The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नेहरूंनी अहमदनगरच्या कारागृहात असताना लिहिलेल्या पुस्तकावरची ही मालिका प्रचंड गाजली होती

by द पोस्टमन टीम
29 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


लॉकडाऊनच्या काळात दूरदर्शनवरील अनेक जुन्या मालिकांचे पुनःप्रक्षेपण करण्यात आले. ९०च्या दशकात प्रक्षेपित करण्यात आलेल्या या बहुतांश मालिकांनी लोकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. या मालिका पुन्हा प्रक्षेपित करून लोकांच्या त्या जुन्या आठवणींना उजळणी देण्यात आली.

परंतु या सर्व मालिकांमध्ये एका मालिकेचे पुन्हा प्रक्षेपण करण्यात आले नाही. ती मालिका म्हणजे शाम बेेनेगल यांची ‘भारत एक खोज’. ८०-९० च्या दशकातील लोकांना ‘भारत एक खोज’ ही मालिका माहिती असेलच.

छोडो भारत चळवळीच्या काळात अहमदनगरच्या कारागृहात कारावास भोगणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरूंने लिहलेल्या ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या ग्रंथावर आधारलेली ही मालिका, भारताच्या ५००० वर्ष प्राचीन इतिहासावर दृष्टिक्षेप टाकते.

भारत कसा घडत गेला याची वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून मांडणी करून प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास या ५३ भागांच्या मालिकेच्या माध्यमातून लोकांच्या समोर ठेवण्यात आला होता.

या मालिकेच्या पहिल्या भागात जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू एका खेडे गावाला भेट देतात आणि लोकांना ‘भारत माता कोण आहे?’ असा प्रश्न विचारतात. त्यानंतर स्वतः भारत माता दुसरं तिसरं कोणी नसून भारताचे लोक आहेत, हे ज्या सुबकपणे मांडतात ते अगदीच मनाला भावते.



तिथून सुरू झालेल्या मालिकेचा प्रवास हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती, रामायण, महाभारत, मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य, अकबराचा मोघल दरबार, शिवाजी महाराजांचे राज्य, १८५७ चा उठाव आणि पुढे महात्मा गांधींनी ब्रिटिशांच्या विरोधात उभारलेली स्वातंत्र्य चळवळ असा शेवटाकडे प्रवास करतो.

या मालिकेच्या वैशिष्ट्यावर भाष्य करताना श्याम बेनेगल म्हणाले होते की “या मालिकेच्या कथानकात मी दोन बाजू मांडल्या आहेत. एक बाजू होती नेहरूंची भूमिका साकारणाऱ्या रोशन सेठ यांनी मांडलेली नेहरूंची बाजू आणि दुसरी होती त्याच्या प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवली गेलेली ओम पुरी यांच्या आवाजातील बाजू, यातूनच या कथेला एक वेगळा भरभक्कमपणा प्राप्त झाला, जो एकांगी नव्हता.”

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

या मालिकेत दक्षिण भारताच्या इतिहासाला देखील न्याय देण्यात आला होता.

यात चोल साम्राज्याचा कालखंड दाखवण्यात आला होता, सोबतच रामायण-महाभारतातील विविध घटनाक्रम आणि जातीप्रथेच्या निर्मितीच्या भागाने या मालिकेला समृद्ध केले.

या मालिकेत तब्बल ५०० कलाकारांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या. नसिरुद्दीन शहा, शबाना अजमी, ओम पुरी, इरफान आणि रोशन सेठ या काही दिग्गजांचा यात समावेश करण्यात आला होता. या मालिकेच्या पटकथा लेखनाचे काम शमा झैदी यांच्या नेतृत्वाखालील २५ लेखकांनी केले होते. यासाठी १४४ वेगवेगळ्या सेट्सची निर्मिती करण्यात आली होती.

या मालिकेसाठी २२ इतिहासकारांनी तीन वर्षे अखंड परिश्रम घेतले होते. यासाठी पुरातत्व विभागाची मदत घेण्यात आली होती. या मालिकेच्या संपूर्ण चित्रीकरणाला २० महिन्यांचा अवधी लागला होता.

बेनेगल यांच्या दिग्दर्शनाचे प्रमुख सूत्र म्हणजे दुर्योधन आणि अल्लाद्दीन खिलजीसारखे इतिहासात आपल्या क्रू*रतेसाठी आणि कपटासाठी प्रसिद्ध असलेले खलनायकसुद्धा त्यांनी अतिशय भावपूर्णरित्या मांडले होते. आजच्या काळात कोणी असं करणं शक्यच नाही.

नसिरुद्दीन शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला होता. बेनेगल म्हणाले होते की या मालिकेच्या निमिर्तीसाठी त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा राजकीय दबाव नव्हता, त्यांना ती मालिका जशी दाखवायची तशीच दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

मालिकेचे कथानक जरी चांगलेच होते पण त्यातही काही कमतरता होत्याच.

या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आधुनिक भारताच्या निर्मितीत असणारे योगदान झाकोळले गेले होते. इतकेच नाही तर, बऱ्याच ठिकाणी ओम पुरी यांचा प्रतिवादी आवाज अनेक ठिकाणी दाखवण्यात आला नाही, यामुळे या मालिकेवर सर्वार्थाने नेहरूंच्या विचारांची छाप पडलेली दिसते.

काहीही असले तरी भारत एक खोज ही मालिका, त्या काळातील कलाकृतीचा एक सर्वोत्तम नमुना होती. कदाचित श्याम बेनेगल यांचं त्यावेळी केलेलं सर्वोत्तम काम होतं.

श्याम बेनेगल म्हणायचे की या मालिकेच्या निर्मिती दरम्यान ते प्रचंड झपाटले होते. भारताच्या विविधतेतील एकतेचं दर्शन या मालिकेतुन समाजाला घडावण्यात आलं होतं.

परंतु ही मालिका शेवटपर्यंत नेहरुंच्या तत्वांचा आदर करणारी असल्यामुळे आजच्या सत्ताधारी पक्षाला या मालिकेच्या पुनःप्रक्षेपणाचा विचार रुचला नसावा. असं असलं तरीही ही मालिका युट्युबवर उपलब्ध असून भारताच्या ५००० वर्षांच्या इतिहासाचे नेहरूवादी चष्म्यातून केलेले विवेचन जाणून घ्यायचे असेल तर ही मालिका नक्कीच बघायला हवी!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या बटूग्रहावर पृथ्वीपेक्षाही जास्ती पाण्याचा साठा आहे..

Next Post

चीनला एकसंध करणाऱ्या या सम्राटाने अमरत्वाचा ध्यास घेतला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

चीनला एकसंध करणाऱ्या या सम्राटाने अमरत्वाचा ध्यास घेतला होता

"उरलेली भजनं वर जाऊन म्हण" असं म्हणत दाऊद गँगने गुलशन कुमारला गोळ्या घातल्या होत्या

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.