The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय नोटेवर गांधीजींचा फोटो कधीपासून छापला जाऊ लागला?

by द पोस्टमन टीम
13 May 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


भारतीय जनता पार्टीचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मागे एकदा अशी मागणी केली होती की आपल्याला रुपयाची अवस्था सुधारायची असेल तर त्यावर असलेले महात्मा गांधी यांचे चित्र काढून हिंदू दैवत लक्ष्मीचे चित्र लावले पाहिजे. हा दावा जरी अवैज्ञानिक होता पण यामुळे नव्या वादाला तोंड फुटले.

तेव्हाच आपल्या भारतीय मुद्रेबद्दल बरेच प्रश्न निर्माण झाले. आज आपण ज्या नोटा हाताळतो आहे, त्यावर महात्मा गांधींचा फोटो कधी आला, याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल २२ वर्षं नोटांवर गांधीजींचा फोटो नव्हता. सर्वप्रथम भारताच्या एक रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधींचा फोटो छापण्यात आला.

भारतीय रिझर्व बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार १९४९ साली तत्कालीन भारत सरकारने भारतीय चलनी नोटांचे पहिले डिझाइन तयार केले. स्वतंत्र भारताचे प्रतिक असलेले एखादे चिन्ह त्या नोटेवर असावे यासाठी चर्चा सुरू झाली. सुरुवातीला आधीच्या नोटेवर असलेल्या किंग जॉर्जच्या फोटोऐवजी महात्मा गांधी यांचा फोटो लावला जाईल हे सुनिश्चित झाले होते आणि यासाठी एक डिझाइन देखील तयार करण्यात आले होते.



परंतु सर्व लोक यासाठी सहमत नव्हते. सरतेशेवटी किंग जॉर्ज यांच्या जागी अशोक स्तंभाची प्रतिमा लावली जाईल, असे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. याखेरीज चलनी नोटांच्या रचनेत विशेष बदल करण्यात आले नाही.

१९५० साली भारतीय गणराज्यात पहिल्यांदा दोन, पाच, दहा आणि शंभर रुपयांच्या नोटेचे अनावरण करण्यात आले. यापैकी एकाही नोटेवर गांधीजींचं चित्र नव्हतं.

यानंतर तब्बल २२ वर्षांनी गांधीजींचे चित्र १ रुपयाच्या नोटेवर छापण्यात आले. परंतु गांधीजींचा फोटो असलेल्या सर्व नोटा व्यवहारात यायला ४९ वर्षांचा कालावधी लागला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

गांधीजी पहिल्यांदा १९६९ मध्ये भारतीय चलनी नोटांवर आले. रिझर्व्ह बँकेने एक रुपयाची पहिली चलनी नोट महात्मा गांधींच्या शंभराव्या जयंतीनिमित्त फोटोसकट प्रकाशित केली. यात महात्मा गांधी यांना सेवाग्राम आश्रमाच्या समोर बसलेलं दाखवण्यात आलं होतं.

त्यानंतर १८ वर्षांनी महात्मा गांधींचं चित्र असलेली अजून एक नोट रिजर्व बँकेने छापली. १९८७ मध्ये पहिल्यांदा छापण्यात आलेली ही ५०० रुपयांची नोट १९९६ मध्ये बंद करण्यात आली.

१९९६ साली रिझर्व्ह बँकेने गांधीजींच्या फोटोसोबत नोटांची नवीन सिरीज काढली. त्या प्रत्येक नोटेवर गांधीजींचा फोटो अंकित होता. गांधीजींचा फोटो असलेल्या या नव्या नोटा, नव्या सुरक्षा चिन्हांसोबत छापण्यात आल्या. दृष्टिहीन लोकांना देखील नोटेची अनुभूती घेता येईल अशी छपाई करण्यात आली होती.

रिझर्व्ह बँकेने ह्या नोटेवर राष्ट्रपती भवनाच्या बाहेर १९४६ साली काढलेल्या फोटोचा भाग छापला आहे. हा फोटो म्हणजे एखादं व्यंगचित्र नसून एका फोटोतून घेण्यात आलेला भाग आहे जो राष्ट्रपती भवनाच्या बाहेर ब्रिटिश नेते फ्रेडरिक विलियम पँटीक लॉरेन्स यांच्या समवेत महात्मा गांधींनी काढला होता.

२०१४ साली मोदी सरकार सत्तेत आल्यावर नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो हटवण्याचा चर्चा सुरू झाल्या. तेव्हा तत्कालीन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेला संबोधित करताना जाहीर केले होते की,

महात्मा गांधी हे भारताचे प्रतीक आहेत. रिझर्व्ह बँकेच्या पॅनलने भारतीय नोटांवर महात्मा गांधींचाच फोटो असेल असा निर्णय घेतला असून इतर कुठल्याही नेत्याचा फोटो त्यावर छापला जाणार नाही.

तेव्हा जरी ह्या विषयावर पडदा पडला होता, तरी अधूनमधून इतर कोणाला स्थान देण्याचा चर्चा मात्र कायम सुरूच राहिल्या.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आपलं संविधान इतर देशांची कॉपी असल्याच्या आरोपावर काय म्हणाले होते बाबासाहेब?

Next Post

दुर्गाबाई देशमुखांच्या प्रयत्नामुळे भारतात कौटुंबिक न्यायालये सुरु झाली आहेत.

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

दुर्गाबाई देशमुखांच्या प्रयत्नामुळे भारतात कौटुंबिक न्यायालये सुरु झाली आहेत.

आणि म्हणून भारतीय फुटबॉल संघाला 'आशियाचा ब्राझील' म्हटलं जायचं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.