The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फक्त मुलंच नाही तर मुलींनासुद्धा येज्दीने आपलं वेड लावलं होतं

by द पोस्टमन टीम
1 March 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


ऐंशी-नव्वदच्या दशकात जुनी कात टाकून भारत एका नव्या रुपात समोर येऊ पहात होता. याकाळात मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनशैलीत थोडा फार फरक पडण्यास सुरुवात झाली होती. या काळातील काही वस्तूंचा भारतीयांना कधीच विसर पडू शकत नाही. याच काळात शेझ रिपब्लिकच्या जावा मोटारसायकल या कंपनीची येज्दी बाईकही अशीच भारतीयांच्या कायम स्मरणात राहणारी आहे.

शेझ रिपब्लिकनमधून ही बाईक सुमारे १०० देशांत निर्यात होत असे. या बाईकच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे ती तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली होती. १९६९ साली शेझ रिपब्लिकमध्ये या बाईकचे पहिले मॉडेल मार्केटमध्ये आले.

येज्दी सोडल्यास त्याकाळी राजदूत आणि बुलेट या दोन बाइक्स होत्या. पण, यातील राजदूत ही अगदीच हलकी वाटत असे, त्यामुळे ही बाईक शरीराने किरकोळ असणाऱ्या मुलांसाठी आहे असा समज झाला होता. तर बुलेट अगदीच मजबूत त्यामुळे बुलेट चालवण्यासाठी शरीरयष्टीही मजबूत असावी असा समज होता.

येज्दी मात्र कोणत्याही सामान्य अंगकाठीच्या माणसासाठी अगदी योग्य बाईक होती. 



येज्दीचा चकचकीत रंग, घोंघावणारा आवाज, आणि मजबूत बॉडी यामुळे तरुणांची या बाईकला विशेष पसंती होती. २५० सीसी इंजिन असणारी ही बाईक राजदूत आणि बुलेटपेक्षा जास्त लोकप्रिय होती.

काही लोकांच्या मते, राजदूत ही अगदीच लुकड्या मुलांसाठी योग्य वाटत असे. तर बुलेट फारच जड होती आणि अधिक मजबूत शरीरयष्टीच्या लोकांनी ही बाईक वापरणे चांगले दिसत असे. परंतु, येज्दी अशी गाडी होती, कुणीही त्यावर बसले तरी त्याचा लुक हँडसम वाटेल.

राजदूतचे इंजिन १७५ सीसीचे होते तर बुलेटचे ३५० सीसी. यामुळे २५०सीसीवाली येज्दी बाईक अगदी योग्य होती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

१९७३ पर्यंत जावा मोटारसायकल भारतात विकल्या जात होत्या. त्यानंतर कंपनीने नाव बदलून येज्दी हे नाव घेतले. ‘फॉरेव्हर बाईक, फॉरेव्हर व्हॅल्यू’ या पंचलाईनमुळे तर या बाईकने मार्केटमधील समीकरणेच बदलून टाकली. ही बाईक म्हणजे विश्वसनीयता आणि लवचिकता दोन्हीचे प्रतिक मानले जात असे.

या बाईकमुळे भारतात बाईक रेसिंग, बाईक ऍडव्हेंचर, बाईक रॅलिंगची संस्कृती निर्माण झाली. रेसिंगसाठी तर येज्दी बाईक अगदी परफेक्ट होती. भारतीय रस्त्यांवर तर या बाईकने आपली जादू दाखवली होतीच पण, भारताच्या रेसिंग ट्रेकवरदेखील या गाडीने भरपूर नाव गाजवले.

सी. के. चीन्नाप्पा, जगदीश्वरा रेड्डी, थिरूमल रॉय, रुस्तम हर्मुज्दी आणि अनिता नंजप्पा अशा अनेक बाईक रेसर आपल्या यशाचे श्रेय येज्दी बाईकलाच देतात.

बाईक चालवण्याची आवड असणाऱ्या लोकांमध्ये तर येज्दीचे प्रचंड आकर्षण होते. ट्रेकिंग, रेसिंग अशा थ्रिलर गेम्ससाठी त्यांना येज्दी एक परफेक्ट पार्टनर वाटत असे.

गेली २२ वर्षे येज्दी मार्केटमध्ये नाही, तरीही उत्साही बाइकर्स जुलैच्या दुसऱ्या रविवारी येज्दी डे साजरा करतात. येज्दी बाईक प्रेमींसाठी येज्दी बाईकच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. काही लोकांकडे अजूनही ही येज्दी बाईक पाहायला मिळते.

भारतातच नाही तर युरोपमध्येही येज्दी तितकीच लोकप्रिय होती. युरोपमध्ये तर लोक रॅलीसाठी या बाईक शिवाय दुसऱ्या कुठल्याच बाईकचा विचारच करू शकत नाहीत. जावा मोटारबाईकलाच अधिक मजबूत आणि भारतीय रस्त्यांवरून धावण्यायोग्य बनवून तिला अजून सुंदर रूप देण्यात आले. कंपनीच्या वेबसाईटवर येज्दीही अधिक काळ टिकणारी मजबूत बाईक असे वर्णन करण्यात आले आहे.

या गाड्यांची भारतातील वाढती मागणी लक्षात घेऊन जावा कंपनीने भारतात मैसूरमध्येच १९६१ साली एक फॅक्टरी सुरु केली. इथेच याला येज्दी हे नाव देण्यात आले. जावा मोटारचे भारतीय रूप म्हणजे येज्दी. ही गाडी भारतीय रस्त्यांवरून धावण्यायोग्य बनवण्यात आली. शिवाय तिचे रूप देखील थोडेसे पालटण्यात आले, ज्यामुळे ती अधिक आकर्षक वाटू लागली. या गाडीला भारतात भरपूर यश मिळाले.

फक्त सामान्य तरुणांच्यातच नाही तर सिने इंडस्ट्रीत देखील या बाईकची क्रेझ होती. जितेंद्रच्या ‘हमजोली’ पासून ते अमिताभ बच्चनच्या ‘परवरीश’पर्यंत जवळपास सगळ्या सिनेमातील हिरो याच गाडीची सवारी करत असत. यामुळेच तर कॉलेज तरुणांमध्ये या गाडीची क्रेझ आणखीनच वाढली.

त्याकाळी फारुख शेख आणि दीप्ती नवलच्या १९८१ साली आलेल्या ‘चष्मेबद्दूर’मध्ये तर ‘काली घोडी द्वार खडी’ या गाण्यातून या गाडीचेच गुणगान ऐकायला मिळेल.

डोंगर कपाऱ्यातून भटकंती करताना, ग्रुपने सहलीवर जाताना किंवा एखादा मोर्चा, रॅलीमध्ये सहभागी होताना याच गाडीला पसंती दिली जात असे. येझ्दीची स्टाईल आणि लवचिकता यामुळे मुलांमध्येच नाही तर मुलींमध्ये देखील येज्दीची क्रेझ होती. त्याकाळी मुली देखील ही बाईक चालवणे पसंत करत असत.

जावा कंपनीची मैसूर मधील फॅक्टरी काही कारणामुळे बंद पडली. त्यासोबतच येज्दीचे उत्पादन देखील बंद झाले. १९९६च्या दरम्यान ही गाडी बाजारातून गायब झाली. पण, या बाईकशी भारतीयांच्या इतक्या आठवणी जुळल्या आहेत की, त्या आठवणीतून ही बाईक कधीच गायब होणार नाही.

२०१८मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने येज्दी पुन्हा नव्या रुपात भारतीय बाजारपेठेत आणण्याची घोषणा केली तेंव्हा अनेकांना या गाडीच्या अगमानाची उत्सुकता लागून राहिली होती. २०२० पर्यंत ही बाईक भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होईल अशी अशा व्यक्त केली जात आहे.

या गाडीसोबत अनेकांच्या आपल्या उमेदीच्या दिवसातील आठवणी जोडलेल्या आहेत. काही लोकांनी आजही आपली जुनी येज्दी संभाळून ठेवली आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी आजही ही बाईक रस्त्यावरून धावताना दिसते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या रिअल लाईफ डॉनला पकडण्यासाठी सरकारने साडेपाच कोटीचे बक्षीस ठेवले होते

Next Post

सातारच्या छत्रपतींचा हा सेनापती इंग्लंडला जाणारा पहिला मराठी माणूस होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

सातारच्या छत्रपतींचा हा सेनापती इंग्लंडला जाणारा पहिला मराठी माणूस होता

कोरोनाने आपल्या आवडत्या क्रिकेट सम्राटचा देखील बळी घेतलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.