The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाकडी खोक्यात स्क्रीन आणि त्याला शटर असलेला डायनोरा टीव्ही आठवतो का..?

by द पोस्टमन टीम
29 May 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


एक भले मोठे लाकडी खोके, त्याला दोन्ही बाजूंनी शटर्स आणि अनेक बटणं.

काही ओळखीचं वाटतंय का..? बरोबर! फार पूर्वी जेव्हा भारतात टीव्ही नवीन होता तेव्हा असाच टीव्ही यायचा. तो पण डायनोरा कंपनीचा. डायनोरा हा पूर्वीचा टीव्ही कंपनीचा नावाजलेला भारतीय ब्रँड होता. जागतिकीकरणाने भारतात नवीन कंपन्यांचा शिरकाव झाला. या स्पर्धेत टिकण्यासाठी डायनोराने काय केले याची ही गोष्ट!

या टीव्हीच्या नावानेच आपण आपल्या लहानपणात जातो. टीव्ही वगैरे गोष्टी नवीन असतानाच्या काळातसुद्धा डार्कनेस, कॉन्ट्रास्ट या सेटिंग बदलण्याच्या सोयी डायनोराच्या टीव्हीत होत्या आणि १९७९ च्या दरम्यान एवढ्या सुविधांसाठी पाच हजार रुपयांची किंमत मोजावी लागत होती.

त्याकाळात रेडिओसाठी ट्यूब टेक्नॉलॉजी वापरली जात होती. रेडिओ सिग्नल मिळवण्यासाठी ‘कॅथोड रे’चा वापर केला जात होता.



यानंतर टीव्ही कंपन्यांनी देखील हेच तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली. डायनोरा टीव्हीनेही हे रेडिओ लहरींचे तंत्रज्ञान आपल्या उत्पादनात वापरलं.

सॉलिड स्टेट टेक्नॉलॉजीने डायनोरा टीव्हीच्या गुणवत्तेत बरीच क्रांती घडवून आणली. त्यादरम्यान डायनोरा टीव्हीने पुढील टॅगलाईनसुद्धा त्यांच्या जाहिरातीसाठी वापरली-

“Take the advice of your eyes and ear. Dyanora tv Solid state!”

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

एका जाहिरातीत तर टोक्यो बँक लिमिटेडचे जनरल मॅनेजर के. आय्वामुरा यांचा फोटो लावलेला होता आणि त्यांच्या सही-शिक्क्यासह खालील ओळी लिहिलेल्या होत्या-

“Pure sound, superb quality, elegant looks, in short Dyanora’s uncompromising standards of quality really surprise me.”

डायनोरा टीव्ही, ‘डायनाव्हिजन लिमिटेड’च्या मालकीची होती. १९७३ साली तमिळनाडू डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि विख्यात व्यावसायिक अब्दुल रेड्डी यांनी ही कंपनी स्थापन केली होती. या कंपनीने जवळपास दोन दशके टीव्हीचे उत्पादन घेतले. त्या काळात घरात टीव्ही असणे ही फार दुर्मिळ बाब होती. दक्षिण भारतात बऱ्याच मध्यमवर्गीय घरांमध्ये डायनोरा टीव्हीच असायचा.

१९९० साली आर्थिक सुधारणा झाल्या. उदारमतवादी धोरण स्वीकारले गेले आणि बाहेरील कंपन्यांना परवाना देण्यात आला. यामुळे डायनोरासाठी स्पर्धा वाढत गेली.

सोनी, फिलिप्स, सॅमसंग यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या गर्दीत डायनोराची घुसमट झाली. काही वर्षे त्यांना उत्पादन बंद करावे लागले. त्यानंतर काही सुधारणा करीत द्यानोरा ने नवीन रुपात जोरदार पुनरागमन केले.

‘Gandhi Meets Prime-time: Globalization and Nationalization in Indian Television‘ या पुस्तकात लेखक शांतीकुमार म्हणतात, “छापील जाहिरातींनी नव्या भारतातील बदलेल्या टीव्ही सेटचा आढावा घेतलेला आहे आणि त्या भारतीय संस्कृतीनुसार बदलत चालल्या आहेत.” परवाना राज जरी असली तरी बाहेरच्या कंपन्यांचे लगेच स्वागत झाले नाही. बऱ्याच राज्यांत आपल्या इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीला चालना देण्यासाठी खुद्द सरकारनेच टीव्हीचे उत्पादन सुरू केले होते.

Dynavision Ltd त्या कंपन्यांपैकी एक होती. स्पर्धा भरपूर असली तरी ही आकर्षित टॅगलाईनमुळे लोकांच्या मनावर छाप पाडणे शक्य झाले. डायनोरा टीव्हीने आपल्या ग्राहकांना जाहिरातीतून १२ वचने दिली होती ; ती खालील प्रमाणे;

“Get in touch with Dyanora, Get the best point of view and the sound that true! Stay in touch with the time, keep in touch with the new! get the latest Dyanora! GET IN TOUCH !!”

हे गाणं अजूनही अनेकांच्या ओठांवर असतं!

तुम्हाला माहिती आहे का, डायनोरा टीव्हीला रिमोटचीसुद्धा सुविधा नव्हती. आवाज कमी-जास्त करायला टीव्हीजवळ जावे लागे आणि त्यावरून भांडणंसुद्धा होत. डायनोराचं सुरुवातीचं व्हर्जन ब्लॅक अँड व्हाईट होतं. नंतर १९८२ च्या आशियन गेम्सच्या समारंभात डायनोराचं कलर्ड वर्जन लॉन्च केलं गेलं.

आता तर टीव्हीचे रूप पूर्णपणे पालटले आहे. फ्लॅट स्क्रीन, एलइडी, होम थिएटर आणि बरंच काही. आता प्रत्येक घरी एक तरी टीव्ही आहेच पण त्यावेळी खूप कमी लोकांकडे टीव्ही होता. पण, लाकडी खोक्यात स्क्रीन आणि त्याला शटर असलेला डायनोरा टीव्हीवर दूरदर्शन बघायला शेजाऱ्यांच्या घरी धावत जाण्याची मजा आजच्या पिढीला कळणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

सुमित्रा भावेंचा अखेरचा चित्रपट ठरलेल्या ‘दिठी’ने मराठी चित्रपटसृष्टीला नवी दिशा दिलीय

Next Post

सुनील छेत्रीचा जन्म एखाद्या फुटबॉलप्रेमी देशात झाला असता तर लोकांनी त्याची पुजा केली असती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

सुनील छेत्रीचा जन्म एखाद्या फुटबॉलप्रेमी देशात झाला असता तर लोकांनी त्याची पुजा केली असती

रामदेव बाबांनी जगभर पॉप्युलर केलेला 'योग' शोधला कोणी..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.