The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुस्लिमांच्या शिया व सुन्नी पंथियांचा पेहरावच नव्हे तर ‘अजान’सुद्धा वेगळी आहे !

by द पोस्टमन टीम
26 March 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


जगभरातील मुस्लिम समाज हा शिया आणि सुन्नी या दोन पंथात विभागला गेला आहे. दोघांची मोहम्मद पैगंबर  आणि कुराण-ए-शरीफ या ग्रंथावर श्रद्धा आहे. परंतु पैगंबरांच्या वारसावरून या दोन पंथातील लोकांमधे वाद असून या दोन्ही पंथाच्या धार्मिक कर्मकांडाचे प्रकार आणि अगदी नमाजचे प्रकार देखील वेगळे आहेत.

या दोन्ही समुदायाच्या अजानमधे मोठा फरक आहे. तो फरक काय आहे ते आपण आज जाणून घेऊया…

शिया अजान

अल्लाह हू अकबर (४ वेळा)- अल्लाह सर्वात मोठा आहे.

अशहदो अन ला इलाहा इल्लल ला (२ वेळा)- मी साक्ष देतो की अल्लाहच्या व्यतिरिक्त माझा दुसरा कोणी देव नाही.



अशहदो अनना मुहम्मदर-रसूल-उल्लाह (२ वेळा) – मी साक्ष देतो की मोहम्मद पैगंबर हेच अल्लाहचे खरे प्रेषित होते.

अशहदो अनना अलियन वली-युल्लाह (२ वेळा )- मी साक्ष देतो की अली हे अल्लाहचे प्रतिनिधी आहेत.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

हय्या अलस्सलाह (२ वेळा)- इबादतीकडे चला

य्या अलल फलाह (२ वेळा)- समृद्धी, सौभाग्य, सफलतेच्या दिशेने चला

हय्या अला खैरिल अमल (२ वेळा)- जगातील सर्वात चांगल्या मार्गाकडे चला

अल्लाहु अकबर (२ वेळा )- अल्लाह सर्वात मोठा आहे.

ला इलाहा इल्लल ला (२ वेळा)- अल्लाहशिवाय दुसरा कुठलाच परमेश्वर नाही.

सुन्नी अज़ान

अल्लाहु अकबर (४ वेळा )- अल्लाह सर्वात मोठा आहे.

अशहदो अन ला इलाहा इल्लल ला (२ वेळा)- अल्लाह व्यतिरिक्त दुसरा कुठलाच परमेश्वर नाही, अशी मी साक्ष देतो.

अशहदो अनना मुहम्मदर-रसूल-उल्लाह (२ वेळा)- मोहम्मद पैगंबर वगळता इस्लामचा दुसरा कोणी प्रेषित नाही.

हय्या अलस्सलाह (२ वेळा )- इबादतीकडे चला

हय्या अलल फलाह ( २ वेळा)- समृद्धी, सौभाग्य, सफलतेकडे चला
अस सलातु ख़ैर अल-मिन अन-नौम (२ वेळा सकाळच्या अजानदरम्यान )- इबादत ( प्रार्थना) झोपण्यापेक्षा फायदेशीर आहे.

अल्लाहु अकबर (२ वेळा)- अल्लाह सर्वात मोठा आहे.

ला इलाहा इल्लल ला- अल्लाह व्यतिरिक्त दुसरा कुठला देव नाही.

मोहम्मद पैगंबर आणि त्यांच्या वारसातील विचारसरणीच्या फरकामुळे दोन्ही समुदाय वेगळे झाले आहेत. त्यांच्या मुळातच हा फरक अधोरेखित करण्यात आला आहे. शिया अजान आणि सुन्नी अजान या दोघांच्या कडव्यांमध्ये दोन ओळी वेगवेगळ्या आहेत.

शिया अजानची पहिली ओळ- अशहदो अनना अलियन वली-युल्लाह

दुसरी ओळ- हय्या अला खैरिल अमल

पहिल्या ओळीचा अर्थ – मी साक्ष देतो की अली हा अल्लाहचा प्रतिनिधी आहे. अली हा तोच अल्लाहचा प्रतिनिधी आहे ज्याला सुन्नी लोक मोहम्मद पैगंबरांचा वारसदार मानायला नकार देतात.

सुन्नी समुदायाच्या मते मोहम्मद पैगंबरांनंतर हजरत अबू बकर मुस्लिमांचा नेता बनला, त्याच्या नंतर हजरत उमर आणि त्याच्या नंतर हजरत उस्मान व त्यानंतर हजरत अली इस्लामचा नेता बनला.

या चौघांनाही खलिफा म्हणून ओळखले जाते.

शिया देखील सुन्नीप्रमाणे अबू बकर, हजरत उमर आणि हजरत उस्मान यांना राजकीयदृष्ट्या इस्लामचे प्रतिनिधी मानतात, पण धार्मिकदृष्ट्या ते त्यांना खलिफा मानत नाहीत. शिया पंथीयांच्या मते मोहम्मद पैगंबरांच्या नंतर कुठलाच खलिफा झाला नाही. पैगंबरांच्या नंतरचे सर्व धर्मगुरु हे इमाम असल्याची शिया मुस्लिमांची श्रद्धा आहे.  मोहम्मद पैगंबरानंतर हजरत अली हेच इस्लामचे इमाम आहे, अशी शिया लोकांची श्रद्धा आहे.

हजरत अली मोहम्मद पैगंबरांचा जावई होता व तोच त्यांचा वारसदार आहे, असा शिया लोकांचा विश्वास आहे.

शिया अजानमधील दुसऱ्या ओळीचा अर्थ होतो, जगातील सर्वोत्तम सवयींकडे वळा, शिया पंथीयांच्या मते नमाज पठण ही जगातील सर्वोत्तम सवय आहे, सर्वात उत्तम काम आहे. सुन्नी अजानमध्ये मात्र या जागी एक वेगळं वाक्य वापरण्यात येतं ‘स सलातु ख़ैर अल-मिन अन-नौम’ हे ते वाक्य असून या वाक्याचा अर्थ आहे नमाज पठण करणे हे झोपण्यापेक्षा पवित्र कृत्य आहे. याचाच अर्थ असा कि शिया मुसलमान नमाज पठणानाला जगातील सर्वोत्तम कृत्य मानतात तर सुन्नी मुसलमान नमाज पठणाला झोपेपेक्षा चांगले कृत्य मानतात.

सुन्नी अजानमधील  ‘अस सलातु ख़ैर अल-मिन अन-नौम’ या ओळीला त्यांचे धर्मगुरू उमरने बदलून ‘हय्या अला खैरिल अमल’ असे केले असल्याचा उल्लेख, सुन्नी मुस्लिमांच्या या पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे-

1. मिशकत अल-मसाबीह, वॉल्यून 1. पेज नं-142, मोहम्मद बिन अब्दुल्लाह.

2. मुवत्ता ऑफ मलिक, किताब 3, हदीथ नंबर 3.1.8

3. किताब अल-फारूक़. अल्लमा शिबली नो-मानी द्वारा लिखित. पेज नंबर-295, करांची में पब्लिश.

4. किताब इज़ालातुल ख़िफा, वॉल्यूम 3, पेज नंबर- 328, सुनान-ए-अधान.

5. किताब कन्ज- अल उम्मल वॉल्यूम 4, पेज नंबर- 270, धिकार ए अधन.

6. सीरत अल हलाबियाह, वॉल्यूम 2, पेज नंबर-303, धिकार ए अधन.

7. नेल अल अवतार, वॉल्यूम 2, पेज नंबर- 43.

8. सुनन अल कुबरा, पेज नंबर- 425, अल-बैयहक़्क़ी द्वारा लिखित.

9. तारीख बगदाद, वॉल्यूम 9, पेज नंबर- 409.

आपण रोज सकाळी जी अजान ऐकतो, तिचा अर्थ सांगावा असा होतो. जगभरातील मुस्लिमाना नमाज पठण करण्यासाठी बोलवायला अजान म्हणतात. प्रत्येक दिवशी पाच टप्प्यात नमाज पठण करण्यात येते. नमाजचे पाच टप्पे आहेत – फजर, ज़ौहर, असर, मग़रिब, इशां.

या टप्प्यांचा अर्थ असा होतो: –

फजर- सकाळ

ज़ौहर- दुपार

असर- संध्याकाळ

मग़रिब- सूर्यास्तानंतर लगेच

इशां- रात्र

शिया आणि सुन्नी समुदायाची अजान आणि नमाज या दोन गोष्टीच वेगवेगळ्या नसून त्यांची प्रार्थना करायची पद्धत देखील वेगळी आहे. दोन्ही समुदायाचे लोक प्रार्थनेच्या वेळी समान संख्येने उपस्थित राहत असले तरी शिया समुदायाचे लोक नमाज पठण करताना आपले दोन्ही हात उघडून प्रार्थना म्हणताना आढळून येतात तर सुन्नी समुदायाचे लोक हात एकमेकांना बांधून नमाज करताना दिसतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या माणसाने त्यावेळी गांधीजींना चंपारणला बोलवले नसते तर आज गांधी ‘राष्ट्रपिता’ नसते

Next Post

एवढा मोठा माणूस असूनही ‘जॅक मा’चा नेमका काय कार्यक्रम झालाय कळायला मार्ग नाही

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

एवढा मोठा माणूस असूनही 'जॅक मा'चा नेमका काय कार्यक्रम झालाय कळायला मार्ग नाही

या स्टार्ट-अपमुळे लाखांच्या शस्त्रक्रिया काही हजारात होणं शक्य झालंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.