The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोनालीसाचं चित्र काढणाऱ्या लिओनार्डो दा विंचीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती

by द पोस्टमन टीम
2 May 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


इटलीचा महान चित्रकार लिओनार्डो दा विंची हे नाव कोण ओळखत नाही? मोनालिसाचा चित्रकार म्हणून त्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे. १५ एप्रिल १४५२ रोजी इटलीतील अंचनियो गावात जन्मलेल्या लिओनार्डोकडे अलौकिक गुणांचा जणू खजिनाच होता.

लिओनार्डो लहानपणी जंगलात भटकण्यासाठी जाई तेव्हा तिथल्या झाडांचे, पक्षांचे, प्राण्यांचे, निरीक्षण करी आणि त्याची चित्रे काढून स्वतःजवळ ठेवत असे. त्याच्या वडिलांनी ही चित्रे बघितली तेव्हा आपल्या मुलातील अंगभूत कौशल्य त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी लिओनार्डोला चित्रकलेच्या शिक्षणासाठी फ्लॉरेन्सला पाठवले.

फ्लॉरेन्सचे महान चित्रकार वेरोचीयोकडे लिओनार्डोचे शिक्षण सुरु झाले. पाहता पाहता लिओनार्डोच्या चित्रकलेतील शिक्षणाला २० वर्षे पूर्ण झाली. वेरोचीयो जीसस ख्राईस्टच्या बाप्तिस्माचे चित्र बनवत होता. लिओनार्डोने त्याला हे चित्र पूर्ण करण्यात मदत केली. हे चित्र वेरोचीयोचे सर्वांत सुंदर चित्र होते.

यात लिओनार्डोने ऑईल पेंटिंगच्या नव्या तंत्राचा वापर केला होता. असे तंत्र यापूर्वी कुठल्याच चित्रकाराने आपल्या चित्रात वापरले नव्हते.



वेरोचीयोला लिओनार्डोचे कौशल्य पाहून आनंद झाला. आपला शिष्य आपल्यापेक्षाही उत्तम चित्रे काढू शकतो, हे लक्षात आल्यावर वेरोचीयोने आपल्या कुंचल्याचा कायमचा त्याग केला आणि चित्रकारितेतून संन्यास घेतला.

यानंतर फ्लॉरेन्समधील एक उत्तम चित्रकार म्हणून लिओनार्डोची कीर्ती दिवसेंदिवस वाढू लागली.

फ्लॉरेन्समध्येच या महान चित्रकाराला एकदा मृत्युदंड ठोठावण्यात आला होता. पण, कदाचित लिओनार्डोच्या हातून अजरामर कलाकृती तयार व्हाव्यात ही नियतीचीच इच्छा असेल, म्हणून तो यातून वाचला असावा.

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

१४७६ साली लिओनार्डो आणि त्याच्या चार मित्रांवर बेकायदेशीर लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप लावण्यात आला. लिओनार्डोच्या जीवनावर आधारित ‘लाइफ फ्रॉम बिगिनिंग’ या पुस्तकातही त्याचा उल्लेख आहे.

लिओनार्डो एका वेश्येसोबत पकडला गेला होता. त्याकाळी फ्लॉरेन्समध्ये हा गुन्हा होता आणि यासाठी मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद होती. परंतु त्याच्या विरोधात पुरेसा पुरावा न सापडल्याने तो यातून मुक्त झाला

यानंतर लिओनार्डो किमान दोन वर्षं फ्लॉरेन्समधून गायब होता. संपूर्ण जीवनभर तो अविवाहित राहिला. पण, त्याच्या अनेक मैत्रिणी होत्या. बिट्रेस आणि इजाबेल अशा दोन बहिणीशी त्याची चांगली मैत्री होती. इजाबेलची तर त्याने अनेक चित्रे रेखाटली होती. पण, काळाच्या ओघात ती सर्व चित्रे हरवली.

लिओनार्डोला चित्रकलेसोबतच संगीताचीही खूप आवड होती. त्याची कल्पना शक्ती इतकी तीव्र होती की आजच्या काळात आपण जे काही आधुनिक वाद्य वापरतोय त्याची कल्पना त्याला तेव्हाच सुचली होती. या कल्पना त्याने कागदावर रेखाटून ठेवल्या होत्या.

तो कलाकार तर होताच तसेच संशोधकही होता त्याची निरीक्षण शक्ती आणि स्मरणशक्ती अफाट होती. १४८२ साली त्याने स्वतःचे एक वाद्य विकसित केले होते. या वाद्याचा आकार घोड्याच्या डोक्यासारखा होता. हे वाद्य फ्लॉरेन्सच्या ड्युकला खूपच आवडले.

त्याने हे वाद्य मिलानच्या ड्युकला त्याच्यावतीने भेट म्हणून पाठवायचे ठरवले. खुद्द लिओनार्डोचं हे वाद्य घेऊन मिलानच्या ड्युककडे गेला. पण, तिथे त्याने आपली ओळख एक चित्रकार अशी न करून देता लष्करी शस्त्रास्त्रांचा जाणकार अशी करून दिली. यामुळे आपल्याला मोठे पद मिळेल असा विचार त्याने केला.

स्वतःचे वकब सिद्ध करण्यासाठी त्याने लष्करात वापरल्या जाणाऱ्या अनेक यंत्रांची हुबेहूब चित्रे रेखाटली. धातूचा टँक, तलवार अडकवलेले रथ, मोठमोठे धनुष्यबाण अशा अनेक यंत्रांचा यात समावेश होता. मिलानच्या ड्युकला लिओनार्डोचा हा कलाविष्कार खूपच आवडला.

लिओनार्डोने मिलान शहर कधीच सोडले नाही. पुढील १७ वर्षे तो मिलानमध्येच राहिला. मिलानमध्ये असतानाच लिओनार्डोने ‘द लास्ट सपर’ हे जगप्रसिद्ध पेंटिंग बनवले होते.

मिलान शहरात लिओनार्डोची ख्याती दिवसेंदिवस वाढत होती. अर्थात शहरात सत्ता ड्युकची असली तरी, त्याकाळी ड्युकवर चर्च आणि पोपचे नियंत्रण असे. त्यामुळे जे धर्मसत्तेला रुचेल तेच ड्युकला करावे लागे. राजाच्या दरबारी राहणाऱ्या कलाकारांनाही धर्मसत्तेची मर्जी राखणे भाग होते.

कलाकाराने धर्मिक आणि चर्चला मान्य होईल अशीच कला सादर करणे बंधनकारक होते. याच काळात लिओनार्डोने ‘द लास्ट सपर’ हे चित्र बनवले. या चित्रामुळेच लिओनार्डोचे नाव आजही संस्मरणीय बनले आहे.

या चित्रात येशू ख्रिस्त आपल्या बारा शिष्यांसह जेवण घेत आहे. एका टेबलावर पांढरी चादर अंथरली आहे. यात ख्रिस्ताचा तो जुडस नावाचा शिष्यही बसला आहे ज्याने पुढे ख्रिस्ताचा विश्वासघात केला.

बायबलमध्ये वर्णन केल्यानुसार जिसस हे लास्ट सपर घेत असताना आपल्या शिष्यांना म्हणतो की, तुमच्यापैकी कुणी एक माझा विश्वासघात करणार आहे. जीससचे हे शब्द ऐकताच शिष्य भांबावून जातात. एकेमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागतात. यावर प्रत्येक जण काही ना काही प्रतिक्रिया देऊ लागतो.

जीससच्या आयुष्यातील याच क्षणांची कल्पना करून लिओनार्डोने हे लास्ट सपर पेंटिंग बनवले.

हे चित्र पूर्ण करण्यासाठी लिओनार्डोला तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागला. या चित्रात जीससच्या आजूबाजूला त्याचे शिष्य आहेत, आणि तरीही जिसस एकटा पडल्याचे दाखवण्यात आले आहे.

त्याच्या सर्वच शिष्यांच्या चेहऱ्यावरील भाव चित्रात स्पष्टपणे उमटलेत. ते एकमेकांच्या जवळ आहेत. पण जीसस मात्र त्यांच्यात असूनही एकटाच आहे. विंचीने या पेंटिंगमध्ये दाखवले आहे की जीसस विश्वासघातावर बोलू लागतात, तेव्हा सगळे शिष्य काहीसे त्यांच्यापासून दूर जातात आणि जीसस एकटे पडतात.

‘द लास्ट सपर नंतरही लिओनार्डोने ड्युकच्या पसंतीची चित्रे रेखाटली. १४९९ साली यु*द्ध सुरु झाले. फ्रांसचे सैन्य मिलानमध्ये घुसले तेव्हा मिलानच्या ड्युक आणि त्याच्या कुटुंबासह शहर सोडले.

लिओनार्डोने देखील त्यांच्यासोबत शहर सोडले. मिलान शहर सोडल्यानंतर चार वर्षांनी त्यांनी १५०३ साली मोनालिसाचे चित्र रेखाटले. जगातील एक गूढ स्त्री आणि तिचे ते गूढ हास्य यामुळे तर लिओनार्डोला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या चित्राने लिओनार्डोला अमर केले.

एकाहून एक अजरामर कलाकृती देणाऱ्या या महान चित्रकाराचा २ मे १५१९ रोजी मृत्यू झाला. यावेळी ‘लाइफ फ्रॉम बिगिनिंग’ या त्यांच्या जीवन चरित्रात लिहिल्यानुसार लिओनार्डोने अंतिम क्षणी विधात्याची आणि समस्त सृष्टीची माफी मागितली.

त्याचे शब्द होते, “मी देवाचा आणि संपूर्ण मानव जातीचा गुन्हेगार आहे. माझी कला गुणवत्तेच्या त्या शिखरावर पोहोचू शकली नाही जिथे तिला पोचणे आवश्यक होते.”

जगाला एकाहून एक सरस अनमोल कलाकृतींची भेट देणाऱ्या या महान चित्रकाराला आजन्म कलेची साधना करूनही इच्छित लक्ष्य गाठण्यात कमी पडल्याची खंत सतावत होती, हे पाहून आश्चर्य वाटते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यावर अमूलने आजवर तयार केलेले सर्व कार्टून्स जपून ठेवले आहेत

Next Post

या कारणामुळेच पासपोर्टवर हसरा फोटो चालत नाही

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

या कारणामुळेच पासपोर्टवर हसरा फोटो चालत नाही

पारसी व्यक्तीशी लग्न करूनही इंदिराजी आयुष्यभर हिंदूच राहिल्या

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.