The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ज्याच्याशिवाय आपलं पान हलू शकत नाही त्या इंटरनेटचा शोध नेमका कोणी लावला?

by द पोस्टमन टीम
17 October 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


अश्मयुगापासून आजपर्यंत मानवानं अफाट प्रगती केली आहे. व्यापार, शिक्षण, वैद्यकीय उपचार, माहिती तंत्रज्ञान, संज्ञापन यासारख्या कितीतरी क्षेत्रांमध्ये मानव कल्पनेच्याही पलीकडे जाऊन पोहचला आहे. आज क्षणाचाही विलंब न लावत आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. मानवाच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीमागे एक घटक सारखा आहे तो म्हणजे इंटरनेट!

इंटरनेटच्या शोधामुळं मानवाचं जीवन सुलभ झालं आहे. त्याच्याशिवाय आपण आपल्या दिवसाची कल्पना देखील नाही करू शकत. ज्या इंटरनेटशिवाय आपला एक दिवसही जाऊ नाही शकत, त्या इंटरनेटचा शोध कुणी लावला, याचा तुम्ही कधी विचार केलाय का?

लाईटचा बल्ब किंवा टेलिफोन सारख्या शोधांप्रमाणं इंटरनेटचा शोध कुण्या एका व्यक्तीनं लावलेला नाही. त्याच्या शोधाची पाळेमुळे अमेरिका आणि सोव्हिएत युनियनच्या शीतयु*द्धात दडलेली आहेत. इंटरनेटच्या निर्मितीमध्ये काळाच्या ओघात अनेकांनी आपलं योगदान दिलेलं आहे. शीतयु*द्धात एक सरकारी शस्त्र म्हणून साधारण ६० वर्षांपूर्वी अमेरिकेत इंटरनेटची सुरुवात झाली. सुरुवातीला शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि डेटा शेअर करण्यासाठी त्याचा वापर केला.

४ ऑक्टोबर १९५७ रोजी सोव्हिएत युनियननं जगातील पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडला. स्पुटनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपग्रहाने फारसं काही वेगळं काम केलं नाही. फक्त अंतराळातून पृथ्वीभोवती फिरताना रेडिओ ट्रान्समिशन करता येते हे त्यातून सिद्ध झालं.

त्याच वेळी युनायटेड स्टेट्समधील सर्वात हुशार शास्त्रज्ञ आणि अभियंते मोठ-मोठ्या कार आणि चांगल्या दूरचित्रवाणी संचांची रचना करण्यात व्यस्त होते. जेव्हा सोव्हिएतनं पहिला उपग्रह अवकाशात सोडला तेव्हा मात्र, अमेरिकन लोकांना ही धोक्याची घंटा वाटली. अमेरिकन शास्त्रज्ञ जर क्षुल्लक गोष्टींवर लक्ष केंद्रित करत राहिले तर नक्कीच सोव्हिएत शीतयु*द्धामध्ये बाजी मारेल याची खात्री अमेरिकन नागरिकांना वाटू लागली.

स्पुटनिकच्या प्रक्षेपणानंतर मात्र अमेरिकन लोकांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल अधिक गंभीरपणे विचार करण्यास सुरुवात केली. अगदी शालेय अभ्यासक्रमांमध्ये देखील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि कॅल्क्युलससारख्या विषयांचा समावेश झाला. कॉर्पोरेशन्सनी सरकारी अनुदान घेतले आणि ते वैज्ञानिक संशोधन व विकास कामांमध्ये गुंतवलं.



अंतराळ संशोधनात उपयुक्त असणारे रॉकेट, शस्त्रास्त्रे आणि संगणक यांसारख्या गोष्टींचा विकास करण्यासाठी फेडरल सरकारनं स्वतः नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (नासा) आणि डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स ऍडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सीसारख्या (एआरपीए)  नवीन एजन्सीज् निर्माण केल्या. सोव्हिएतच्या प्रगतीमुळं शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकारी विशेष चिंतेत होते. सोव्हिएतनं देशाच्या दूरध्वनी प्रणालीवर ह*ल्ला केल्यास काय होऊ शकतं याबद्दल ही चिंता होती. सोव्हिएतचं फक्त एक क्षेपणास्त्र अमेरिकेला संकटाच्या खायीत लोटण्यासाठी पुरेसं होतं.

१९६२ साली एमआयटी आणि ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सीसाठी काम करणारे शास्त्रज्ञ जेसीआर लिकलायडर यांनी या समस्येवर एक उपाय सुचवला. संगणकातील ‘गॅलेक्टिक नेटवर्क’ हे यावर उपाय होता. या नेटवर्कच्या माध्यमातून दोन संगणकांद्वारे एकमेकांशी संवाद साधणं शक्य होतं. जर कधी सोव्हिएतनं अमेरिकेच्या दूरध्वनी यंत्रणेवर ह*ल्ला केलाच तर गॅलेक्टिक वापरून सरकारी नेत्यांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना एकमेकांशी संवाद साधणं शक्य आहे, असं लिकलायडरनं सुचवलं. १९६५ साली, एमआयटीतील आणखी एका शास्त्रज्ञानं एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर माहिती पाठवण्याचा नवीन मार्ग विकसित केला ज्याला. त्याला ‘पॅकेट स्विचिंग’ असं नाव देण्यात आलं होतं.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

पॅकेट स्विचिंगमध्ये, माहितीला डेस्टिनेशनपर्यंत पाठवण्यापूर्वी ब्लॉक किंवा पॅकेटमध्ये विभागलं जातं. अशा प्रकारे, प्रत्येक पॅकेट स्वतःच्या मार्गानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. पॅकेट स्विचिंगला आता ARPAnet नावानं ओळखलं जातं.

२ ऑक्टोबर १९६९ रोजी ARPAnet नं आपला पहिला संदेश पाठवला. ही एका संगणकावरून दुसऱ्या संगणकासाठीची ‘नोड-टू-नोड’ संप्रेषण प्रणाली होती. (पहिला संगणक UCLA येथील संशोधन प्रयोगशाळेत होता आणि दुसरा स्टॅनफोर्ड येथे होता. प्रत्येक संगणकाचा आकार एका लहान घराएवढा होता.) ‘लॉगिन’ हा लहान आणि सोपा शब्द संदेश म्हणून पाठवण्यात आला होता. तरीही तो एआरपीए नेटवर्कमध्ये क्रॅश झाला. स्टॅनफोर्ड येथील संगणकाला फक्त सुरुवातीची दोन अक्षरं मिळाली. १९६९ च्या अखेरीस, फक्त चार संगणक ARPAnet शी जोडले गेले होते. नंतर मात्र, यात सातत्यानं वाढ होत गेली.

१९७१ साली, त्यात हवाई विद्यापीठाचं ALOH नेट जोडण्यात आलं. दोन वर्षांनंतर लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज आणि नॉर्वेमधील रॉयल रडार एस्टॅब्लिशमेंटमधील नेटवर्कही त्यात जोडण्यात आलं. मात्र, अशा पद्धतीनं पॅकेट-स्विच केलेले कॉम्प्यूटर नेटवर्क वाढत असताना त्यांना जगभरातील ‘इंटरनेट’मध्ये एकत्रित करणं अधिक कठीण होत गेलं.

१९७० च्या अखेरीस, विंटन सर्फ नावाच्या संगणक शास्त्रज्ञानं जगातील सर्व मिनी-नेटवर्कवरील संगणकांसाठी एकमेकांशी संवाद साधण्याचा मार्ग विकसित करून या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यानं त्याच्या शोधाला ‘ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल’ किंवा टीसीपी हे नाव दिलं. (नंतर, त्यानं त्यात एक अतिरिक्त प्रोटोकॉल जोडला ज्याला ‘इंटरनेट प्रोटोकॉल’, असं संबोधलं जातं. त्याला आपण टीसीपी/आयपी म्हणतो.) 

एका लेखकानं सर्फच्या प्रोटोकॉलचं ‘हँडशेक’ असं वर्णन केलं आहे. हा प्रोटोकॉल आभासी जगात एकमेकांपासून दूर आणि भिन्न असलेल्या संगणकांची ओळख करून देतो.

सर्फच्या प्रोटोकॉलनं इंटरनेटचं जागतिक नेटवर्कमध्ये रूपांतर केलं. संपूर्ण १९८० च्या दशकात, संशोधक आणि शास्त्रज्ञांनी त्याचा वापर एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर फाइल आणि डेटा पाठवण्यासाठी केला. १९९१ साली इंटरनेट पुन्हा बदललं. त्यावर्षी, स्वित्झर्लंडमधील टिम बर्नर्स-ली नावाच्या प्रोग्रामरनं जगासमोर वर्ल्ड वाइड वेब सादर केलं. वर्ल्ड वाइड वेब फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फाईल्स पाठवण्याचा मार्ग नव्हता तर स्वतःच माहितीचं एक ‘जाळं’ होतं. जे इंटरनेटवरील कोणीही पुन्हा मिळवू शकत होतं. आपल्याला आज माहित असलेलं इंटरनेट बर्नर्स-ली यांनी तयार केलेलं आहे.

तेव्हापासून इंटरनेटमध्ये अनेक बदल होत गेले. १९९२ मध्ये, इलिनॉय विद्यापीठातील विद्यार्थी आणि संशोधकांच्या गटानं ‘मोझेक’ नावाचा एक अत्याधुनिक ब्राउझर विकसित केला. (नंतर त्याचं नाव नेटस्केप झालं) मोझेकच्या मदतीनं वेबवर माहिती शोधणं सोपं झालं. यामुळे वापरकर्त्यांना पहिल्यांदा एकाच पेजवर शब्द आणि चित्रे पाहण्याची सुविधा मिळाली.

त्याच वर्षी, काँग्रेसनं व्यावसायिक कारणांसाठी वेबचा वापर करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, सर्व प्रकारच्या कंपन्यांनी त्यांच्या स्वतःच्या वेबसाइट्स उभारण्यासाठी घाई केली आणि ई-कॉमर्स उद्योजकांनी इंटरनेटचा वापर थेट ग्राहकांना वस्तू विकण्यासाठी केला. १९९५ साली ब्रॅन्डन इचने नेटस्केपसाठीच जावास्क्रिप्ट शोधून काढले. आजचे ९०% इंटरनेट यावरच अवलंबून आहे. पुढे इंटरनेटचे रक्षक सेंटही नेमले गेले. 

मध्यंतरी इंटरनेटचा स्पीड फारच कमी होता, पण आता त्यातही क्रांती होत आहे. आता तर फेसबुक, व्हॉट्सऍप, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स तर प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. या साईट्स आणि इंटरनेटचा वापर करून सर्व वयोगटातील लोक एकमेकांशी कनेक्ट राहत आहेत. तरुणांची स्थिती तर, ‘एकवेळ जेवण नको पण इंटरनेट द्या’ अशी झाली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

नील आर्मस्ट्राँगच्या मृत्यूचं प्रकरण त्याच्याच पोरांनी पैसे घेऊन दाबलं होतं

Next Post

‘एलोन मस्क’पेक्षा श्रीमंत असूनही मुकेश अंबानींनी सेकंड हॅन्ड टेस्ला कार का विकत घेतली..?

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

'एलोन मस्क'पेक्षा श्रीमंत असूनही मुकेश अंबानींनी सेकंड हॅन्ड टेस्ला कार का विकत घेतली..?

आंतरराष्ट्रीय पोलीस म्हणजे इंटरपोल नेमकं काम कसं करतं..? त्यांना काय टार्गेट असतं..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.