The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टाटा कंपनीचं ओके साबण भारतीय मार्केटमध्ये अपयशी का ठरलं?

by द पोस्टमन टीम
3 April 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आज आपण साधारण कुठल्याही किराणा दुकानात गेलो तरी आपल्याला हजारो साबणाचे ब्रँड दिसतात. कपड्यांसाठी किंवा आंघोळीसाठी कुठला साबण घ्यावा असा प्रश्न आपल्याला कधीच पडत नाही. इतके पर्याय आज आपल्यासमोर उपलब्ध असतात. अर्थात हे आजचे चित्र झाले. स्वातंत्र्यापूर्वी आपल्याकडे साबणाचे फारसे पर्यायसुद्धा उपलब्ध नसायचे.

इतकी वर्षे एकमेव चालत आलेले साबण म्हणजे हिंदुस्तान लिव्हरचा लाईफ बॉय साबण! “लाइफ बॉय है जहाँ, तंदुरुस्ती है वहाँ” हे स्लोगन अनेक वर्षे पूर्वी रेडिओवर वाजत असे. जेव्हा भारतात टेलिव्हिजन आले तेव्हा हा साबण टीव्हीवरच्या जाहिरातीमधून दिसू लागला.

परंतु हा साबण भारतीय बनावटीचा नव्हता. इंग्रज भारतात आले त्यानंतर लिव्हर ब्रदरने हा साबण बनवला होता.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी देखील हा साबण सगळ्या लोकांकडे उपलब्ध नसायचा. अगदी श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय लोक फक्त हा साबण वापरू शकत होते.

भारतात अगदी फार पूर्वीच्या काळापासून बेसन पीठ, वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेले उटणे, सुगंधी द्रव्य, शिकेकाई, आवळा, रिठा काही अशा गोष्टींचा वापर अंग आणि केस स्वच्छ ठेवण्यासाठी केला जात होता.



आपल्याकडे नेहमीच नैसर्गिक पदार्थांचा वापर स्नानगृहामध्ये केला जात होता. अशा परिस्थतीत हायड्रोजन पेरॉक्साइडपासून बनवलेला साबण वापरणे हे एक दिव्यच होते. परंतु हळूहळू लाईफ बॉय भारतामध्ये सेटल झाला भारतीय लोकांच्या स्नानगृहामध्ये दिमाखाने विराजमान झाला.

१८९५ साली लाईफ बॉय भारतात आला आणि त्यानंतर भारताचाच बनून गेला.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अनेक वर्षानंतर लाईफ बॉयला टक्कर देण्यासाठी भारताचा स्वदेशी साबण बाजारात आला, त्याचे नाव होते OK!

हा साबण टाटा ऑईल मिल्स या कंपनीकडून बाजारामध्ये आणला गेला. खरंतर टाटा म्हणजे भारतीयांसाठी लक्ष्मीचे दुसरे नाव आणि स्वदेशीचा खरा अभिमान. जेव्हापासून टाटाची स्थापना झाली तेव्हापासून टाटाने विदेशी वस्तूंविरोधात स्वदेशी वस्तू बाजारपेठेमध्ये उतरवल्या आणि यशस्वी देखील करून दाखवल्या.

यामध्ये कपडे, घड्याळे, गाड्या, लोखंड-पोलादाच्या वस्तू, यंत्रसामग्री अशा अनेक उद्योगांचा समावेश होतो. १९१७ साली टाटा ऑईल मिल्सची स्थापना अनेक प्रकारचे साबण, डिटर्जंट पावडर, तेल, खाद्यतेल सामग्री, उद्योगात लागणारे तेल तयार करण्यासाठीच करण्यात आली होती.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल परंतु आजच्या फॅशनच्या जगातला लॅक्मे नावाचा ब्रँडसुद्धा टाटांचंच प्रोडक्ट आहे.

या टाटा ऑईल मिल्समधून हमाम, मोती, अशा दर्जेदार साबणाची निर्मिती होत होती. लाईफ बॉयविरुद्ध आपला साबण मार्केटमध्ये आपण उतरवूया अशी स्ट्रॅटेजी टाटांनी ठरवली आणि त्यानुसार ते कामालाही लागले. टाटांचा नवीन साबण ओके या नावाने बाजारात आला आणि तसा तो भरपूर चालला देखील.

परंतु खरी कसोटी यापुढे होती कुठलेही नवीन उत्पादन बाजारात आल्यानंतर पहिल्यांदा ते चालते परंतु दीर्घकाळ त्याला ग्राहकांच्या कसोट्यांवर थांबणे शक्य होते किंवा शक्य होत नाही. ओके साबणाच्याबाबत देखील हीच कथा घडली.

टीव्हीवर ओके साबणाची जाहिरात आली त्यावेळी त्या जाहिरातीमधून लोकांच्या मनावर उत्पादनकर्त्यांना एकच गोष्ट सांगायची होती ती म्हणजे आमचे साबण लाईफ बॉयपेक्षा स्वस्त आहे.

तसेच याचा आकार देखील मोठा आहे त्यामुळे त्यामुळे याची टॅग लाइनसुद्धा ओके- “नहाने का बडा साबुन” अशी ठेवली गेली. या स्ट्रॅटेजीमुळे कुठल्याही प्रकारची नवीन कल्पना किंवा कुठल्याही प्रकारचे दुसरे कुठले वैशिष्ट्य न सांगता अगदी बेसिक गोष्ट सांगणारी अशी ओके साबणाची जाहिरात तयार झाली.

ही जाहिरात आज देखील युट्युबला जाऊन आपण पाहू शकतो. ज्यामध्ये एक कुटुंब दाखवले गेले आहे. जाहिरातीच्या सुरुवातीलाच कमळाचे फूल उमलताना दाखवलेले आहे ओके साबणाचा सुगंध हा कमळासारखा आहे हे ठसवण्याचा त्यातून प्रयत्न केला गेला.

पुढे याच जाहिरातीमध्ये आई आपल्या मुलाला आंघोळ करून यायला सांगते. आंघोळीसाठी अर्थातच आपला ओके साबण दाखवला जातो. आणि सगळ्यात शेवटी ओके की ताजगी कमल सी ताजगी असं जिंगल दिसते.

साधारणपणे गुलाबी रंगाचा, सुगंधी असणारा आणि आकाराने मोठा असा स्वदेशी साबण म्हणून ओके साबण भारतीय बाजारपेठेमध्ये भरपूर चालायला पाहिजे होता. तसा तो चालला देखील परंतु फार काळ मात्र टिकला नाही. याचं कारण कदाचित त्याच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये दडलेलं आहे.

उत्पादन कितीही चांगले असेल परंतु त्याची जाहिरात जर योग्य प्रकारे झाली नाही तर त्याला त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो. ग्राहकांना आपल्या वस्तूमध्ये काहीतरी वेगळेपण हवे असते. त्यांना सर्वसामान्य ठिकाणी मिळणारी कुठलीच गोष्ट पहिल्यांदा अपील होत नाही.

ज्या गोष्टींमध्ये काहीतरी असामान्य आहे, जी गोष्ट इतर चार लोकांकडे नाही पण आपल्याकडे आहे ती गोष्ट खरेदी करायला लोकांना नेहमी आवडते.

ओके साबण लाईफ बॉयपेक्षा स्वस्त आहे यापेक्षा त्याचे कुठलेही वेगळे वैशिष्ट्य ते लोकांना दाखवू शकले नाहीत.

या उलट ओके साबणाची जाहिरात आल्यानंतर मात्र लाईफ बॉयवाले सावध झाले. लाईफबॉयने आपली वेगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आखली. त्यांनी आपल्या जाहिरातींमधून लाईफ बॉय शरीर कसे १००% स्वच्छ ठेवते, किटाणूंना कसे मारतो, कशा प्रकारे तो जंतूनाशक आहे आणि लाईफ बॉय वापरल्यामुळे आपले आरोग्य कसे सुरक्षित राहते या प्रकारच्या जाहिराती करायला सुरुवात केली.

या जाहिराती लोकांना प्रचंड प्रमाणात अपील झाल्या. कुठलाही साबण शरीराची स्वच्छता करतोच परंतु ही गोष्ट कुठल्या साबणाच्या जाहिरातींमधून दाखवली जात नाही. साबण किती सुगंधी आहे यावर अनेक जाहिराती येत राहतात मात्र, साबण किती सुरक्षित आहे याची जाहिरात फक्त आणि फक्त लाईफबॉयने दाखवलेली होती. त्यामुळे लाईफ बॉय गेली शंभर वर्षे अनेक घरांच्या स्नानगृहमध्ये आपले स्थान अबाधित ठेवून आहे.

ओके साबण खरंतर टाटासारख्या मोठ्या कंपनीने काढले होते. त्याच्या संशोधनावर आणि मार्केटिंगवरसुद्धा प्रचंड पैसा खर्च केलेला होता. परंतु फक्त पैसा खर्च करून उपयोग होत नाही. जर समजा मार्केटिंग स्ट्रॅटेजी चुकली तर एखादे चांगले उत्पादनसुद्धा कसे विस्मृतीमध्ये जाऊ शकते, बंद पडू शकते याचा ओके साबण हा एक उत्तम परिपाठ आहे.

कारण १९९० साली टाटा ऑईल मिल्स ही कंपनीच टाटांनी हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड या कंपनीला विकून टाकली. आज हिंदुस्थान युनिलिव्हर या नावाने ही कंपनी अनेक साबणांचे उत्पादन करते परंतु आपल्या लहानपणी आपण अनुभवलेला ओके साबणाचा सुगंध मात्र आज हरवून गेलेला आहे. आज हा साबण बाजारात नाही!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

नुसतं मेकअपचं सामान विकून ही बाई करोडोच्या कंपनीची मालकीण बनली होती

Next Post

दोनशे वर्षं बांधकामासाठी लागली तरीही हा मनोरा तिरकाच बांधला गेला

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

दोनशे वर्षं बांधकामासाठी लागली तरीही हा मनोरा तिरकाच बांधला गेला

गांधीजींच्या सांगण्यावरून मोतीलाल नेहरूंनी आपली सगळी संपत्ती कॉंग्रेसला दान केली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.