The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

…म्हणून आईन्स्टाईन जर्मनीचं नागरिकत्व सोडून अमेरिकेत स्थायिक झाला..!

by Heramb
14 January 2022
in विश्लेषण, विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


युद्धस्य कथा रम्य: असं अनेकदा म्हटलं जातं. त्याप्रमाणे युद्धाच्या कथा अतिशय रमणीय तर असतातच पण त्याशिवाय त्यांच्यातून आपल्याला बरंच शिकता येण्यासारखंही असतं. तत्त्वज्ञानाचं खरं ज्ञान युद्धभूमीशिवाय आणखी कोठेही होऊ शकत नाही हा अनेक अनुभवी सैनिकांचा अनुभव आहे. बिजनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील कित्येक व्यख्या आणि संकल्पना तर युद्धभूमीवरूनच आलेल्या असतात.

युद्धाचा निकाल शस्त्रबलाचे प्रमाण किंवा सैन्यसंख्या अशा फक्त एखाद दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून नसतो. युद्धभूमीवर अनेक लहान लहान गोष्टींचा प्रभावदेखील प्रकर्षाने जाणवतो. दुसऱ्या महायुद्धातही अशा अनेक लहान लहान घटनांचे मोठे परिणाम युद्धभूमीच्या दोन्ही बाजूंच्या राष्ट्रांना भोगावे लागले. कधी एखाद्या मृतदेहामुळे, कधी चुकीच्या धारणा आणि माहितीमुळे, तर कधी हेरगिरीमुळे!

युद्धामध्ये छोटीशी चूकही राष्ट्राच्या पराभवाची कारण ठरू शकते. अशाच एका लहानशा घटनेने दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या विजयाची शक्यता पूर्णपणे मिटवून टाकली. ती घटना म्हणजे आईन्स्टाईनसारख्या प्रतिभावान शास्त्रज्ञाने अमेरिकेत स्थलांतर करणे. पण जर्मनीमध्ये राहून अक्ष राष्ट्रांना शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये मदत करण्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला असता हेही तितकच खरं.

अनेक इतिहासकारांच्या मते अमेरिका वास्तव्याच्या दृष्टीने तत्कालीन जर्मनीपेक्षा सर्वोत्तम जागा होती, म्हणून आईन्स्टाईनने स्थलांतर केले. पण हे इतकं सहज-सोपं निश्चितच नाही. आपली मातृभूमी सोडून आईन्स्टाईनवर परदेशात जाण्याची वेळ नेमकी का आली याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

अल्बर्ट आइनस्टाईन या प्रतिभावान भौतिकशास्त्रज्ञाने हिटलर सत्तेवर येण्यापूर्वीच त्याच्या जर्मनीसाठी कशा योजना आखल्या आहेत याचा अचूक अंदाज लावण्यासाठी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेचा वापर केला. जर्मनीच्या नेतृत्वाकडून सुरु होणाऱ्या युद्धाला संपूर्ण युरोप समोरा जाणार आहे असा अचूक अंदाजही त्याने लावला. आईन्स्टाईन शांततावादी आणि मानवतावादी असल्याने तो कोणत्याही प्रकारच्या युद्धाच्या विरोधात होता. युद्धामुळे समाजाला कोणताही फायदा होत नाही आणि युद्धामुळे असंख्य संसाधने वाया जातात असे आईन्स्टाईनचे मत होते.

ADVERTISEMENT

प्रिन्सटन विद्यापीठातील आपल्या काही मित्रांना भेटण्यासाठी आइन्स्टाईन १९३२ साली पहिल्यांदा अमेरिकेला गेला. आईन्स्टाईनचे हे मित्रसुद्धा त्याच्याचप्रमाणे सैद्धांतिक भौतिकशास्त्रात काम करीत होते. अमेरिकेच्या या पहिल्याच भेटीत आईन्स्टाईन जे काही अनुभवत आणि पाहत होता ते सर्व त्याला अनपेक्षित असल्याने मिळालेल्या मानसन्मानामुळे तो खुश होता. याशिवाय अमेरिकेत पाऊल ठेवल्यानंतर त्याला ऑक्सफर्डसह जगभरातील अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांकडून आमंत्रणं येत होती.

१९३३ साल उजाडले तरी आईन्स्टाईन अमेरिकेतच वास्तव्यास होता. तिकडे जर्मनीत एव्हाना चॅन्सलर होऊन हिटलर सत्तेतही आला होता. मार्च १९३३ साली आईन्स्टाईन आपल्या पत्नीसह पुन्हा जर्मनीत गेला, पण घरावर छापा पडला आहे हे पाहून त्याने पुन्हा अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. काही इतिहासकारांच्या मते, आईन्स्टाईन अमेरिकेत गेला याचा विरोध म्हणून हिटलरने त्याचे घर उध्वस्त केले होते. कारण काहीही असो पण या घटनेने आईन्स्टाईनच्या कायमचे अमेरिकेत स्थलांतर करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

हे देखील वाचा

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

रशिया दुसऱ्या महायुद्धापासून जपानच्या या बेटांवर ठाण मांडून बसलाय!

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

एवढेच नाही तर त्याने आपल्या जर्मन नागरिकत्वाचा औपचारिकपणे त्याग करण्यापर्यंत मजल मारली आणि आपला जर्मन पासपोर्टही त्याने जर्मनीच्या कॉन्सुलेटमध्ये दिला. हिटलरला हा अप्रत्यक्ष संदेश होता. हिटलरकडे आईन्स्टाईनचे स्थलांतर रोखण्याची शक्ती निश्चितच नव्हती. पण आता आईन्स्टाईन हिटलरच्या ‘ॲसॅसीनेशन’ लिस्टमध्ये होता. एखाद्या ज्यूच्या नागरिकत्वाच्या त्यागाने तो थेट हिटलरच्या ‘ॲसॅसीनेशन’ लिस्टमध्ये जावा ही काही साधी गोष्ट नव्हती.

आईन्स्टाईन फक्त जर्मनीचा नव्हता सोडत, तर तो युद्धामध्ये अक्ष राष्ट्रांची बाजू सोडून मित्र राष्ट्रांमध्ये जात होता. हे कळण्याइतका हिटलर नक्कीच प्रगल्भ होता. याशिवाय युद्धादरम्यान एक न एक दिवस आईन्स्टाईनच्या प्रचंड बौद्धिक क्षमतेचा वापर मित्र राष्ट्रांना शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये होणार याचीदेखील कल्पना आणि भीती हिटलरला होती. त्यामुळेच त्याच्या तळपायातील आग मस्तकात गेली होती.

जेव्हा आईनस्टाईनला आपले नाव ‘ॲसॅसीनेशन’ लिस्टमध्ये असल्याचे कळले तेव्हा त्याने तात्पुरते इंग्लंडला जाण्याचा आणि तेथून अमेरिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर १९३३ मध्ये आईन्स्टाईन ‘न्यू जर्सी’ येथे स्थलांतरित झाला. त्यानंतर त्याने ‘प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी ऍडवान्सड स्टडी ग्रुप’चे सदस्यत्व स्वीकारले. फक्त आईन्स्टाईनच नाही तर अनेक जर्मन शास्त्रज्ञांनी हिटलरशासित जर्मनीतून विविध देशांमध्ये स्थलांतर केले होते.

ज्यावेळी आईन्स्टाईनने जर्मनी देश सोडला त्यावेळी नुकताच सत्तेवर आलेल्या हिटलरने ज्यूंवर कोणतेही अत्याचार केले नव्हते. असे असूनही हिटलरच्या सत्तेचा ज्यूंना असलेला धोका ओळखण्यात आईन्स्टाईन यशस्वी ठरला होता. यावरून आपल्याला या शास्त्रज्ञाची प्रगल्भ दूरदृष्टी समजते. केवळ आईन्स्टाईनच नाही आईन्स्टाईननन्तर चैम वेझमनसारख्या झिओनिस्ट ऑर्गनायझेशनच्या अनेक नेत्यांनी हिटलरची ज्यू लोकांसाठी एक मोठी आणि क्रूर योजना आहे असा अंदाज लावला होता.

या वेळी, आइनस्टाईन अणुऊर्जा कार्यक्षमतेने कशी वापरता येईल यासाठी संशोधन करीत होता. हिटलर अण्वस्त्रे तयार करण्यासाठी त्याचा छळ करेल अशी त्याला भीती असल्यानेही त्याने देश सोडून पळून जाण्याचा पर्याय स्वीकारला असेही एक कारण सांगितले जाते. अनेक इतिहासकारांच्या मते, हिटलरने त्याची भेट झाल्या झाल्या लगेचच त्याला जीवे मारले असते. पण कदाचित हिटलरने तसे केले नसते. त्याने शस्त्रास्त्र निर्मितीसाठी आणि युद्ध जिंकायच्या नव-नव्या कल्पना शोधून काढण्यासाठी आईन्स्टाईनचा छळ केला असता.

१९४० पर्यंत आइनस्टाईनने अमेरिकन नागरिक म्हणून त्याचे नागरिकत्व मिळवले. युद्धाबद्दल नकारात्मक भावना असूनही त्याने आण्विक विखंडन अर्थात न्यूक्लिअर फिशनचा शोध लावला. याचाच वापर अमेरिकन सैन्याने १९४५ साली जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर केला होता.

अनेक इतिहासकारांनी त्याला अणुबॉम्ब तयार केल्याबद्दल अपराधी मानले आहे. हे अर्धसत्य असून त्याने फक्त अणुविखंडन करण्याचे शास्त्र शोधून काढले, परंतु त्याचा शस्त्र निर्मितीसाठी वापर हा अमेरिकन शास्त्रज्ञांनी केला. अमेरिकेत असताना आणि अणुबॉम्ब तयार होत असताना एका सोव्हिएत हेराने आईन्स्टाईनकडून अणुबॉम्बचे गुपित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, पण तो यशस्वी झाला नाही. कारण आईन्स्टाईनचा ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’मध्ये अर्थात अणुबॉम्ब तयार करण्यामध्ये कधीही सक्रिय सहभाग नव्हता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweetShare
Previous Post

या आजोबांनी रक्तदान करून २४ लाख लहान मुलांचा जीव वाचवला आहे

Next Post

क्युबाला व्हिलन बनवण्यासाठी अमेरिकेने स्वतःच्याच भूमीवर दहशतवादी हल्ले करण्याचा प्लॅन केला होता

Heramb

Heramb

Related Posts

विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
विश्लेषण

रशिया दुसऱ्या महायुद्धापासून जपानच्या या बेटांवर ठाण मांडून बसलाय!

18 May 2022
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

22 April 2022
इतिहास

त्याच्या संशोधनाने कोट्यवधी लोकांना अन्न दिले आणि लाखोंना वेदनादायक मृत्यूही!

18 April 2022
विश्लेषण

३००० वर्षांपूर्वी माया संस्कृतीतील लोकांनी प्राण्यांचा व्यापार का केला?

18 April 2022
विश्लेषण

शास्त्रज्ञांनी २ हजार वर्ष जुन्या खजुराच्या बिया रुजवून खजुराच्या प्रजातीचं पुनरुज्जीवन केलंय!

16 April 2022
Next Post

क्युबाला व्हिलन बनवण्यासाठी अमेरिकेने स्वतःच्याच भूमीवर दहशतवादी हल्ले करण्याचा प्लॅन केला होता

FBIने १९ वर्षे तपास केला पण हे तीन फरार कैदी शेवटपर्यंत सापडले नाहीत

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!