The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्याच्या वेणूताई चितळे बीबीसीचा पहिला मराठी आवाज बनल्या होत्या

by द पोस्टमन टीम
7 March 2025
in मनोरंजन, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात बीबीसी या प्रसिद्ध प्रसारण यंत्रणेने भारतातील काही प्रादेशिक भाषांमध्ये बातम्या प्रसारीत करण्याचा निर्णय घेतला. बीबीसीसाठी मराठीतून बातमी सांगणारा आवाज होता कोल्हापूरच्या वेणूताई चितळे यांचा. कोल्हापूर ते इंग्लंड आणि पुन्हा भारत, वेणूताईंच्या आयुष्याचा हा प्रवास अगदीच अनपेक्षित असला तरी, प्रेरणादायी आहे.

यु*द्धजन्य परिस्थितीत त्यांनी इंग्लंडसारख्या देशात राहून आपल्या मातृभूमीसाठी जे करता येईल ते ते केले. लग्न न करण्याचा निर्णय घेऊन वेणूताई यांनी आपले उच्चशिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय केला. त्या काळातील सामाजिक स्थिती पाहता त्यांचा हा निर्णयही फारच धाडसी होता, असे म्हणावे लागेल.

पण, त्यांचे कुटुंबीय या काळात खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले म्हणूनच वेणूताईंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचे सोने केले.

जाणून घेऊया बीबीसीवरील पहिल्या भारतीय आवाजाविषयी या लेखातून.



दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात कुणालाच या यु*द्धापासून अलिप्त राहता येणं शक्य नव्हतं. प्रत्यक्ष यु*द्धात सक्रीय सहभाग घेणे प्रत्येकाला शक्य नसले तरी, दुरून या यु*द्धाला हातभार लागेल अशी एक तरी जबाबदारी घेणे भाग होते.

नेहमीच शालेय जीवनात सक्रीय असणारी वेणू अभ्यासासह इतर उपक्रमातही आघाडीवर असे. तिच्या याच हरहुन्नरी स्वभावामुळे तिची शिक्षिका क्विंटा ड्यू प्रिझ यांनी तिला आपल्यासोबत इंग्लंडला नेऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

वेणूचा जन्म कोल्हापूरमधील. ती सहा वर्षांची असतानाच तिची आई वारली. भावंडात शेंडेफळ असल्याने मोठ्या भावंडानी रेणूचा अत्यंत प्रेमाने सांभाळ केला. वेणू आणि तिच्या कुटुंबियांमधील नाते अतिशय घट्ट होते.

एका ज्योतिषाने वेणूने लग्न केल्यास तिच्या मोठ्या बहिणीसाठी ते त्रासदायक ठरेल अशी भविष्यवाणी केली आणि वेणूने तेव्हा लग्न न करण्याचा निश्चय केला. लग्नाचा विचार लांबणीवर पडल्याने तिने आपल्या करिअरला प्राधान्य दिले.

पुण्यातील हुजूरपगा आणि नंतर मुंबईच्या सेंट कोलंबा शाळेत वेणूताईंचं शिक्षण झालं. वेणूताईंचं कुटुंब परंपरागत विचारसारणीचं असलं तरीही पुढारलेलं होतं. त्यांनी वेणूताईंच्या उच्च शिक्षणाला आडकाठी आणली नाही. चितळे आणि चितळे ॲग्रो प्रोडक्ट्सची स्थापना करणारे श्रीकृष्ण चितळे हे वेणूताईंचे थोरले बंधू.

क्विंटा ड्यू प्रीझा हिच्यासोबत १९३९ साली वेणूताई पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाल्या. मॉंटेसरी मेथड्स ऑफ एज्युकेशन या कोर्ससाठी युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे प्रवेश घेतला. पुढच्या वर्षी क्विंटा आणि वेणूताई, दोघींनीही ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला.

आपल्या १४ वर्षांच्या इंग्लंडमधील वास्तव्याच्या आठवणी लिहिताना त्या सांगतात,

“मी खूप उत्साही होते, माझे व्यक्तिमत्वही प्रभावी होते. मला इंग्रजी साहित्याची खूप आवड होती. एखाद्या मांजरीने लोण्याच्या गोळ्यावर झेप घ्यावी आणि त्याचा फडशा पडावा तसं काहीसं माझं पुस्तकांच्या बाबतीत होत असे.”

१९३९ साली यु*द्धाला सुरुवात झाली. साहित्याबद्दल प्रचंड आवड, लिखाणाचा निसर्गदत्त गुण आणि बातमी वाचण्याचे कौशल्य या सगळ्या गुणांमुळे वेणूताई यांना एक चांगली संधी चालून आली. बीबीसीमध्ये नोकरी करण्याची. इथे त्यांना जॉर्ज ऑरवेल आणि टी. एस. इलियट, मुल्कराज आनंद यांसारख्या प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिकांसोबत काम करण्याची संधी मिळाली.

बीबीसीवरून प्रसारित होणाऱ्या रेडीओ झंकार या मराठी कार्यक्रमाची आखणी, लेखन, निवेदन, अशी कामं वेणूताई करत असत.

बीबीसीमध्ये भारतीय लोकांना काही महत्त्वाचे संदेश प्रसारीत करण्याची जबाबदारी दिली गेली. पुढच्या वर्षी बीबीसीने बंगाली, तमिळ आणि मराठी या भारतीय भाषांमधून बातमी प्रसारित करण्यास सुरुवात केली. यु*द्धकाळात घरातून बाहेर पडणेच अत्यंत धोकादायक होते. बॉ*म्बच्या गोळ्यांचा कधी वर्षाव सुरु होईल हे सांगता येणे कठीण होते.

अशावेळी डोक्यावर हेल्मेट, पायात बूट आणि अंगावर साडी अशा वेशात वेणूताई बीबीसीच्या ऑफिसमध्ये पोहोचत. बॉ*म्ब वर्षावांचा सामना करावा लागला तरी त्या आपल्या कर्तव्यापासून डगमगल्या नाहीत.

मायक्रोफोन घेऊन वेणूताई भारतीयांसाठी बातमी वाचत असत. फासीवादाविरोधात सुरु असलेल्या ब्रिटीशांच्या लढ्याला प्रोत्साहन देणे आणि ब्रिटीशांच्या भारतातील साम्राज्यवादी धोरणाला विरोध करणे या दोन्ही आघाड्यांवर त्या समतोल साधत होत्या.

रेडीओवरून यु*द्धाच्या बातम्या देण्यासोबतच त्या ब्रिटीश नागरिकांसाठी शाकाहारी जेवणाच्या रेसिपीची माहितीही देऊ लागल्या. त्याकाळात यु*द्धामुळे नागरिकांना मटन मिळणे मुश्कील झाले होते.

रेसिपी सांगणे, सोबतच काही नाटके लिहणे अशा वेगवेगळ्या कामातून वेणूताईंनी बीबीसीमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांनी लिहिलेल्या नाटकांत जॉर्ज ऑरवेल देखील भूमिका करत असत. शिवाय, व्ही. के. कृष्णन यांनी लंडनमधून भारतीय लीगचे काम सुरु केले त्यातही त्या सहभागी होत असत.

व्ही. के. कृष्णन यांची ही संघटना ब्रिटन नागरिकांमध्ये आणि परदेशातील भारतीयांमध्ये भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रसार करत असे.

वेणूताई ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्समध्येही सहभागी झाल्या होत्या. इथेच त्यांची ओळख विजयालक्ष्मी पंडित यांच्याशी झाली.

१९४७च्या डिसेंबरमध्ये, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काहीच महिन्यात त्या भारतात परत आल्या.

भारतात परतल्यानंतर वयाच्या ३९व्या वर्षी त्यांनी प्रा. गणेश खरे यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर वेणूताईंनी ऑल इंडिया रेडीओसाठी देखील काम केले. शिवाय, काही वृत्तपत्र आणि मासिकांतून त्या स्तंभलेखनही करत असत.

त्यांनी १९५० साली ट्रांझीट ही पहिली कादंबरी प्रकाशित केली. त्यानंतर १९९३ साली इनकॉग्नीटो ही त्यांची दुसरी कादंबरी प्रकाशित झाली. मात्र, या कादंबरीच्या प्रकाशनाच्या दोन वर्षानंतरच त्यांचा मृत्यू झाला.

दुसऱ्या महायु*द्धाच्या कठीण काळात ज्या आवाजाने कणखरपणे अर्ध्या गोलार्धाशी संवाद साधला तो आवाज कायमचा शांत झाला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सुरतच्या या दोन शाळकरी मुलींनी एका नवीन लघुग्रहाचा शोध लावला आहे

Next Post

देशाच्या स्वातंत्र्यासाठी तिने अवघ्या १४व्या वर्षी जन्मठेपेची शिक्षा भोगली होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

देशाच्या स्वातंत्र्यासाठी तिने अवघ्या १४व्या वर्षी जन्मठेपेची शिक्षा भोगली होती

तुलसी कॉमिक्सच्या सुपरहिरोसमोर बॅटमॅनसुद्धा झक मारेल

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.