The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डकवर्थ-लुईसपेक्षाही वाईट नियमाने १९९२ च्या वर्ल्डकप सेमीफायनलमधून दक्षिण आफ्रिका बाहेर पडली होती

by द पोस्टमन टीम
28 October 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


‘क्रिकेट’ हा अनेक अनिश्चित गोष्टींचा समावेश असलेला ‘ग्लोरियस’ खेळ मानला जातो. म्हणूनच गमतीनं म्हटलं जातं, ‘Nothing is certain in cricket except its uncertainty’. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एखादा बॅट्समन एका ओव्हरच्या प्रत्येक बॉलवर सिक्स मारू शकतो, शेवटच्या विकेटसाठी तीनशे रन्स जोडले जाऊ शकतात, विकेट किपींग करणारा हॅट्ट्रिक घेऊ शकतो, ५० बॉल्स शिल्लक असूनही १० रन्स काढता आलेले नाहीत तर, कधी फक्त १० बॉल्स शिल्लक असताना ५० रन्सही निघाले आहेत.

अशा कितीतरी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये घडल्या आहेत. अनेक भले-भले संघ या अशक्य गोष्टींच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत. अनिश्चित गोष्टींचा फेरा तर दक्षिण आफ्रिकन संघाच्या जणू पाचवीलाच पुजलेला आहे. अनेकदा प्रयत्न करून ऐनवेळी महत्त्वाचे सामने त्यांच्या हातातून अगदी ‘समुद्राच्या वाळू’प्रमाणं निसटून गेले आहेत. १९९२ च्या वर्ल्डकपमधील सेमीफायनलचा सामना देखील असाच एक सामना होता. या सामन्यात पाऊस आणि क्रिकेटच्या एका विचित्र नियमानं ‘व्हिलन’चा रोल पार पाडला होता. क्रिकेट इतिहासातील विचित्र सामन्यांमध्ये ही सेमीफायनल सर्वांना नक्की आठवते.

१९९२ च्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये नेमकं काय झालं होतं हे जाणून घेण्याअगोदर दक्षिण आफ्रिकेसाठी तो सामना का प्रतिष्ठेचा होता हे आपण पाहुया. दक्षिण आफ्रिका क्रिकेटला १८८९ साली कसोटी संघाचा दर्जा मिळाला. मात्र, त्यांना कधीही जागतिक क्रिकेटमध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश आलं नाही.

विसाव्या शतकात आफ्रिकन संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २१ वर्षांच्या बंदीचा सामना करावा लागला. त्यामुळं त्यांना १९७५ साली सुरू झालेली विश्वचषक स्पर्धा देखील खेळता आली नव्हती. याला दक्षिण आफ्रिकन सरकारचं वर्णभेदी धोरण जबाबदार होतं. दक्षिण आफ्रिकन सरकारच्या वर्णभेदी धोरणात असे काही नियम बनवले गेले होते ज्यामुळं आयसीसी कोंडीत पकडली गेली होती. सरकारच्या नियमांनुसार, त्यांच्या देशाचा संघ फक्त श्वेतवर्णीय देशांविरुद्ध (इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड) सामने खेळेल.

याशिवाय विरोधी संघात देखील फक्त श्वेतवर्णीय खेळाडूच खेळतील अशी सरकारची अट होती. आयसीसीला ही अट मान्य नव्हती. याचा परिणाम म्हणून आयसीसनं १९७० साली दक्षिण आफ्रिकन संघावर बंदी घातली. आयसीसीनं दक्षिण आफ्रिका संघाला निलंबित केल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट खेळाडूंचं भविष्य पणाला लागलं. अनेकांची क्रिकेट कारकीर्द संपली.



तब्बल २१ वर्षानंतर, दक्षिण आफ्रिकेत बदल झाला आणि वर्णभेदाचं धोरण रद्द करण्यात आलं. त्यानंतर आयसीसीनं देखील १९९१ साली दक्षिण आफ्रिकेवरील बंदी उठवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं उत्कृष्ट खेळ केला. पुढील वर्षांमध्ये शॉन पोलॉक, ॲलन डोनाल्डसारख्या महान क्रिकेटपटूंनी दक्षिण आफ्रिकेला प्रसिद्धी मिळवून दिली.

परंतु याच काळात दक्षिण आफ्रिकेला अनपेक्षितपणे ‘चोकर्स’ हे अपमानास्पद विशेषण मिळालं. याची सुरुवात ऑस्ट्रेलियातील मैदानातून म्हणजेच १९९२च्या वर्ल्डकप सेमीफायनलपासून झाली. २१ वर्षांपासून आपल्या देशाच्या वर्णभेदी धोरणांमुळे क्रिकेट विश्वातून बहिष्कृत झालेल्या दक्षिण आफ्रिकेला त्यावर्षी पहिल्यांदाच वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली होती. हा वर्ल्डकप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सर्वांना चकित करत आपल्या पहिल्याच प्रयत्नात सेमीफायनल गाठली होती.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

२२ मार्च १९९२ रोजी वर्ल्डकप सेमीफायनलचा पहिला सामना होता. दक्षिण आफ्रिकेसमोर तगड्या इंग्लंडचं आव्हान होतं. सामन्यावर पावसाचं सावट होतं. कारण पूर्ण स्पर्धेतील अनेक सामन्यांवर पावसानं अक्षरश: पाणी फिरवलं होतं. पावसाची शक्यता असूनही आफ्रिकन कर्णधार केप्लर वेसल्सनं टॉस जिंकून अगोदर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा वर्ल्डकपमध्ये प्रत्येक संघाला ५० ओव्हर्स पूर्ण करण्यासाठी फक्त साडेतीन तास मिळतील, असा नियम होता. (विशेष म्हणजे हा नियम ब्रॉडकास्टर्सच्या म्हणण्यानुसार करण्यात आला होता) दिलेल्या वेळेत जर ओव्हर्स पूर्ण झाल्या नाही तरी डाव संपल्याचं घोषीत केलं जाई आणि नंतर प्रतिस्पर्धी संघाला देखील तितक्याच ओव्हर्समध्ये लक्ष्य गाठावं लागत असे.

असं म्हटलं जातं, दक्षिण आफ्रिकन संघानं जाणीवपूर्वक संथ गोलंदाजी केली. याचाचं परिणाम म्हणून इंग्लंडला तीन तासात फक्त ४५ ओव्हर्स बॅटिंग करता आली. इंग्लंडचा डाव ६ बाद २५२ वर आटोपला. हे लक्ष्य आपण सहज गाठू असा दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना आत्मविश्वास होता. मात्र, पुढील काही तासातचं नियती त्यांनी अतिशय क्रूरपणे थट्टा करणार होती याची त्यांना कल्पनाही नव्हती.

सामन्याच्या दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर ४५ ओव्हर्समध्ये २५३ रन्स करण्याचं लक्ष्य होतं. अँड्र्यू हडसन (४६) आणि जॉन्टी रोड्स (४३) यांच्या बळावर आफ्रिकन संघानं ४२.५ ओव्हर्समध्ये ६ गडी गमावून २३१ धावा केल्या. शेवटच्या १३ बॉल्समध्ये त्याना २२ रन्सची आवश्यकता होती. आफ्रिकन संघ विजयाचा प्रबळ दावेदार होता. पण, पाऊस सुरू झाला.

तेव्हा आजच्या सारखा डकवर्थ लुईस आणि स्टर्न नियम नव्हता. ‘९२ च्या वर्ल्डकपमध्ये असा नियम करण्यात आला होता की, जर पावसामुळं एखादी ओव्हर कमी झाली तर, बॅटिंग करणाऱ्या टीमला नवीन टारगेट देताना अगोदर बॅटिंग केलेल्या संघाच्या डावातील सर्वात कमी रन्स निघालेली ओव्हर कमी करण्यात येईल. उदाहरणार्थ जर पहिल्या डावातील एखाद्या ओव्हरमध्ये फक्त १ रन निघाला असेल तर तिच ओव्हर कमी केली जाईल.

दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग सुरू असताना आलेला पाऊस १२ मिनिटे चालला. कुण्या शहाण्याच्या डोक्यातून निघालेल्या ‘रेन रूल’नुसार इंग्लिश संघाच्या डावातून २ ओव्हर्स कापल्या गेल्या आणि आफ्रिकन संघासाठी निर्धारित केलेले नवीन लक्ष्य स्टेडियमवरील मोठ्या इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर झळकलं. बोर्ड पाहिल्या पाहिल्या सर्वांना आश्चर्याचा झटका बसला.

दक्षिण आफ्रिकेला एका बॉलमध्ये २२ धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं! कारण दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडच्या डावादरम्यान २ ओव्हर्स मेडन टाकल्या होत्या. पावसाच्या नियमामुळं नेमक्या त्याच कमी करून आफ्रिकेलं टारगेट दिलं गेलं. परिणामी बॉल्स तर कमी झाले पण, रन्स कमी झाले नाहीत. या प्रकारानं स्टेडियममध्ये उपस्थित हजारो प्रेक्षक संतप्त झाले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. त्याचवेळी डगआउटमध्ये बसलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाच्या लक्षात एक गोष्ट आली. त्यांनी बॉलिंग करताना दोन नाही तर फक्त एक मेडन ओव्हर टाकली होती.

एका ओव्हरमध्ये लेग बायचा एक रन मिळाला होता. परिणामी पुन्हा आकडेवारी करून आफ्रिकेला एका बॉलमध्ये २१ रन्सचं नवीन टारगेट देण्यात आलं. स्टेडियममध्ये प्रचंड गोंधळ सुरू असताना आफ्रिकन फलंदाजांनी एका बॉलवर एक रन घेतला आणि रागाच्या भरात मैदान सोडलं. सामना संपल्यानंतर आफ्रिकन संघ मैदानात परतला. त्यांनी इंग्लंड संघाशी हस्तांदोलन केले आणि संपूर्ण मैदानाला प्रदक्षिणा घालून प्रेक्षकांचे आभार मानले. प्रेक्षकांनी देखील जोरदार टाळ्या वाजवून आफ्रिकन संघाचे कौतुक केलं.

या घटनेनंतर जगभरातून क्रिकेटच्या नियमांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर काही वर्षात डकवर्थ-लुईस हा नियम सुरू करण्यात आला. मात्र, त्यापूर्वी क्रिकेटच्या एका विचित्र नियमामुळं दक्षिण आफ्रिकन संघाचं फायनलमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न भंगलं होत हे सत्य बदलता येणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सीरिअल कि*लरच्या कैदेत दोन महिने हालअपेष्टा सहन केल्यानंतर तिची सुटका झाली होती

Next Post

आजही जगभर अनेक बाळं शेपटी घेऊन जन्माला येतात..!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

आजही जगभर अनेक बाळं शेपटी घेऊन जन्माला येतात..!

अमेरिकेच्या आर्थिक व्यवहाराचं केंद्र असलेल्या वॉल स्ट्रीटवर झालेल्या ह*ल्ल्याचा सूत्रधार अखेरपर्यंत सापडला नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.