The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या दोन भावांच्या प्रयत्नातून पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता

by द पोस्टमन टीम
8 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपल्याला सगळ्यांनाच सिनेमा बघायला आवडतो, सर्व जण सिनेमागृहात सिनेमा बघायला जातात पण कोणाला या सिनेमाचा इतिहास माहिती आहे का? जगातला पहिला सिनेमा कसा प्रदर्शित झाला हे तुम्हाला माहिती आहे का?

लुई आणि ऑगस्ट लुईम या दोन भावंडानी पहिल्या सिनेमाचा प्रीमियर केला होता. याची कथा फार रंजक आहे.

आपले वडील अँटोनी यांच्यानंतर लुई लुईमने आपल्या वडिलांप्रमाणे फोटोग्राफीचा बिझनेस करायला सुरुवात केली. त्याला फोटोग्राफीच्या साधनांसोबत वेगेवगळे प्रयोग करण्याची सवय होती. १८८१ साली लुईला ड्राय प्लेटच्या निर्मितीचे शास्त्र गवसले आणि त्याने फिल्म तयार करायला सुरुवात केली. यामुळे त्याचा वडिलांच्या धंद्यात मोठ्या प्रमाणत नफा त्याला कमावता आला. त्याने आपल्या वडिलांच्या बिझनेसचा विस्तार करत लीऑन्स उपनगरात नवी फॅक्टरी चालू केली.

१८९४ साली लुईमने दीड कोटी प्लेट्सची निर्मिती केली. त्याच वर्षी अँटोनीने पॅरिसला एका महोत्सवात हजेरी लावली. याठिकाणी त्याने एडिसनच्या कायनेटोस्कोपचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. घरी परतल्यावर त्याने आपल्या दोन्ही मुलांना सिनेमाची टेक्नॉलॉजी दाखवली, जी त्याने एडिसनकडून आणली होती.



त्याने त्याच्या मुलांना पिपहोल तंत्रज्ञान अत्यंत कमी खर्चात कसं तयार करता येईल यावर संशोधन करायला सांगितलं आणि त्याने फिल्म स्क्रीनवर प्रोजेक्ट करण्याची यंत्रणा विकसित करायला सांगितली.

१८९४ साली ऑगस्टने आपल्या मोठ्या भावाच्या सांगण्यावरुन सिनेमाच्या नव्या तंत्रज्ञानाच्या विकासाचे कार्य हाती घेतले. काही वर्षातच दोघे बंधू एका नव्या उपकरणाला घेऊन आले.

हे उपकरण एडिसनच्या कायनेटोस्कोप व कायनेटोग्राफच्या तुलनेत अत्यंत छोट्या आकाराचे होते. त्याचं वजन फक्त ५ किलो होते आणि एका हस्तचलित यंत्राच्या बळावर कार्य करायचं.

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

एडिसनच्या कायनेटोग्राफच्या तुलनेत हे यंत्र फार धीम्या गतीने एखादी फिल्म स्क्रीनवर प्रोजेक्ट करायचं, या यंत्राचा वेग हा केवळ १६ स्क्रीन प्रतिसेकंद इतका होता तर एडिसनच्या यंत्राचा वेग हा ४८ स्क्रीन प्रतिसेकंद इतका होता. सोबतच या नव्या यंत्राचा वापर देखील सोपा होता आणि याला फिल्मदेखील कमी लागायची.

कॅमेरातून जाणाऱ्या फिल्मचा आविष्कार हा सिनेमॅटोग्राफची जमेची बाजू होता. दोन पिन्स आणि क्लाउजला सेल्युलॉइड स्ट्रीपच्या स्प्रॉकेटमध्ये घातल्यावर स्ट्रिप्सच्या मदतीने एक स्थिर चित्र पडद्यावर उमटत होतं. लुईस लुईम यांनी इंटरमिटंट मुव्हमेंटचं तंत्रज्ञान विकसित केलं. लुईस लुईम यांनी इंट्रीमेन्ट मुव्हमेंटचा आविष्कार केला ज्याप्रकारे शिलाई मशीन काम करते, तसं त्याने ते तंत्रज्ञान विकसित केले. एडिसनने हे तंत्रज्ञान नाकारले होते.

सिनेमॅटोग्राफ हे तीन प्रकारे वापरता येणारे यंत्र होते. यावर चित्रपट शूट करण्यापासून डेव्हलपिंग करून तो प्रदर्शित करण्यापर्यंत सर्व काही करणे शक्य होते. हा इतिहासातील पहिला फिल्म कॅमेरा होता. या कॅमेराच्या मदतीने लुईम बंधूंनी फॅक्टरीत काम करणाऱ्या कामगारांचे छायाचित्रण केले होते. पॅरिसमधील एका मीटिंगमध्ये त्यांनी हे चलचित्र दाखवलं होतं. १८९५ मध्ये हे प्रसिद्ध करण्यात आलेले पहिले चलचित्र होते.

यानंतर या दोन्ही बंधूनी खाजगी स्क्रिनिंगचा तडाखा लावला. २८ डिसेंबर १८९५ रोजी त्यांनी पहिल्यांदा आपला चित्रपट सार्वजनिकरित्या प्रदर्शित केला. यासाठी त्यांनी एका कॅफेची निवड केली होती. १८९६ साली त्यांनी पॅरिस, लंडन, ब्रसेल्स, बेल्जीयम आणि न्यूयॉर्कला विविध चित्रपटगृहे स्थापन करून दरवर्षी ४० चित्रपटांचे प्रदर्शन केले आहे. त्यांनी जगभरात पहिल्या रीळ व पहिल्या कॅमेरा प्रोजेक्शनचा प्रचार केला. बघता बघता हे तंत्रज्ञान जगभरात पोहचले.

१९०५ साली त्यांनी चलचित्रनिर्मतीतून माघार घेतली. याऐवजी फोटोग्राफच्या कलर प्रोसेसला सुरुवात केली आणि त्या तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना दिली. त्यांच्या सिनेमॅटोग्राफ या यंत्राने मात्र अवघ्या २० व्या शतकाला वेड लावणाऱ्या सिनेमाच्या कलेला जन्म दिला होता.

भारतात दादासाहेब फाळकेंनी पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती केली आणि भारतात चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली.

आज या लोकांच्या प्रयत्नामुळे आपल्या समोर सिनेमाचं एक भलं मोठं विश्व उभं राहिलं आहे. ज्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते आणि असंख्य लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

आज सगळ्याच दृष्टीने सगळ्यात पुढे असलेल्या चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या अवलिया लुईम बंधूंच्या कार्याला सलाम!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Cinemaindian cinemaMovie
ShareTweet
Previous Post

जगाला हसवणारा चार्ली चॅप्लिन कोण होता ? : भाग १

Next Post

जगाला हसवणारा चार्ली चॅप्लिन कोण होता ? : भाग २

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post
charlie chaplin 6 postman

जगाला हसवणारा चार्ली चॅप्लिन कोण होता ? : भाग २

जगाला हसवणारा चार्ली चॅप्लिन कोण होता ? : भाग ३

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.