The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इराणचे सर्वेसर्वा असलेले अयातोल्ला खोमेनी मूळचे उत्तरप्रदेशचे आहेत

by द पोस्टमन टीम
24 April 2025
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतीय वंशाच्या अनेक मोठमोठ्या हस्ती आज जागतिक व्यासपीठ गाजवत आहेत. आपल्या नेतृत्व कौशल्याने आज जागतिक स्तरावर नाव मिळवणारे अनेक लोक भारतीय वंशाचेच आहेत.

इराणसारख्या देशाचे परराष्ट्र धोरण बिघडवण्याचं श्रेय दिलं जातं त्या खोमेनी यांचे पूर्वजही भारतीय होते हेसुद्धा खरंच. आज आपण याच खोमेनीबद्दल जाणून घेणार आहोत.

इराणमधील सगळ्यात मोठे धर्मगुरु अयातुल्ला खोमेनी यांचे आजोबा भारताच्या उत्तर प्रदेशचे होते हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. इथूनच ते इराणला गेले आणि तेथेच स्थायिक झाले.

इराण आणि अमेरिका यांच्यातील कडव्या नात्यांचं बीज रोवण्यात त्यांचा मोठा हात होता. इराणमध्ये क्रांतीच्या वेळी भारताशी असलेल्या त्यांच्या या नात्यामुळेच त्यांना भारतीय धर्मगुरु किंवा ब्रिटिश गुप्तहेर म्हणून ओळखले जात होते.

अयातुल्लाह खामनेई यांचे आजोबा सय्यद अहमद मसूवी हे उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथील रहिवाशी होते. १८३० साली ते अवधच्या नवाबाबरोबर यात्रेसाठी इराकला गेले. तिथं इराणमधील खुमैन गावात स्थायिक झाले. त्यामुळेच पुढे त्यांचे आडनाव खोमेनी झाले. साधारणत: शांत असलेल्या किंतुर गावाशी त्यांचा जास्त संबंध होता.



१९७८ साली इराणच्या सरकारी वर्तमानपत्रात इराण सरकारने ‘भारतीय धर्मगुरु’ आणि ‘ब्रिटनचे गुप्तहेर’ म्हणून खोमेनीचे वर्णन केले होते. हा लेख प्रकाशित झाला तेव्हा इराणची जनता खूप भडकली होती.

अयातुल्लाह रुहोल्लाह खोमेनी एक इस्लामिक नेता होते. त्यांचा इराणच्या शहाला उघड उघड विरोध होता. या कहाणीची खरी सुरुवात झाली ती १९६३ साली. मोहम्मद रजा शहा पहलवी याने श्वेतक्रांतीची घोषणा केली. हा एक सहासुत्री कार्यक्रम होता. ही प्रगती पश्चिमी नितींवर आधारित होती. या नितींचा विरोध सुरू झाला. खोमेनी या विरोधाचं नेतृत्व करत होते. १९६४ साली इराणच्या शहाने खोमेनींना देशाच्या बाहेर काढले.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

शहा पहलवी पश्चिमी नेत्यांशी बऱ्याच वेळा बैठकी रंगवत होता. अशा एका बैठकीला राक्षसांची बैठक म्हणत खोमेनी यांनी या बैठकींची निंदा केली होती. १९७३ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या. इराणची अर्थव्यवस्था आणि शहाच्या श्वेतक्रांतीच्या स्वप्नांचा यामुळे शेवट झाला.

याच वेळी श्वेतक्रांती म्हणजे इस्लामला होणारी जखम असे’ इस्लामिक धर्मगुरूंनी म्हटले होते. या मुल्लांच्या मागे त्यावेळी खोमेनी यांचा हात होता.

सप्टेंबर १९७८ मध्ये तेहरानच्या शाहयाद चौकात लाखो लोक इराणच्या शाह विरोधात एकत्र येऊन प्रदर्शन करत होते. शाहने हा विरोध दडपून टाकण्यासाठी सैन्य तैनात केले. १९७९ साली इराणममध्ये गृहयु*ध्दाची परिस्थिती निर्माण झाली. खोमेनीला पुन्हा देशात येऊ देण्याची मागणी जोर धरू लागली.

१६ जानेवारी, १९७९ रोजी शाहने इराण सोडून अमेरिकेचा रस्ता पकडला. पलायन करण्याआधी शाहने विरोधी नेता शापोर बख्तियार यांना पंतप्रधान केले होते. नव्या पंतप्रधानाने खोमेनीला इराणमध्ये परतण्याची परवानगी दिली. १२ फेब्रुवारी, १९७९ रोजी खोमेनी फ्रांसवरुन इराणमधे परतले. खोमेनीच्या स्वागतासाठी लाखो लोक जमा झाले होते.

खोमेनीने बख्तियार सरकार विरोधातच बंड पुकारले. स्वत:चं सरकार बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. १६ फेब्रुवारीला त्यांनी मेहदी बाजारगान यांना नवीन पंतप्रधान घोषित केले. आता देशात दोन पंतप्रधान झाले होते. इराणची वायुसेना खोमेनीला आपला नेता मानत होती. २० फेब्रुवारीला शाह समर्थक आणि खोमेनीची वायुसेना यांच्यात यु*द्ध झाले. यात शाह समर्थकांना हार पत्करावी लागली.

एप्रिल १९७९ मध्ये एक जनमत संग्रह करण्यात आला. यानंतर इराणला एक इस्लामी प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. एक सरकार निवडले गेले आणि खोमेनीला देशाचा सर्वोच्च नेता बनवण्यात आले.

पंतप्रधानपद बरखास्त करुन राष्ट्रपतीपद निर्माण केले गेले. या क्रांतीमुळे अमेरिकेचा इराणच्या राजकाणातील हस्तक्षेप आणि प्रभाव दोन्ही संपुष्टात आला.

प्रभाव संपुष्टात आल्याने अमेरिक-इराण संबंध कटुतेकडे वळले. शाहच्या वेळी असलेल्या मैत्रीच्या नात्याचं रुपांतर आता शत्रुत्वात झालं. त्यांच्यात असलेले राजकीय संबंध संपुष्टात आले. तेहरानमध्ये अमेरिकी दुतावासात ५२ अमेरिकी नागरिकांना बंदी बनवून ठेवण्यात आले. या लोकांनी इराणच्या शाहला पुन्हा इराणमध्ये पाठवण्याची विनंती तत्कालीन अमेरीकन राष्ट्रपती जिमी कार्टर यांना केली, पण असे झाले नाही.

हळूहळू हे शत्रुत्व वाढतच चालले आहे. खोमेनीचा मृत्यू १९८९ मध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी झाला.

खोमेनीमुळे निर्माण झालेल्या तेढाचे परीणाम आजही इराण भोगत आहे. अमेरिकेने विविध निर्बंध लादून इराणची अर्थव्यवस्था डळमळीत करण्याचे प्रयत्न केले आहेत. खोमेनीच्या उदाहरणावरून जागतिक परराष्ट्र धोरणाचे काही धडे उभरत्या नेत्यांना मिळतील एवढं मात्र नक्की!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘ट्राफिक जॅम’मुळे लंडनमध्ये १८६३ सालीच भूमिगत मेट्रो सुरु झाली होती

Next Post

राणी एलिझाबेथबद्दलच्या या इंटरेस्टिंग गोष्टी माहित आहेत का..?

Related Posts

राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

19 January 2026
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
Next Post

राणी एलिझाबेथबद्दलच्या या इंटरेस्टिंग गोष्टी माहित आहेत का..?

नेहरूंच्या इच्छेखातर गोदरेजने आशिया खंडातील पहिला टाइपरायटर बनवला होता !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.