The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अबब…! कॅमेऱ्याच्या आकाराचं घर आणि मुलांची नावं निकॉन, कॅनन, इप्सन..!

by द पोस्टमन टीम
18 July 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात फक्त स्वतःसाठी असा वेळ काढणंसुद्धा अवघड होऊन बसलंय. पण, आपल्या कामात अव्वल असण्यासाठी डोकं ताजंतवानं असणं आवश्यक आहे.  केवळ झोप घेतल्याने ते शक्य होईल असं नाही तर, एखाद्या दुसऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे. यासाठी एखादा तरी छंद जोपासावा असं म्हणतात. मग तो कुठला का असेना.

एखाद्या व्यक्तीचे छंद त्याच्या व्यवसायाशी जोडलेले असतीलच असं नाही, परंतु स्वतःला आनंद मिळावा यासाठी ते जोपासत असतात. छंद एखाद्यास कौशल्य, ज्ञान, एखादा वेगळा अनुभव घेण्याची संधी देतो. छंद हे स्वतः एक्स्प्रेस होण्याचं एक उत्तम साधन आहे. एखाद्या व्यक्तीचे छंद हे त्या व्यक्तीचे वय, आवडनिवड, बौद्धिक पातळी  इत्यादी गोष्टींवर अवलंबून असते. एखाद्याला प्रचंड आवडणारी गोष्ट दुसऱ्यासाठी कंटाळवाणी असू शकते.

कोणाला वाचनाचा छंद असतो, बाहेर जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेण्यापेक्षा तासनतास पुस्तकांच्या सानिध्यात वेळ घालवण्याला ते जास्ती प्राधान्य देतात. कोणाला निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला आवडतं तर कोणाला संगीतात स्वतःला हरवून घ्यायला आवडतं.

काही लोक आपले छंद जोपासण्यासाठी कुठल्या थराला जातील याची काहीच शाश्वती नाही. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेऊयात ज्याने चक्क आपल्याला घरालाच आपल्या छंदामध्ये रुपांतरीत केलं आहे.

आश्चर्य वाटलं नं वाचून?



रवी होंगल. बेळगावमध्ये राहणारा एक सामान्य माणूस. लहानपणापासूनच रवीला फोटोग्राफीची आवड होती. त्यांच्याकडे असणारा जुना “पेंटॅक्स” कॅमेरा घेऊन तो आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन वेगवेगळे फोटो काढायचा. तेव्हापासूनच त्याने फोटोग्राफर होण्याचं स्वप्न बघितलं. आपल्या छंदालाच आपलं करिअर बनवून आज तो बेळगावमधील एक यशस्वी फोटोग्राफर झालाय.

त्याचं फोटोग्राफीचं वेड इतकं आहे की, त्यानी आपल्या तीन मुलांचे नावं पण कॅमेरा कंपन्यांच्या नावावर ठेवले आहेत. एकाचं इप्सन, एकाचं कॅनन आणि तिसऱ्याचं निकॉन.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पण हे वेड इथेच थांबलं नाही. रवीनी नुकतंच स्वतःचं घर बांधलं. ते पण एका कॅमेराच्या आकारात! त्याच्या घराचे फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होतायत.

“हे घर बांधणं आमच्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. यासाठी आम्ही कर्ज काढलं, जुनं घरसुद्धा विकलं”, असं रवीची पत्नी सांगते.

इंडिअन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला मुलाखत देताना रवी सांगतात,

“फोटोग्राफर होणं हे माझं लहानपणापासूनचं स्वप्नं होतं. मला फोटोग्राफीशी संबंधित सगळ्याच गोष्टींचं प्रचंड आकर्षण आहे. या क्षेत्रात आता बरेच बदल झाले आहेत. मला कायम वाटायचं की आपलं घर हे एका कॅमेरासारखं असावं पण ते कसं बांधता येईल, किती खर्च होईल याचा मला काहीच अंदाज नव्हता.”

अनेक वर्षं बचत करून बऱ्याच आर्किटेक्टच्या मदतीनं त्यांनी आपलं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. “की कन्सेप्ट इंटेरिअर” या कंपनीने हंगल यांच्या घराचं डिझाईन तयार करून त्याचं बांधकाम पूर्ण केलं. आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं सगळं श्रेय रवी या कंपनीला देतात.

फोटोग्राफीशी संबधित बऱ्याच गोष्टी या घरात दिसून येतील. घराबाहेरील भिंतीवर त्यांनी कॅनन, इप्सन आणि निकॉन या कॅमेरा कंपन्यांचं नाव लिहिलेलं दिसेल. एक बाल्कनी कॅमेराच्या रीळच्या आकारात तयार केली आहे. याशिवाय बाहेरील बाजूस, लेन्सच्या वरती एक मोठा फ्लॅश बसवला आहे. कॅमेरा शटरच्या आकाराचे गेट, मेमरी कार्ड असे अनेक फिचर या घरात दिसून येतील.

“माझ्या डोक्यातील कल्पना प्रत्यक्षात उतरवणं इतकं सोपं नव्हतं. मला अगदी कॅमेरातील सगळ्या गोष्टी त्या घरात होत्या. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर हे घर पूर्ण झालं. मला कधीच वाटलं नव्हतं की हे पूर्ण होईल.”

“क्लिक” नावाच्या या घराचं बांधकाम दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण झालं होतं. ट्वीटरवर काही लोकांनी याचे फोटो शेअर केल्यापासून सगळीकडे या आगळ्यावेगळ्या घराचीच चर्चा होताना दिसून येतेय.

आपला छंद जोपासण्यासाठी एखादी व्यक्ती काहीही करू शकते याचं हे एक उत्तम उदाहारण ठरतं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या पारसी वकीलाने आपल्याला राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं रक्षण केलंय

Next Post

जेव्हा एका ब्रिटीश मिठाच्या कंपनीला ‘देश का नमक’ने पाणी पाजलं होतं..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जेव्हा एका ब्रिटीश मिठाच्या कंपनीला 'देश का नमक'ने पाणी पाजलं होतं..!

... आणि म्हणून दुसरं महायु*द्ध अजूनही ऑफिशियली संपलेलं नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.