The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केरळच्या या डॉक्टरने आयडिया करून ड्रायव्हिंग कॉस्ट शून्य रुपयांवर आणली आहे

by द पोस्टमन टीम
6 February 2024
in विज्ञान तंत्रज्ञान, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


प्रॉडक्ट कुठलंही असू देत, टाटा या ब्रॅन्डचं नाव कायमच विश्वास आणि गुणवत्ता यांच्याशी जोडलं गेलं आहे. काही वर्षांपूर्वी बाजारात दाखल झालेल्या टाटा नेक्सोन इव्ही या कारचा बोलबाला पाहता हेच परत एकदा दिसून आलं. देशातली पहिली इलेक्ट्रिक कार असा लौकिक असलेली ही गाडी अल्पावधीत लोकप्रिय झाली.

हरित ऊर्जा या संकल्पनेवर आधारलेली कार म्हणून हिची नंबर प्लेटपण हिरव्या रंगाची आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत्या किंमती पाहता ही कार डिमांडमध्ये असणं स्वाभाविक होतं. टाटा या नावाला साजेसं असलेलं तिचं आबदार व्यक्तिमत्त्व आणि तिच्या वापरातून मिळणारे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष फायदे अनेकांना मोहवून गेले. अगदी कमी कालावधीत तब्बल २००० पेक्षा जास्त गाड्या विकल्या गेल्याने इलेक्ट्रिक व्हेइकल्सचं भविष्य उज्ज्वल आहे हे अधोरेखित झालं.

या गाड्यांचं चार्जिंग करण्यासाठी प्रति किलोमीटर खर्च आहे फक्त ०.७२४ रुपये.

त्यावरही केरळमधल्या एका डॉक्टरने नामी उपाय शोधून काढला आहे. त्यांचं नाव जोजो जॉन. ते सोलर पॉवरचा वापर करून गाडीची बॅटरी चार्ज करतात आणि त्यामुळे आज गाडी चालवण्यासाठी त्यांना शून्य खर्च आहे. इतर इलेक्ट्रिक व्हेइकल्सना लागतं तसं त्यांना गाडीचं चार्जिंग करण्यासाठी पैसे पडत नाहीत. घरी बसवलेल्या ५ किलोवॅट ऑन ग्रिड सोलर सिस्टीमच्या मदतीने ते आपली कार चार्ज करतात.

त्यांनी गाडी खरेदी करायचं ठरवलं तेव्हाच लॉकडाऊन सुरू झालं आणि त्यामुळे त्यांचा बेत काहीसा लांबणीवर पडला. पुढे लॉकडाऊनच्या काळातच त्यांनी गाडी खरेदी केली. त्यानंतर मात्र त्यांनी ऑन ग्रिड सोलर सिस्टीमचा पुरेपूर वापर करून घेतला. सौर ऊर्जेच्या मदतीने त्यांच्या गाडीचं चार्जिंग तर होऊ लागलंच, पण या सिस्टीममध्ये निर्माण झालेली वीज आज ते स्थानिक वीजनिर्मिती केंद्रास पुरवतात, त्यामुळे त्यांना विजेच्या बिलाचा खर्चही नाही.



उलट केरळच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडूनच त्यांना ही वीज पुरवण्यासाठीचे पैसे मिळतात. ५ किलोवॅट ऑन ग्रिड सोलर सिस्टीममधून दररोज २० ते २२ युनिट्स इतकी वीज मिळते. गाडी फुल चार्ज करण्यासाठी ३० युनिट्स वीज लागते. मग या जास्तीच्या युनिट्सचं काय? तर मुळात ही कार रोज चार्ज करायची गरज नाही.

अगदी शहरात चालवण्यासाठीसुद्धा गाडी आठवड्यातून एकदाच चार्ज करावी लागते. एका चार्जिंगमध्ये ती २५० किलोमीटरपर्यंत आरामात जाते.

त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर टाटा नेक्सोनच्या पेट्रोल कारसाठी दर वर्षाला १५ हजार किलोमीटर या हिशोबाने ८ वर्षांसाठी साडेसहा लाख रुपये खर्च आहे तर इलेक्ट्रिक कारसाठी हाच खर्च केवळ ७० हजार रुपये आहे- तेही तुमच्याकडे सोलर सिस्टीम नसेल तर. सोलर सिस्टीम असेल तर हाच खर्च अजून बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकेल. शिवाय रोड टॅक्स कमी लागतो तो वेगळाच.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आपल्याकडे चारचाकी गाडी वापरणं म्हणजे पांढरा हत्ती पोसणं असं मानतात. हे समीकरण खोटं ठरवतील अशा गाड्या नजीकच्या भविष्यकाळात दाखल होऊ पाहत आहेत. गाडी ही खर्चिक बाब न होता उत्पन्नाचं पर्यायी साधन बनू शकेल, पैशाची बचत करेल आणि पर्यावरण रक्षणाला हातभार लावेल हे तर अजूनच स्वप्नवत! पण हे सत्यात उतरलंय. बघूया अजून कायकाय घडतं ते…


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: keral solar carsolar cartata nexon
ShareTweet
Previous Post

या इमामाच्या आठवणीत मुस्लिम बांधव काढतात मोहरमला ताजियांचा जुलूस

Next Post

जगज्जेत्या अलेक्झांडरच्या प्रेयसीने पुरु राजाला राखी बांधून त्याची इज्जत वाचवली होती

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

जगज्जेत्या अलेक्झांडरच्या प्रेयसीने पुरु राजाला राखी बांधून त्याची इज्जत वाचवली होती

केरळच्या जोडप्याने चहा विकून केला जगभर प्रवास!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.