The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेत येणारे हे ‘चिनुक वारे’ एकाच दिवसात फूटभर बर्फ वितळवतात

by द पोस्टमन टीम
30 June 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आपल्या आजूबाजूला हवा असते मात्र, जोपर्यंत तीचं रुपांतर सोसाट्याच्या वाऱ्यात होत नाही तोपर्यंत तीचं अस्तित्व आपल्याला दिसत नाही. वातावरणातील बदलांचा हवेवर परिणाम होऊन वारा तयार होतो. जगभरात अक्षांशानुसार वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या प्रकारचे वारे वाहत असतात. व्यापारी वारे, गरजणारे चाळीस, ध्रुवीय वारे, पूर्वीय वारे, खारे वारे, मतलई वारे असे काही वाऱ्यांचे प्रकार आपण शाळेत असताना शिकलो आहोत. मात्र, याशिवाय देखील वाऱ्यांचे असंख्य प्रकार आहेत. विशिष्ट ठिकाणी असलेल्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीचा परिणाम म्हणून असे काही वाऱ्यांचे प्रकार तयार होतात.

‘चिनूक वारे’ हा असाच एक प्रकार आहे. हे वारे कसे आणि कुठे तयार होतात? त्यांच्या वातावरणावर आणि मानवी जीवनावर काय परिणाम होतात? याबाबत आपण जाणून घेऊया.

चिनूक वारे ही एक हवामान बदलाची घटना आहे. पर्वत रांगांच्या पायथ्याला असलेल्या कोरड्या, उबदार, उच्च-दाबाच्या हवेमध्ये बदल होऊन या वाऱ्यांची निर्मिती होते. साधारणपणे हिवाळ्यात हे वारे तापमानात विलक्षण वाढ होण्यास कारणीभूत ठरतात.

चिनूक वाऱ्यांच्या निर्मितीसाठी दोनच गोष्टींची आवश्यकता असते एक म्हणजे आर्द्रता असलेली समुद्राची हवा आणि दुसरी म्हणजे पर्वत. पॅसिफिक महासागराच्या बाजूनं रॉकीज पर्वतच्या पश्चिमेला अशा प्रकाराचे वारे तयार होतात.

पॅसिफिक महासागरावरून येणारी आर्द्र हवा रॉकीज पर्वतावर चढते. जसजशी ही हवा पर्वताच्या शिखराकडे सरकते तसतशी ती थंड होते आणि तिचं रुपांतर पर्जन्यवृष्टी किंवा बर्फात होतं. त्यामुळे रॉकीजच्या पश्चिम भागात आपल्याला बर्फ आढळतो. जेव्हा ही हवा रॉकीच्या एकदम शिखरावर जाते तेव्हा ती थंड पण कोरडी असते.



पर्वताच्या दुसऱ्या बाजूला ही हवा पोहचते तेव्हा ती थंड असते आणि रात्रीच्या वेळी तीची घनता कमालीची जास्त होते. पर्वतापासून जसं आपण दूर जाऊ तशी हवा उबदार आणि विरळ होत जाते. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण वातावरणावर मोठा परिणाम करतं. गुरुत्वाकर्षणामुळं पॅसिफिकवरुन येणारी हवा पर्वताच्या पूर्वेकडच्या उतारावर खेचली जाते. मात्र, जोपर्यंत ही हवा पूर्वेकडील भागात जाते तोपर्यंत त्यातून आर्द्रता पूर्णपणे संपलेली असते.

पर्वत माथ्यावरून खाली येणारी कोरडी, थंड व जास्त घनता असलेली हवा आणि पाथ्यालगत असणारी उबदार हवा एकत्र झाल्यानं मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. भारतीय उपखंडासारख्या प्रदेशात ही उष्णता फारशी वाटत नाही.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

मात्र, रॉकी पर्वताच्या समुद्रसपाटीपासून असणाऱ्या १४ हजार ४४० फूट उंचीचा विचार करता ही उष्णता नक्कीच जास्त असते. या बदलांमुळेच जे वारे तयार होतात त्यांना ‘चिनूक वारे’ म्हणतात.

कॅनडातील अल्बर्टा प्रांताच्या दक्षिणेकडील भागातील लोक वर्षभरात ३० ते ३५ वेळा चिनूक वाऱ्यांचा सामना करतात. चिनूक वारे काही तास किंवा काही दिवस सक्रीय राहू शकतात. १९६२ मध्ये कॅनडातील पिनचर क्रिक येथे अवघ्या एका तासात पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वरती गेला होता. आतापर्यंत चिनूकमुळे झालेली ही सर्वांत मोठी तापमान वाढ आहे.

पॅसिफिक महासागराच्या जवळ आणि कोलंबिया नदीच्या काठावर ‘चिनूक’ नावाची आदिवासी जमात राहते. त्यावरून या वाऱ्यांना चिनूक असं म्हटलं जातं. यातील काही ओरेगॉन आणि वॉशिंग्टनमध्ये देखील वास्तव्यास आहेत. याच वाऱ्यांना ‘ब्लॅकफूट’ लोक ‘स्नो इटर’ असं म्हणतात. कारण चिनूक वारा एकाच दिवसात एक फूट बर्फ वितळवू शकतो.

रॉकीज पर्वतीय प्रदेश वगळता इतर ठिकाणी देखील चिनूक वारे आढळतात फक्त त्याला नावं वेगळी आहेत. युरोपच्या आल्प्समध्ये चिनूकला ‘फॉन’ किंवा ‘फोहेन’ असं म्हणतात. मध्य आशियात त्यांना ‘अफगानेट’ म्हटलं जातं. दक्षिण अमेरिकेतील अँडिज पर्वतांमध्ये त्यांना ‘पुलेचे’ म्हणतात. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये या वाऱ्यांना ‘सांता अ‌ॅन’ असं म्हणतात.

चिनूक वाऱ्यांच्या उत्पत्ती विषयी अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. एला ए क्लार्क यांनी आपल्या ‘इंडियन लिजंड्स ऑफ द नॉदर्न रॉकिज’ पुस्तकात एका कथेचा संदर्भ दिला आहे.

‘द क्रिएटिव्ह हाय मिस्ट्री’ने थंडरबर्डला (उत्तर अमेरिका खंडातील स्थानिक आदिवासी लोक या पक्षाला देवता मानतात) मिशन रेंजमधील उत्तर ‘क्रो क्रिक कॅनन’चा एक भाग दिला होता. तिने त्याठिकाणी आपलं कुटुंब वाढवलं. एक दिवस एक निष्काळजी शिकारी आपली शेकोटी न विझवताचं निघून गेला.

त्यानंतर त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली व थंडरबर्डचं सर्व कुटुंब नष्ट झालं. संतप्त झालेल्या थंडरबर्डनं थंड ईशान्य वारा पाठवून ‘सालिश’ लोकांना शिक्षा केली. थंडीमुळं संपूर्ण खोरं ओसाड झालं.

बरेच हिवाळे गेल्यानंतर थंडरबर्डनं खोऱ्यातून पळवून लावलेल्या लोकांवर दया दाखवली. थंडरबर्डनं ईशान्य वाऱ्याला निघून जाण्यास सांगितलं. त्यानंतर सालिश लोकांच्या सरदारानं त्यांच्या जागेला पूर्वीप्रमाणं उबदार करण्यासाठी ‘कोयटो’(उत्तर अमेरिकेतील कुत्र्यांची एक प्रजात)ला सल्ला विचारला. कोयटोनं त्यांना मदत करण्यास नकार दिला मात्र, थंडरबर्डच्या ‘ब्लूजे’ या मुलीनं सालिश लोकांना मदत केली. तिने चिनूक वाऱ्याला सालिश लोकांच्या मदतीसाठी बोलावलं. उबदार चिनूक वाऱ्यांमुळं सालिश लोकांचं जीवन पुन्हा रुळावर आलं

दक्षिण-पूर्व वायोमिंग आणि कोलोरॅडोच्या पायथ्याला असलेल्या लोकांना नियमितपणे चिनूक वाऱ्यांचा सामना करावा लागतो. जानेवारी १९८२मध्ये चिनूकमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. १७ आणि २४ जानेवारी कोलोरॅडोच्या बोल्डरभागात चिनूक वाऱ्यांमुळे चक्रीवादळ आलं होतं. EF1 आणि EF2 दोन मध्यम आकाराची चक्रीवादळं आहेत. यामध्ये वाऱ्यांचा ताशी वेग अनुक्रमे ८६-११० मैल आणि १११-१३५ असतो. बोल्डरमध्ये चिनूक वाऱ्यांमुळं झालेलं नुकसान हे या दोन्ही चक्रीवादळांप्रमाणं होतं.

बोल्डरमधील जवळपास ४० टक्के इमारतींचं नुकसान झालं होतं. ५० टक्के लोकांनी काही दिवस आपली घरे सोडून दुसरीकडे निवारा शोधला होता. बोल्डर महानगरपालिकेच्या विमानतळावरील वीस छोट्या विमानांचं नुकसान झालं होतं. हजारो इलेक्ट्रिसिटी पोल उन्मळून पडल्यानं कित्येक दिवस शहराचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. बोल्डर काउंटीमधील हजारो एकर शेतजमिनीवरील पीकं भुईसपाट झाली होती.

१९९२मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार मायग्रेनचे १३ रूग्ण आणि चिनूकमध्ये दीर्घकालीन संबंध आढळला होता. मात्र, त्याबाबत जास्त काही पुरावे मिळाले नाहीत. २००२मध्ये देखील स्ट्रोकचा अभ्यास करताना चिनूक वारे आणि स्ट्रोक्सचा संबंध तपासला गेला होता. मात्र, त्यांच्यात कोणताही संबंध आढळला नाही. न्यूझीलंडमध्ये १९९९ साली झालेल्या अभ्यासानुसार एसआयडीएस(सडन इन्फन्ट डेथ सिंड्रोम) आणि फॉन वारे यांच्यातील संबंध तपासला गेला. यासाठी क्राइस्टचर्चमधील एसआयडीएसच्या ६४६ केसेस तपासल्या गेल्या. बालकांच्या मृत्यूंमागे काही पर्यावरणीय घटक असल्याचं स्पष्ट झालं होतं मात्र, फॉनचा थेट संबंध आढळला नव्हता.

पर्यावरणातील प्रत्येक घटक मानवी जीवनावर किती तरी चांगले-वाईट परिणाम करतात. चिनूक वारे हा देखील असाच एक घटक आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या दोन स्त्रियांनी देखील टाइम ट्रॅव्हल केल्याचा दावा केला होता, त्यावर पुस्तकही लिहलंय..!

Next Post

हि*टल*रने देऊ केलेला मानसन्मान लाथाडून ध्यानचंद यांनी भारतातली उपेक्षा स्वीकारली

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

हि*टल*रने देऊ केलेला मानसन्मान लाथाडून ध्यानचंद यांनी भारतातली उपेक्षा स्वीकारली

काय सांगता..? अमेरिकेत चक्क कुमार सानू दिवस साजरा केला जातो..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.