The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चित्रपटाचं पिंजरा नाव ऐकून डॉ. लागू बोलले, “हा काय जनावरांचा पिच्चर आहे का..?”

by द पोस्टमन टीम
15 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाच्या निर्मितीचा काळ होता. नवखा दिग्दर्शक अभिजित देशपांडे चित्रपटातील एका भूमिकेसाठी विचारणा करायला अभिनेता सुमित राघवनला जाऊन भेटला.

परंतु सुमितने ती भूमिका साकारण्यास नकार दिला.

सुमितने अभिजितला त्याच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आणि या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सुबोध भावे यांची निवड सार्थ आहे, असं देखील तो म्हणाला, पण हा विषय तिथेच थांबला नाही.

काही दिवसांनी सुमितला झी मराठी निर्मिती संस्थेचे प्रमुख निखिल साने यांचा कॉल आला. त्यांनी सुमितला त्याच चित्रपटातील एका वेगळ्या भूमिकेसाठी विचारणा केली आणि तो ही भूमिका नाकारू शकणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं आणि झालं देखील तसं सुमित त्या भूमिकेसाठी एका पायावर तयार झाला.



त्याने ताबडतोब आपला होकार कळवला आणि त्याने चित्रपटातील त्या भूमिकेला योग्य न्यायच दिला नाही तर त्या चित्रपटातील काही प्रसंगात मुख्य भूमिकेत असणाऱ्या सुबोध भावेपेक्षा तो वरचढ ठरला.

चित्रपट महाराष्ट्रभर चालला, प्रचंड कौतुक सर्वत्र चित्रपटाचं करण्यात आलं. सुमितने त्या चित्रपटात जी भूमिका साकारली होती, ती भूमिका होती जेष्ठ अभिनेते डॉ श्रीराम लागू यांची!

डॉ. श्रीराम लागू माहिती नाही, असा मराठी चित्रपट सृष्टीचा व नाट्यसृष्टीचा प्रेक्षक विरळच!

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

गेली चार दशकं डॉ. श्रीराम लागू यांनी त्यांच्या ठसठशीत अभिनयाने रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर असंख्य भूमिका जिवंत केल्या. आज डॉ. लागूंचा जन्मदिवस.

डॉ श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलं.

पुढे त्यांनी पुण्याच्याच बी.जे.मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस., एम.एस.चं शिक्षण घेतलं. ते कान नका घसा विकारतज्ञ बनले.

परंतु डॉक्टरकी करत असताना देखील त्यांचा ओढा हा नाटकाकडे होता. ते नाट्य कमिटीचे सदस्य होते. पुण्यात त्यांनी नाटक असोसिएशनचे सदस्यत्व स्वीकारले आणि नाटकात भूमिका साकारायला सुरुवात केली.

या दरम्याच त्यांनी आपल्या शल्य चिकित्सेच्या अभ्यासासाठी टांझानियाचा दौरा केला. पुढे ते मुंबईला स्थायिक झाले. ‘रंगायण’ या नाट्य संस्थेच्या माध्यमातून विविध भूमिका साकारत राहिले. १९६९ मध्ये ते मराठी रंगभूमीवर व्यवसायिक अभिनेते बनले.

कुसुमाग्रज लिखित ‘नटसम्राट’ या नाटकाने डॉ. लागूंना नायक म्हणून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. नटसम्राटमधील त्यांची भूमिका आणि संवादफेक याचे लोक इतके चाहते झाले की हे नाटक महाराष्ट्रभर हाऊसफुल असायचं.

लोक नटसम्राट बघायला गर्दी करायचे. नाटकाबरोबरच डॉ. लागू  यांनी पिंजरा, सिंहासन आणि मुक्ती या मराठी चित्रपटात केलेल्या भूमिका देखील प्रचंड गाजल्या.

डॉ. लागूंनी हिंदी चित्रपटात ही काम केलं, त्यांनी ‘घरोंदा‘ या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून पुरस्कृत करण्यात आले होते.

त्यांनी ‘गलियो का खुद्दार, बादशहा,  चरणो की सौगंध, काला धंदा गोरे लोग, लावारीस इत्यादी हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या.

पिंजरा या लागूंच्या चित्रपटाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. गमतीची गोष्ट म्हणजे लागू यांनी आधी पिंजराच्या टायटलवरच आक्षेप घेतला होता. त्यांना वाटलं कि पिंजरा नाव द्यायला हा काही जनावरांचा चित्रपट आहे का?

परंतु व्ही. शांताराम यांच्या सांगण्यावरून त्यांनी काम केलं आणि चित्रीकरण जसजसे होत गेले, तशी त्यांना त्यांची चूक उमगली.

हा पिंजरा लाकडाचा किंवा लोखंडाचा नाही तर, माणसाच्या जाणिवेचा पिंजरा आहे. या पिंजऱ्यात माणूस कसा उत्कृष्टपणे सापडू शकेल हे पाहण्यात आले आहे, अशा शब्दांत लागू यांनी पिंजरा चित्रपटाचे वैशिष्टय़ सांगितले.

डॉ. लागूंनी १०० पेक्षा जास्त हिंदी व मराठी चित्रपटात काम केलं असून, ४० हुन अधिक मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेतील नाटकं केली आहेत.

डॉ. लागू हे त्यांच्या दिवंगत अभिनेते व मराठी चित्रपट सृष्टीचे पहिले सुपरस्टार डॉ काशिनाथ घाणेकर यांच्याशी असलेल्या वादग्रस्त संबंधांमुळे देखील बरेच चर्चेत असायचे.

‘आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर’ चित्रपटात त्या दोघांतील वाद मांडण्याचा प्रयत्न झाला पण डॉ लागूंनी आपले घाणेकरांशी मैत्रीपूर्ण संबंध होते, आमच्यात वाद होते असं म्हणणं दुर्दैवी असल्याचं मीडियाशी बोलतांना स्पष्ट केलं होतं.

डॉ.श्रीराम लागूंनी दीर्घकाळ रंगभूमीची सेवा करूनव लोकांच्या हृदयात आपल्या अजरामर भूमिकांनी स्थान मिळवलं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

दलित स्त्रियांमध्ये कुटुंबनियोजनाबद्दल जागरूकता घडवणारी पहिली महिला

Next Post

मथुरेत मानवी अ*त्याचारात बळी गेलेल्या हत्तींचं स्मारक उभारलंय

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

मथुरेत मानवी अ*त्याचारात बळी गेलेल्या हत्तींचं स्मारक उभारलंय

प्रेमाची भाषा शिकवणारा कालातीत कवी : रूमी

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.