The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विंटेज फॅमिली स्कूटर लँब्रेटा पुन्हा रस्त्यावर धावणार आहे

by द पोस्टमन टीम
6 March 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


भूतकाळातील एखाद्या विशिष्ट काळाचे वर्णन करायचे असेल तर त्यासाठी त्यावेळी वापरात असलेली प्रसिद्ध उत्पादने आठवावी लागतात. कधी कधी आता आपण वापरत असलेल्या आधुनिक वस्तु बघितल्या की भूतकाळातील त्यांचे प्रारंभिक रुप कसे असेल हा प्रश्न आपल्यालासुद्धा पडतोच की.

‘जुनं ते सोनं’ ही म्हण काही बाबतीत अगदी खरी असते. जुन्या गाड्यांत आजही सगळ्यांची पहिली पसंद असलेली रॉयल एन्फिल्डची दुचाकी या म्हणीच्या योग्यतेवर अगदी शिक्कामोर्तबच करते. अशीच एक जुनी स्कूटर ‘लँब्रेटा’ आता नव्याने बाजारात येत आहे.

दुचाकीच्या मागच्या बाजूला स्पेअर चाक असणारी स्कूटर दिसली की एकच नाव आताच्या वृद्ध लोकांच्या लक्षात येते. ते म्हणजे ‘लँब्रेटा स्कूटर’. ७०च्या दशकात लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या स्कूटरचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.

भारतातील लोकांच्या मनात घर केलेली ही स्कूटर पहिल्यांदा तयार केली गेली ती १९४७ मध्ये. इटलीतील मिलान शहरात पहिल्यांदा या स्कूटरची निर्मिती केली. लँब्रेटा हे नाव मिलानच्या एका पौराणिक जलस्त्रोताच्या नावावरुन दिले गेले.



ही स्कुटर डिझाईन केली होती इनोसंती एस.ए. या व्यक्तीने. जो अजुनही लँब्रेटाचे मालकी हक्क स्वत:कडे ठेवले आहेत.

१९५० साली लँब्रेटा पहिल्या वेळेस भारतात आली. ‘ऑटोमोबाइल प्रॉडक्ट्स ऑफ इंडिया’ने (API) लँब्रेटाची निर्मिती सुरु केली. ४८ सीसी क्षमता असलेली स्कूटर त्यांनी निर्माण केली. नंतर ‘Li 150 सीरीज 2 मॉडेल’चा परवाना त्यांनी मिळवला. या मॉडेलची निर्मिती सुरु करुन १९७६ पर्यंत त्यांनी तिची विक्री लँब्रेटा या नावानेच चालू ठेवली. १९७६ नंतर काही कारणास्तव तिचे नाव बदलून ‘लँबी’ ठेवण्यात आले.

या स्कूटरच्या प्रसिद्धीमागे कारण होतं बॉलिवुड चित्रपट ‘ऍन इवनिंग इन पॅरिस’. अभिनेता शमी कपूरने या चित्रपटातील शर्मिला टागोर यांना आपल्या प्रेमात पाडण्यासाठी ‘होगा तुमसे कल’ या गाण्यात ही स्कूटर चालवली. यानंतर हे गाणे आणि स्कूटर दोघेही भरपूर प्रसिद्ध झाले. त्याकाळी बऱ्याच बॉलिवुड चित्रपटात अभिनेत्रींना भुरळ घालण्यासाठी या स्कूटरने अभिनेत्यांना मदत केली असे म्हणायला काही हरकत नाही..!

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सुरुवातीला ही स्कूटर फक्त उद्योगवर्ग आणि उच्च वर्गांना समोर ठेऊनच फेमस करण्यात आली होती. हळुहळु ती मध्यमवर्गीयांमधेही प्रसिद्ध झाली.

भारती ग्रुप या मोठ्या समुहाचे मालक असलेले अब्जाधीश सुनिल मित्तलसुद्धा ‘लँब्रेटा’ वापरत असताना रस्त्यावर दिसत असत. हळुहळु सगळेच आपल्या घरात लँब्रेटा स्कूटर विकत घेऊ लागले.

ही स्कूटर एवढी प्रसिद्ध होण्यामागचे नेमके कारण काय..?

तर ते आहे या स्कूटरची क्षमता. ही स्कूटर अगदी सहजपणे ४ जणांना घेऊन जात असे. त्यामुळे हिला फॅमिली स्कूटरसुद्धा म्हटले जात असे.

एक जण सीट आणि हँडलच्या मध्ये, २ जण सीटवर आणि एक जण मागे स्पेअर चाकावर असे एक छोटे कुटुंब आरामात यावर प्रवास करत असत.

आकाराने मोठी असलेली स्कूटर क्षमतेने चांगली असली तरी आकर्षक मात्र नव्हती. आकाराने मोठी असलेली ही स्कूटर ‘डॅड स्कूटर’ म्हणूनच ओळखली गेली.

तरुणांनी त्यावेळी बाजारात उपलब्ध असलेल्या बजाज चेतक, एलएमएल वेस्पा या स्कूटर्सना जास्त पसंद केले. तसेच आर्थिकरित्या सुदृढ झालेल्या भारतीय ग्राहकांचा कल कार घेण्याकडे वाढत चालला होता.

शेवटी १९७१ मध्ये कंपनीचा भारतातील कारखाना बंद करण्यात आला होता.

भारत सरकारने यावेळी कंपनीला मदतीचा हात पुढे केला आणि ‘स्कूटर इंडिया लिमिटेड'(एसआईएल) या उत्तर प्रदेशमधील कंपनीने मशीनरी, डिझाईन, कागदपत्र सर्व खरेदी केले. एसआईएलने १९७५ मध्ये स्कूटरचे उत्पादन आणि विक्री सुरु केली.

भारतीय बाजारात ‘विजय सुपर’ तर जागतिक बाजारात लँब्रेटा नावाने ही स्कूटर विकली जाऊ लागली. १९९७ मध्ये आपल्या तीन चाकी गाड्यांच्या उत्पादनावर लक्ष देण्यासाठी कंपनीने स्कूटरचे उत्पादन बंद केले.

बंद झालेली ही विंटेज स्कूटर आता पुन्हा बाजारात येण्याची घोषणा लँब्रेटाने केली आहे. दिल्लीच्या ऑटो एक्सपो २०२० मध्ये ही गाडी पहिल्यांदा प्रदर्शित केली गेली असून हिची किंमत १ लाख रुपयांपर्यंत असेल असे सांगितले जात आहे.

कंपनीने सुपर लँब्रेटा नावाचे मॉडेल प्रदर्शित करण्याचे मनसुबेसुद्धा जाहीर केलेत. इलेक्ट्रिक असलेली ही स्कूटर वेस्पा सारख्या कंपनीला टक्कर देईल असा अंदाज लावण्यात येत आहे.

लँब्रेटाने नोईडातील लोहिया ऑटो आणि दिल्लीतील बर्ड ग्रुप यांच्याशी भागीदारी केली असुन फक्त भारतातच नाही तर आफ्रिकन देशातसुद्धा भारतातील स्कूटर्स निर्यात करण्याचा कंपनीचा विचार आहे.

बरेच वर्ष गायब असलेली ही स्कूटर आता आपल्या विंटेज लुकने आताच्या तरणांना भुरळ घालण्यात यशस्वी होते की नाही हा एक कुतूहलाचा विषय असणार एवढं मात्र नक्की. तसेच जुन्या गोष्टींची आवड असलेल्या ग्राहकांसाठी, ७० च्या काळात स्वत:कडे लँब्रेटा असलेल्या लोकांसाठी ही आपल्या भुतकाळात पुन्हा एकदा डोकावण्याची संधी असेल हे सुद्धा तितकंच खरं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

कॉम्रेड ज्योती बसू कम्युनिस्टांमुळेच पंतप्रधानपदाला मुकले होते

Next Post

पुण्यात त्याकाळी गोऱ्या साहेबासह भारतीयांना जेवण देणारं दोराबजी एकमेव रेस्टॉरंट होतं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

पुण्यात त्याकाळी गोऱ्या साहेबासह भारतीयांना जेवण देणारं दोराबजी एकमेव रेस्टॉरंट होतं

अतरंगी स्कीमा सांगून लोकांना चुना लावणारा पहिला माणूस म्हणजे 'चार्ल्स पॉन्झी'

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.