The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजा रविवर्मांच्या कुंचल्याने आपल्या देवदेवतांना मूर्त स्वरूप दिलंय

by द पोस्टमन टीम
28 April 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


राजा रविवर्मा यांचे नाव घेतल्याशिवाय भारतीय चित्रकलेचा इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही. भारतीय इतिहासातील उत्कृष्ट चित्रकार म्हणून राजा रविवर्माचे नाव घेतले जाते. राजा रविवर्मा यांनी हिंदू धर्मातील पौराणिक कथांवर आधारित चित्र काढले.  त्यांनी रामायण व महाभारत ग्रंथांतील काढलेले चित्र त्या कथांना जिवंत करतात.

राजा रविवर्मा यांचा जन्म २९ एप्रिल १८४८ रोजी केरळच्या कली मानूर या गावी झाला. एज्जुमावील निलाकंथन भात्तातीरीपिद राजा रविवर्मा यांचे वडील होते. त्यांचे वडील एक विद्वान होते तर, आई उमायाम्बा थांबुरत्ती या एक कवयत्री आणि लेखिका होत्या.

राजा रविवर्मा यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्यांना त्यांच्या काकांकडून चित्रकलेची प्रेरणा मिळाली होती.  त्यांचे काका उत्कृष्ट चित्रकार होते. राजा रविवर्मा यांचे चित्रकलेतील रस पाहून त्यांचे काका त्यांना त्रावणकोरच्या राजदरबारात घेऊन गेले. तेथे गेल्यानंतर वॉटर पेंटिंगसाठी विख्यात असलेले रामास्वामी नायडू यांच्याकडून राजा रविवर्माना चित्रकलेचे धडे मिळाले. त्यावेळी राजा रविवर्मा यांचे वय अवघ्या १४ वर्षं होते. थोड्याच कालावधीत ते चित्रकलेत निपुण झाले.

त्यानंतर रविवर्मांनी मदुराई, म्हैसूर, बडोदा तसेच जगभरात आपली चित्रकला पोहोचवली. यावेळी भारतात वॉटर पेंटिंगला विशेष महत्त्व होते.

नेदरलँडचे प्रसिद्ध चित्रकार थियोडोर जेन्सन यांच्याकडून राजा रविवर्मा ऑइल पेंटिंग शिकले. जेन्सन हे त्यावेळी भारत दौऱ्यावर आले होते. ऑइल पेंटिंग शिकल्यानंतर राजा रविवर्मा यांनी ऑइल पेंटिंगचे एकापेक्षा एक उत्कृष्ट नमुने चितारले.  वॉटर पेंटिंगला महत्त्व असणाऱ्या भारतात लवकरच ऑइल पेंटिंगची राजवट सुरू झाली. याचे श्रेय राजा रविवर्मा यांनी तयार केलेल्या कलाकृतींना जाते.



राजा रविवर्मा यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सात हजारांपेक्षाही अधिक चित्र काढली. त्यात मुख्यतः दमयंती आणि हंसाच्या गप्पा, शकुंतलेच्या दुष्यंत यासाठीचा शोध, नायर लेडीच्या अदा, शंतनू व मत्स्यगंधेचे चित्र इत्यादी सर्वाधिक गाजलेली चित्र आहेत. 2007 साली राजा रविवर्माने काढलेले एक चित्र तब्बल सव्वा मिल्लियन डॉलर विकले गेले. या चित्रात राजा रविवर्मा यांनी त्रावणकोरचे महाराज व त्यांचा भाऊ यांना मद्रासचे तत्कालीन गव्हर्नर जनरल रिचर्ड टेम्पल यांचे स्वागत करताना दाखविले होते.

आपल्या घरांमध्ये दिसणाऱ्या लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, किंवा राधाकृष्ण यांचे फोटो, पोस्टर्स किंवा कॅलेंडर यांच्यावरील बहुतांशी चित्रे राजा रविवर्मा यांनी काढलेले आहेत. बऱ्याच घरांमध्ये आजही त्या चित्रांची मनोभावे पूजा केली जाते. चित्रांचे खास वैशिष्ट्य म्हणजे देवी-देवतांचे देवत्व त्यातून झळकते. त्यामुळे त्या चित्रांशी खूप लोकांच्या श्रद्धा निगडित आहेत. महाभारत रामायण इत्यादी कथांमधील पात्रांच्या कल्पना करून राजा रविवर्मा यांनी त्यांना हुबेहूब रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर, चौथीच्या पुस्तकात कव्हर म्हणून वापरलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रदेखील राजा रविवर्मानेच रेखाटलेले आहे.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

राजा रविवर्मा यांना  त्यांच्या कलेसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.

१८७८ साली विएन्ना येथील प्रदर्शनात त्यांना पुरस्कार दिला गेला. तसेच १८९३ साली शिकागो येथे झालेल्या वर्ल्ड्स कोलंबियन एक्सपोजिंग या प्रदर्शनात वर्मा यांच्या कलाकृतींना तीन सुवर्णपदके मिळाली होती. शिवाय 1904 मध्ये ब्रिटिश भारताचे व्हॉईसरॉय लोर्ड कर्जन यांच्या हस्ते वर्मांना कैसर-ए-हिंद हा सर्वोत्कृष्ट सन्मान मिळाला होता. 

हा पुरस्कार मिळवणारे राजा रविवर्मा हे पहिलेच भारतीय कलाकार होते. आजही वडोदरा येथील लक्ष्मीविलास पॅलेस येथे राजा रविवर्मा यांच्या चित्रांचा संग्रह बघायला मिळतो.

२ ऑक्टोबर १९०६ या दिवशी तिरुवनंतपुरम येथे वयाच्या ५८व्या वर्षी राजा रविवर्मा यांचे निधन झाले. भारतीय कलेत  योगदान देणाऱ्या या महान कलाकाराच्या जाण्याने चित्रकारिता क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले.

त्यांच्या स्मृती जपण्यासाठी केरळ सरकारने एका पुरस्काराची स्थापना केली. हा पुरस्कार कला व संस्कृती क्षेत्रातील महान योगदानासाठी दिला जातो. केरळमध्ये राजा रविवर्मा यांच्या सन्मानासाठी एक फाईन आर्ट कॉलेज स्थापन केले गेले तसेच कालीमानुर येथे एका हायस्कूलला राजा रविवर्मा यांचे नाव देण्यात आले. तेवढेच नाही तर २०१३ साली बुध ग्रहावरील एका क्रेटरला देखील राजा रविवर्मा यांचे नाव देण्यात आले आहे.

२०१४ साली राजा रविवर्मा यांच्या जीवनावर आधारित रंग रसिया नावाचा चित्रपट देखील बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केतन मेहता यांनी केले आहे. रणजित देसाई यांच्या कादंबरीवर चित्रपटाची कथा आधारलेली आहे. राजा रविवर्मा यांची भूमिका अभिनेता रणदीप हुडा यांनी साकारली होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

केवळ २१ शीख सैनिकांनी १० हजार अफगाणांचा सामना केला होता !

Next Post

या प्रश्नांची उत्तरं फक्त KGF चे डाय हार्ड फॅनच देऊ शकतात..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

या प्रश्नांची उत्तरं फक्त KGF चे डाय हार्ड फॅनच देऊ शकतात..!

मजुराच्या मुलीने फेडरेशनला नडून देशासाठी कांस्यपदक आणलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.