्ये काही ब्राईट कलर्स टाकले आणि त्याला अधिक आकर्षक बनवण्यात मदत केली. टेस्सरने या अगोदर अनेक मोठ्या ब्रॅंड्सचे लोगो डिझाईन केले होते. यात opeye’s, Wendy’s, I Hop, Domino’s Pizza, Quizno’s इत्यादी ब्रॅण्ड्सचा समावेश आहे.

केएफसीच्या नव्या लोगोमध्ये लाल बॅकग्राउंडमध्ये कोलोनल सँडर्स यांचा एप्रन घातलेला हसरा चेहरा दिसतो. या लोगोत गळ्याचा भाग देखील व्यवस्थित हायलाईट करण्यात आला आहे. कोलोनल सँडर्स यांची ग्राहकांच्या सहर्ष स्वागताची मुद्रा या लोगोमधून उठून दिसते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

१९०६ साली कोलोनल सँडर्स १६ वर्षांचे होते. त्यांनी आपलं खोटं वय सांगून सैन्यात प्रवेश मिळवला आणि १९०७ साली त्यांची सैन्यातून हकालपट्टी करण्यात आली. ते २० वर्षांचे होते त्यावेळी त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली. ती स्वतःबरोबर त्यांच्या मुलांना घेऊन गेली होती. अखेरीस ते एका हॉटेलात स्वयंपाकी म्हणून रुजू झाले, याच  काळात त्यांनी त्यांच्या पत्नीला पुन्हा घरी परत आणले. या काळात त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या. ६५ व्या वर्षी ते रिटायर झाले त्यावेळी त्यांच्या हातात विशेष काही उरले नव्हते.

रिटायरमेंटनंतर त्यांनी आपण आजवर आयुष्यात काय कमावलं याची नोंद केली व त्यात त्यांना कळून चुकले की स्वयंपाक करणे हे एकमेव काम आहे ज्यातून त्यांना समाधान मिळाले आहे. मग त्यांनी एका ठिकाणाहून ८५ डॉलर्सचे कर्ज घेतले आणि आपल्या जुन्या चिकन रेसिपीला फ्राय करून विकायला सुरुवात केली.  त्यांची ही नवीन रेसिपी अनेकांच्या पसंतीस उतरली. मग त्यांनी त्यातून आपला हॉटेलचा ब्रँड विकसित केला आणि वयाच्या ८८ व्या वर्षी केंटुकी फ्राईड चिकन अर्थात केएफसी हा ब्रँड उभा केला.

आज हा ब्रँड जगातील काही प्रमुख ब्रॅंड्सपैकी एक असून कोलोनल सँडर्स यांचा हसरा चेहरा त्यांच्या संघर्षाची गाथा मांडत असतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भूल न देता शस्त्रक्रिया करताना बघण्यासाठी लोक तिकीट काढून गर्दी करायचे!

Next Post

भारतात स्वर्णयुग आणणाऱ्या या सम्राटाने सिंधुपासून ब्रम्हपुत्रेपर्यंत ‘अजिंक्य’ साम्राज्य उभारले होते

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

भारतात स्वर्णयुग आणणाऱ्या या सम्राटाने सिंधुपासून ब्रम्हपुत्रेपर्यंत 'अजिंक्य' साम्राज्य उभारले होते

कसोटी क्रिकेटचे हे नियम तुम्हाला माहित आहेत काय..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.