The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चीन मोठ्या प्रमाणावर गाढवांची आयात का करतोय..?

by द पोस्टमन टीम
10 June 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जगभरात गाढवांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे. असं म्हणतात की पुढील ५ वर्षात त्यांची संख्या अजून मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. आज जगभरात ४.४ करोड गाढवं आहेत, यापैकी पाकिस्तान आणि आफ्रिकन देश या आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या देशात गाढवांचे वास्तव्य आहे.

चीन दरवर्षी तब्बल ५० लाख गाढवं या देशातून आयात करतो आणि त्यापासून औषधांची निर्मिती करतो. बऱ्याचदा संख्या कमी असल्यास तस्करी आणि चोरी करून गाढवं चीनला पाठवली जातात. याच कारणामुळे जगभरात गाढवांची संख्या कमी होत आहे.

चीनमध्ये एका पारंपरिक चिनी औषधाच्या निर्मितीसाठी अनेक प्राण्यांचा वापर केला जातो. या औषधांचा व्यापार तब्बल १३० अब्ज डॉलर्सचा आहे. अनेक प्रकारचे पशु-पक्षी, उदाहरणार्थ – साप, विंचु, कोळी आणि झुरळं यांचा वापर करून ह्या पारंपरिक औषधांची निर्मिती केली जाते. गाढवाचा वापर देखील अशा विशिष्ट औषधाच्या निर्मितीसाठी केला जातो.

गाढवाच्या चरबीपासून तयार होणाऱ्या जिलेटीनपासून एजियाओ हे औषध तयार करण्यात येते. चीनच्या प्राचीन वैद्यक शास्त्रानुसार हे औषध शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी दिले जाते. सांधेदुखी आणि लैंगिक समस्येवर देखील या जिलेटीनचे औषध वापरले जाते. हे औषध चॉकलेटसारखे पण कडक असते. त्यामुळे या औषधाला पाण्यात विरघळून घेतले जाते.

औषधाच्या निर्मितीसाठी गाढवांंना मारलं जातं आणि त्यांच्या मृत शरीराला एका केमिकलमध्ये ठेवण्यात येतं. काही काळाने त्यांच्या मृत शरीरावरचे चामडे काढून त्याला गरम पाण्यात नीट उकळवलं जातं. या प्रक्रियेत गाढवाच्या त्वचेतून एक चिपकट पदार्थ बाहेर येतो, ज्याला एजियाओ म्हटले जाते. अनेक आजरांच्या उपचारासाठी आणि लैंगिक समस्येच्या निराकरणासाठी या औषधाचा वापर केला जातो. यामुळे चीनमध्ये याची मोठ्या प्रमाणावर मागणी असते.



एका संस्थेच्या रिपोर्टनुसार २०१३ सालापासून २०१६ पर्यंत एजियाओचे उत्पादन ३२०० टन वरून ५६०० टन इतके वाढले आहे. उत्पादनात तब्बल २० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

वाढत्या मागणीमुळे चीनमध्ये १९९२ साली गाढवांची टंचाई निर्माण झाली, कारण तिथे उद्योग-धंद्यात मोठी वाढ देखील झाली होती. यामुळे एजियाओ बनवण्यासाठी चीनने गरीब देशातून गाढवांची आयात करायला सुरुवात केली. गाढवांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या द डाँकी सँच्युरी या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात चीन दरवर्षी ५० लाख गाढवांची आयात करतो. यासाठी कायदेशीर आणि बेकायदेशीर दोन्ही मार्ग अवलंबले जातात.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

पशु-पक्षांची खरेदीविक्री आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अवैध असली तरीसुद्धा बेकायदेशीरपणे ढोबळमानाने चीन दरवर्षी ५० लाख गाढवांची आयात करत असावा अंदाज लावला जात आहे. औषधाची मागणी पूर्ण करण्यासाठी आफ्रिका, पाकिस्तान आणि ब्राझीलमधून गाढवांची आयात केली जाते. २००७ साली एकट्या ब्राझीलमध्ये गाढवांच्य संख्येत ३० टक्के घट आढळून आली होती. असं मानलं जातं, एवढं असून देखील अवैध तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे.

बऱ्याचदा एका देशातून दुसऱ्या देशात नेताना गाढवांचे निधन होते. याची संख्या तब्बल २० टक्के इतकी आहे. समुद्री यात्रेत गाढवांंना खायला काहीच दिलं जात नाही. जर कुठला आजार पसरला तर त्यांच्या देखभालीसाठी कुठला पशु चिकित्सक देखील नसतो. चीनमध्ये या गाढवांंना अतिशय वाईट परिस्थितीत ठेवलं जातं.

सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार चीनच्या मागणीला पूर्ण करण्यासाठी अगदी गर्भवती नवजात आणि आजारी गाढवांची तस्करी देखील केली जाते. गाढवांंना प्रजननासाठी सुदृढ होण्यात बराच काळ जात असतो, याच कारणामुळे त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

पाकिस्तानमधून दरवर्षी ८० हजार गाढवांची निर्यात केली जाते, पण सध्या कोरोनामुळे गाढवांची निर्यात मंदावली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

….म्हणून ‘सेट मॅक्स’वर सूर्यवंशम दाखवायचं कधीच बंद होणार नाही..!

Next Post

चीनने १९६२ मध्ये कुठलीही पूर्वसूचना न देता आपल्यावर ह*ल्ला केला होता

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

चीनने १९६२ मध्ये कुठलीही पूर्वसूचना न देता आपल्यावर ह*ल्ला केला होता

गलवान खोऱ्याचं नामकरण ज्याच्यावरून झालं तो गुलाम रसूल गलवान कोण होता?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.