The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जपानने अमेरिकेवर कागदाचे फुगे सोडून त्यांची झोप उडवली होती

by द पोस्टमन टीम
6 February 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“दुसरे महायु*द्ध” – जगाच्या इतिहासातील एक अशी घटना ज्या घटनेने संपूर्ण मानवजातीचे डोळे उघडले. सन १९३९-१९४५ या सहा वर्ष चाललेल्या ह्या यु*द्धात अतोनात जीवित आणि वित्तहानी झाली. साडेसात करोड लोकांना यात आपला जीव गमवावा लागला होता.

जपानने अमेरिकेवर आणि जर्मनीने पोलंडवर केलेल्या ह*ल्ल्याने या यु*द्धाची सुरुवात झाली. नंतर या यु*द्धात सगळेच प्रमुख राष्ट्र सामील झाले. “जिंकणं” हा एकच उद्देश ठेवून सर्वजण लढत होते. माणुसकी तर नावालासुद्धा नव्हती. केवळ जिंकण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परिने लढत होता. अमेरिकेने जपानवर अ*णुबॉ*म्ब टाकून तर क्रू*रतेची परिसीमा गाठली होती.

१९४४ मध्ये जपानने अमेरिकेवर खूप मोठा ह*ल्ला चढवला होता. अर्थातच तो यशस्वी नाही झाला, पण जर तो यशस्वी झाला असता तर अणुबॉ*म्ब एवढीच हानी अमेरिकेत झाली असती.

२३ फेब्रुवारी १९४५ रोजी अमेरिकेतील डोर प्रदेशातील एका खेड्यात, एक मोठा फुगा, जवळ जवळ दहा मीटरचा व्यास असलेला उडत उडत येऊन पडला. लहान मुले सगळे त्याच्या आजूबाजूला पोहोचले. पण त्यांना याची कल्पना नव्हती की हा फुगा एक बॉ*म्ब घेऊन जपानमधून उडाला होता आणि आता अमेरिकेत पोहोचला होता. निश्चितच तो बॉ*म्ब कुठेतरी पडला होता नाहीतर त्या खेड्यात हाहाःकार झाला असता.



३ नोव्हेंबर १९४४ रोजी जपानने जगातील पहिलं “आंतरखंडीय शस्त्र” अमेरिकेवर सोडलं होतं.

हे शस्त्र दुसरं तिसरं काही नसून शालेय मुलींनी बनवलेले कागदाचे मोठे हायड्रोजनचे फुगे आणि त्यांच्यावर असलेला बॉ*म्ब होता. या मोहिमेला त्यांनी नाव दिलं होतं “फु-गो( fu-go)” म्हणजेच “आग लावणारा बॉ*म्ब.”

जवळजवळ ९३०० फुगे त्यांनी अमेरिकेकडे सोडले होते. त्यांचा उद्देश एकच होता, ‘हे फुगे अमेरिकेत पाडून तिथे आग लावायची आणि सगळीकडे भीतीचे वातावरण पसरवायचे.’

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

अमेरिकी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न याआधीही जपानने दोनदा हवाई ह*ल्ले करून केला होता. पण या दोन्ही ह*ल्ल्यांत म्हणावं तसं यश जपानला मिळालं नव्हतं.

अशातच कमी जोखीम घेऊन मोठा हल्ला करण्याचा एक उपाय जपान्यांना सापडला होता. १९३० ते १९४४ ह्या कालावधीत जपानी हवमानशास्त्रज्ञ वासाबुरो ह्यांनी पश्चिमेकडुन पूर्वेकडे सातत्याने आणि जोराने वाहणाऱ्या वाऱ्यांवर अहवाल प्रसिद्ध केला. (याच वाऱ्यांना आज आपण  “Jet stream” म्हणून ओळखतो).

बाकी जगाने त्या अहवालांकडे फारसं काही लक्ष नाही दिलं. पण जपान्यांनी मात्र त्यावर अजून अभ्यास सुरू केला आणि या वाऱ्यांचा वापर आपल्याला यु*द्धात कसा करता येईल यावर लक्ष दिलं. जपानी सैन्याला यातूनच एक कल्पना सुचली की या वाऱ्यांच्या मदतीने आपण अमेरिकेत बॉ*म्ब सोडू शकतो.

पण कसा?

उत्तर काही त्यांना सापडत नव्हतं. त्यातच अमेरिकेने १८ एप्रिल १९४२ रोजी टोकियोवर हवाई ह*ल्ला करून जपानच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली होती. आता अमेरिकेवर ह*ल्ला करायचाच या जिद्दीने जपानी कामाला लागले. अमेरिकेसारखे लांब पल्ल्याचे लढाऊ विमानं जपानकडे नव्हते.

त्यांनी आता “जेट स्ट्रीम” चा वापर करून हल्ला करण्याचं ठरवलं. यातूनच १९४३ साली उदय झाला “ऑपरेशन फु-गो”चा.

बॉ*म्बवाहक फुगे तयार करण्यासाठी जपानींनी तुतीच्या झाडापासून तयार होणाऱ्या बारीक थराच्या, तंतूमय कागदाचा वापर केला. तो चिकटवण्यासाठी त्यांनी जो डिंक वापरला होता, तोसुद्धा त्यांनी बटाट्यापासून तयार केला होता.

१० मीटर व्यास असणाऱ्या फुग्यात १९००० घनफुट एवढा हायड्रोजन वायू भरण्यात आला. फुगे तर तयार झाले होते, पण त्यांना अमेरिकेपर्यंत पोहोचवणे हे वाटतं तितकं सोपं नव्हतं.

सुरुवातीला चाचणी म्हणून काही फुगे जेट स्ट्रीमचा वापर करून सोडण्यात आले. यावर रेडिओ ट्रान्स्पोन्डर लावले होते. ज्यामुळे फुगे कसे मार्गक्रमण करतात हे कळणार होते. चाचणीमुळे आलेल्या निष्कर्षांमधून एक गोष्ट तर कळली होती कीफुगे अमेरिकेत पाठवण्यामध्ये खूप मोठं अभियांत्रिक आव्हान होतं.

फुग्याला अमेरिकेपर्यंत पोहोचण्यासाठी एक ठराविक उंची कायम ठेवावी लागणार होती. कारण हे सगळे फुगे कागदाचे होते आणि त्यातल्या त्यात त्यामध्ये हायड्रोजनने भरलेले, त्यामुळे तीव्र सूर्यप्रकाशात आल्यानंतर त्यांचा विस्तार होऊन ते फुटत होते.

दुसरीकडे जर फुगे जास्त उंचीवर गेले तर अत्यंत कमी तापमनामुळे बॅटरीमधील ऊर्जा कमी होऊन बॉ*म्ब निकामी होत होता.

ह्या सगळ्या आव्हानांशी सामना करून सरतेशेवटी जपानने योग्य रचना असलेला फुगा बनवला. हा फुगा म्हणजे जपानी अभियांत्रिकीचा अत्यंत उत्तम नमुना होता.

एक ठराविक उंची कायम राखण्यासाठी त्यांनी जास्तीचा हायड्रोजन फुग्यात भरला ,तसेच वाळूच्या पिशव्या फुग्याला बांधल्या. एक अल्टिमिटर कन्ट्रोल्ड वॉल्वसुद्धा लावला. त्यामुळे जर फुगा सूर्यप्रकाशामुळे खूप गरम झाला, तर वाळूच्या पिशव्या सोडून द्यायच्या ज्यामुळे फुगा अजून उंच म्हणजेच ३८००० फुटापर्यंत जाईल आणि थंड होईल.

याउलट जर अतिउंच जाऊन खूप थंड व्हायला लागला तर जास्तीचा हायड्रोजन भरून पुन्हा फुग्याला ३०००० फुटापर्यंत खाली आणायचं. हे पाहून तर नक्कीच वाटतं ‘जपानी म्हणजे हुशारतेचं प्रतीकच आहेत.’

३ नोव्हेंबर १९४४ रोजी जपानने अमेरिकेकडे ९३०० बॉ*म्ब जोडलेले फुगे सोडले. हा दिवस त्यांनी ह्यासाठी निवडला होता कारण या दिवसांत हिवाळी जेट स्ट्रीममुळे वाऱ्याचा वेग जास्त असतो. सगळं व्यवस्थित असतानासुद्धा उत्तर अमेरिकेत मात्र ९३०० पैकी फक्त काही हजार फुगेच पोहोचू शकले. हजारो फुगे तर पॅसिफिक महासागरातच पडले. त्या हजार फुग्यांपैकीसुद्धा बरेचसे फुगे निकामीच होते. वाऱ्याच्या प्रवाहामुळे बरेच बॉ*म्ब फुग्यांमधून आधीच पडले होते.

या फुग्यांमुळे फक्त एकाच ठिकाणी जीवितहानी झाली होती. ५ मे १९४५ ला रेव्हरंड मिशेल हे त्यांची गर्भवती बायकोला आणि काही रविवार शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन ओरेगॉन राज्यातील , जिरहार्ट डोंगराजवळ सहलीला गेले होते.

मिशेल गाडी पार्क करत असतानाच मुलांना मोठा फुगा दिसला, आनंदाने ओरडणाऱ्या मुलांना थोडीसुद्धा कल्पना नव्हती की तो बॉ*म्ब आहे. मिशेल तिथे पोहोचेपर्यंत तर त्या बॉ*म्बचा स्फोट झाला. मिशेलच्या पत्नीसह ४ लोकांचा जागीच मृत्यू झाला.

बाकी बऱ्याच ठिकाणीसुद्धा छोट्या मोठ्या आग लागल्याच्या घटना झाल्या. पण कुठेच मोठ्या प्रमाणात हानी नव्हती झाली.

ही योजना अयशस्वी जरी अयशस्वी झाली असली जपानने अमेरिकेला चांगलाच हादरवलं होतं. अमेरिकन सैन्याने एकच दिलासा व्यक्त केला होता की, यामध्ये नेहमी वापरण्यात येणारे बॉ*म्ब होते. जर जपानने या फुग्यांच्या मदतीने जैविकह*ल्ला केला असता तर अमेरिकेत मृत्यूचे तांडव झाले असते.

“फु-गो” ऑपरेशन जरी अयशस्वी झालं असलं तरी जपानने अमेरिकेच्या दिशेने सोडलेले फुगे अमेरिकेत पोहोचलेच होते आणि तेसुद्धा साधासुधं नाही तर तब्बल ६४०० मैलाचा प्रवास यशस्वीपणे करून.

काही संशोधकांच्या मते जपानने सोडलेल्या ९३०० पैकी हजारो फुगे अमेरिकेत पोहोचले होते पण त्यापैकी फक्त २८४ अमेरिकेला सापडले. अमेरिकन सैन्याला अजूनही काही बॉ*म्बचे अवशेष सापडतात. २०१४ साली कॅनडातील लुम्बी डोंगराजवळ काही वन कर्मचाऱ्यांना बॉ*म्बचे अवशेष सापडले.

आपण नेहमी अमेरिकेने जपानवर अ*णुबॉ*म्ब टाकले एवढेच वाचतो. पण ही मोहीम तर अ*णुबॉ*म्बपेक्षा घातक होती. जपान्यांच्या परिश्रम आणि चिवट वृत्तीचं सगळीकडे कायम कौतुक होत असतं. आणि ही घटना तर त्याचं खूप मोठं उदाहरण आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: World War 2
ShareTweet
Previous Post

कशी आहे सगळीकडे चर्चेत असलेली ‘पाताल लोक’ वेबसिरीज..?

Next Post

पुण्यातील या तरुणांनी विरगळ जतन करण्याचा विडा उचललाय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

पुण्यातील या तरुणांनी विरगळ जतन करण्याचा विडा उचललाय

मानव जातीच्या इतिहासातील सर्वांत वाईट वर्ष कुठलं?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.