The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ही आहे जगाच्या इतिहासातील सगळ्यात विचित्र यु*द्धांची यादी

by द पोस्टमन टीम
17 April 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


इतिहासात आपण अनेक यु*द्धांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. दोन्ही जागतिक महायु*द्धे आणि त्या आधी सुरू झालेली गृहयु*द्धे यावर तर अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. पण, जगात अशीही काही यु*द्धे होऊन गेली ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही.

कधी कधी काही यु*द्धाची कारणे मात्र खूपच गमतीशीर आणि क्षुल्लक असतात, वाचूया अशाच काही विचित्र यु*द्धांबद्दल या लेखाद्वारे.

युनायटेड किंग्डम वि. झांझिबार

युनायटेड किंग्डम आणि झांझिबार दरम्यानचे हे यु*द्ध २७ ऑगस्ट १८९६ रोजी सुरु झाले आणि अवघ्या ४० मिनिटात संपले. यापेक्षा नेटफ्लिक्सवरचा एखादा एपिसोडही मोठा असतो. हे आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात छोटं यु*द्ध म्हणून ओळखलं जातं.

१८८६ साली झालेल्या करारानुसार झांझिबारच्या होणाऱ्या राजाला ब्रिटीशांची मंजुरी घेणे अनिवार्य होते. सुलतान हमद बिन थुवैनीनंतर सुलतान खालिद बिन बरघाश झांझिबारच्या गादीवर बसला, पण त्याने इंग्रजांची परवानगी घेतली नव्हती. म्हणून इंग्रजांनी त्याला राजमहाल सोडण्याचे आदेश दिले. त्याने नकार दर्शवताच ब्रिटिशांनी लगेच यु*द्धाची तयारी केली. त्यांनी झांझिबारमधे बॉ*म्बह*ल्ला केला त्यामुळे सुलतान बरघाशला माघार घ्यावीच लागली. फक्त ४० मिनिटे लढल्या गेलेल्या या यु*द्धात सुलतानचे ५०० सैनिक मारले गेले होते.

मोल्डोव्हा वि. ट्रान्स्निस्ट्रीया

१९८९ साली मोल्डोव्हा या छोट्याशा देशाने सोव्हिएत संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःला स्वतंत्र देश घोषित केले. मोल्डोव्हाला रोमानिया आणि इतर पश्चिमी राष्ट्रांशी मैत्री करायची होती. याच मोल्डोव्हाच्या पूर्व सीमेवरील ट्रान्स्निस्ट्रीया राज्याला मात्र रशियाशी असलेले आपले संबंध जपायचे होते. त्यामुळे त्यांनी मोल्डोव्हामधून बाहेर पडून स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला.



मोल्डोव्हाचे सैनिक आणि ट्रान्स्निस्ट्रीयामधील क्रांतिकारक यांच्यात १९९० ते १९९१ पर्यंत छोटीमोठी लढाई सुरु होती. परंतु १९९२ पासून यु*द्धाला सुरुवात झाली. ट्रान्स्निस्ट्रीयातील क्रांतीकारकांना रशियन सैन्याची मदत आणि प्रशिक्षण मिळू लागले.

इतर यु*द्धांपेक्षा हे यु*द्ध फारच वेगळे होते. या यु*द्धातील सैनिक दिवसभर एकमेकांशी लढत आणि रात्री सोबतच प्यायला बसत. यामुळे दोन्ही सैन्यातील द्वेष पूर्ण शमत होता. काही काही सैनिक तर एकमेकांना कोणतीही इजा करणार नाही याची ग्वाही देत.

एल साल्वाडोर वि. होन्डुरास

फुटबॉल हा अनेकांसाठी खेळापेक्षाही मोठा आहे. काहीजण तर त्याला यु*द्धच संबोधतात. हे ही असेच एक फुटबॉल यु*द्ध होते. ज्याला १०० तासांचे यु*द्ध म्हणूनही ओळखले जाते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

फक्त पाचच दिवस लढले गेलेले हे यु*द्ध १९६९ साली झाले होते. एल साल्वाडोरमधून होन्डुरासमधे स्थलांतरित होऊन आलेल्या स्थलांतरितांमध्ये हे यु*द्ध लढले गेले. १९७० सालच्या फिफा वर्ल्ड कपच्या वेळेस तर वातावरण अधिकच तापले.

होन्डुरासमधे जेव्हा या दोन देशांचे खेळाडू आमनेसामने आले तेव्हा दोन्ही संघाच्या चाहत्यांमधेच संघर्ष सुरू झाला. या मॅचनंतर एल साल्वाडोरच्या एका अठरा वर्षीय तरुणीने स्वतःलाच गोळी झाडून घेतली. तिला या यु*द्धातील हुतात्म्याचा दर्जा देण्यात आला.

दुसऱ्या फेरीवेळीही यापेक्षा अधिक हिं*साचार उफाळून आला. २६ जून रोजी एक मॅच झाली ज्यात एल साल्वाडोरचा विजय झाला. १४ जुलै १९६९ रोजी साल्वाडोरन सैनिकांनी होन्डुरासवर ह*ल्ला केला. २० जुलै रोजी त्यांच्यात शस्त्रबंदीचा करार झाला आणि ऑगस्टमधे साल्वाडोरने आपले सैन्य माघारी घेतले. १९७०च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये एल साल्वाडोरचीच निवड झाली.

नेदरलँड्स वि. आयसल्स ऑफ सिली

हे जगातील सर्वात प्रदीर्घ काळ चालेले यु*द्ध होते. १६५१ साली या यु*द्धाला सुरुवात झाली आणि १९८६ मध्ये यासाठीचा शांततेचा करार संमत करण्यात आला. ३३५ वर्षे हे यु*द्ध सुरु होते. ग्रेट ब्रिटन मधील सरदार आणि संसदीय सदस्य यांच्यात अंतर्गत वाद उफाळला.

डचांनी संसदीय सदस्यांना पाठींबा देण्याचे ठरवले आणि त्यामुळे सरदारांना राग आला. त्यांनी इंग्लिश खाडीतून जाणाऱ्या डच जहाजांची लुट सुरु केली. सारे सरदार ते आइल्स ऑफ सिलीमधे जमा झाले. 

डचांनी आपल्या लुटलेल्या जहाजांची नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी सरदारांना पत्र लिहिले. सरदारांनी डचांच्या या मागणीकडे लक्ष दिले नाही तेव्हा डचांनी त्यांच्यावर ह*ल्ला केला. ३० मार्च १६५१ साली त्यांनी आइल्स ऑफ सिलीविरोधात यु*द्ध पुकारले.

सरदार आणि संसदीय सदस्य यांच्यात समझोता झाल्याने डचांनी देखील माघार घेतली आणि ते परत गेले. हे यु*द्ध सुरु झाल्याची कागदोपत्री नोंद होती मात्र हे यु*द्ध संपून शांततेचा करार स्थापन झाल्याचे मात्र कुठलेच पुरावे नव्हते. म्हणून १९८५ साली सिलीच्या एका इतिहास तज्ञांनी डच दूतावासाची संपर्क करून या यु*द्धाचा शांतता करार संमत करण्याची विनंती केली आणि त्यानंतर अधिकृतपणे हे यु*द्ध संपुष्टात आले.

मेक्सिको वि. फ्रांस

१८२८ साली मेक्सिको शहरात झालेल्या लष्करी ह*ल्ल्यात रेमोंटेल या फ्रेंच पेस्ट्री शेफचा कॅफे लुटला गेला. त्याने मेक्सिकन अधिकाऱ्याकडे याबद्दल तक्रार केली, पण त्याच्या तक्रारीची कुणीही नोंद घेतली नाही. मग त्याने फ्रेंच सरकार विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली.

या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली तरी त्यावर तोडगा निघाला नव्हता.

 दहा वर्षानंतर राजा लुई फिलिपिला या फ्रेंच शेफची तक्रार नजरेस पडली. त्याचा आधीच मेक्सिकोवर राग होता, कारण मेक्सिको सरकारने त्याचे लक्षावधी पिसोचे कर्ज चुकवले नव्हते. या याचिकेच्या निमित्ताने त्याला रेमोंटेलच्या वतीने आणखी ६००,००० पिसो मागण्याची आयती संधी सापडली.

परंतु मेक्सिकन सरकारने ही मागणी धुडकावून लावली तेंव्हा, राजाने मेक्सिकोविरुद्ध यु*द्ध पुकारले.

१८३८ साली फ्रेंच सैन्य मेक्सिकोमधे दाखल झाले. सुमारे वर्षभर तरी हे यु*द्ध चालले. शेवटी ब्रिटीश सरकारने यात मध्यस्थी केली आणि मार्च १८३९ दोन्ही दोन्ही बाजूने शांतता करार संमत करण्यात आला. पण, मेक्सिकोला रेमोंटेलची नुकसान भरपाई म्हणून ६००,००० पिसो द्यावेच लागले. एका कॅफेसाठी इतकी नुकसान भरपाई जरा जास्तच ठरली.

कासाकेला वि. कहामा

यु*द्धे फक्त माणसातच होतात असे नाही. आता याच यु*द्धाचं उदाहरण घ्या.

हे यु*द्ध चिपांझी वानारात झालेलं आहे. १९७० साली चिपांझीच्या एका गटाच्या नेत्याचा मृत्यू झाल्याने चक्क एक ‘चिपांझी सिव्हील वॉ*र’ सुरु झाले. प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ जेम गुडाल यांनी या यु*द्धाचे निरीक्षण केले होते. चिपांझीच्या या एका गटाचे दोन भाग पडले कासाकेला आणि कहामा. या दोन्ही गटात तब्बल चार वर्षे हे यु*द्ध चालले. शेवटी कासाकेला गटाच्या चिपाझींचा विजय झाला. त्यांनी दुसऱ्या गटातील म्हणजेच कहामा गटातील सर्व चिपाझींना मारून टाकले.

ग्रेट ब्रिटन वि. अमेरिका

दोन्ही देशादरम्यान काही सामायिक बेटे आहेत. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण एका डुकरामुळे या दोन देशांमध्ये यु*द्ध जुंपले होते. एक ब्रिटीश डुकर भटकत असताना अमेरिकन शेतकऱ्याच्या शेतात घुसले.

त्याने त्या डुकराला गोळी घालून ठार मारून टाकले. अशा घटनेत बऱ्याचदा नुकसान भरपाई ही मागितलीच जाते. पण, अमेरिकन शेतकऱ्याने नुकसान भरपाई देण्यास नकार दिला.

मग ब्रिटीश सैनिकांनी त्याला कैद केले आणि तुरुंगात डांबले. या घटनेने दोन्ही देशात यु*द्धाला तोंड फुटले. या शेतकऱ्याची सुटका करण्यासाठी ५०० अमेरिकन सैनिक गेले होते तर, या शेतकऱ्याला ज्या तुरुंगात डांबले होते तिथे १५०० ब्रिटीश सैनिक पहारा देत होते. शेवटी जर्मनीने मध्यस्थी करेपर्यंत यु*द्धाला स्थगिती देण्यात आली. त्या शेतकऱ्याचीही सुटका झाली आणि ते बेट अमेरिकेला बक्षीस देण्यात आले.

कॅनडा वि. डेन्मार्क

हांस बेटावर या यु*द्धाची ठिणगी पडली. खरे तर या यु*द्धाला एक विनोदी किनार आहे, जी प्रत्येक यु*द्धाला नसते. आर्क्टीक समुद्राच्या केनेडी खाडीतील एका बेटावर हा प्रसंग घडला. या दोन्ही देशामध्ये १९७३ रोजी सीमा प्रश्नावरून सीमा करार संमत करण्यात आला.

१९८४ साली या वादग्रस्त जागेत कॅनडियन सरकारने आपला झेंडा रोवला आणि त्यासोबत कॅनेडियन व्हिस्कीची एक बाटली देखील ठेवली. त्यानंतर डॅनिश सरकारने हा झेंडा काढला आणि तिथे आपला झेंडा रोवला. त्यांनी व्हिस्कीची बाटली देखील हटवली आणि तिथे डॅनिश स्नॅप ठेवला. शिवाय, डॅनिश बेटावर आपले स्वागत आहे असा बोर्डही लावला.

दोन्ही बाजूकडून आपापले झेंडे रोवले जात आणि आपल्या कडच्या दारूची बाटली तिथे ठेवली जात असे, असे तब्बल वीस वर्षे सुरूच राहिले. २००५ साली दोन्ही देशांनी यावर काहीतरी तोडगा काढण्याचे मान्य केले आणि त्यावर प्रक्रिया सुरु केली. चर्चा सुरु होती मात्र तरीही त्यांना निश्चित सीमा ठरवता येत नव्हत्या. आजही ही चर्चा सुरु आहे आणि एकमेकांचे झेंडे काढून आपापले झेंडे आणि दारूच्या बाटल्या ठेवण्याचा उद्योगही सुरूच आहे.

ग्रीस वि. बल्गेरिया

१८ ऑक्टोबर १९२५ रोजी एक ग्रीक सैनिक आपल्या कुत्र्यामागून पळताना चुकून बल्गेरियाच्या हद्दीत घुसला आणि तेव्हापासून या दोन्ही देशातील वातावरण बिघडले. आपल्या हद्दीतून एक ग्रीक सैनिक पळत असल्याचे जेव्हा बल्गेरियन सैनिकांना दिसले तेव्हा त्यांनी त्याच्यावर गोळी झाडली. त्यांच्याकडून घडलेल्या या कृत्याबद्दल बल्गेरियन सैनिक माफी मागतील अशी ग्रीकला अपेक्षा होती. पण, बल्गेरियाकडून तसे कुठलेच पाऊल उचलले गेले नाही. तेव्हा ग्रीकने बल्गेरियावर ह*ल्ला केला आणि त्यांचे पेट्रिच शहर ताब्यात घेतले. या यु*द्धात पन्नास सैनिक मृत्युमुखी पडले. त्यानंतर ‘लीग ऑफ नेशन’ने या यु*द्धात मध्यस्थी केली आणि शस्त्रबंदी घडवून आणली.

मोठमोठ्या यु*द्धांबद्दल आपण कुठे ना कुठे वाचलेले असतेच, पण या छोट्या यु*द्धाची माहिती वाचल्यानंतर आपल्याला पटेल की यु*द्धासाठी कधीही खूप मोठे काहीतरी कारण असावेच लागते असे नाही. छोट्या छोट्या गोष्टीने अहंकार दुखावला तरी, तेवढे कारण यु*द्धासाठी पुरेसे ठरते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

बेस्ट बॅट्समन, बॉलर सगळ्यांना माहित आहेत, ही आहे बेस्ट कमेंटेटर्सची यादी

Next Post

एकेकाळी बाजारात ज्यांची विक्री केली जायची त्या गुलामांनीच भारतावर राज्य केलं होतं!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

एकेकाळी बाजारात ज्यांची विक्री केली जायची त्या गुलामांनीच भारतावर राज्य केलं होतं!

माल्ल्या-मोदींचे आदर्श - ही आहेत जगातील सर्वात जुनी बुडीत कर्ज खाती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.