The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चित्रपट, वेबसिरीज डाउनलोड करायला टोरंट वापरणे गुन्हा आहे का..? जाणून घ्या..!

by द पोस्टमन टीम
17 July 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


२०२०, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील एक विचित्र, अनाकलनीय आणि देशातील शासन-प्रशासन व्यवस्थेसाठी एक मोठं आव्हान ठरलेलं वर्ष. कोरोना व्हायरसची जीवघेणी साथ पसरल्याने मार्च २०२० मध्ये संपूर्ण देशात टाळेबंदी झाली. त्याबरोबरच अनेकांच्या उत्पन्नाचे मार्ग बंद झाले, अनेक नोकऱ्या गेल्या, आणि अशा कैक दुःखद घटनांनी भरलेलं हे वर्ष.

या वेळी “तरुण” देश काय करत होता? तरुणाई, त्यातही २१व्या शतकातली तरुणाई, ज्यांना घरी बसण्याची जणू “ॲलर्जीच” असते, त्यांना २४ तास घरी बसावं लागलं. “वर्क फ्रॉम होम”चे दिवस सुरु झाले. या सगळ्यात मनोरंजनाचं, इतरांबरोबर संपर्क साधण्याचं साधन काय? एक म्हणजे हातातला मोबाईल आणि लॅपटॉप!

माझ्यासाहित आपण सर्वांनीच अनेक वेब सिरीज, सिनेमे, पॉडकास्ट्स वगैरे बघितले, ऐकले. ही सगळी मौजमजा आणि एंजोयमेंट करीत असताना आपल्याला काही गोष्टींचं भान राहत नसेल, उदाहरणादाखल सांगायचं तर कुटुंबाला वेळ देणे, स्वतःच्या उन्नतीसाठी वेळ देणे, व्यायाम, वाचन आणि असं खूप काही. याला अनेक अपवादही आहेत म्हणा. शेवटी प्रत्येकाने आपपल्या हितासाठी कोणाच्याही सल्ल्याशिवाय जागृत असलं पाहिजे.

या अनेक “एंजोयमेंट्स”पैकी सुप्रसिद्ध आणि चटक लावणारा प्रकार म्हणजे वेब सिरिज, सिनिमे आणि पाश्चिमात्त्य सिनेमे. कथा, संवाद आणि दृश्ययोजना (ग्राफिक्स) यांमुळे असे वेब सिरीज आकर्षणाचं प्रमुख केंद्र ठरतात.



ते डाउनलोड करण्यासाठी बऱ्याच वेळा टॉरेंट नावाच्या संकेतस्थळाला बऱ्याचदा भेट दिली जाते, त्या बरोबरच टेलिग्राम नावाचं सामाजिक माध्यमसुध्दा वापरलं जातं.

एक कल्पना करा, तुम्ही असं काही “युनिक” तयार केलं, चित्रपट, एखादं सॉफ्टवेअर, एखादी गेम किंवा असं काहीही जे तुमच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही तयार करू शकत नाही, आणि ते एखाद्या अज्ञात व्यक्तीने तुमच्याकडून चोरून स्वातंत्रपणे त्या निर्मितीची विक्री केली. असं झाल्यास तो दखलपात्र गुन्हा ठरतो, शिवाय असं केल्याने आपण आपल्या निर्मितीक्षमतेला आतल्याआत संपवतो. तर अशा एकमेव निर्मितीला “कॉपीराईट” असतो.

उदाहरणादाखल, एखाद्या गोष्टीवर जर अनिलचा कॉपीराईट असेल तर त्या बद्दलचे सर्व अधिकार अनिलकडे असतात, ते उत्पादन अथवा सेवा कुठे विकली जाईल, कोणाला विकली जाईल, आणि कोणत्या किमतीत विकली जाईल या सर्व गोष्टी अनिल ठरवतो. पण त्याच्या इच्छेविरुद्ध कुणी ती निर्मिती, सेवा अथवा उत्पादन यांची विक्री केली तर तो एक गुन्हा मानला जातो, वर दिलेले जे अधिकार सांगितले आहेत, त्यांनाच बौद्धिक मालमत्तेचे अधिकार किंवा “इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स” असं संबोधलं जातं.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

टॉरेंट आणि टेलिग्राम अशा मुक्त स्रोत (ओपन सोर्स) तंत्रज्ञानांमुळे अनेकांची बौद्धिक मालमत्ता धोक्यात येते, म्हणजेच एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या आणि निर्मितीक्षमतेच्या जोरावर तयार केलेलं सॉफ्टवेअर, गेम, सिनेमा, पुस्तक, इत्यादी हे कोणीही त्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्धही अपलोड किंवा डाऊनलोड करू शकतं.

अर्थात, हे नेहमी हे असंच होतं असं नाही. अनेकजण आपली निर्मिती जगासमोर आणण्यासाठी आपणहून या तंत्रज्ञानाचा वापर करतात.

सर्वप्रथम डाउनलोड म्हणजे काय हे समजून घेऊ, आपण काहीही डाउनलोड करतो म्हणजे नेमकं काय करतो? आपण आपल्या संगणकातून दुसऱ्या संगणकावर विनंती (request) पाठवतो, तो दुसरा संगणक म्हणजे विशेष काही नसून त्या संकेतस्थळाचा “सर्वर” असतो, थोडक्यात ज्या संगणकावरून ते संकेतस्थळ प्रक्षेपित होत आहे असा एक विशेष संगणक, त्या संगणकाला विनंती (request) पोहोचल्यावर एका विशिष्ट आंतरजालीय प्रोटोकॉलनुसार तो संगणक आपल्याला हवी असलेली माहिती आपल्या संगणकावर पोहोचवतो. म्हणजेच अपलोड करतो.

पण इतका मोठा डेटा सांभाळण्यासाठी आणि हजारो रिक्वेस्ट्सना एका वेळी प्रतिसाद (रिस्पोंड) देण्यासाठी सर्वसाधारण संगणकापेक्षा कैक पटीने जास्त क्षमता असलेल्या संगणकाची गरज भासते. असे संगणक सहसा महाग असतात. या समस्येवर तोडगा म्हणून टॉरेंट या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

मला एखादी माहिती अथवा एखादी फाईल, पुस्तक, इ. जगापर्यंत मोफत आणि मुक्त स्रोत पद्धतीने पोहोचवायचा असल्यास मी टॉरेंट संबंधी संकेतस्थळावर जाऊन त्या फाईलचा एक टॉरेंट तयार करतो, ज्या व्यक्तीला ती फाईल हवी असेल ती व्यक्ती टॉरेंट क्लायंट तयार करून ती फाईल डाउनलोड करू शकतो.

टॉरेंट तंत्रज्ञानाच्या परिभाषेत अपलोड करणाऱ्या व्यक्तीला सिडर म्हणतात, तर डाउनलोड करणाऱ्या व्यक्तीला पिचर म्हणतात. सिडर्स आणि प्रिचर्सची संख्या एका विशिष्ट प्रमाणात असण्यावर डाउनलोड आणि अपलोडचा वेग अवलंबून असतो.

टॉरेंट वापरणं हे वर वर पाहता बेकायदेशीर नाही, पण त्याचा वापर कशासाठी होतोय या वर ते बेकायदेशीर आहे अथवा नाही हे ठरतं. वर सांगितल्याप्रमाणे जर कोणाच्या बौद्धिक मालमत्तेचा गैरवापर या टॉरेंटद्वारे होणार असेल किंवा तसं आढळून येण्याने कुणी त्याविरुद्ध तक्रार केली तर मात्र सिडर आणि प्रिचर या दोघांवरही गुन्हा दाखल होऊन सुमारे तीन वर्षांचा तुरुंगवास आणि/किंवा तीन लाखांचा दंड होऊ शकतो.

एखाद्या व्यक्तीची बौद्धिक मालमत्ता चोरणे हा फक्त आर्थिक गैरव्यवहार ठरत नाही, तर यामुळे या ज्ञानाधिष्ठित समाजात आपली काय प्रतिमा तयार होईल?

टॉरेंट विकसित होण्याआधीही वाङ्मयकचौर्याचे अनेक प्रकार घडतच होते, यालाच आजच्या भाषेत ‘पायरसी’ असंही म्हणतात. पण हा प्रकार वाङ्मयापुरता मर्यादित न राहता, सॉफ्टवेअरचे कोड, विक्रीसाठी असलेले सॉफ्टवेअर, गेम्स अशा अनेक बाबतीत आज पायरसी होते, ज्यांचं मुख्य आणि सर्वाधिक वापरलं जाणार साधन म्हणजे “टॉरेंट”!

यामुळे कैक प्रकारांद्वारे सायबर ह*ल्लासुद्धा होऊ शकतो, उदाहरणादाखल, तुम्ही एखादं खुल्या बाजारात विकत मिळणार सॉफ्टवेअर तुमच्या संगणकात टॉरेंटद्वारे डाउनलोड केलं, आणि त्यात असं एखादं मालवेअर किंवा वायरस असला जो तुमचा सगळा डेटा हॅकरपर्यंत पोहोचवतो.

याद्वारे तुमच्या बँक अकाउंटमधले पैसे आपोआप गायब होतील, किंवा सामाजिक माध्यमांवरील तुमच्या सगळ्या हालचालींवर लक्षं ठेवलं जाईल. आणि असे बरेच काही प्रकार जे आपण जवळ जवळ रोजच टीव्हीवर पाहतो किंवा वर्तमानपत्रात वाचतो, भविष्यात यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

तर आपल्या हातातलं तंत्रज्ञान सद्सद्विवेकबुद्धिने वापरणं हे मानवाचं सर्वप्रथम कर्तव्य आहे. आंतरजाल (इंटरनेट) वापरायच्या “हक्काची” अपेक्षा जर सरकार आणि समाजाकडून ठेवायची तर त्याच मुख्यतः समाजाप्रती आपली काही “कर्तव्य” सुद्धा आहेत, हे विसरून चालणार नाही.

त्यामुळे यानंतर टॉरेंट वापरताना आपल्या या सामाजिक कर्तव्यांची जाणीव रहावी हीच माफक अपेक्षा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

सायकलच्या उत्क्रांतीचा इतिहास मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासा इतकाच इंटरेस्टिंग आहे

Next Post

अस्तित्वात नसलेल्या देशातून जपानच्या विमानतळावर आलेला ‘तो’ माणूस कोण होता, अचानक कुठे गायब झाला..?

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

अस्तित्वात नसलेल्या देशातून जपानच्या विमानतळावर आलेला 'तो' माणूस कोण होता, अचानक कुठे गायब झाला..?

गोष्ट तोंडाला पाणी आणणाऱ्या लोणच्याची !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.