The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोनशे वर्षं बांधकामासाठी लागली तरीही हा मनोरा तिरकाच बांधला गेला

by द पोस्टमन टीम
6 March 2025
in मनोरंजन, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


इटलीच्या पिसा शहरातील झुकत्या मनोर्‍याचे नाव शाळेत असताना अनेक लोकांनी ऐकलेले आहे. जगातील सात आश्चर्यापैकी हा मनोरा एक आश्चर्य मानले जायचे. २००० साली जगभरातील नवीन सात आश्चर्ये शोधण्यासाठी सुरुवात करण्यात आली. जगभरातील विविध ठिकाणांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. इंटरनेटवर लोकांना त्यांच्या पसंतीचे ठिकाण निवडण्यास सांगितले. ज्या ठिकाणाला सगळ्यात जास्त लोकांची मते मिळतील त्याच्यानुसार जगातील नवीन सात आश्चर्ये निश्चित करण्यात आली. यामध्ये आपला इटलीचा झुकता मनोरा पाठीमागे पडला.

इटली बघायला जाणारे पर्यटक मात्र या पिसाच्या झुकत्या मनोऱ्याला आवर्जून भेट देतात. जसा फ्रान्सचा आयफेल टॉवर त्या देशातील एक प्रसिद्ध ठिकाण मानले जाते तसाच इटली शहरातील हा पिसाचा झुकता मनोरा इटली देशाचे एक वैशिष्ट्य मानले जाते. याचा इतिहास जर पाहायला गेला तर तो या मनोऱ्याप्रमाणेच विचित्र आणि विलक्षण आहे.

या मनोर्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे हा मनोरा एका बाजूला झुकलेला तर आहेच पण दरवर्षी तो थोडाथोडा एकाच बाजूला झुकत चालला आहे. एक मोठी सात मजली इमारत ही झुकलेल्या अवस्थेत कशी उभी राहू शकते हे बघण्यासाठी दरवर्षी पर्यटक या ठिकाणाला भेट द्यायला येतात.

या मनोर्‍याचे बांधकाम अकराव्या शतकाच्या सुमारास सुरू झाले होते. त्या काळामध्ये स्थापत्यशास्त्राचा इतका विकास देखील झालेला नव्हता. तिथे सात मजली उंच मनोरा बांधायचे काम या वास्तूच्या रचनाकाराने आपल्या शिरावर घेतले.

पण बांधताना काय चूक झाली माहिती नाही. कदाचित पाया कमकुवत राहिला असेल, बांधकाम ढिसाळ पद्धतीने झाले असेल पण, तीन मजले बांधून झाल्यानंतर ही इमारत एका बाजूला झुकते आहे हे पाहून ताबडतोब काम थांबवण्याचा निर्णय घेतला गेला. तब्बल आठ वर्षे काम चालून देखील फक्त तीन मजले पूर्ण झाले होते आणि तेही एका बाजूला कलले होते.



अकराव्या शतकात पिसा हे एक समृद्ध राज्य होते तेव्हा संपूर्ण इटली देशाचा विस्तार झालेला नव्हता. या मनोऱ्याबाबत अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे अकराव्या शतकात तीन मजले बांधून झाल्यानंतर या मनोर्‍याचे बांधकाम जवळपास शंभर वर्षे थांबले आणि ते बाराव्या शतकात पुन्हा सुरू झाले.

१२७२ साली हा मनोरा पुन्हा बांधायला घेतला गेला. झिझोवानी द सीमन या स्थापत्यशास्त्रज्ञाने या मनोर्‍याचे पुढचे बांधकाम करायला सुरुवात केली. पुढच्या सहा वर्षात हे बांधकाम सातव्या मजल्यापर्यंत गेले. हा मनोरा उत्तर दिशेकडे झुकला होता. त्याला पुन्हा सरळ कसा आणता येईल या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

परंतु पहिले चार मजले बांधल्यानंतर उत्तरेकडे झुकलेला हा मनोरा नंतरचे तीन मजले त्याच्यावर बांधल्यानंतर दक्षिणेकडे झुकला. सात मजले पूर्ण झाल्यानंतर पुन्हा जवळपास ऐंशी वर्षे या मनोर्‍याचे काम थांबले. 

मग पुन्हा १३६० ते १३७० या कालखंडामध्ये सगळ्यात वरचा बेल टॉवर बांधला गेला आणि अशा रीतीने हा मनोरा तयार झाला. सगळ्यात वरच्या बेल टॉवरमध्ये सात घंटा बसवल्या गेल्या होत्या. या सातही घंटांमधून वेगवेगळे सात सूर निघतात.

या मनोर्‍याला तयार होण्यासाठी तब्बल दोनशे वर्षांचा काळ लागला. बरं, इतकी वर्षे बांधकाम होऊनसुद्धा हा मजला एका बाजूला झुकलेल्या अवस्थेतच राहिला. त्याच्या एका बाजूला कलण्याचा दोष जर सोडला तर ही इमारत रोमन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना समजली जाते.

गेली अनेक शतके ही इमारत जरी उभी असली तरी ती हळूहळू एका बाजूला कलत आहे. त्याच्यामुळे कधी ना कधी हा मनोरा कोसळून पडेल ही भीती गेली काही शतके प्रत्येक इटालियन माणसाच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे. 

१९३४ साली बेनिटो मुसोलिनीने हा कलता मनोरा अजून जास्त कलु नये म्हणून त्यामध्ये काही बदल करण्याचे निर्णय घेतले. त्यानुसार आधुनिक स्थापत्य अभियंता यांना पाचारण केले गेले. मनोऱ्याच्या पायथ्याशी मोठी छिद्रे पाडून त्याच्या मध्ये सिमेंट भरले गेले परंतु याचाही काही उपयोग झाला नाही.

तोपर्यंत या वास्तूला जागतिक प्रसिद्धी मिळाली. आता तसे बघायला गेले तर सदोष बांधकामामुळे हा मनोरा एका बाजूला कललेला आहे. परंतु यामुळेच तो जगप्रसिद्ध झाला.

हा मनोरा भूकंप आला तर कोसळेल अशी भीती अनेकदा व्यक्त करण्यात आली. बाराव्या शतकापासून या मनोऱ्याच्या परिसरामध्ये पाच ते सहा वेळा प्रचंड मोठे भूकंपाचे धक्के बसले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे झुकत्या मनोर्‍याला काहीही झाले नाही. 

हा मनोरा भूकंपामध्ये जमीनदोस्त का झाला नाही यावर अलीकडच्या काळामध्ये मोठे संशोधन केले गेले. त्यानुसार एका शास्त्रज्ञाच्या तुकडीला या मागचे रहस्य उलगडण्यात थोडेफार यश मिळाले आहे.

हा मनोरा बांधण्याच्या वेळी त्याच्या पायामध्ये जी माती टाकली गेली, त्यामुळे हा मनोरा भूकंपात देखील स्थिर राहिल असे अनुमान या शास्त्रज्ञांनी काढले आहे. या प्रक्रियेला शास्त्रज्ञांनी सॉईल स्ट्रक्चर इंटरॅक्शन असे नाव दिले आहे. मनोर्‍याचे बांधकाम जितके मजबूत आहे तितकीच त्याच्या पायाशी असलेली जमीन भुसभुशीत आणि मऊ आहे त्यामुळे या मनोर्‍याला भूकंपापासून संरक्षण मिळाले.

युनेस्कोने या इमारतीला जागतिक वारसा असे संबोधले. १९९० साली या मनोर्‍याचे कलणे वाढले म्हणून हा मनोरा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. तिथून पुढे अकरा वर्षे हा मनोरा पर्यटनासाठी बंद राहिला.

सातव्या मजल्यावर बसलेल्या बेल टॉवरमधल्या सगळ्या मोठ्या घंटा देखील त्याचे कलणे कमी व्हावे म्हणून काढून टाकण्यात आल्या. हा मनोरा त्याच्या मूळ स्थितीत आणण्यासाठी इटालियन सरकारने ९० च्या दशकात रेस्‍टोरेशन प्रकल्प सुरू केला होता.

२००१ साली हा प्रकल्प पूर्ण झाला. त्याचे परिणाम पुढच्या काही वर्षात दिसले. या मनोर्‍याचे कलणे हळूहळू कमी झाले. अर्थात जरी जगभरातले स्थापत्य शास्त्रज्ञ या मनोर्‍याला सरळ करण्यामध्ये गुंतलेले असले तरीही सर्वार्थाने हा मनोरा कधीही सरळ झालेला नाही आणि पुढेही होणार नाही.

आज हा मनोरा पर्यटकांसाठी खुला आहे आणि पुढील अनेक वर्षे पर्यटक स्थापत्यशास्त्राचा हा अद्भुत नमुना बघू शकतील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

टाटा कंपनीचं ओके साबण भारतीय मार्केटमध्ये अपयशी का ठरलं?

Next Post

गांधीजींच्या सांगण्यावरून मोतीलाल नेहरूंनी आपली सगळी संपत्ती कॉंग्रेसला दान केली होती

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

गांधीजींच्या सांगण्यावरून मोतीलाल नेहरूंनी आपली सगळी संपत्ती कॉंग्रेसला दान केली होती

जगातील सगळ्यात जुनं खेळण्यांचं दुकानसुद्धा आता अंबानीच्या मालकीचं झालंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.