The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या शहरातल्या घरांची एक खोली अमेरिकेत आहे तर दुसरी कॅनडात

by द पोस्टमन टीम
23 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सीमा वादाबद्दल आपण बर्‍याचदा ऐकले. पण तुम्हाला माहितीये का की या देशांच्या सीमेवर वसलेलं एक गाव दोन्ही देशांच्या मालकीचं आहे.

हो! हे एकच गाव दोन्ही देशांच्या अखत्यारीत येतं. आणि त्या गावाचं नाव आहे डर्बी.

डर्बी हे कॅनडाच्या बॉर्डरवर आहे, कॅनडाची बॉर्डर बरोबर या गावाच्या मध्यभागातून जाते. त्यामुळे बऱ्याचदा तुमचे एक पाऊल एका देशात तर दुसरं पाऊल दुसऱ्या देशात असतं.

ही बॉर्डर चक्क बिल्डिंगच्या मधूनसुद्धा गेलेली आहे.



अठराव्या शतकात अमेरिका आणि कॅनडा बॉर्डरचा सर्वे करीत असतानाच हा घोळ झाला आहे. मूळ आराखड्यात ही बॉर्डर बरोबर ४५ डिग्री अक्षांशावर येणार होती, पण सर्वे करताना चुकून ४५ डिग्री अक्षांश याच्या उत्तरेकडे आखली गेली. या चुकीमुळे डर्बीच्या नागरिकांना कायमचा त्रास होऊन बसला.

ही बॉर्डर रस्त्यांना तर छेदतेच पण अगदी राहत्या घरांनासुद्धा दोन वेगळ्या देशांमध्ये विभागते!!

या गावातील एक लोकप्रिय इमारत आहे, हस्केल्ल फ्री लायब्ररी आणि ऑपेरा हाऊस. १९०४ साली ही इमारत या खास बॉर्डरवर हेतुपुरस्सर बांधली गेली. त्यामागे एक भन्नाट गोष्ट आहे. ज्यांनी या बिल्डिंगचे बांधकाम केले ते एक विवाहित जोडपे होते. काल्स हस्केल हा अमेरिकेचा नागरिक होता तर त्याची बायको मार्था स्ट्युअर्ट ही कॅनडाची होती. ही लायब्ररी दोन्ही देशांतील नागरिकांना वापरता यावी म्हणून त्यांनी बॉर्डरवर तिचं बांधकाम केलं.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आजसुद्धा त्या लायब्ररीचा कोणताही सभासद दोन्ही देशांत जाऊ शकतो, तेही कोणत्याही बॉर्डर सिक्यूरिटीशिवाय! फक्त या बिल्डिंगमध्ये बॉर्डर लाईन दाखवण्यासाठी एक साधी काळी रेषा आखलेली आहे. या लायब्ररीचं प्रवेशद्वार अमेरिकेच्या बाजूला आहे पण बिल्डिंगचा प्रेक्षणीय भाग मात्र कॅनडामध्ये येतो. जरी बिल्डींगच्या कोणत्याही बाजूला जाण्यास बंधने नसली तरीही कधी काही समस्या उद्भवल्याच नाही असे नाही.

खरा प्रश्न बिल्डिंगचे नूतनीकरण करताना उद्भवतो. अशावेळी दोन्ही देशांच्या नियमात राहून काम करावे लागते. अगदी बारीक-सारीक गोष्टी जसे प्लंबिंग, कन्स्ट्रक्शन ,फायर सेफ्टी यासाठी ज्या त्या देशाच्या नियमात बसून त्या भागाचे काम करावे लागते. या कारणामुळे लायब्ररीच्या नूतनीकरणाला ठरलेल्या वेळेपेक्षा तब्बल तीन वर्ष जास्त लागले होते.

या बॉर्डरवरची आणखी एक मजेदार इमारत म्हणजे, टूल ऍण्ड डाय फॅक्टरी. या फॅक्टरीचा कॅनडाच्या बाजूकडील भाग १९८२ साली बंद झाला होता पण अमेरिकेच्या बाजूचा भाग १९८८ पर्यंत वापरला जात होता आणि विशेष म्हणजे अमेरिकेच्या बाजूच्या गेटमधून कॅनडाच्या भागात विनापरवानगी जाता येत होते!

साधारणतः आंतरराष्ट्रीय सीमा म्हटल्या की आपल्या डोळ्यांसमोर बॉर्डरच्या दोन्ही बाजूला बंदुका रोखून बसलेल्या सैनिकांचं चित्र येतं. पण कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवर काही वेगळंच चित्र बघायला मिळतं. सीमा ओलांडण्यासाठी बरेचदा पोलिसांचे परवानगी काढावी लागते.

अनेकदा तर लोक चक्क सीमेच्या दोन्ही बाजूला खुर्च्या टाकून एकमेकांशी गप्पा मारताना दिसतात!

पोलिस सतत गस्ती घालत असल्यामुळे काही ठिकाणी तर लोक बॉर्डरच्या दोन्ही बाजूंना उभे राहून गप्पा मारणे पसंत करतात. काही भागात विस्तीर्ण शेत जमिनीचे पट्टे आहेत. त्यामुळे काही लोकांची शेती कॅनडा आणि अमेरिकेत विभागलेली आहे. पण शेतजमिनीच्या भागात बॉर्डर संबंधीचे नियम वेगळे आहेत.

काही जागी तर ही बॉर्डर लोकांच्या घरातून जाते, म्हणजे चक्क लोक एका देशात जेवतात आणि दुसऱ्या देशात झोपायला जातात!

या बॉर्डरच्या भोवतालचे पाणीसुद्धा एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करते. कॅनडातून आलेले पिण्याचे पाणी अमेरिकेत साठवले जाते तसेच अमेरिकेतून आलेल्या सांडपाण्यावर कॅनडात प्रक्रिया केली जाते. जर काही कठीण प्रसंग ओढवला तर लोक चक्क शेजारच्या देशातून मदत मागतात!!

इथल्या नागरिकांना दोन्ही देशांतील सरकारी यंत्रणांशी सहकार्य करावे लागते. रस्त्यावरची बॉर्डर कुठल्याही चौकशी विना पार करता येते पण त्यानंतर त्यासाठीची सबब मात्र पुरवावी लागते. कधी कधी तर शेजाऱ्याकडून दोन अंडी घ्यायची असली तरी इन्स्पेक्शन ऑफिसला कळवावे लागते.

असं असलं तरी जेव्हा लोक त्यांच्या स्वतःच्या घरात असतात तेव्हा मात्र वेगळे नियम लागू होतात. म्हणजे समजा ही बॉर्डर एखाद्या अपार्टमेंटमधून गेली असेल तर बिल्डिंगच्या आत लोक बॉर्डर क्रॉस करू शकतात आणि त्यासाठी चौकशीची गरज नसते. पण एखादा व्यक्ती एका देशातून इमारतीच्या आत गेला आणि बाहेर पडताना दुसऱ्या देशातून पडला तर मात्र चौकशी होऊ शकते. त्यामुळे सतत काही न काही गमती घडत असतात.

एका छोट्याशा चुकीमुळे आज या गावातल्या लोकांना काय काय भोगावं लागतंय!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

नेपियरचा तो सामना ज्यात नयन मोंगिया भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता

Next Post

दोन्ही हात नसूनही पायाने गाडी चालवून या माणसाने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलंय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

दोन्ही हात नसूनही पायाने गाडी चालवून या माणसाने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलंय

एंपरर अशोक: भारताचं पहिलंच जम्बो जेट अरबी समुद्रात कोसळलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.