The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लेडी डायनाच्या आयुष्यातील रहस्य अजूनही उलगडले नाहीत

by द पोस्टमन टीम
3 May 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


काही लोकांच्या भोवती तयार झालेले प्रसिद्धीचे वलय त्यांच्या मृत्यूनंतरही कायम राहते. जिवंत असतानाही या प्रसिद्धीमुळेच ज्यांना थोडीशीही उसंत मिळालेली नसते, त्यांची मरणोपरांतही यातून सुटका होत नसावी. संपूर्ण जगाला आपल्या सौंदर्याने वेड लावणाऱ्या लेडी डायनाचा आजही चाहत्यांना अजिबात विसर पडलेला नाही. ब्रिटीश राजघराण्यातील इतर व्यक्तींच्या तुलनेत डायनाची लोकप्रियता काकणभर जास्तच आहे.

डायनाचे निळे डोळे आणि मनमोहक हास्य यांची जादू कणभरही ओसरलेली नाही. तिचा मृत्यू होऊन आज वीस वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी, तिच्या आयुष्याशी संबधित बाबी जाणून घेण्याची आजही लोकांना प्रचंड उत्सुकता आहे. तिचे जीवन आणि तिचा मृत्यू या दोन्ही गोष्टी अगदीच गूढ वाटाव्या अशाच आहेत.

डायनाच्या भोवती नेहमीच प्रसार माध्यमांचा गराडा असायचा. रात्र असो की दिवस, प्रसार माध्यमांचे कॅमेरे नेहमीच तिचा पाठलाग करत असत. ब्रिटनच्या राजकुमारीची लोकप्रियता तिच्या देशापुरतीच मर्यादित नव्हती. तिच्या लोकप्रियतेने देश आणि सीमांची बंधने कधीच पार केली होती. तिच्या जीवनातील प्रत्येक घडामोडीत प्रसार माध्यमांनी नाक खुपसले असले तरी तिच्या आतला भावनिक कोलाहल कुणालाच दिसला नाही.

लेडी डायनाचे पूर्वीचे नाव डायना फ्रांसेस स्पेंसर होते. नॉरफोक सेनड्रींघममध्ये १ जुलै १९६१ रोजी तिचा जन्म झाला. तिच्या आई-वडिलांच्या पोटी जन्मलेले शेंडेफळ म्हणजे डायना.

डायनाच्या बालपणीच तिच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला होता. त्यामुळे नंतर तिला नेहमीच नॉर्थेंप्टनशायर आणि स्कॉटलंड दरम्यान फेऱ्या माराव्या लागत. राजघराण्यातील नियमानुसार मुलांना शाळेत पाठवले जात नाही, त्याऐवजी त्यांना घरीच खाजगी शिक्षकांची शिकवणी लावली जाते. त्यामुळे तिचे सुरुवातीचे शिक्षण घरीच झाले. थोडी मोठी झाल्यावर तिला शाळेत प्रवेश दिला गेला. परंतु डायनाला शाळा आणि अभ्यासात फार काही रस नव्हता. शाळेत असताना तर ती अनेकदा नापास झाली होती. परंतु तिला संगीत आणि नृत्याची खूप आवड होती.



डायनाचा जन्म एका राजघराण्यात झाला असला तरी तिने कधीच याचा देखावा केला नाही. तिने अगदी सामान्य जीवनशैली अंगिकारली होती. स्वतःचा खर्च भागवण्यासाठीही तिने कधीच आपल्या कुटुंबाचा आधार घेतला नाही. उलट ती स्वतःच्या खर्चाची रक्कम जुळवण्यासाठी मिळेल त्या प्रकारचे काम करत असे. कधी ती कुणाची सेवाश्रुशुषा करी तर, कधी कुठल्या हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करी. लंडनमधील यंग इंग्लंड किंडरगार्टनमध्ये तिने सहाय्यक शिक्षिकेचे देखील काम केले. राजेशाही जीवन तिला कधीच रुचले नाही.

एखाद्या सामान्य घरातील सामान्य मुलीप्रमाणेच ती काम करून स्वतःचा खर्च भागवी. शिवाय, तिची राहणी देखील अत्यंत साधी होती. शाही जीवनाच्या झगमगाटापासून दूर, साधे आयुष्य जगण्यातच तिला आनंद मिळत होता. अशा साध्यासुध्या डायनाचा विवाह वेल्सच्या राजकुमाराशी झाला आणि ती वेल्सची राजकुमारी बनली. २४ फेब्रुवारी १९८१ रोजी त्यांची एंगेजमेंट सेरेमनी पार पडली. या कार्यक्रमात डायनाला तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून प्रचंड महागडी वस्तू भेट स्वरुपात मिळाली होती. तिला भेट मिळालेल्या अंगठीची किंमत साधारण २८,००० पौंड इतकी होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

या अंगठीत एक नीलम आणि १४ हिरे जडवलेले होते. आज ही अंगठी केंब्रीजची राजकुमारी केट मिडलटन हिच्याकडे आहे.

आत्तापर्यंत अगदी साधे जीवन जगणारी डायना राजकुमार चार्ल्सशी लग्न झाल्यानंतर लगेचच प्रकाशझोतात आली. २९ जुलै १९८१ रोजी ती राजकुमार चार्ल्ससोबत विवाहबंधनात अडकली. यावेळी डायना अवघ्या वीस वर्षांची होती. या लग्नाची जोरदार चर्चा झाली. टीव्हीवरून या लग्नाचे प्रसारण करण्यात आले, ज्याला जगभरातील ७५ करोड लोकांनी पहिले असेल. या लग्नाला ‘वेडिंग ऑफ द सेंचुरी’ असल्याचे म्हटले गेले. त्यानंतर डायनाला दोन मुलं झाली. प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हॅरी.

डायना, चार्ल्स, विलियम आणि हॅरी यांना एकत्र पाहिल्यावर प्रत्येकाला असेच वाटे की किती छान, सुखी आणि समृद्ध कुटुंब आहे. पण, चार भिंतीच्या आत मात्र या कुटुंबात जी दरी निर्माण झाली होती, ती कुणालाच दिसत नव्हती. डायनाचे आपल्या दोन्ही मुलांवर निरतिशय प्रेम होते. परंतु डायना आणि चार्ल्स यांच्या सुखी संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली. दोघांच्याही नात्यात तणाव निर्माण झाला आणि तो दिवसेंदिवस वाढू लागला.

चार्ल्स आणि त्याची प्रेयसी कॅमेला यांच्यातील संबंधांची डायनाला चुणूक लागली होती. ज्यामुळे डायना पूर्णतः खचून गेली. पतीच्या या विवाहबाह्य संबंधांमुळे ती नैराश्याच्या गर्ततेत अडकली होती.

तिच्या मृत्युनंतर तिच्या आयुष्याशी संबधित एक सिक्रेट टेप उजेडात आली, ज्यात डायनाने आपल्या साऱ्या व्यथा बोलून दाखवल्या होत्या. तणावाच्या काळात तिने कित्येकदा आत्मह*त्येचा प्रयत्न केल्याचेही तिने या टेपमध्ये म्हटले होते.

चार्ल्ससोबत तिने घटस्फोट घेतला. पण, तरीही तिच्या प्रसिद्धीत थोडीही कमी झाली नाही.

डायना शाही परिवारातील असली तरी तिच्या वागण्यात सहजता आणि कमालीचा साधेपणा होता. कुठेही गेली तरी ती अगदी सहजतेने लोकांच्यात मिसळत असे. नर्सरी, शाळा, हॉस्पिटल कुठेही गेली तरी तिला लोकांशी जोडून घेणे सोपे जात असे. तिच्या उदार व्यक्तिमत्त्वामुळे आणि तिने केलेल्या अनेक सामाजिक उपक्रमांमुळे देखील ती नेहमीच लोकांच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय होती.

एड्सग्रस्त लोकांच्या प्रश्नावर तिने प्रामुख्याने काम केले. त्यांचे प्रश्न तिने पहिल्यांदा सामाजिक पटलावर मांडले. एड्सग्रस्त लोकांना स्पर्श करून ती हे दाखवून देत होती, की स्पर्शाद्वारे एड्सची लागण होत नाही. या आजारासंबधी असलेले पूर्वग्रह दूर करून वस्तुनिष्ठ माहिती लोकापर्यंत पोहोचावी म्हणून ती धडपडत होती. सामाजिक क्षेत्रात तिने केलेल्या कार्यामुळेही जगभर तिची लोकप्रियता वाढत होती.

तिच्याकडे एक फॅशन आयकॉन म्हणूनही पाहिले जाई. सतत पाठलाग करण्याऱ्या प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यांना कधीकधी ती वैतागून जात असे. तर कधी कधी स्वतःच काही तरी चटपटीत बातम्यांचा मसाला पुरवत असे. तिच्या विषयीच्या खास बातम्या मिळवण्यासाठी प्रसार माध्यमातही एक प्रकारची चुरस ल्गालेली असे.

तिच्या मृत्यूविषयीही अनेक तर्क-कुतर्क लढवण्यात आले. पण तिचा मृत्यू अपघात होता की घातपात हे मात्र अखेरपर्यंत रहस्यच राहिले. तिच्या जीवनाचे रहस्य शोधण्याचे काम अनेकांनी केले पण, कुणालाच यश आले नाही. डायनाच्या जीवनातील गुपिते तिच्यासोबतच संपून गेली. परंतु आजही तिच्या जीवनाचे सत्य जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते.

आजही इंटरनेट सर्चवर तिचे नाव शाही परिवारातील इतर व्यक्तींच्या तुलनेत नेहमीच वर असते. तिच्या मृत्यूला दोन दशकाहून अधिक काळ लोटला पण, तिच्याविषयीचे कुतूहल मात्र अद्यापही शमलेले नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अफगाणी सैनिकांसाठी यु*द्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

Next Post

इंदिरा गांधींवर नाराज होऊन राजकारण सोडलेला हा नेता बिनविरोध राष्ट्रपती बनला होता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

इंदिरा गांधींवर नाराज होऊन राजकारण सोडलेला हा नेता बिनविरोध राष्ट्रपती बनला होता

जगण्यासाठी आवश्यक बनलेल्या वायफायचा शोध हॉलीवूडच्या या अभिनेत्रीने लावलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.