The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंदीसोबतच या पाच भाषा जगातील सगळ्यात कठीण भाषा मानल्या जातात

by द पोस्टमन टीम
30 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


स्वतःच्या भाषेवर म्हणजेच मातृभाषेवर सर्वांचेच प्रेम असते. पण, सध्याचा काळ असा आहे की, स्वतःची भाषा सोडून एक तरी परकीय भाषा यायला हवी. तसेही इंग्रजांचे अर्ध्या पृथ्वीवर राज्य होते तेंव्हापासून इंग्रजीचे महत्व तर सगळ्यांनाच वाटते.

आजकाल अगदी ग्रामीण भागातील गल्ली बोळातूनही इंग्रजी मिडीयम स्कूल्स, इंग्लिश स्पिकिंग क्लासेस दिसताहेत. पण, आजही अनेकांना इंग्रजीबद्दल न्यूनगंड आहे. पण, खुद्द इंग्लिशच ज्यांची मातृभाषा आहे, अशा लोकांनाही जेव्हा इतर भाषा शिकण्याची वेळ येते तेंव्हा त्यांना काय वाटत असेल?

त्यांनाही दुसरी भाषा शिकताना, ‘किती अवघड आहे हे?’ असे वाटत असेल का? गंमत म्हणजे भारतावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या या गोऱ्या साहेबांना हिंदी भाषा अवघड वाटते.

खरेतर कुठलीही नवी भाषा आत्मसात करणे तसे अवघडच असते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसरी भाषा शिकूच शकत नाही. थोड्याशा प्रयत्नाने तुम्ही दुसरी भाषा शिकू शकता. भारतात तर किती भाषा बोलल्या जातात.



भारतात तर दुभाषिक किंवा बहुभाषिकही भरपूर आहेत. इंग्रजी भाषिक व्यक्तींना जगातील पाच भाषा सर्वात जास्त अवघड वाटतात.

ज्यात आपल्या हिंदीचाही समावेश आहे. इंग्रजी भाषिकांना अवघड वाटणाऱ्या या कोणत्या पाच भाषा आहेत आणि त्यामागची कारणे काय आहेत जाणून घेऊया या लेखातून.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

मँडरिन (चीनी)

इंग्रजी बोलणाऱ्यांना चीनची ही भाषा खूपच अवघड वाटते. फक्त इंग्रजी भाषिक किंवा इतर भाषिक व्यक्तींसाठीच नाही तर खुद्द चीनी लोकांना देखील या भाषेवर प्रभुत्व मिळवणे खूपच अवघड वाटते.

तरीही चीनी लोकांना या भाषेचा अभिमान आहे. यामागचे एक मुख्य कारण म्हणजे या भाषेची लिपी खूपच किचकट आहे.

ही लिपी दिसायला सुंदर आहे, तितकीच रहस्यमय आहे आणि वाचायला कठीण. शिवाय, यात काही अक्षरांची कमतरता आहे.

ही भाषा ध्वनीप्रधान नाही. या भाषेतील शब्दांचे अर्थ तर डिक्शनरीतही शोधून सापडत नाहीत. परंतु जगातील सर्वाधिक लोक ही भाषा बोलतात. त्यामुळे ही भाषा अवगत केल्यास खूपच फायदा होऊ शकतो.

हिंदी

युरोपीय आणि अमेरिकन लोकांच्या दृष्टीने हिंदी भाषा शिकणे तर खूपच कठीण आहे. हिंदी लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर केला जातो. ही देवनागरी लिपीच या लोकांना कठीण वाटते. शिवाय या भाषेत लिंगानुसार क्रियापद, कर्ता आणि विशेषणे बदलतात. त्यामुळे कधी कधी वाक्याचा अर्थच बदलून जातो. याच कारणाने इंग्रजी भाषिकांना ही भाषा अवघड वाटते.

आकडेवारीनुसार हिंदी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी पाचव्या क्रमांकाची भाषा आहे. 

परंतु इतर भाषांशी तुलना करता ही भाषा अवघड वाटते. इंग्रजीच्या तुलनेत हिंदी भाषा अधिक तार्किक, वैज्ञानिक आणि सुटसुटीत आहे. हिंदीतील कुठल्याही शब्दाचा उच्चार आणि लेखन यात फरक नाही. परंतु इंग्रजीत मात्र शब्दाचे स्पेलिंग वेगळे आणि उच्चार वेगळा अशी स्थिती असते.

अर्थात, परकीय भाषा शिकणे तसे कुणालाही अवघड वाटू शकते. परंतु, कमिल बुल्के, मोनियर विल्यम्स, जॉर्ज ग्रीयर्सन असे कित्येक इंग्रजी विद्वान होऊन गेले ज्यांनी हिंदीवर प्रभुत्व मिळवले. हिंदीवर प्रेम केले आणि हिंदी भाषेत मौलिक योगदानही दिले.

रशियन

इंग्रजी भाषिक लोकांना रशियन भाषा शिकणेही कठीण वाटते. ज्यांना जर्मन किंवा स्पॅनिश भाषा येते ज्यात अक्षरांचा अस्पष्ट उच्चार असतो, त्यांना रशियन भाषा शिकणे सहज जमू शकेल. पण, इंग्रजी भाषिक लोकांनी यासाठी थोडा वेळ जाऊ दिला पाहिजे.

इंग्रजी भाषिक लोकांसाठी रशियन भाषेपेक्षा स्पॅनिश भाषा जास्त सोपी वाटू शकते. विशेष म्हणजे रशियन भाषा ही जगातील आठव्या क्रमांकाची प्रचलित भाषा आहे.

जपानी

सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत जपानचा क्रमांक नववा आहे. इतर भाषांच्या तुलनेत जपानी जरा जास्तच अवघड वाटू शकते. कारण प्रसंगानुरूप ही भाषा बदलते.

मुलांशी बोलताना, मित्रांशी बोलताना, महिलांशी बोलताना, घरात किंवा बाहेर बोलताना अशा प्रत्येक ठिकाणी या भाषेचे रूप बदलते.

त्यामुळे तुम्ही ही भाषा बोलत असताना अगदीच बालिश किंवा अगदीच रुक्ष वाटणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते.

जपानी भाषेचे व्याकरण सुरुवातीला खूपच सोपे वाटते. कारण, यात दोनच काळ आहेत. यात उपपदे नसतात, विशेषण आणि वेळ, संख्या, लिंग यांच्या काही संबंध नसतो. लिंग ही संकल्पनाच व्याकरणात नाहीये. त्यामुळे परकीय लोकांना ही भाषा जास्तच अवघड वाटते.

अरबी

इंग्रजी भाषिक लोकांना तर अरबी भाषा अवघड वाटू शकतेच पण, इतर भाषिक कुळातील व्यक्तींनाही अरबी शिकणे तितकेसे सोपे नाही. अरबी भाषेची लिपीही अगदीच निराळी आहे. शिवाय, ही भाषा उजवीकडून डावीकडे न लिहिता डावीकडून उजवीकडे अशा क्रमाने लिहिली जाते.

या भाषेत स्वर नाहीत, त्यामुळेही ही भाषा अवघड वाटते. शिवाय, याचे उच्चारही अवघड आहेत.

ज्या ज्या देशांत अरबी भाषा बोलली जाते, त्या प्रत्येक देशातील अरबीमध्ये फरक आहे. या भाषेचे असंख्य नमुने आहेत. थोड्या थोड्या अंतरावर या भाषेत भरपूर बदल होता जातात.

प्रत्येक अरबी बोली पकडून ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या पाहिल्यास जी जगातील चौथ्या क्रमांकाची भाषा आहे.

चीनी भाषेच्या तुलनेत अरबी भाषा शिकणे सोपे आहे. परंतु या भाषेत शब्द तयार करताना स्वरांचा उपयोग केला जात नाही. त्यामुळे इंग्रजी भाषिक व्यक्तीला हा भाषा शिकताना खूपच मेहनत घ्यावी लागते.

थोडक्यात युरोपीयन किंवा अमेरिकन लोकांना आशियाई भाषा शिकणे काठीण वाटते. तुलेनेने त्यांना फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश या युरोपियन भाषा शिकणे जास्त सोपे वाटते. कारण या भाषांची परंपरा आणि याचा उगम एकाच संस्कृतीतून झाला आहे. जसे संस्कृत भाषेपासून तयार झालेल्या सगळ्या भाषा शिकणे आपल्याला सोपे जाते.

हिंदी भाषिक व्यक्तीला मराठी, बंगाली गुजराती या भाषा शिकणे फार अवघड वाटणार नाही. तसेच मराठी भाषिक व्यक्तीलाही हिंदी भाषा शिकणे जास्त अवघड वाटत नाही, कारण यांचा उगम एकाच भाषेतून झाला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आपल्या पोरांसाठी तर मार्व्हल आणि डीसी दोन्ही चांदोबाच होता

Next Post

अवघे 25 सैनिक आणि पाच घोडेस्वार घेऊन छत्रसाल बुंदेला मुघलांवर चालून गेले होते

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

अवघे 25 सैनिक आणि पाच घोडेस्वार घेऊन छत्रसाल बुंदेला मुघलांवर चालून गेले होते

सहारनपूरमधे रेशन दुकान चालवणारे गुप्ता बंधू आफ्रिकेत जाऊन डॉन कसे बनले..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.