The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रिप्टो करन्सी जुन्या झाल्या, मार्केटमध्ये नवीन गोष्ट आलीये ती म्हणजे NFT..!

by द पोस्टमन टीम
21 November 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


तुम्ही टेक्नॉलॉजीशी संबंधित बातम्या, अपडेट्स यांचे नियमित वाचक असाल तर क्रिप्टो करन्सी, बिटकॉइन यांसारखे शब्द नक्कीच तुमच्या डोळ्यांखालून गेले असतील. गेल्या काही वर्षांपासून तर हे शब्द जास्तच ऐकू येत आहेत. असाच एक प्रांत म्हणजे एन एफ टी अर्थात नॉन फंजीबल टोकन. हे एन एफ टी म्हणजे नक्की काय आहे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा..

सोप्या शब्दात सांगायचे तर एन एफ टी ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे, जी प्रत्यक्ष जगात अस्तित्वात असलेल्या कला, संगीत, गेम्स, व्हिडिओज यांसारख्या गोष्टींचे डिजिटल स्वरूप मानली जाते. एन एफ टीला रिप्लेसमेंट किंवा बदली पर्याय अस्तित्वात नाही. म्हणून त्याचे नाव नॉन फंजीबल टोकन. त्याआधी फंजीबल या शब्दाचा अर्थ माहिती असायला हवा.

फंजीबल म्हणजे ज्या गोष्टीच्या ऐवजी तितक्याच किमतीची दुसरी गोष्ट अस्तित्वात असते किंवा वापरता येते अशी गोष्ट. उदाहरणार्थ २० रुपयांची नोट हे फंजीबल टोकन आहे. कारण वीस रुपयांच्या नोटेच्या बदल्यात तुम्हाला दहा रुपयांच्या दोन नोटा घेता येतात. यात त्या पैशाचे मूल्य कायम राहते. तीच गोष्ट सोने, शेअर्स यांसारख्या मालमत्तांची. यातही एक देऊन त्याच किमतीचे दुसरे घेता येते.

पण एखादे पेंटिंग किंवा एखादा युनिक क्षण टिपणारा फोटो किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे ट्विट, एखाद्या संगीतकाराची पहिली हिट संगीतरचना या गोष्टी अशा आहेत, ज्यांना बदली पर्याय नाही. या गोष्टी ‘युनिक’ या सदरात मोडतात. जरी चित्राची किंवा फोटोची डुप्लिकेट काढली तरी ती ‘कॉपी’ असते; ‘ओरिजिनल’ कधीच नसते. त्यामुळे तिचे मूल्यही ओरिजिनल गोष्टीइतके नसते. अशा ओरिजिनल गोष्टी नॉन फंजीबल म्हणून ओळखल्या जातात.

या प्रकारच्या गोष्टीची खरेदी-विक्री ऑनलाइन होते आणि त्यासाठी क्रिप्टो करन्सीचा वापर केला जातो. आता ही क्रिप्टो करन्सी म्हणजे काय? क्रिप्टो करन्सी हा शब्द आजकाल सर्वत्र ऐकू येतो. क्रिप्टो करन्सी हे एक प्रकारचे “आभासी चलन” आहे. यामध्ये विशिष्ट फॉरमॅट असलेल्या डिजिटल फाइल्स चलन म्हणून वापरल्या जातात. या फाइल्स क्रिप्टोग्राफी तंत्राचा वापर करून तयार केलेल्या असतात आणि त्यामध्ये विशिष्ट प्रकारची डिजिटल सिग्नेचर वापरलेली असते. त्यामुळे हे व्यवहार सुरक्षित ठेवले जातात आणि ते खरे आहेत की नाही हे इतरांना तपासून पाहता येते. तर हे झाले क्रिप्टो करन्सी बद्दल.



आता आपण परत वळू आपल्या मूळ विषयाकडे, म्हणजेच एन एफ टी कडे. तसे पाहिले तर एन एफ टी २०१४ पासून वापरात आहे. पण आजकाल ‘डिजिटल आर्ट वर्क’ची खरेदी आणि विक्री करण्यासाठी एन एफ टी हा मार्ग चांगलाच लोकप्रिय झाला आहे. एका अंदाजानुसार, नोव्हेंबर २०१७ पासून मे २०२१ पर्यंत ‘एन एफ टी’वर १७४ मिलियन डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. पण एन एफ टी एवढी लोकप्रिय होण्यामागे नक्की काय कारणे आहेत?

‘एन एफ टी’च्या मदतीने प्रत्येक डिजिटल आर्टिस्ट आपल्या कामावर स्वतःची सही करू शकतो. त्यामुळे एन एफ टी हा आर्टिस्टला त्याच्या आर्टवर्कसाठी मालकी हक्क मिळवून देणारा सुरक्षित मार्ग समजला जातो. याचा अर्थ असा नाही, की त्या आर्टवर्कची कॉपी कुणी करू शकणार नाही, पण त्या कॉपीवर ते आपलेच काम आहे असा दावा कुणालाही करता येणार नाही. पुढे या ‘ओरिजिनल’ आर्टवर्कला एखाद्या आर्ट कलेक्टर किंवा संग्राहकाने खरेदी केले तर ते अस्सल आहे की डुप्लिकेट हे डिजिटल सिग्नेचरच्या साहाय्याने पडताळून पाहता येते आणि त्याच्या मूळ निर्मात्यालाच त्याचा मोबदला मिळतो.

एन एफ टी ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली जातात. ब्लॉकचेन तंत्रज्ञान समजायला क्लिष्ट असले तरी त्यामागची कल्पना अतिशय साधीसोपी आहे. ती म्हणजे यात कोणत्याही प्रकारची माहिती साठवताना ती एकाच ठिकाणी न साठवता विकेंद्रित स्वरूपात अनेक ठिकाणी साठवली जाते, जेणेकरून ती माहिती कुणा एका व्यक्तीला मॅनिप्युलेट किंवा नियंत्रित करता येणार नाही.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

ब्लॉकचेनमध्ये एन एफ टी शी संबंधित सर्व व्यवहारांची नोंद ठेवली जाते. प्रत्येक एन एफ टी हे ब्लॉकचेनवर एक विशिष्ट आयडेंटिफिकेशन कोड आणि मेटाडाटा यांच्यासह साठवले जाते. यामुळे प्रत्येक एन एफ टी बोटांच्या ठशांप्रमाणे युनिक असते. येथे मेटाडाटा म्हणजे त्या एन एफ टी बद्दल ची माहिती साठवलेला माहितीचा तुकडा.

ज्याप्रकारे एन एफ टी डिजिटल आर्टिस्ट्सना त्यांच्या आर्टवर्कवरील मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी उपयुक्त आहे, त्याचप्रमाणे ते कला संग्राहक किंवा आर्ट कलेक्टर लोकांसाठीही महत्त्वाचे आहे. कला संग्राहकांसाठी एन एफ टी हे त्यांनी खरेदी केलेल्या आर्टवर्कसाठी पावतीसारखे काम करते. याआधी अशा प्रकारचे डिजिटल असेट्स सहजगत्या चोरी करता येत असत. इंटरनेटवर अशाप्रकारे फोटोज, व्हिडिओज, लेख उचलून ते आपले म्हणून खपवणारे महाभाग असंख्य आहेत. या सगळ्यांवर एन एफ टी च्या मदतीने नियंत्रण आणणे शक्य आहे.

एन एफ टी व्यवहारांची दुसरी बाजूही लक्षात घ्यायला हवी. आजकाल अनेकजण यात गुंतवणूक करू पाहत आहेत. पण ही बाजारपेठ फसवी आहे. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एन एफ टी फायदेशीर नाही. याशिवाय जरी एन एफ टी मुळे निर्मात्यांकडे मालकीचा पुरावा राहत असला तरी त्यांची कॉपी आणि चोरीही होऊ शकते.

अजून एक महत्त्वाचे म्हणजे ब्लॉकचेनमध्ये रेकॉर्ड्सची एंट्री करण्यासाठी आणि त्याच्या डेटाबेसचे विश्लेषण करण्यासाठी प्रचंड प्रमाणात कॉम्प्युटर पॉवर गरजेची असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्युत ऊर्जा वापरली जाते. याशिवाय बिटकॉइनसारख्या नेटवर्कमुळे दरवर्षी सुमारे ११.५ किलो टन एवढा इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण होत आहे.

एकंदरीत, एन एफ टी ही बदलत्या जगाची नांदी म्हणायला हरकत नाही. प्रत्येक गोष्टीला चांगली वाईट बाजू असते तसेच एन एफ टी च्या बाबतीतही आहे. आता याचा वापर कसा होतो यावरच त्याचे भवितव्य अवलंबून असेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

वेगळ्या मणिपूर देशाची मागणी करणाऱ्या संघटना काय आहेत..?

Next Post

भारतीय संघातील खेळाडूंना BCCIने ‘हलाल’ मांस कंपल्सरी केलंय..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

भारतीय संघातील खेळाडूंना BCCIने 'हलाल' मांस कंपल्सरी केलंय..!

...म्हणून 'किम जोंग' सारखा नेता कुठल्याच देशाला मिळू नये..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.