The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नारायण मूर्तींचा जावई ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पुढे येतोय

by द पोस्टमन टीम
1 August 2020
in विश्लेषण, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एखादा नेता राजकीय क्षेत्रातून निवृत्ती घेतो, तेंव्हा आपसूकच याच्यानंतर कोण? हा प्रश्न चर्चेत येतो. असेच काहीसे सध्या ब्रिटनच्या राजकारणात घडत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बॉरीस जॉन्सन यांच्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान पद कोण सांभाळणार याबाबत ब्रिटनमध्ये आता उत्सुकता ताणली जात आहे. बॉरीस जॉन्सनच्या कॉन्झर्व्हेटीव्ह पक्षाचे सदस्य आहेत. पक्षाच्या इतर सदस्यांच्या मते, ब्रिटनचे सध्याचे वित्तमंत्री ऋषी सुनक हे बॉरीस यांचे वारसदार ठरू शकतात.

गेल्या पाच वर्षापासून ब्रिटनचे अर्थमंत्रालय ज्यांच्या ताब्यात आहे, त्या ऋषी सुनकमध्ये अनेकांना आता ब्रिटनच्या भावी पंतप्रधानाची प्रतिमा दिसते आहे. गेल्या पाच वर्षात सुनक यांनी ज्याप्रकारे काम केले आहे त्यामुळे ब्रिटनमधील त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे.

ऋषी सुनक यांचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत. १९६० साली ते पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये शिफ्ट झाले. आधी इंग्लंड विंचेस्टर आणि त्यानंतर ऑक्सफर्डमधून ऋषी सुनक यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी तीन वर्षे गोल्डमन सॅस्श ग्रुपसाठी काम केले आणि त्यानंतर कॅलिफोर्नियातील स्टँडफोर्ड येथून एमबीएची डिग्री घेतली. त्यांनतर पुढची तीन वर्षे त्यांनी टीसीआय निधी व्यवस्थापनासाठी काम केले.

खरंतर, ऋषी सुनक हे भारताचे जावईच आहेत. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीचे ते पती आहेत. ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यास भारतासाठी निश्चितच एक अभिमानाची बाब असेल.

परंतु ब्रिटनमध्ये होणारी कोणतीही चर्चा ही कधीच बिनबुडाची नसते. त्यामागे तशी काही ठोस कारणे असतात. पुढील निवडणुकांना अजून थोडा अवधी शिल्लक असला तरी, बॉरीस यांनी निवडणुकीपूर्वी निवृत्ती स्वीकारावी असेही त्यांच्याच काही पक्ष सदस्यांचे मत आहे.



ज्यापद्धतीने सुनक यांची लोकप्रियता वाढत आहे, ते पाहता सध्या तरी ते पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात, असे वाटते. अर्थात, खरंच सुनक हे बॉरीस यांचे उत्तराधिकारी होण्यास पत्र आहेत का? हाही प्रश्न आहे.

सध्या तरी ब्रिटनची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती सुधारणे हे सुनक यांच्यासमोरील एक प्राथमिक आव्हान आहे. सध्या ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला गेल्या ३०० वर्षाच्या इतिहासात कधीच अनुभवली नाही अशा आर्थिक मंदीला सामोरे जावे लागत आहे. त्यात प्रदीर्घ काळाच्या लॉकडाऊनमुळे ही समस्या आणखी गंभीर बनली आहे. ब्रिटनमधील व्यापार थंड पडला आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

गेली पाच वर्षे सुनक अर्थमंत्रालय सांभाळत आहेत. त्याच्या कामाबाबत ब्रिटनमध्ये सकारात्मक वातावरण आहे. परंतु, लॉकडाउन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना कामावर जाण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

या मंदीतून देशाला बाहेर काढण्यात जर सुनक अपयशी ठरले तर त्याच्या राजकीय कारकिर्दीवर नकारात्मक परिणाम होईल की काय अशी भीती त्यांच्या समर्थकांना वाटते.

सुनक एक अर्थमंत्री म्हणून एका खडतर काळातून जात आहेत. गेल्या तीन महिन्यापासून ठप्प असलेल्या अर्थव्यवस्थेला गती द्यायची आहे. शिवाय, बेरोजगारीच्या समस्येवरही उपाय शोधून ते अंमलात आणायचे आहेत.

आजपर्यंतच्या त्यांच्या कामामुळे त्यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढते आहे. फक्त ब्रिटनच नाही तर, अमेरिकेतही त्यांचे चाहते वाढत आहेत. बर्नी सँडर्सदेखील ऋषी सुनक यांचे चाहते आहेत.

ब्रिटनमध्ये अलीकडेच कॉन्झरव्हेटीव्ह पक्षाच्या वेबसाईटवर पक्ष सदस्यांनी जनमत चाचणी घेतली. यामध्ये सुनक यांना ९२% मते मिळाली आहेत. ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान बॉरीस जॉन्सन यांच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे.

त्यामुळेच बॉरीस यांच्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी हे ऋषी सुनकच असतील अशा चर्चा जोर धरत आहेत.

ब्रिटनमधील पुढील निवडणुका २०२४मध्ये पार पडतील. कॉन्झरव्हेटीव पक्षाच्या काही सदस्यांचे असे मत आहे की, बॉरीस यांनी निवडणुकांची वाट न पाहता राजीनामा द्यावा. परंतु, पंतप्रधानांचे समर्थक मात्र या मताचे खंडन करत आहेत. एका टीव्ही चॅनेल वरील चर्चेत तसुनक यांना अशा त्यांची पुढची योजना काय आहे? असे विचारण्यात आले तेंव्हा अत्यंत नम्रतेने ते म्हणाले, “या पदाची जबाबदारी सांभाळणे ही माझ्यासाठी एक मोठी सन्मानाची बाब असेल.” मात्र सध्या ते आणि त्यांचे सहकारी परस्पर सहयोगाने ब्रिटनची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काम करत आहेत.

ऋषी सुनक यांचे व्यक्तिमत्व अत्यंत शांत आणि संयमी असल्याचे म्हटले जाते. ते आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करतात. आजपर्यंतच्या त्यांच्या योजना बऱ्यापैकी यशस्वी झाल्याने त्यांची प्रतिमा उजळली आहे. विशेषत: वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर देशातील तरुणांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. देशाच्या घसरत्या अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्यात ते यशस्वी ठरले तर नक्कीच पुढच्या पंतप्रधानपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडेल.

गुंतवणूकदारांनाही सुनक यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. आजपर्यंत सुनक यांनी गुंतवणूकदरांसाठी अनेक सकारात्मक योजना राबवल्या आहेत. गुंतवणूकदरांना त्यांच्यात एका शुभचिंतकाची प्रतिमा दिसते. सुनक यांची सोशल मीडियातील लोकप्रियताही वाखाणण्याजोगी आहे. ते सोशल मिडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात.

अर्थात सगळ्याच गोष्टी सुनक यांच्यासाठी जमेच्या आहेत असे अजिबात नाही. त्यांचे समर्थक आहेत, तसेच राजकारणात त्यांचे विरोधकही आहेत. सध्या तरी सुनक यांच्या पंतप्रधानपदाची चर्चा त्याच्या समर्थकांसाठी आणि चाहत्यांसाठी खूपच आशादायक वाटत आहे. सुनक यांना राजकीय क्षेत्रात कुठलेतरी मोठे पद मिळावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ह्युमन कम्प्युटर म्हणून ओळख असणाऱ्या शकुंतला देवींवरचा हा चित्रपट कोणीही चुकवू नये असाच आहे

Next Post

नेहरूंनी खरंच नेपाळला भारतात विलीन करून घेण्याची संधी सोडून दिली होती का…?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

नेहरूंनी खरंच नेपाळला भारतात विलीन करून घेण्याची संधी सोडून दिली होती का...?

या कोल्ड ड्रिंकच्या अपयशाचे धडे बंगलोरच्या मॅनेजमेंट कॉलेजमध्ये दिले जातात

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.