The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगातलं एकमेव घर ज्याला दूरदूरपर्यंत एकही शेजारी नाही..!

by द पोस्टमन टीम
20 December 2025
in भटकंती, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


माणूस हा समूहात राहणारा प्राणी आहे. इतर प्राणी जसे कळपाने राहतात तसेच माणूससुद्धा वस्ती करून राहतो.  मग एखाद्या निर्जन बेटावर एकटाच टुमदार घर कोण आणि का बांधेल? पण असं एक घर आहे! आयर्लंडच्या दक्षिण समुद्रात एक निर्जन  बेट आहे आणि त्या बेटावर पांढऱ्या रंगाचं एकच घर!!

त्या बेटाचे नाव आहे ‘एलीदोय’!  हे बेट दूर समुद्रात आहे शिवाय वाळवंटासारखं  निर्मनुष्य आहे. असं असतानाही त्यावर कोणी घर का बांधलं असेल याबद्दल कोणाचीही उत्कंठा जागृत होते. असं म्हणतात की हे घर जगातील सर्वांत निर्जन जागी असणारे घर आहे.

या बेटावरील घराला झाडाझुडपांचा कसलाही निवारा नाही. अटलांटिक महासागराच्या महाकाय लाटा एवढाच काय तो आधार. या घराबद्दल खूप कथा रचल्या गेल्या आहेत. ते घर कोणी बांधले आणि त्या आधी तिथे कोण राहत होतं याबद्दल सगळ्यांना प्रश्न पडतो. गेल्या काही वर्षात एलीदोय बेटाबद्दल बरच काही छापून येतंय. त्यामुळे त्या घराबद्दल गुढ अधिकच दाट होत चाललेले दिसते.

याबद्दल अशी एक अफवा आहे की हे घर आयर्लंडच्या सरकारने विसाव्या शतकात एलीदोय हे बेट एक प्रसिद्ध पॉप सिंगर बिजोर्क याला भेट म्हणून दिले होते. 

रिपोर्टनुसार असे सांगितले जाते की, बिजोर्कला तिथे एकांतात घर बांधायचे होते आणि एलीदोय  बेटावर  एक रेकॉर्डिंग स्टुडिओसुद्धा थाटायचा होता. यावरून बिजोर्कचे आयर्लंड सरकारसोबत वाजले होते.

ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार बिजोर्क आणि आयर्लंड सरकारचा हा वाद बराच काळ चर्चेत होता. नंतर बिजोर्कने दुसऱ्या एका बेटावर असा प्रोजेक्ट उभा करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्या बेटाचे नावसुद्धा एलीदोय होते. पण तिने ऐनवेळी माघार घेतली आणि सुरू असणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला. पण त्या रहस्यमय घराचा  आणि पॉप सिंगर बिजोर्कचा तसा काहीही संबंध नव्हता.

कोणीही राहत नसलेल्या एलीदोय बेटावरील घराबद्दल कायम चर्चा होत राहिल्या. अशाही अफवा पसरल्या होत्या की, ते घर एका कोणत्या तरी करोडपती माणसाने बांधले आहे. ‘झाँबी ॲपोकॅलिप्स’च्या निमित्ताने त्याला आपल्या कुटुंबासोबत तिथे राहायला जायचं होतं.

एवढंच नाही तर, ते घर अस्तित्वातच नसून, कुणीतरी फोटो शॉप करून तो फोटो बाहेरून केला आहे अशाही काही अफवा पसरवण्यात आल्या होत्या.

पण, खरं काही वेगळंच आहे. या बेटावर अठराव्या शतकापासून काही लोक राहत होते. १९३० च्या नंतर ते रहिवासी निघून गेले. हे लोक मुख्यतः मासेमारीवर पोट भरत होते. आणि बाकीच्या जगापासून लांब राहत होते.

शेवटी त्यांच्यातील पाच कुटुंब त्या बेटावर उरले. यथावकाश त्यांनीही एलीदोयचा निरोप घेतला आणि तेव्हापासून ते बेट पुन्हा रिकामं आणि निर्जन बनलं.

काही वर्षांनी पुन्हा एकदा माणसाची पावले या बेटाकडे वळली.

एलीदोय बेटावर मोठ्या प्रमाणात पफिन पक्षी होते. त्यांची शिकार करण्यासाठी शिकारी हळूहळू एलीदोयवर येऊ लागले. त्यांची संघटना स्थापन झाली आणि या ‘एलीदोय हंटिंग असोसिएशन’ने शिकाऱ्यांच्या सोयीसाठी बेटावर बांधकाम करायचे ठरवले.

तिथे एक हंटिंग लॉज बांधण्यात आला, या हंटिंग असोसिएशननेच लॉजची देखरेख करायला सुरुवात केली. पण, आपण बघितले आहेत त्या लॉजपेक्षा हा लॉज फारच वेगळा आहे! इथे पावसाचं साठवलेलं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं, इतर मूलभूत गोष्टीसुद्धा इथे नाहीत.

असं हे बेट म्हणजे सध्या पफिन पक्षांचा नंदनवन झालंय. बऱ्याच पक्षांनी तेथे घरटी बांधली आहेत. मनुष्यवस्ती नसल्यामुळे हळूहळू इतर समुद्री पक्षी देखील येथे राहत आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.


ShareTweet
Previous Post

एंपरर अशोक: भारताचं पहिलंच जम्बो जेट अरबी समुद्रात कोसळलं होतं

Next Post

म्हणून आजही ज्यू आणि अरब लोकांमध्ये इस्राईलवरून भांडणं सुरु आहेत

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

म्हणून आजही ज्यू आणि अरब लोकांमध्ये इस्राईलवरून भांडणं सुरु आहेत

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुस्तकाची सुरुवात कशी झाली माहितीये का..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.