The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेव्हा बाबरने शिखांचे पहिले गुरु गुरुनानक यांना कैदेत टाकलं होतं..

by द पोस्टमन टीम
14 April 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


अकराव्या वर्षी फरगना राज्याची सूत्रे सांभाळणाऱ्या बाबरने आपल्या अतिमहत्त्वाकांक्षेपोटी स्वतःचे राज्यही गमावले. स्वतःच्याच राज्यातून पदच्युत झाल्यावरही वेगवेगळे मुलुख पादाक्रांत करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा संपली नव्हती. अफगाणिस्तानच्या दिशेने प्रवास करत असताना त्याने काबुलवर आक्र*मण केले. आता त्याचे पुढचे लक्ष्य होते भारतावर आक्र*मण करणे. दुर्दैवाने तेव्हा दिल्लीत इब्राहीम लोदीसारखा एक निष्क्रिय राजा होता. राज्याच्या सुरक्षेसाठी त्याच्याकडे सक्षम यंत्रणा तर नव्हतीच शिवाय घरातीलच दुफळीमुळे हा वंश कमकुवत बनला होता.

दिल्लीवर स्वारी करण्याची हीच अचूक वेळ असल्याचे बाबरने हेरले. याआधीही त्याने भारतावर पाच वेळा आक्र*मण करून बरीच लुटालूट केली होती. या पानिपतच्या पहिल्या यु*द्धात त्याने इब्राहीम लोदीचा पराभव केला, त्याच्या काकाला कैद केले आणि त्याच्या भावालाही मारून टाकले. दिल्लीच्या गादीवर बसण्यासाठी आता बाबरला कोणीही रोखू शकणार नव्हते.

आणि उझबेकिस्तानच्या मंगोल वंशातील बाबरने भारतात मुघल सत्तेचा पाया रचला.

त्याने भारतावर कसे आक्र*मण केले याचे वर्णन अनेक ऐतिहासिक ग्रंथातून मिळते. बाबरने भारतावर आक्र*मण करण्याचा आणि गुरु नानक देव यांचा काळ एकच होता. बाबरने १५१९ ते १५२६ या काळात भारतावर पाच वेळा ह*ल्ला केला आणि शेवटच्या प्रयत्नात त्याला दिल्लीचा पाडाव करण्यात यश आले. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांचा काळही १४६८ ते १५३९ हाच आहे. आपल्या गुरुग्रंथसाहिब या ग्रंथात गुरु नानक देवांनी बाबरच्या या ह*ल्ल्याचे आणि त्याच्या क्रू*रतेचे वर्णन केले आहे.

या ग्रंथात बाबरवाणी नावाचा बाबरवरील एक विशेष अध्याय आहे. ज्यामध्ये बाबरने भारतावर केलेल्या या आक्र*मणात भारत कसा होरपळून निघाला त्याचे वर्णन आहे. बाबरवाणीमध्ये गुरु नानक लिहितात, ‘बाबरवाणी फिरी गई कुइरु ना रो खाई.’ म्हणजे, बाबरच्या साम्राज्याचा विस्तार होत आहे, ज्याला कोणीही रोखू शकत नाही. परंतु बाबरच्या या राज्यात अत्या*चार इतका होता की राजराण्यातील स्त्रियांना देखील अन्नपाणी मिळत नव्हतं मग, सामान्यांची अवस्था काय असेल याची कल्पनाही करवत नाही. बाबरवाणीमध्ये बाबरच्या अनेक किस्स्यांचा उल्लेख आहे. यामध्ये गुरु नानक यांनी बाबरच्या या आक्र*मणामुळे सगळीकडे उडालेल्या हाहाकाराचे अत्यंत बारकाईने वर्णन केले आहे.



बाबरने १५२६ साली जेव्हा भारतावर आक्र*मण केले तेव्हा गुरू नानक प्रवासात होते. बाबरच्या सैनिकांनी एमनाबाद शहराजवळ आपली छावणी उभारली होती. त्यांनी शहरात जाऊन सामान्य जनतेचीही लुट केली. अनेक लोक बेघर झाले. स्त्रिया आणि लहान मुलांचा आक्रोश तर हृदय पिळवटून टाकणारा होता. अनेक स्त्रियांवर अत्या*चार करण्यात आले. त्यांना जबरदस्तीने गुलाम बनवण्यात आले. शहरातील बहुतांश नागरिकांना कैद करून कैदखान्यात टाकण्यात आले. गुरू नानक त्यावेळी याच शहरात वास्तव्याला होते. बाबरच्या काळ्या कारनाम्यांचे ते स्वतः साक्षीदार होते.

इतर रहिवाशांप्रमाणेच बाबरच्या सैनिकांनी गुरू नानक यांना देखील बंदी बनवले. पण, जगाच्या बंदिवासातून मुक्त झालेले नानक या बंदीवासाचा त्रास कशाला करून घेतील. त्यांनी तुरुंगातही आपली कीर्तने सुरूच ठेवली.

बाबरला याविषयी माहिती मिळताच तो स्वतः गुरू नानकांना भेटायला आला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

बाबरने जेव्हा गुरू नानकांना पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील तेज बघूनच तो स्तिमित झाला. गुरू नानक हे खरोखरच श्रेष्ठ संत असल्याची त्याला खात्री पटली. गुरू नानकांना त्याच्यामुळे जो काही त्रास झाला त्याचा त्याला प्रचंड पश्चात्ताप झाला. त्याने गुरू नानकांना दिलेल्या त्रासबद्दल त्यांची माफी मागितली. बाबरने गुरू नानकांना कैदेतून स्वतंत्र करण्याचे आदेश दिले. यावर गुरू नानक बाबरला म्हणाले, “मी तर तुला कधीच माफ केले आहे. परंतु तू अल्लाहकडेही माफी मागितली पाहिजे. या तुरुंगातील सर्वच कैद्यांना तू स्वतंत्र करून अल्लाहची माफी मिळवू शकतोस.” गुरू नानक देवांच्या विचाराने बाबर प्रभावित झाला. त्याने केलेल्या कृत्यामुळे त्याची मान शरमेने खाली गेली. गुरू नानक देवांसोबतच त्याने कैदेतील सर्वांना मुक्त केले. शिवाय, त्यांच्यावरील वाढीव करदेखील रद्द करण्याचे आश्वासन दिले आणि गुरू नानक यांची माफी मागितली. गुरू नानक यांनी बाबरसारख्या क्रू*रकर्म्याचेही मतपरिवर्तन घडवून आणले.

बाबरवाणीमध्ये नानकदेवांच्या चार रचनांचा समावेश आहे. यातील पहिल्या कडव्यात नानकदेव यांनी बाबरच्या सैनिकांनी महिलांवर कसे अत्या*चार केले याचे वर्णन केले आहे. या सैनिकांनी भारतातील पोरीबाळींना पळवून त्यांच्याशी जबरदस्तीने निकाह केल्याचे वर्णन यात आले आहे.

दुसऱ्या कडव्यात त्यांनी म्हटले आहे, “बाबरने भारतावर आक्र*मण करून भारताला आगीच्या ज्वाळांत फेकले आहे. संपूर्ण भारत या आगीत होरपळून निघत आहे. इथे झालेल्या अनन्वित अत्या*चाराने प्रत्येक नागरिक कण्हत-विव्हळत आहे.”

तिसऱ्या कडव्यात त्यांनी राजघराण्यातील स्त्रियांचे वर्णन केले आहे. उंचउंच महालात आणि सदा सुखविलासात राहणाऱ्या या महिलांनाही कुणी वाली उरला नव्हता. त्याही रस्त्यावरून निराधार होऊन हिंडत होत्या. त्यांच्या गळ्यातील मोती रस्त्यावरून सांडले होते. त्यांच्या हातातील बांगड्या कधीच्याच फुटल्या होत्या. इतकेच काय त्यांना अन्नपाणी मिळण्याचीही मारामार झाली होती. ज्या पूर्वी पालखीत बसून शहरातून फिरत होत्या त्या आता अनवाणी पायांनी रस्ता तुडवत होत्या.

चौथ्या कडव्यात नानकांनी सर्वशक्तिमान ईश्वराचे स्मरण केले आहे. ते म्हणतात, हे विश्व माझेच आहे तरीही याचा मालक तर एकमेव तू आहेस. तूच बनवतोस आणि तूच याला नष्ट करतोस. सुख असो की दुख तुझ्या मर्जीशिवाय त्याची उत्पत्ती होत नाही.

बाबरचे वर्णन त्यांनी जाबर असे केले आहे. जाबर हा फारसी शब्द असून त्याचा अर्थ होतो घोर अन्याय अत्या*चार करणारा क्रू*र माणूस. गुरू नानकांनी केलेले हे वर्णन ऐकून बाबराचे डोळे खाडकन उघडले. त्यानंतर बाबरने आपल्यातील क्रू*रतेचा त्याग केला. राज्यातील नागरिकांच्या हितासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याचे वचनही त्याने गुरू नानकांना दिले.

खरंच, एका क्रू*र व्यक्तीतही परिवर्तन घडवून त्याला सत्कर्मासाठी प्रवृत्त करण्याची किमया केवळ संतच करू शकतात!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

समग्र क्रांतीचे अग्रदूत : महर्षी दयानंद सरस्वती

Next Post

या टीव्ही कंपनीने ‘ब्रँडिंग’ची संकल्पना भारतात रुजवली होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या टीव्ही कंपनीने 'ब्रँडिंग'ची संकल्पना भारतात रुजवली होती

आयआयएममधून लागलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडून हर्षा 'व्हॉइस ऑफ क्रिकेट' बनला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.