The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकदा चिकनच्या तुटवड्यामुळे KFC च्या ८० शाखांना टाळं लागला होतं..!

by Heramb
19 December 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मॅकडॉनल्ड्स, डॉमिनोज आणि अशाच अनेक फास्ट फूड जायंट्सच्या शाखांना टाळं ठोकायची वेळ आलेली तुम्ही कधी ऐकलंय का? कदाचित हे अतिशयोक्त वाटेल पण अशी घटना जगाच्या व्यावसायिक इतिहासात घडली आहे. २०१८ साली एका मोठ्या फास्ट-फूड चेनमधील रॉ-मटेरियलचा सप्लाय संपुष्टात आला, पण यावर बहुतेक लोकांचा विश्वासच बसला नाही. यावेळी केएफसीच्या इंग्लंडमधील शाखांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला होता. चिकनचा पुरवठा करणारा कंत्राटदार इंग्लंडमधील ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणावरील मागणीची पूर्तता करू शकला नाही.

चिकनचा पुरवठा बंद झाल्याने २०१८ च्या पहिल्या तीन महिन्यांत ब्रिटनमधील केएफसीच्या ८० पेक्षा जास्त शाखा बंद करण्यात आल्या. केएफसीमध्ये मिळणाऱ्या चिकनच्या डीशेस जगप्रसिद्ध आहेत. तिथे मिळणाऱ्या चिकनची चव जगातील बहुतेक लोकांच्या जिभेवर रेंगाळत असते. त्यामुळे केएफसीमधील खाद्यपदार्थ अचानक बंद झाल्याने संतप्त ग्राहकांनी केएफसीच्या काही शाखांमध्ये तोडफोड देखील केली.

या सगळ्या गोंधळामध्ये केएफसीच्या मार्केटिंग टीमला इंग्लंडमधील ग्राहक चिकनसाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. आधीच्या चिकन कंत्राटदाराने वेळेत पुरवठा न केल्याने त्याच्याकडील कंत्राट काढून घेण्यात आले आणि नव्या कंत्राटदाराला चिकनचे कंत्राट देण्यात येणार होते. पण ही प्रक्रिया बरीच वेळखाऊ होती हे केएफसीमधील प्रत्येक कर्मचाऱ्याला माहित होते.

ज्यावेळी कंपन्यांसमोर समस्या उभ्या राहतात, तेव्हा न्यूनगंडाच्या भावनेने अनेक कंपन्या वस्तुस्थिती लपविण्याचा प्रयत्न करतात. निदान व्यवसायाच्या बाबतीत तरी आपली चूक कबूल करण्यात कोणताही कमीपणा नसतो, त्यानुसारच केएफसीने देखील आपल्या ग्राहकांचा मन राखण्यासाठी आपली चूक कबूल केली. चिकनच्या प्रचंड तुटवड्यामुळे केएफसीचे लॉयल कस्टमर्ससुद्धा तुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण केएफसीने आपली चूक अतिशय सभ्य शब्दांतून मान्य करून या समस्येतून एक मार्ग शोधला.

सप्लाय चेनची समस्या सुटेपर्यंत ग्राहकांसाठी मार्केटमध्ये काहीतरी नवीन घेऊन यावे यासाठी मार्केटिंग टीमने एका जाहिरात मोहिमेवर काम करण्यास सुरुवात केली. यावेळी केएफसीच्या मार्केटिंग टीमने न भूतो न भविष्यती अशी युक्ती वापरली. चिकनची गरज लागणार नाही अशा शाकाहारी फास्टफूडची सुरुवात यावेळी केएफसीने केली होती. नेहमीच केएफसीचे चिकन बर्गर खाणाऱ्या व्यक्तीला हे निश्चितच आवडणार नव्हते. पण त्यांनी ११ औषधी वनस्पती आणि मसाल्यांनी बनवलेले ‘चिकन फ्री’ बर्गर सुरु केले.

‘चिकन फ्री’ बर्गर चिकन बर्गरसारखेच दिसते आणि अनेक रिव्ह्यूजनुसार, त्याची चव चिकन बर्गरसारखीच होती. पण काहीही झालं तरी ते “चिकन फ्री” बर्गर आहे हे लोकांना माहित होतं. त्यामुळे त्यांना पाहिजे ते मिळत नव्हतं. थोडक्यात आणि स्पष्टपणे सांगायचं झाल्यास त्यांना केएफसीकडून हवे तसे पदार्थ अजिबात मिळत नव्हते. केएफसीच्या मार्केटिंग टीमने कठोर परिश्रम आणि अविश्वसनीय मार्केटिंग टेक्निक्स वापरून ब्रिटनमधील केएफसी वाचवण्याचा प्रयत्न केला. पण कोणताही व्यावसायिक किंवा मार्केटिंग एक्सपर्ट एखाद्या गोष्टीबद्दल विशेषतः खाद्यपदार्थाबद्दल ग्राहकांची धारणा बदलू शकत नाही.



उत्पादनांचे अतिशयोक्त वर्णन करणाऱ्या शब्दांच्या सहाय्याने कोणताही मार्केटिंग एक्सपर्ट एका झटक्यात ग्राहकाची धारणा बदलू शकत नाही. मार्केटिंगच्या या गोष्टी नव्वदच्या दशकात सहजपणे चालत असत, पण आता तो काळ राहिला नाही. एकविसाव्या शतकातील ग्राहक या सर्व गोष्टींबद्दल अधिक जागरूक आहेत. एखाद्या ब्रॅण्डच्या क्वालिटीमध्ये झालेला बदल आजचा ग्राहक एका झटक्यात ओळखू शकतो.

मार्केटिंग टीमने ज्या प्रकारे ग्राहकांच्या आवडीनिवडी टिकवण्यासाठी आणि आपली व्हॅल्यू कमी होऊ न देण्याचे अनेक प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी फक्त सर्वोत्तम पर्यायाचाच अवलंब केला नाही तर आपल्या ग्राहकांप्रती निष्ठा ठेऊन सत्य परिस्थिती, किंबहुना अपयशही मान्य केले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

केएफसीला तीन महिन्यांनंतर जास्त मागणी हाताळू शकणारा चिकनचा एक नवीन पुरवठादार सापडला तेव्हा परस्थिती सुधारली. पण दुर्दैवाने या काळात केएफसीने अनेक ग्राहक गमावले. पण आता सर्व शाखा पुन्हा उघडल्यानंतर त्या सर्व शाखांचा व्यवसाय तेजीत सुरु आहे आणि त्यांनी आपले झालेले नुकसान यशस्वीपणे भरूनही काढले आहे.

जेव्हा एखादी कंपनी केएफसीसारख्या कठीण परिस्थितीत असते तेव्हा मार्केटिंग टीम अशा प्रकारे महत्वाची ठरते. एखाद्या गोष्टीचा पुरवठा बाजारपेठेत कमी झाल्यास सर्व पर्यायांचा विचार व्हायला हवा. 


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सरकार स्थापन करून वर्षही झालं नाही आणि तालिबान सरकार जगभर पैसे मागत फिरत आहे

Next Post

क्रेडिट कार्ड, युपीआयच्या जमान्यातसुद्धा बँक नोट्सचा इतिहास तेवढाच महत्वाचा आहे..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

क्रेडिट कार्ड, युपीआयच्या जमान्यातसुद्धा बँक नोट्सचा इतिहास तेवढाच महत्वाचा आहे..!

आणि तेव्हा अमेरिकन लोकांवर स्वतःच्या पोटच्या मुलांना विकण्याची वेळ आली होती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.