The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तीन देशांचं राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर हे एकमेव व्यक्ती आहेत

by द पोस्टमन टीम
7 August 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारताच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवून देणारे दोनच व्यक्तित्त्व आपल्याकडे झाले आहेत. एक आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस तर दुसरे आहेत रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अनेक आंतरराष्ट्रीय आघाड्या तयार करून स्वतंत्र आणि अविभाजित भारताचं स्वप्नं पाहिलं तर रवींद्रनाथ टागोरांनी आधुनिक विचार, कविता व राष्ट्रवादाची नवीन दृष्टी जगाला दिली. टागोरांच्या राष्ट्रवादी विचारांची अजूनही भारतीय जनमानसावर पकड आहे. कवी, कथाकार, गीतकार, संगीतकार, निबंधकार, नाटककार आणि चित्रकार अशा असंख्य आयामांनी टागोरांचे व्यक्तिमत्त्व आकारास आले होते.

रवींद्रनाथ टागोरांचा जन्म कोलकाता शहरातील जोडासांको ठाकूरवाडी या भागात झाला. त्यांना ‘गुरुदेव’ म्हणून देखील ओळखले जाते. टागोरांचे वडील देवेंद्रनाथ टागोर हे एक थोर समाजसुधारक होते. त्यांची इच्छा होती की रवींद्रनाथांनी बॅरिस्टर व्हावे. टागोरांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिक्षण घेतले. लंडनला जाऊन कायद्याचे शिक्षण घेतले, पण यशस्वीपणे आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आणि त्यामुळे ते डिग्री न घेता भारतात परतले.

बालपणापासूनच रवींद्रनाथ टागोरांना कविता आणि कथा लिहण्याची आवड होती. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपली पहिली कविता लिहली होती. १८७७ मध्ये १६ वर्षांच्या वयात टागोरांची पहिली लघुकथा प्रकाशित करण्यात आली. त्यांच्या ‘गीतंजली’ या कादंबरीला १९१३ साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.

टागोरांना ब्रिटिश राजघराण्याने ‘नाईटहुड’ बहाल केले होते, पण जालियनवाला बाग ह*त्याकांडाचा निषेध म्हणून त्यांनी हा किताब परत केला.



१९२१ साली टागोरांनी ‘शांति निकेतन’ची स्थापना केली, आज याला ‘विश्व भारती’ युनिव्हर्सिटी म्हणून ओळखले जाते.

टागोर यांनी लिहलेली दोन गीते दोन राष्ट्रांनी अधिकृत राष्ट्रगीते म्हणून स्वीकारली आहेत. भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि बांग्लादेशचे राष्ट्रगीत ‘आमार सोनार बांग्ला’ दोन्ही रवींद्रनाथ टागोरांच्या रचना आहेत. इतकंच नाही श्रीलंकेचे राष्ट्रगीत ‘श्रीलंका माथा’ देखील टागोरांच्या कवितेची प्रेरणा घेऊन लिहिण्यात आले आहे.

श्रीलंकेचे राष्ट्रगीत लिहिणारे समरकून शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथ टागोरांसोबत वास्तव्यास होते. ते टागोरांच्या काव्य शैलीने प्रभावित झाले होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

टागोर यांच्या रचनांना बांग्लादेशाच्या पुस्तकातून हटवण्याचा प्रकार घडला आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी बांग्लादेशने आपल्या पाठ्यक्रमात बदल केला तेव्हा त्यांनी टागोरांच्या मातृभूमीच्या सुंदरतेचे वर्णन करणाऱ्या ‘बांग्लादेशर हृदय’ या कवितेला पुस्तकातून हद्दपार केले होते.

बांग्लादेशने असं का केलं याचं उत्तर अजूनही मिळालेलं नसलं तरी याचा रवींद्रनाथ टागोरांच्या लोकप्रियतेवर तसूभर देखील परिणाम झालेला नाही. टागोरांची साहित्याकृती अभिजात होती, आहे आणि राहणार आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

रामायण मालिकेत या मुस्लिम कलाकाराने सर्वाधिक भूमिका केल्या आहेत, तुमच्या लक्षात किती आल्या?

Next Post

फक्त ३५ डॉलर्सच्या मोबदल्यात बनलाय नायकीचा जगप्रसिद्ध लोगो

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

फक्त ३५ डॉलर्सच्या मोबदल्यात बनलाय नायकीचा जगप्रसिद्ध लोगो

संतांचे आखाडे काय असतात, त्यांचा उद्देश काय..? जाणून घ्या कुंभमेळ्याबद्दलच्या गोष्टी

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.